विषयः अर्धसैनिक दल (Paramilitary Forces) आणि चकमकी
पुलवामा असो, दंतेवाडा, बस्तर वा सुखमा याठिकाणी चकमकीत धारातिर्थी पडतात ते फक्त अर्धसैनिक दलाचे जवान! मग देशभरात एक प्रचंड दुःखाची लाट येते आणि हा हा म्हणता ओसरते. मग पुढील घटना घडेपर्यंत सगळीकडे शांतता!
१
+👇
अर्धसैनिक दलात अत्यंत तुटपुंजं वेतन असतं. म्हणून सामान्यतः यात भरती होणारे तरुण हे शेतकरी, कष्टकरी समाजातील असतात. अर्धसैनिक दल म्हणजे लष्कर नव्हे. त्यामुळे एखाद्या लष्करी सैनिकाला मिळणारा पगार आणि एका अर्धसैनिक दलातील जवानाचं वेतन यात जमीनआस्मानाचं अंतर असतं.
२
+👇
अर्धसैनिक दलातील जवानांचं प्रशिक्षण व कामगिरी, लष्करी जवानांच्या तोडीस तोड असते. तरीही अर्धसैनिक दलातील जवान पगाराची ठराविक रक्कम वगळता इतर भत्ते, सुविधा,निवृत्ती वेतन या लाभांपासून कायमच वंचित असतात/आहेत.
३
+👇
भारतीय लष्करातील जवान, अर्धसैनिक दलातील जवानापेक्षा दीड पट अधिक वेतन घेतो. या दोघांच्या पगारातील ही तफावत बरीच बोलकी आहे. तरीही देशभरात होणार्या दहशतवादी, नक्षलवादी, दंगल सदृश्य चकमकीत ठार होण्याचं अर्धसैनिक दल जवानांचं प्रमाण सर्वाधिक आहे.
४
+👇
अर्धसैनिक दलातील धारातिर्थी पडलेल्या जवानाला तुम्ही, आम्ही किंवा नेते, माध्यमं जरी "शहीद" म्हणत असलो तरी सरकारी कागदोपत्री त्यांना तो दर्जा मिळत नाही. तिथे त्यांचा अमुकतमुक चकमकीतील "मृत" एवढाच उल्लेख असतो, ही वस्तुस्थिती आहे.
५
+👇
अर्धसैनिक दलातील मृत जवानांमागे त्यांचं कुटुंब पोरकं होतं. बरेचदा त्यांना मदतीची पॅकेजेस् जाहीर केली जातात. परंतु त्यातली किती त्यांच्या नातेवाईकांना मिळतात, हा कायमच संशोधनाचा विषय राहिलाय.
६
+👇
काही दिवस निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, या जवानांच्या कुटुंबियांच्या आयुष्यातील अंधार दूर करु शकत नाही. प्रत्येकवेळी अर्धसैनिक दलाबाबतच गुप्तवार्ता विभागाचं पितळ उघडं पडतं. आता तर या खरंच चकमकी असतात की घातपात, याबाबतही लोकांमध्ये संभ्रम आहे.
७
+👇
बालाकोट हल्ल्यात ३०० दहशतवादी मारले गेले म्हणून सरकारने शेखी मिरवली. परंतु पुलवामा हल्ल्यातील एका शहीद पत्नीने जेव्हा, "आमच्या माणसांच्या छिन्नविछिन्न मृतदेहांसारखे दहशतवाद्यांचे मुडदे कुठे दिसले नाहीत ते?" असा प्रश्न उपस्थित केला असता सगळ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
८
+👇
बरं, निवडणुका आणि अशाप्रकारच्या चकमकी यांचं काय साटंलोटं आहे, कोणास ठाऊक? पण दबक्या आवाजात केल्या जाणार्या या चर्चांना प्रमाण मिळू लागल्याने अधिकच उठावदार होताना दिसतात. पुढे सगळी सामसूम आणि निवडणुका जाहीर होताच लोकांचा याबाबत सूर लागणं, आता नेहमीच झालंय.
९
+👇
अशा घटना वारंवार घडू लागल्यानं एकतर त्यांची धार बोथट होते किंवा संशयाचं धुकं अधिकच गडद होत जातं. गेलेल्या माणसाला परत आणता येत नाही. किरकोळ पगारात देशसेवा करताना मृत्यूमुखी पडलेल्या जवानांची महती गाण्यापेक्षा त्यांच्या जिविताची काळजी घेणं, अधिक गरजेचं आहे.
१०
+👇
सैनिकीपेशाला कोणी कितीही देशप्रेमाची लेबलं लावू देत, पण वास्तव पूर्णतः वेगळं असतं. वास्तविक पाहता "गरीबी" हा मुद्दा इथे ठळकपणे अधोरेखित करावा लागेल. नोकरी, पगार व त्या अनुषंगाने घरात येणार्या किंचितश्या सुबत्तेमुळे बरीच तरुण मुलं अर्धसैनिक दलात भरती होतात.
११
+👇
आतासं मरण इतकं स्वस्त झालंय, की त्याला असा सैनिकी दिमाख प्राप्त झाला की लोकांच्या मनातील राष्ट्रवाद चुटकीसरशी जागा होतो आणि लोकशाहीतील अदृश्य सत्ता सिंहासन दृष्टिपथात येतं. कोणाच्या तरी चितेवरील राखेवर कोणाची तरी सत्तेची बाग मोहरुन उठते.
१२
+👇
राहत इंदौरींच्या शब्दांत सांगायचं झाल्यास.....
सरहद पे तनाव हैं क्या?
पता करो चुनाव हैं क्या?
१३
समाप्त 🙏
--- दुर्गा
०५.०४.२०२१
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
लोकसभेच्या वेळी राज ठाकरे "लाव रे तो व्हिडिओ" माध्यमातून सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते. तेव्हा कोणी विचार तरी केला होता का, की पुढे जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस मिळून सत्ता स्थापन करतील. त्याकाळात राज व साहेबांच्या मैत्रीची पारायणं केली जात.
+👇
१
त्यावेळी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या समर्थकांनी राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन नाचायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. पुढे राज ठाकरे भाजपच्या बाजूला झुकले, तर त्याचा एवढा गवगवा, इतका रागराग का केला गेला वा अजूनही केला जातोय. राज ठाकरेंना आपलं राजकारण करु द्यात की👍 अडचण काय आहे.
+👇
२
राज ठाकरेंच्या राजकारणाचं पुढे काय होईल, न होईल, हे त्यांचं ते बघतील की, तुम्ही का उगं अंगाची लाही लाही करुन घेत आहात. तसंही बाहेर निसर्ग आग ओकतोय, तेवढं पुरेसं नाही का? तुमचे नेते जर खरोखरीच पावरबाज असतील, तर फिकर नाॅट! तुम्हाला इतकं तणतणायची काही गरज नाही. बरोबर ना?
+👇
३
शासनातील भ्रष्टाचार हे हिमनगाच्या टोकासारखे असतात. किंचीतश्या टोकाच्या दर्शनाने जनता हक्काबक्का होते, असा गरीब बापड्या राजकारण्यांचा समज असतो. लोणचं जसं मुरतं, तसा भ्रष्टाचार खोलपर्यंत मुरलेला आहे, हे चलाख जनता चांगलंच जाणते.
+👇
१/१४
आता या गोष्टी पासून कोणी अनभिज्ञ असेल, तर समजा त्याचे दुधाचे दात अजूनही पडलेले नाहीत. लोक एकतर खरंच दुधखुळे असतील किंवा राजकारण्यांनी लोकांबद्दल तसा समज करुन घेतला असावा. कालचा अख्खा दिवस, वेगवेगळ्या राजकारण्यांनी भ्रष्टाचारावर चर्वितचर्वण करण्यात घालवला.
+👇
२/१४
अबब! काय ते खंडणीचे आकडे आणि त्या पैशांच्या राशी कोणासमोर ओतल्या जाणार म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुफान गदारोळ! म्हणजे असलं अब्रमण्यम राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडतंय की काय? असं वाटण्याजोगी स्थिती! थोडक्यात, ऐतिहासिक घटनाच जणू!
शेतकरी आंदोलनाला दोन महिने होतील. या दोन महिन्यांत शेतकर्यांचा संयम कौतुकास्पद! सरकार, गोदी मिडीया, भाजप आयटी सेल, व्हाॅटस् अप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाविरोधात सगळ्या प्रकारची गरळ ओकून झाली.
१/१९
+👇
अशा परिस्थितीतही शेतकरी आपल्या निर्णयाबाबत ठाम राहिले. सरकारच्या साम, दाम, दंड, भेदाविरोधात उभं राहणं, कधीच सोपं नव्हतं. म्हणूनच शेतकर्यांचं विशेष अभिनंदन!शेतकरी आंदोलन...
Divert & Rule,
Divide & Rule,
Defame & Rule
असं तीन प्रकारे तोडण्याचा यत्न झाला.
२/१९
+👇
Divert & Rule : सरकारमधील नेते व प्रवक्ते यांनी शेतकर्यांना पाकिस्तानी, खलिस्तानी, चायनीज एजंट, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्सल या आणि अशा अनेक उपाध्या देऊन आंदोलन बदनाम करण्याचं कुंभांड रचलं गेलं. परंतु शेतकरी याला पुरुन उरले आणि आंदोलन अधिक तेजाने तळपू लागलं.
३/१९
+👇
कालपासून धारावीतील कोरोना नियंत्रण, संघ स्वयंसेवकांचं काम, WHO कडून शाब्बासकी, असं बरंच काही वाचनात आलं. त्यावरुन बरेच वादंगही होत आहेत. अशावेळी भाईंदर पश्चिमेकडील धारावी आठवली. ही धारावी म्हणजे "धारावी देवी"चं स्थान!
+👇
इथे देवीला कोंबड्या, बकरे इ.चा नैवेद्य चढविला जातो. अर्थात बळी दिला जातो. या धारावीला लागूनच डोंगरी आहे. इथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा, केशवसृष्टी, रामरतन विद्यामंदिर, असं बरंच काही आहे. या शहराची महानगरपालिका (MBMC) व महापौर भाजपचा आहे.
+👇
तेव्हा कालपासून गाजत असलेलं "धारावी" हे ठिकाण बहुतेक इथलं असू शकतं.😄 नामसार्धम्यामुळे असं झालं असावं. नीट खात्री करुन घ्यावी. उगीच कोरोना काळात श्रेयवादाच्या लढाईवरुन वादंग नको.😉😝 तर सांगायची गोष्ट अशी, की भाईंदर शहरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे.
+👇
जुन्या मुंबईतील कामगारबहुल भाग आणि आत्ताच्या मुंबईचा एक श्रीमंत भाग म्हणजे लालबाग! बस, रेल्वे, मोनोरेल मार्गे पश्चिमेकडे कुलाब्यापासून दहिसर व पूर्वेकडे मुलुंडपर्यंत जोडला गेलेला हा विभाग म्हणजे गणेशोत्सवाची पंढरीच जणू!
+👇
अनेक नामांकित गणेशोत्सव मंडळांची इथे मांदियाळी! पैकी गणेश गल्ली, लालबागचा राजा व चिंचपोकळी (चिंतामणी) ही तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सगळ्यात जास्त प्रसिद्ध! यातही पुन्हा लालबागचा राजा हा मानबिंदू! लालबागमध्ये पारशी लोकांची "हिल्ला टाॅवर" व अग्यारी देखील तितकीच ख्यातनाम!
+👇
थोडक्यात सांगायचं, तर लालबाग बहुभाषिक सुध्दा आहे. अशा या लालबागमध्ये शिवसेनेच्या उदयापूर्वी काॅम्रेड कृष्णा देसाई व त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीची निरंकुश सत्ता होती. सेनेच्या उदयानंतर कृष्णा देसाईंची हत्या झाली आणि ही संधी समजून, बाळासाहेबांनी याठिकाणी मराठीची तुतारी फुंकली.
#LalbaugchaRaja स्वातंत्र्योत्तर काळापूर्वीपासून लालबागच्या बाजारातील व्यापारी व मासळी बाजारातील कोळी भगिनींनी मिळून हा गणेशोत्सव सुरु केला. आजही गणपतीच्या मिरवणुकीत या दोन वर्गांना महत्त्वाचं स्थान असतं. २००२ पूर्वीपर्यंत ह्या गणपतीचं दर्शन सहजसोपं होतं.
+👇
किंबहुना कुठलेही पडदे वा कनाती लावून इथलं गणेश दर्शन बंदिस्त केलं गेलं नव्हतं. परंतु २००३ नंतरच्या काळात या भागातील चाळींचं प्रचंड मोठ्या प्रमाणात पुर्नविकासाचं काम मोठमोठ्या विकासकांनी हाती घेतलं आणि इथे गगनचुंबी इमारती आकार घेऊ लागल्या. #LalbaugchaRaja
+👇
त्यामुळे इथल्या जागांना हिरेमाणकांचे भाव आले. मग इथला मूळ मुंबईकर गिरणी कामगार मध्यमवर्गीय मराठी समाज या जागा विकून रातोरात करोडपती झाला. दूरच्या पूर्व व पश्चिम उपनगरात मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला गेला. या कालावधीत इथे अमराठी लोकांचं प्राबल्य खूप वाढलं #LalbaugchaRaja
+👇