#Thread
तुकाराम महाराज - वैकुण्ठगमन की संशयित मृत्यू..?हा थ्रेड चालू करण्यापूर्वी मी माझ्या विषयी थोड सांगू इच्छितो. आमच्या दोन्ही घरात अर्थात माझ्या घरी आणि आजोळी भागवत सांगण्याची किमान ५ पिढ्यांपासून परंपरा आहे. माझे आजोबा हे खूप विद्वान आणि प्रसिद्ध भागवतकार होते.
१/
त्याचप्रमाणे माझ्या आईचे वडील हे एकनाथ महाराजांच्या परंपरेतील प्रसिद्ध भागवतकार व कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच वातावरण दोन्ही घरात अगदी ओतप्रोत भरलेलं आहे. सध्या ही परंपरा माझे काका आणि मामा उत्तमरित्या चालवत आहेत. अशा घरात वाढल्यामुळे साहजिकच
२/
अत्यंत विद्वान व थोर अध्यात्मिक विभूतींचा सहवास प्राप्त झाला त्यांना ऐकायला भेटलं.म्हणजे अगदी सध्या वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित घर म्हणजे देगलूरकरांच. त्या घरातील प पू चंद्रशेखर महाराज व प पू चैतन्य महाराज ह्यांच्यापासून ते अगदी सर्व सर्व लोकं.
३/
लहानपणापासून ते मग अगदी चार पाच वर्षांपूर्वी पर्यंत मी घरात अनेक संत साहित्याच्या गोष्टी ऐकल्या, त्यात अनेकदा तुकाराम महाराजांचा विषय येऊन गेला पण त्यात म्हणा किंवा मी ऐकलेल्या व्यक्तींनी कधी ही कुठे ही तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या गोष्टीवर थोडासुद्धा संशय घेतला नाही.
४/
गेल्या चार पाच वर्षात जसं मी सोशल मीडिया वर विविध वाचन करू लागलो तिथे मला हा वाद दिसून आला. मी याविषयी ज्यावेळी माझ्या आजोबांना विचारलं तेंव्हा ते माझ्यावर पहिल्यांदा रागावले व नंतर म्हणाले की असा प्रश्न उद्भवू तरी कसाच शकतो?
५/
पुढे त्यांनी मला सांगितलं की मलाच काय पण कुठल्याही खऱ्या वारकऱ्याच्या मनात थोडा सुद्धा किंतू नाहीये की तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले नाहीत आणि ज्या वारकऱ्याला ही गोष्ट मान्य नाही तो खरा वारकरीच नाहीये. म्हणजे यावरून एक गोष्ट तर नक्की आहे की तुकाराम महाराज ज्या वारकरी
६/
परंपरेचे अध्वर्यू आहेत त्यातील लोकांना अजिबात संशय नाहीये की ते सदेह वैकुंठाला गेले नाहीत म्हणून.
मग त्यांना मी पुढे विचारलं की तुमच्याकाळी हा वाद होता का? त्यावर ते म्हणाले की नाही हा वाद अशात २०-२५ वर्षात उत्पन्न झाला आहे. म्हणजे ह्या २०-२५ वर्षांच्या आधी जे जे कोणी
७/
थोर विद्वान संत, वारकरी,कीर्तनकार,विचारवंत होऊन गेले त्यांना सर्वांना ही गोष्ट मान्य होती की तुकाराम महाराजांचं वैकुंठगमन झालं. बर ह्या लोकांना तुकाराम महाराजांचं,अध्यात्माच आणि वारकरी संप्रदायाच ज्ञान आपल्यापेक्षा जास्त आहे एवढं तर आपल्याला मान्य करावच लागेल.
८/
मग आता तुम्ही ठरवा की तुम्हाला ह्या सर्व थोर व्यक्तींवर विश्वास ठेवायचा आहे की संशय उत्पन्न करणाऱ्या लोकांवर.!
अगदी १०० वर्षातील उदाहरणं द्यायची झाली तर प पू धुंडा महाराज, प पू मामासाहेब दांडेकर, प पू विष्णुबुवा जोग, भगवानगड निवासी प पू भगवानबाबा, प पू नारायण महाराज
९/
प पू बंकट स्वामी महाराज, प पू साखरे महाराज असे अनेक जण सांगता येतील ज्यांच्या साहित्यात, कीर्तनात, प्रवचनात कुठेही ही वरच्या वादाचा उल्लेखही येत नाही. आणि वरची मंडळी काही साधी सुधी नाहीयेत वारकरी परंपरेचे रत्न आहेत रत्न.!
मग हा वाद उत्पन्न झाला त्याच कारण काय असायला हवं?
१०/
तर कोणाही सामान्य व्यक्तीला सांगता येईल वारकरी परंपरेत तेढ निर्माण करण्यासाठी हा वाद तयार करण्यात आला. लोकांमध्ये जातीपातीचे वाद निर्माण करायचे. ह्या वाद उत्पन्न करणाऱ्या लोकांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या एका सत्यावर संशय घेतला.
११/
मग लोकांनी इकडे प्रश्न विचारण्या ऐवजी ह्या वाद उत्पन्न करणाऱ्या लोकांना प्रश्न विचारायला हवेत की तुमच्याकडे असे काय पुरावे आहेत ज्याद्वारे तुम्ही हा वाद मांडला आहे?
१२/
वारकरी संप्रदायात तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाविषयी अनेक अभंग प्रसिद्ध आहेत जे की स्वतः तुकाराम महाराजांनी तसेच त्यांच्या वैकुंठ गमनाच्या साक्षी असणाऱ्या लोकांनी लिहून ठेवले आहेत. खाली काही त्यातील पदे देत आहे.
१३/
१. सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावे तुम्ही ॥
– संत तुकाराम
२. माझ्या भावे केली जोडी । नजरेशी कल्प कोडी ॥
आणियेले धाडी । आणिले अवघे वैैकुंठ॥ – संत कान्होबा
३.म्हणे रामेश्वर सकळा पुसोनि । गेला तो विमानी बैसोनिया ॥ – रामेश्वर भट्ट
१४/
४.सांगोनिया गेले वैकुंठासी लोला । धन्य भाग्य तुका देखियेला॥
प्रयाण काळी देवे विमान पाठविले ।
कलीच्या कालामाजी अद्भुत वर्तविले ।
मानव देह घेऊनी निजधामी गेले। निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥
– संत निळोबाराय
असे अनेक अभंग उपलब्ध असताना लोक संशय उपस्थित करतात त्यांची कमाल वाटते मला?
१५/
बर ह्या लोकांचा तर्क विचारात घेणं सुद्धा धोकादायक आहे. ते कस तर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले व ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचा संशयित मृत्यू झाला तो दिवस होता फाल्गुन वद्य द्वितीया आणि इसवी सन होते १६५०.१६५० मध्ये महाराष्ट्रात कोणाचं शासन होत? हे सर्वांना माहिती आहे की
१६/
त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात होते जे की तुकाराम महाराजांना आपले गुरू मानत. मग जर त्यासाली तुकाराम महाराजांचा संशयित मृत्यू झाला असता तर ज्या शिवाजी महाराजांना दिल्लीच्या बादशहाची दाढी कधी हालते ह्याची खबर लागतं असे त्या शिवाजी महाराजांना आपल्या
१७/
गुरूंचा आपल्याजवळ देहूत संशयित मृत्यू झाला आहे ही बातमी नाही का कळणार? बोला आता. मी म्हणलं ना तर्क विचारात घेणं पण धोकादायक आहे. मग शिवाजी महाराजांनी चौकशीचे आदेश दिले नसते का? कारवाई झाली नसती का? बोला आहेत का पुरावे?
१८/
त्यामुळे हा वाद तुमच्याच अंगलट येईल. म्हणून कृपया लोकांमध्ये व विशेषतः वारकरी संप्रदायात तेढ निर्माण करण्याचं अघोरी काम बंद करा..!
तुकाराम तुकाराम । नाम घेता कापे यम ॥ १ ॥
धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला हा पुरुषार्थ ॥ २ ॥
जळी दगडासहित वह्या। तारियेल्या जैश्या लाह्या
॥३॥
१९/
ज्याठिकाणी विकासाच्या,प्रगतीच्या,कामांच्या बातम्या यायला हव्यात त्याठिकाणी दररोज भ्रष्टाचार,बलात्कार,उत्पीडन,कोरोणा काळातील ढिसाळ नियोजन ह्यांच्याच बातम्यांनी गेलं वर्ष गेलं. आणि त्यात मानाचा (अपमानाचा) तुरा म्हणजे आजची बातमी की मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख
१/
ह्यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचा आदेश दिला. एका विद्यमान गृहमंत्र्याविरूध्द केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणे ही खरचं महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आरोप पण कसले तर खंडणी वसुलीचे. ज्यावेळी महाराष्ट्र महामारीने त्रासून गेला होता. त्यावेळी ही लोकं स्वतःचे खिसे भरत होते
२/
किती प्रकरण सांगावीत अगदी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून ते आजच हे प्रकरण इथपर्यंत ह्या सर्व घटनेंनी महाराष्ट्र उध्वस्त झाला. नियोजनशून्य,भावनाशून्य,आत्मस्वार्थीय अशा लोकांचा भरणा ह्या सरकारमध्ये असल्याने महाराष्ट्र आज त्राही त्राही करत आहे..!!
३/
परवा साधकांचे मायबाप जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठगमन दिवस होता अर्थात तुकाराम बीज. ह्या पवित्र दिवशी सुद्धा अनेक पुरोगामी लोकांकडून तुकाराम महाराजांचं नाव पुढे करून ब्राह्मणांना शिव्या देण्याचे काम झाले. हे पुरोगामी स्वतःला एकीकडे जातपात न मानणारे
१/
दाखवातात आणि दुसरीकडे ब्राम्हणांना शिव्या देण्याशिवाय दुसरं काही काम करत नाहीत.
अहो जे तुकाराम महाराज 'विष्णुमय जग। वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ।।' असं सांगतात किंवा जे तुकाराम महाराज 'वर्ण अभिमान विसरली याति। एक एका लोटांगणे जाती।।' हे बोलतात ते तुकाराम महाराज
२/
एखाद्या विशिष्ट जातीला शिव्या कशा देतील.!बर हे लोक आपल्या म्हणण्याला आधार म्हणून गाथेतील काही अर्धवट अभंगांचे पद दाखवतात. ह्या सगळ्या लोकांना आधी माझा हा प्रश्न आहे की बाबांनो तुमची अध्यात्मिक पातळी काय आहे? कारण तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे काही गाण्याचं किंवा कवितांचं
३/