कल्पना करा - महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुडवडा आहे. एक राजकीय पक्ष वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांना संपर्क साधतो. आपल्या स्तरावर. सरकारने सांगितलं म्हणून नव्हे, आपण होऊन. दमणला एक कंपनी म्हणते आम्ही करू प्रोडक्शन पण आमच्याकडे लायसन्स नाहीये.
१+
मग हा पक्ष यंत्रणा हलवतो. पुन्हा - प्रोअॅक्टीव्हली. केंद्राबरोबर को-ओर्डीनेट करतो, आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या जातात. कंपनी रेमडेसिवीर प्रोडक्शन करते.
पुढे - या सगळ्याची राज्य सरकारला कल्पना नसते का? असते! अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंना हे माहिती असतं.
२+
इतकंच नाही - हे रेमडेसिवीर राज्य सरकार तर्फेच डिस्ट्रिब्युट होणार असतात.
असं झालं तर या पक्षाबद्दल, या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल काय वाटेल तुम्हाला? गूड! व्हेरी गूड! उत्तम काम! बरोबर?
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात - ही औषधी पुरवणाऱ्या कम्पनीच्या लोकांना -
३+
राज्य सरकारचे मंत्री आपल्या OSD मार्फत धमकी देतात. "भाजप ला मदत का करता?" असा खडा सवाल विचारतात. कंपनी मालकाला रात्रीत उचलून पोलीस स्टेशनला आणलं जातं.
प्रकरणाची माहिती मिळते म्हणून विरोधी पक्ष नेता तिथे ऐनवेळी पोहोचतो आणि हे धमकी प्रकरण उघडकीस येतं.
४+
पोलीस म्हणतात "काळाबाजार होऊ नये म्हणून चौकशीसाठी बोलावलं होतं." ही कसली प्रोसिजर आहे चौकशीची? चौकशी करताना धमक्या का दिल्या जाताहेत?
काय प्रॉब्लम असेल? सप्लाय आला तर काळाबाजार अफेक्ट होईल, वसुली कमी होईल, कमिशन उतरेल...ही भीती असेल का? की भाजपला क्रेडिट मिळणार असेल तर -
५+
खड्ड्यात गेले रेमडेसिवीर...असा महा विकास केंद्रित निर्णय घेतला गेला असेल?!
पोलिसांचा वापर करून रात्री अपरात्री हवं ते घडवण्याचे दिवस आहेत राज्यात. त्यामुळे काहीच सांगता येत नाही.
हे कुणालाच वाटू नये? थांबवण्याचे प्रयत्न होऊ नयेत?
३ - आमचे पंतप्रधान - पक्षी आमच्या सिस्टिम्स - आदेश देऊन राबवत नाहीत. संत महंतांशी चर्चा करतात नि ते महानुभाव इकडची विनंती "मान्य" करून आपल्या अनुयानांना आदेश देतात - हे चित्र डिप्रेसिंग नाही का?
२+
४ - मोदींना जे कळालं ते मोदींच्या समर्थकांना कसं कळत, पटत नाही? कुंभ ने काहीच झालं नाही, गर्दी जमलीच नाही, पूर्ण खबरदारी घेतली होती...वगैरे बरीच समर्थनं सुरु आहेत...इतकं आहे तर मोदींना का करावं लागलं हे?
"कुणी कितीही म्हणू देत की तो जातीभेद मानत नाही, पण त्याच्या गळ्यात जानवं दिसलं, की माझ्यासारखा खरा डिकास्ट झालेला तरुण हे क्षणात ओळखेल की तो माणूस नाटकी आहे!"
१२-१३ वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. आजही स्पष्ट आठवतो. आम्ही तिघे मित्र (तिघेही जन्माने ब्राह्मण) गप्पा मारत असताना -
१+
दोघांमध्ये "जातीवाद" हा विषय सुरु झाला, मी म्यूट स्पेक्टेटर होतो. त्या चर्चेत वरील वाक्य माझा एक मित्र अतीव अभिमानाने आणि आत्मविश्वासाने म्हणून गेला. ते वयच कमाल असतं. नुकतंच पुस्तकं वाचन सुरु झाल्याने मला सगळं समजलंय हा अहंगंड असतो.
२+
त्यामुळे बरंच काय काय सुरु होतं आम्हा सर्वांच्याच मेंदूत. तेव्हा हे असं तावातावाने कॉन्फिडन्टली ठोस निष्कर्ष काढून मोकळं होणं स्वाभाविक होतं.
आज, एक तप पूर्ण झाल्यानंतर, मी फार कमी विषयांवर एवढा कॉन्फिडन्ट असतो. तो "जानवं दिसलं की..." डायलॉग मला अनेक प्रसंगी ग्राऊंडेड करतो.
Many people die with their music still in them. ऑलिव्हर वेन्डल होम्स यांचं जगद्विख्यात वाक्य. ९९% लोक असेच असतात, असं म्हणतात!
पण ऐसा क्यू?
आपण सगळे एक समाज म्हणून मेडिओक्रसीकडे का जातो, तीच आपली नैसर्गिक टेण्डन्सी का आहे यावर गेले बरेच दिवस -
१+
- खल करतोय. वाचन, चर्चा, रिसर्च.
कुणी स्पष्टपणे यावर बोललं नाहीये. म्हणजे टिपिकल उत्तरं - ध्येय नसणं, शिस्त नसणं, रोज स्वतःबरोबर वेळ नं घालवणं वगैरे आहेतच.
पण त्याहून खोल काही कारण असेल का यावर विचार करत असताना एक गोष्ट जाणवली.
२+
सेल्फ डेव्हलपमेंट हा बाळबोध, बुळबुळीत, हास्यास्पद प्रकार समजला जातो. आपल्याकडेच नाही, सगळीकडेच. जग गाजवणारे अनेक लोक पर्सनल मास्टरीवर भरभरून बोलतात, लिहितात. वेगवेगळे ब्रेन रिसर्च, सायकॉलॉजिकल अनालिसिस समोर ठेवतात.
त्यातून प्रत्येकाने आपल्यात लपलेला ग्रेटनेस शोधावा -
तेंडुलकर-मंगेशकरांची चौकशी होणार म्हणून भाजप समर्थक चिडलेत.
का रे बाबांनो?
यात अनपेक्षित काय आहे नेमकं?
त्यांना सत्ता राबवणं जमतं! तुमच्या लाडक्यांना जमत नाही! इतकं साधं सरळ आहे सगळं!
केंद्र सरकारला जे ७ वर्षांत झेपलं नाही, जमलं नाही ते -
१+
महाराष्ट्रातील आघाडी सरकार अगदी विनासायास करतंय. काँग्रेस, राष्ट्रवादी (आणि आता शिवसेनासुद्धा) - भाजपसमोर या बाबतीत नेहेमीच सरस ठरले आहेत. "सत्ता राबवणं" म्हणजे काय हे त्यांना कळतं.
सोशलमिडीयावर शिवीगाळ केली म्हणून सडकून काढतात ते उघडपणे. -
२+
(आपले नेते मात्र त्याच गुंडाच्या तब्येतीची चौकशी करतात!) एकेरी संबोधन केलं म्हणून एकीचं घर तोडतात, दुसऱ्याला ८ दिवस तुरुंगात डांबतात.
"आम्ही सर्व भारतीय एक आहोत!" असं म्हणणाऱ्याला संघी गणवेशात दाखवावं लागणं हा तुमचा स्कॉअरिंग पॉईंट नव्हे पराभव आहे!
१+
ज्या दैवी गळ्याच्या गायिकेने कित्येक दशकं भारतीयांना अवीट गोडीचा निर्भेळ आनंद मिळवून दिला, तिची साधना तुम्हाला हास्यास्पद वाटत असेल, फक्त तिने देशाच्या बाजूने एक स्वर उमटवला म्हणून...तर तुमची झोळी रिकामीच राहिली रे भिकाऱ्यांनो!
२+
तेंडुलकर, मंगेशकर, कुंबळे, पी टी उषा...
ही सर्व माणसं नाहीत...भारताला घडवणारी, भारताला ओळख देणारी, आपल्या अस्तित्वाची साक्ष आहेत ही थोर मंडळी!
एका फटक्यात तुम्ही यांना काय काय म्हणून गेलात!
त्याने या कुणाच्याही तपश्चर्येस काहीही काळिमा लागत नाही...तुमचंच तोंड काळं होतं रे!
आपण "भारतीय" आहोत असं दाखवून देणारे अनुभव अधूनमधून येतात आणि बरं वाटतं. पुनश्च एक सुखद अनुभव येतोय...भारतीय संस्कृतीतील अनेक तेजस्वी धडयांपैकी एक...वयं पंचाधिकं शतम्...आपण हा धडा विसरलो नाही आहोत हे जाणवतंय आणि बरं वाटतंय!
वनवासात असलेल्या पांडवांची फजिती करण्यासाठी दुर्योधन निघाला असताना, रस्त्यात गंधर्वांचा राजा चित्रसेन दुर्योधनाला धरतो. बंदी करतो.
हे समजल्यावर पांडव दुर्योधनाच्या मदतीस धावून येतात, त्याला सोडवतात.
२+
वास्तवात दुर्योधन अडचणीत सापडलाय हे बघून भीमार्जुन खुश होतात...तेव्हा युधिष्ठिर त्यांना समजावून सांगतो. म्हणतो आपण आपापसात कितीही भांडत असलो तरी "बाहेरच्या" लोकांसमोर आपण १०५च आहोत. १०० कौरव, ५ पांडव हा भेद आपला अंतर्गत. पण इतरांसाठी आपण १०५ एकत्रच आहोत.