कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. राज्यात बुधवार दि. १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजल्यापासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील.
या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देणारे ५,४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.
संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ,केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी प्रत्येकी १००० रुपयांचे आर्थिक सहाय्य
शिवभोजन योजनेतून एक महिना शिवभोजन थाळी मोफत
राज्यातील नोंदणीकृत सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद
फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक थेट त्यांच्या बँक खात्यात देण्यात येईल.
राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपयांचे अर्थसहाय्य
आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब २००० रुपयांचे आर्थिक सहाय्य
याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.
स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.
लष्करी तज्ज्ञांच्या मदतीने हवाई वाहतुकीने ऑक्सिजन आणणे शक्य आहे का आणि शक्य असेल, तर नुसती परवानगी नव्हे, तर हवाई दलाला सांगून मदत करायचे आदेश द्यावेत अशी विनंती पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.
मार्च महिन्यात जीएसटीचा परतावा दाखल करायची मुदत असते. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ही मुदत तीन महिन्यांनी वाढवावी अशीही विनंती. या संकटाला नैसर्गिक आपत्तीचे निकष लावावेत.
लसीकरणाचा वेग आणखी वाढवावा लागणार आहे. आत्ताची लाट प्रचंड मोठी आहे. परंतु लसीकरणामुळे या लाटेच वेग मंदावू शकतो
या बंधनांमागे प्राण वाचवणं हाच एक उद्देश आहे. आपण समर्थपणे मुकाबला करतोय. आजवर सहकार्य केलंत, मला कुटुंबातील एक मानलंत. मी टीकेची पर्वा न करता आपल्याशी असलेली बांधिलकी स्मरून माझ्या राज्यातील जनतेच्या हितासाठी हे निर्बंध लादतोय.
कृपा करा, न रागावता, न चिडता समजून घेत सहकार्य करा. ही लढाई जिंकायला मदतच नाही तर सैनिक म्हणून सोबत या. यापुढेही तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
CM Uddhav Balasaheb Thackeray’s address to the state today;
Namaskar!
Greetings on Gudhi Padwa.
From December to February, we had controlled COVID well. This credit was yours and that of the health system and the state machinery.
But things have changed. We felt that we were winning the war, but this battle has begun again.
Despite capacity additions, the system is under strain. There is an oxygen shortage. Around 1,200 metric tons of oxygen is manufactured daily in Maharashtra.
We have earmarked 100% of this for medical purposes. Today, 950 to 1,000 tons is being used for Corona patients.
Oxygen will be procured from as far as 1,300 kms from states like West Bengal.
CM Uddhav Balasaheb Thackeray today held a virtual meeting with leaders of major political parties and cabinet colleagues to discuss the COVID situation in the State and the mitigation measures. He made the following points:
To break the COVID transmission chain, it is imperative that strict restrictions must be imposed for a certain period of time.
The first priority will be given to saving lives. If this is a public health emergency, then the priority will be health of citizens & their lives
The Leader of Opposition has made some good points. They will be considered earnestly.
The State Government will act on suggestions like availability of Remdesivir, availability of test reports sooner from the labs, & precise planning to make oxygen supply available.
राज्यातील कोविड परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, प्रमुख पक्षांचे नेते व मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. यात मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे :
कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील.
प्रथम जीव वाचवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही आरोग्याची आणीबाणी असेल तर नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला प्राधान्य असले पाहिजे.
विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत
रेमेडीसिवीर उपलब्धता,चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळांना यासाठी सूचना देणे,ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा सूचनांवर शासन कार्यवाही करेल
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे:
संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्रसुद्धा कुठेही मागे नव्हता आणि नाही.
कोविडविरोधातल्या या लढ्यात राजकारण आणू नये. सर्व राजकीय पक्षांना पंतप्रधानांनी समज द्यावी.
राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढवल्या असून आणखी वाढवण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाचे मत.
राज्यात एकूण चाचण्यात ७१ टक्के आरटीपीसीआर आणि २८ टक्के अँटीजेन होतात जे समाधानकरक असले तरी वाढवायला हवे - केंद्रीय आरोग्य सचिव