मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे:
संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्रसुद्धा कुठेही मागे नव्हता आणि नाही.
कोविडविरोधातल्या या लढ्यात राजकारण आणू नये. सर्व राजकीय पक्षांना पंतप्रधानांनी समज द्यावी.
राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढवल्या असून आणखी वाढवण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाचे मत.
राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के अँटीजेन होतात जे समाधानकरक असले तरी वाढवायला हवे - केंद्रीय आरोग्य सचिव
केंद्राने जादा १२०० व्हेंटीलेटर्स द्यावेत
राज्याला लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सिजन व व्हेंटीलेटर्स उपलब्ध करून द्यावे.
एप्रिल अखेरपर्यंत महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे.
२५ वर्षापुढील सर्वांचे लसीकरण गरजेचे आहे
हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता द्यावी. त्यामुळे लसीकरणाला वेग मिळेल
१५ एप्रिलनंतर १७.४३ लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले असले तरी आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे.
CM Uddhav Balasaheb Thackeray today held a virtual meeting with leaders of major political parties and cabinet colleagues to discuss the COVID situation in the State and the mitigation measures. He made the following points:
To break the COVID transmission chain, it is imperative that strict restrictions must be imposed for a certain period of time.
The first priority will be given to saving lives. If this is a public health emergency, then the priority will be health of citizens & their lives
The Leader of Opposition has made some good points. They will be considered earnestly.
The State Government will act on suggestions like availability of Remdesivir, availability of test reports sooner from the labs, & precise planning to make oxygen supply available.
राज्यातील कोविड परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रमुख पक्षांचे नेते व मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे :
कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील.
प्रथम जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला प्राधान्य असले पाहिजे.
विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत
रेमेडीसिवीर उपलब्धता,चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे,ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा सूचनांवर शासन कार्यवाही करेल
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना खालील मुद्दे मांडले :
मधल्या काळात आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यात यशस्वी झालो होतो. पण आपण सगळे हातात हात घालून लढलो म्हणून ते शक्य झाले.
संपूर्ण जगाचीच परिस्थिती दोलायमान आहे.
मधल्या काळात आपण शिथील झालो. शस्त्र टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मी तेव्हाही सांगत होतो, की थोडा धीर धरा.
जी भीती मलाच नव्हे, तर या विषयातल्या तज्ज्ञांना वाटत होती, ती खरी ठरली.
हा विषाणू नवा अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकत आहे आणि आपली परीक्षा पाहात आहे.
कोविडची साथ सुरू झाली तेव्हा या विषाणूंची चाचणी होऊ शकते अशा दोनच प्रयोगशाळा राज्यात होत्या
आज त्या चाचण्या करणाऱ्या जवळपास ५००लॅब्ज आपण तयार केल्या आहेत.
मुंबईत दररोज सुमारे ५०००० चाचण्या करत आहोत.
महाराष्ट्रामध्ये दर दिवशी चाचण्या करण्याची क्षमता आपण जवळपास १८२००० पर्यंत नेली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काल राज्यभरातील कोविडसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यंत काही निर्बंध लावण्यात आले आहेत:
५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना रात्री ८ ते सकाळी ७ या दरम्यान एकत्र येण्यास मनाई आहे.
या वेळेत सागरी किनारे,उद्याने, बागा बंद राहतील.
कुठलेही सामाजिक, धार्मिक,राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना परवानगी नाही. सभागृह, नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाही.
सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील.
या वेळेत टेक होम डिलिव्हरी सुरू राहील.
विवाह समारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल.
अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत.