ज्याठिकाणी विकासाच्या,प्रगतीच्या,कामांच्या बातम्या यायला हव्यात त्याठिकाणी दररोज भ्रष्टाचार,बलात्कार,उत्पीडन,कोरोणा काळातील ढिसाळ नियोजन ह्यांच्याच बातम्यांनी गेलं वर्ष गेलं. आणि त्यात मानाचा (अपमानाचा) तुरा म्हणजे आजची बातमी की मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख
१/
ह्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. एका विद्यमान गृहमंत्र्याविरूध्द केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणे ही खरचं महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आरोप पण कसले तर खंडणी वसुलीचे. ज्यावेळी महाराष्ट्र महामारीने त्रासून गेला होता. त्यावेळी ही लोकं स्वतःचे खिसे भरत होते
२/
किती प्रकरण सांगावीत अगदी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून ते आजच हे प्रकरण इथपर्यंत ह्या सर्व घटनेंनी महाराष्ट्र उध्वस्त झाला. नियोजनशून्य,भावनाशून्य,आत्मस्वार्थीय अशा लोकांचा भरणा ह्या सरकारमध्ये असल्याने महाराष्ट्र आज त्राही त्राही करत आहे..!!
३/
अशावेळी ईश्वराच्या, समर्थांच्या, शिवप्रभूंच्या चरणी प्रार्थना की धावा धावा आम्हाला ह्या संकटातून तारा..!! हे भगवंता आपल्या वचनास जाग तूच म्हणतोस ना 'परित्राणाय साधुनाम् विनाशाय च दुष्कृताम्' मग आता धाव घे कुठला तरी अवतार आणि आम्हाला ह्या संकटातून मुक्त कर..!!
४/
#Thread
तुकाराम महाराज - वैकुण्ठगमन की संशयित मृत्यू..?हा थ्रेड चालू करण्यापूर्वी मी माझ्या विषयी थोड सांगू इच्छितो. आमच्या दोन्ही घरात अर्थात माझ्या घरी आणि आजोळी भागवत सांगण्याची किमान ५ पिढ्यांपासून परंपरा आहे. माझे आजोबा हे खूप विद्वान आणि प्रसिद्ध भागवतकार होते.
१/
त्याचप्रमाणे माझ्या आईचे वडील हे एकनाथ महाराजांच्या परंपरेतील प्रसिद्ध भागवतकार व कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच वातावरण दोन्ही घरात अगदी ओतप्रोत भरलेलं आहे. सध्या ही परंपरा माझे काका आणि मामा उत्तमरित्या चालवत आहेत. अशा घरात वाढल्यामुळे साहजिकच
२/
अत्यंत विद्वान व थोर अध्यात्मिक विभूतींचा सहवास प्राप्त झाला त्यांना ऐकायला भेटलं.म्हणजे अगदी सध्या वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित घर म्हणजे देगलूरकरांच. त्या घरातील प पू चंद्रशेखर महाराज व प पू चैतन्य महाराज ह्यांच्यापासून ते अगदी सर्व सर्व लोकं.
३/
परवा साधकांचे मायबाप जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठगमन दिवस होता अर्थात तुकाराम बीज. ह्या पवित्र दिवशी सुद्धा अनेक पुरोगामी लोकांकडून तुकाराम महाराजांचं नाव पुढे करून ब्राह्मणांना शिव्या देण्याचे काम झाले. हे पुरोगामी स्वतःला एकीकडे जातपात न मानणारे
१/
दाखवातात आणि दुसरीकडे ब्राम्हणांना शिव्या देण्याशिवाय दुसरं काही काम करत नाहीत.
अहो जे तुकाराम महाराज 'विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।' असं सांगतात किंवा जे तुकाराम महाराज 'वर्ण अभिमान विसरली याति। एक एका लोटांगणे जाती।।' हे बोलतात ते तुकाराम महाराज
२/
एखाद्या विशिष्ट जातीला शिव्या कशा देतील.!बर हे लोक आपल्या म्हणण्याला आधार म्हणून गाथेतील काही अर्धवट अभंगांचे पद दाखवतात. ह्या सगळ्या लोकांना आधी माझा हा प्रश्न आहे की बाबांनो तुमची अध्यात्मिक पातळी काय आहे? कारण तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे काही गाण्याचं किंवा कवितांचं
३/