मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काल राज्यभरातील कोविडसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यंत काही निर्बंध लावण्यात आले आहेत:
५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना रात्री ८ ते सकाळी ७ या दरम्यान एकत्र येण्यास मनाई आहे.
या वेळेत सागरी किनारे,उद्याने, बागा बंद राहतील.
कुठलेही सामाजिक, धार्मिक,राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना परवानगी नाही. सभागृह, नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाही.
सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील.
या वेळेत टेक होम डिलिव्हरी सुरू राहील.
विवाह समारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल.
अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत.
होम आयसोलेशनच्या बाबतीत उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी लागेल.
कोविड रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर १४ दिवसांसाठी तसा सुचना फलक लावण्यात येईल.
गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.
खासगी आस्थापनांत (आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्क्यांपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील तर शासकीय व निमशासकीय कार्यालयातील विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोविड परिस्थितीनुसार कर्मचारी संख्या निश्चित करतील.
उत्पादन क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरू ठेवू शकते.
शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तत्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल.
बैठका आदी कामासाठी निमंत्रित केले असल्यास विशेष प्रवेश पास कार्यालयामार्फत दिला जाईल हे कार्यालय किंवा विभाग प्रमुखाने पहावे.
सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चित करावे.
त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत ते सुनिश्चित करावे.
ऑनलाईन आरक्षणावर भर द्यावा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to state today;
We are meeting after several days. You may be aware of the reasons for today’s meeting.
I wanted to meet you for reasons apart from Corona. But you are not at home nowadays. No one wants to sit at home for no reason, including myself. Of course, these restrictions were necessary.
In the first week of March, Maharashtra will complete a year since the first Corona patient was detected.
The other day, someone asked me about my most satisfying moment in those difficult days of the lockdown. I said it was that you all accepted me as a member of your family.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत विविध मुद्दे मांडले. ही बैठक पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. राज्यातील विविध प्रकल्पांना केंद्रांकडून साह्य मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग व्यवसायांच्या बाबतीत आपली स्पर्धा इतर देशांबरोबर असली पाहिजे,राज्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा नको. केंद्राने कार्यक्षमता व गुंतवणुकीसाठी आकर्षकता अशा निकषांवर निकोप स्पर्धेला प्रोत्साहन द्यावे. काही राज्ये वीज सवलतीच्या, जागेच्या दराच्या ऑफर्स देतात. बार्गेनिंग केले जाते.
राज्यांत स्पर्धा जरूर असावी पण ती सवलती किती देतात अशी आर्थिक नसावी तर प्रशासकीय कार्यक्षमता व उपलब्ध सुविधांवर निकोप व्हावी. केवळ पैशाच्या स्वरूपात गुंतवणुकीचा विचार न करता रोजगार किती मिळेल याचाही विचार व्हावा. असे झाले तर खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर बनू.
CM Uddhav Balasaheb Thackeray’s welcome address at the @nasscom Technology & Leadership Forum;
It gives me immense pleasure that the state of Maharashtra is hosting the 29th Chapter of the Nasscom Technology Leadership Forum. The 3-day forum first time in 30 years is completely virtual.
It is a testament to the exponential technology adaption that has helped the world survive the pandemic. The new information technology has propelled both India and Maharashtra as technology hubs poised for growth in 2021 and beyond.
शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्म सोहळ्याप्रसंगी माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले…
शिवराय आणि जिजाऊंचा आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने यंदा हे दुसरं वर्ष आहे, या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. शिवरायांसमोर नतमस्तक व्हायला शिवजयंतीच असली पाहिजे असं काही नाही. आपल्या मनात, हृदयात त्यांचं एक अखंड एक स्थान आहे.
कुठेही, कधीही, कोणत्याही कामाला निघताना छत्रपतींचं स्मरण नकळत होतं. कोणतंही चांगलं किंवा पवित्र काम करताना छत्रपती शिवराय आठवतात. ते आपल्या धमन्यांमध्ये, रक्तात आहेत. आपण या मातीची लेकरं आहोत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढीलप्रमाणे मुद्दे मांडले:
मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजच्या परिस्थितीवर आपण पूर्णपणे काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलं आहे.
जवळपास सर्व गोष्टी आता उघडलेल्या आहेत. रहदारी सुरू झालेली आहे, कारभार सुरू झालेले आहेत, येणं-जाणं भेटणं याही गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मात्र आपला कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक पावलावर सावध रहा हे सांगणं माझं कर्तव्य आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state today;
I would like to thank you all for your cooperation in not bursting crackers during Diwali and celebrating it in a disciplined manner like all other festivals.
Places of worship have reopened but let’s ensure we carry out festivities and celebrations without forming crowds.
With your cooperation, the My Family My Responsibility campaign has been successful and vital in curbing COVID-19 cases. I would like to thank all the doctors, medical staff, officers and all essential staff for their efforts and bravery in making it successful.