मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना खालील मुद्दे मांडले :
मधल्या काळात आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यात यशस्वी झालो होतो. पण आपण सगळे हातात हात घालून लढलो म्हणून ते शक्य झाले.
संपूर्ण जगाचीच परिस्थिती दोलायमान आहे.
मधल्या काळात आपण शिथील झालो. शस्त्र टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. मी तेव्हाही सांगत होतो, की थोडा धीर धरा.
जी भीती मलाच नव्हे, तर या विषयातल्या तज्ज्ञांना वाटत होती, ती खरी ठरली.
हा विषाणू नवा अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकत आहे आणि आपली परीक्षा पाहात आहे.
कोविडची साथ सुरू झाली तेव्हा या विषाणूंची चाचणी होऊ शकते अशा दोनच प्रयोगशाळा राज्यात होत्या
आज त्या चाचण्या करणाऱ्या जवळपास ५००लॅब्ज आपण तयार केल्या आहेत.
मुंबईत दररोज सुमारे ५०००० चाचण्या करत आहोत.
महाराष्ट्रामध्ये दर दिवशी चाचण्या करण्याची क्षमता आपण जवळपास १८२००० पर्यंत नेली.
येत्या काही दिवसांत दररोज चाचण्यांची संख्या अडीच लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
केंद्राच्या नियमावलीनुसार ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर पद्धतीने केल्या जातील.
चाचण्या करताना आपण दर्जाशी तडजोड करत नाही आणि करणार नाही.
मुख्य म्हणजे आपण एकही रूग्ण लपवलेला नाही आणि लपवणार नाही.
महाराष्ट्रातल्या बेड्सची संख्या १०००० पेक्षा कमी होती. आता ती संख्या पावणेचार लाखांपर्यंत नेली आहे
मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीला दर दिवशी ३००-३५० रुग्ण सापडत होते. आज ती संख्या एका महिन्यात ८५०० वर गेली आहे
विलगीकरणासाठी २,२०,००० बेड्स असून त्यापैकी ६२ टक्के बेड्स भरले आहे
आयसीयू बेड्स २०५१९ आहेत व ते ४८ टक्के भरलेले आहेत.
ऑक्सिजनचे बेड्स ६२ हजारांच्या आसपास आहेत आणि आज २५ टक्क्यांच्या आसपास भरलेले होते.
व्हेंटिलेटर्स ९३४७ आहेत आणि ते पण जवळपास २५ टक्क्यांच्या जवळपास भरलेले आहेत.
ही परिस्थिती अशीच राहिली तर या सुविधा लवकरच अपुऱ्या पडतील.
व्हेंटिलेटर्स, बेड्स, औषधांचा साठा, ऑक्सिजन इत्यादी सुविधा आपण वाढवू पण डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची संख्या कशी वाढवणार आरोग्यसेवेत काम करणाऱ्या अनेकांना कोविड होऊन गेला.पण बरे झाल्यानंतर ते लगेच सेवेत रूजू झाले आहेत.त्यांना किती त्रास द्यायचा याचा विचार करायला हवा
लसीकरणात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य ठरले. काल एका दिवसात ३ लाख लसीकरण केले. केंद्राने लसींचा पुरवठा वाढवला तर लसीकरणाची क्षमता एका दिवसात ६ ते ७ लाखांपर्यंत नेऊ. लस घेतल्यानंतरही काही जण कोरोनाने बाधित होतात. कारण लस घेतल्यानंतरही मास्क घालणं अनिवार्य आहे पण बरेच जण हे पाळत नाहीत
जे म्हणतात की लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, माझं म्हणणं आहे की जरूर उतरा पण लॉकडाऊनच्या विरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात उतारा.
डॉक्टरांना मदत करायला रस्त्यावर उतरा, ज्या कुटुंबांमध्ये कर्त्या-करवित्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची जबाबदारी घेण्यासाठी रस्त्यावर उतरा.
आपली यंत्रणा एका बाजूला ट्रेसिंग,ट्रॅकिंग, टेस्टिंगमध्ये बिझी आहे. दुसरीकडे उपचार आहेत,तिसरीकडे हीच यंत्रणा लसीकरण करतेय.
हे सगळं एकत्रित आल्यानंतर त्यांची काय स्थिती होत असेल याचा आपण विचार करायला हवा.
मास्क न वापरण्यात शूरता नाही, मास्क लावायला लाजायची सुद्धा काही गरज नाहीए.
लॉकडाउन आपण टाळू शकतो, पण ज्या जिद्दीने पहिल्यांदा लढलात, त्या जिद्दीनं पुन्हा एकदा लढायला हवं.प्रत्येकानं मी कोरोनाला हरवणार की नाही, रोखणार की नाही हे ठरवलं पाहिजे.
अजूनही कोरोनानं आपल्यावर मात केलेली नाही आणि मी करूही देणार नाही. पण ही मात करताना जर आपण घट्ट उभे राहायला हवे.
सरकार जी पावलं उचलतं आहे, ती जनतेच्या हितासाठी उचलतं आहे. अर्थचक्र फिरवायचं आहे, गरीबाची रोजीरोटी वाचवायची आहे.पण सगळ्यात आधी आपल्याला त्यांचे जीव वाचवायचे आहेत.मी तुमच्या कुटुंबातला एक आहे. तुम्ही मला कुटुंबीय मानलं आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, म्हणजे माझे कुटुंब तुम्ही आहात
माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतल्यानंतर मला टीकेची पर्वा नाही
सरकार यंत्रणेच्या बाबतीत कुठेही कमी पडलेलं नाही,कमी पडू देणार नाही.सरकार खंबीर आहे. आरोग्यसुविधा कुठेही कणभरही कमी पडू देणार नाही.मात्र, टाळी एका हाताने वाजणार नाही. हात हातात घालून जेव्हा आपण काम करू तर आणि तरच यश मिळेल
मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देत आहे,लॉकडाऊन जाहीर करत नाहीए, पण दोन दिवसांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊ.
मला आपल्या सहकार्याची अपेक्षा नाही विश्वास आहे.
सर्व राजकीय पक्ष, सर्व धर्मियांचे सहकार्य अपेक्षित आहे.
ही लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काल राज्यभरातील कोविडसंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यंत काही निर्बंध लावण्यात आले आहेत:
५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना रात्री ८ ते सकाळी ७ या दरम्यान एकत्र येण्यास मनाई आहे.
या वेळेत सागरी किनारे,उद्याने, बागा बंद राहतील.
कुठलेही सामाजिक, धार्मिक,राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना परवानगी नाही. सभागृह, नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाही.
सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील.
या वेळेत टेक होम डिलिव्हरी सुरू राहील.
विवाह समारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल.
अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत.
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to state today;
We are meeting after several days. You may be aware of the reasons for today’s meeting.
I wanted to meet you for reasons apart from Corona. But you are not at home nowadays. No one wants to sit at home for no reason, including myself. Of course, these restrictions were necessary.
In the first week of March, Maharashtra will complete a year since the first Corona patient was detected.
The other day, someone asked me about my most satisfying moment in those difficult days of the lockdown. I said it was that you all accepted me as a member of your family.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत विविध मुद्दे मांडले. ही बैठक पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. राज्यातील विविध प्रकल्पांना केंद्रांकडून साह्य मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग व्यवसायांच्या बाबतीत आपली स्पर्धा इतर देशांबरोबर असली पाहिजे,राज्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा नको. केंद्राने कार्यक्षमता व गुंतवणुकीसाठी आकर्षकता अशा निकषांवर निकोप स्पर्धेला प्रोत्साहन द्यावे. काही राज्ये वीज सवलतीच्या, जागेच्या दराच्या ऑफर्स देतात. बार्गेनिंग केले जाते.
राज्यांत स्पर्धा जरूर असावी पण ती सवलती किती देतात अशी आर्थिक नसावी तर प्रशासकीय कार्यक्षमता व उपलब्ध सुविधांवर निकोप व्हावी. केवळ पैशाच्या स्वरूपात गुंतवणुकीचा विचार न करता रोजगार किती मिळेल याचाही विचार व्हावा. असे झाले तर खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर बनू.
CM Uddhav Balasaheb Thackeray’s welcome address at the @nasscom Technology & Leadership Forum;
It gives me immense pleasure that the state of Maharashtra is hosting the 29th Chapter of the Nasscom Technology Leadership Forum. The 3-day forum first time in 30 years is completely virtual.
It is a testament to the exponential technology adaption that has helped the world survive the pandemic. The new information technology has propelled both India and Maharashtra as technology hubs poised for growth in 2021 and beyond.
शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्म सोहळ्याप्रसंगी माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले…
शिवराय आणि जिजाऊंचा आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने यंदा हे दुसरं वर्ष आहे, या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. शिवरायांसमोर नतमस्तक व्हायला शिवजयंतीच असली पाहिजे असं काही नाही. आपल्या मनात, हृदयात त्यांचं एक अखंड एक स्थान आहे.
कुठेही, कधीही, कोणत्याही कामाला निघताना छत्रपतींचं स्मरण नकळत होतं. कोणतंही चांगलं किंवा पवित्र काम करताना छत्रपती शिवराय आठवतात. ते आपल्या धमन्यांमध्ये, रक्तात आहेत. आपण या मातीची लेकरं आहोत.