"कुणी कितीही म्हणू देत की तो जातीभेद मानत नाही, पण त्याच्या गळ्यात जानवं दिसलं, की माझ्यासारखा खरा डिकास्ट झालेला तरुण हे क्षणात ओळखेल की तो माणूस नाटकी आहे!"
१२-१३ वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. आजही स्पष्ट आठवतो. आम्ही तिघे मित्र (तिघेही जन्माने ब्राह्मण) गप्पा मारत असताना -
१+
दोघांमध्ये "जातीवाद" हा विषय सुरु झाला, मी म्यूट स्पेक्टेटर होतो. त्या चर्चेत वरील वाक्य माझा एक मित्र अतीव अभिमानाने आणि आत्मविश्वासाने म्हणून गेला. ते वयच कमाल असतं. नुकतंच पुस्तकं वाचन सुरु झाल्याने मला सगळं समजलंय हा अहंगंड असतो.
२+
त्यामुळे बरंच काय काय सुरु होतं आम्हा सर्वांच्याच मेंदूत. तेव्हा हे असं तावातावाने कॉन्फिडन्टली ठोस निष्कर्ष काढून मोकळं होणं स्वाभाविक होतं.
आज, एक तप पूर्ण झाल्यानंतर, मी फार कमी विषयांवर एवढा कॉन्फिडन्ट असतो. तो "जानवं दिसलं की..." डायलॉग मला अनेक प्रसंगी ग्राऊंडेड करतो.
३+
हे सगळं आठवण्यामागचं कारण - "स्त्री-पुरुष समानतेचा विचार आपण प्रत्यक्ष कृतीत आणला पाहिजे, हा उद्देश ठेवून शार्दूल कदम या तरुणाने लग्नात मंगळसूत्र घातले." - ही बातमी.
अमुक एक गोष्ट तमुक एका गोष्टीचं "लक्षण" आहे, असं अनेकदा म्हणतो आपण. म्हणजेच ती जी तमुक एक गोष्ट आहे ती खरा प्रॉब्लम आहे. त्यावर सोल्युशन काढणं आवश्यक आहे. ते सोल्युशन सापडलं की समस्या सुटेल. मग त्या अमुक एका लक्षणाचं काहीच महत्व, काहीच कवित्व उरत नाही.
५+
माझ्या वर सांगीतलेल्या जुन्या आठवणीत - ब्राह्मणाच्या अंगावरील जानवं - हे अनेकांना जातीय वर्चस्वाचं लक्षण वाटतं. (खरं खोटं, योग्य अयोग्य हा इतिहास टाळूया. तो वाद घालण्यात अर्थ नाही, इच्छाही नाही.) समस्या - जातीय वर्चस्वाची भावना - ही आहे. ती भावना संपवणं हे खरं चॅलेंज. पण -
६+
लक्ष सगळं त्या गळ्यातल्या ३/६ बारक्या दोऱ्यांकडे असलं की लक्षणांवरील लढाई सुरु होते. मूळ इश्यू बाजूला फेकला जातो.लग्नात आपण मंगळसूत्र घालूया असं शार्दुलला वाटलं हे खरंच नावीन्यपूर्ण आहे. काहींना ते गमतीशीर वाटेल, काहींना हे खुळचट थेर वाटेल...वाटू देत. पण "करू नये" -
७+
असं काहीच नाहीये त्यात. शार्दूलने केलं ते छानच आहे असं मी तरी मानतो. समस्या - "स्त्री-पुरुष समानतेचा विचार आपण प्रत्यक्ष कृतीत आणला पाहिजे, हा उद्देश ठेवून शार्दूल कदम या तरुणाने लग्नात मंगळसूत्र घातले." - या बातमीत, या बातमीत असलेल्या मूलभूत घोळात आहे.
८+
प्रश्न पहिला - आमच्या सगळ्या वैचारिक लढाया सिबॉलिझममधेच का अडकलेल्या असतात? प्रश्न दुसरा - आमच्या लढाया पारतंत्र्यात असल्याना स्वतंत्र करण्यावर केंद्रित नं रहाता "समानता" आणायची म्हणून स्वतंत्र असल्याना पारतंत्र्यात लोटणाऱ्या का असतात?
९+
मंगळसूत्र हे दास्याचं लक्षण आहे - असं काहींना वाटत असेल तर ठीके. (हे खरं की खोटं वगैरे वाद अजिबात नको. मी सध्या या विषयावर सहमत आहे, असं समजून पुढे सरकू.) पण ते फक्त लक्षण आहे बॉस! मूळ प्रॉब्लम नाही! तुम्ही मूळ समस्या सोडवण्यासाठी काही केलंत तरच काही फलित असणार आहे. अन्यथा -
१०+
सगळ्या अभिजनांच्या आपापसातल्या गप्पा असणारेत या. शार्दूल स्वतः ऑन ग्राऊंड काही काम करत असेल तर उत्तमच. पण त्याच्या फक्त या एका कृतीतून स्त्री-पुरुष समानता येणार आहे वा त्या दिशेने जाण्याचं हे एक पाऊल आहे असं समजणं आमचं सामाजिक लढायांचं आकलन किती बाळबोध आहे हेच दाखवून जातं.
११+
गावकुसात स्त्रियांचं पारतंत्र्य काय असतं याची कल्पनाही नाहीये का आम्हाला? दारू ढोसून अत्याचार करणारा नवरा, त्या अत्याचाराविरुद्ध कुठे बोलायला गेलो तर "तूच जरा समजून घे" म्हणणारे नातेवाईक - आणि प्रसंगी पोलीस-वकील देखील. स्वतः कंबरतोड काम करून चार पैसा कमवायचा आणि -
१२+
घरी निमूट द्यायचा. दूर पायपीट करून पाणी आणून, स्वयंपाक करायचा, उष्टी काढायची, कपडे-भांडे सगळं करायचं, पोरांचं बघायचं, सासूसासरे सांभाळायचे, नवऱ्याचा मार खायचा, रात्री प्रेतागत थंड पडून झोपायचं - हे वास्तव रांगडं रूप आहे "स्त्री-पुरुष असमानतेचं". जसजसे "वरच्या" क्लासमधे
१३+
सरकत जाऊ तसतसे पदर उलगडत जातात. स्वरूप कधी अधिक जाचक तर कधी जरा सौम्य होत जातं.आम्ही पुरुषांनी मंगळसूत्र घालणं हे ही असमानता कमी करण्याकडे पडलेलं "एक पाऊल आहे" असं आम्हाला वाटत असेल तर ती मृतवत पडलेली बाई कधीच स्वतंत्र होणार नाहीये. (अगेन-पुरुषांनी मंगळसूत्र घालणं "वाईट" आहे
१४+
असं अजिबात म्हणणं नाही. पण ही काही समानतेच्या लढाईतील समिधा नाही हे प्लिज समजून घ्या.)
आता दुसऱ्या प्रश्नाकडे.
आर्थिक समानता आणायची असेल तर गरिबांना श्रीमंत करा सर. त्यांना संधी मिळवून द्या. न्याय्य स्पर्धेचं वातावरण निर्माण करा.
पण तुमचं समानतेचं व्हर्जन -
१५+
गरिबांना श्रीमंत करणारं नसतं. श्रीमंतांना गरीब करण्याचं असतं.
असं का बरं?
जातीय असमानता संपवायची असेल तर पीडित वंचित मागासलेल्याना उन्नत करण्याकडे लक्ष देऊया...तथाकथित प्रिव्हिलेज्ड लोकांना खाली ओढण्याचा पावित्रा का बरं?
मंगळसूत्र हे जर दास्याचं लक्षण असेल - तर -
१६+
स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याच्या बंधनातून मुक्ती द्या ना...तुम्ही काय त्या बंधनात अडकताय?! हे कसलं सिम्बॉलिझम झालं? पण समस्या ही आहे की "लग्नानंतर माझी बायको मंगळसूत्र घालणार नाही" याची बातमी होत नाही. कारण एकतर त्यात कसलाच पंच नाही. दुसरं - ऑलरेडी अनेक बायका हे करतच आहेत!
१७+
या सिम्बॉलिझमच्या लढाईत अनेक स्त्रिया ऑलरेडी स्वतंत्र झाल्या आहेत...मग त्याचं कौतुक ते काय?
त्यामुळे तथाकथित स्वतंत्र होण्याच्या बातम्या आता आम्ही छापत नाही. लाक्षणिक पारतंत्र्य ग्लोरिफाय करतो.आमच्या प्रायोरिटीज काय आहेत हेच आम्हाला अजून नीट उमगलेलं नाही.
१८+
आम्हाला मनामनात असलेली जातीय उतरंड संपवायची आहे की फक्त जानवं-जानवं खेळायचंय?
गरिबांना श्रीमंत करायचं आहे की "दरी वाढली" म्हणत वरच्या टोकावर असलेल्यांच्या नावाने बोटं मोडायचीयेत?
आम्हाला स्त्री खरोखर स्वतंत्र करायची आहे की मंगळसूत्र-नथ-हळदीकुंकू या वरपांगी लक्षणांवर -
१९+
जुजबी मलमपट्टी करून वैचारिक गंड सुखावून घ्यायचाय?
ती मृतवत पडलेली बाई या प्रश्नांच्या उत्तरांची वाट बघतीये.
Many people die with their music still in them. ऑलिव्हर वेन्डल होम्स यांचं जगद्विख्यात वाक्य. ९९% लोक असेच असतात, असं म्हणतात!
पण ऐसा क्यू?
आपण सगळे एक समाज म्हणून मेडिओक्रसीकडे का जातो, तीच आपली नैसर्गिक टेण्डन्सी का आहे यावर गेले बरेच दिवस -
१+
- खल करतोय. वाचन, चर्चा, रिसर्च.
कुणी स्पष्टपणे यावर बोललं नाहीये. म्हणजे टिपिकल उत्तरं - ध्येय नसणं, शिस्त नसणं, रोज स्वतःबरोबर वेळ नं घालवणं वगैरे आहेतच.
पण त्याहून खोल काही कारण असेल का यावर विचार करत असताना एक गोष्ट जाणवली.
२+
सेल्फ डेव्हलपमेंट हा बाळबोध, बुळबुळीत, हास्यास्पद प्रकार समजला जातो. आपल्याकडेच नाही, सगळीकडेच. जग गाजवणारे अनेक लोक पर्सनल मास्टरीवर भरभरून बोलतात, लिहितात. वेगवेगळे ब्रेन रिसर्च, सायकॉलॉजिकल अनालिसिस समोर ठेवतात.
त्यातून प्रत्येकाने आपल्यात लपलेला ग्रेटनेस शोधावा -
तेंडुलकर-मंगेशकरांची चौकशी होणार म्हणून भाजप समर्थक चिडलेत.
का रे बाबांनो?
यात अनपेक्षित काय आहे नेमकं?
त्यांना सत्ता राबवणं जमतं! तुमच्या लाडक्यांना जमत नाही! इतकं साधं सरळ आहे सगळं!
केंद्र सरकारला जे ७ वर्षांत झेपलं नाही, जमलं नाही ते -
१+
महाराष्ट्रातील आघाडी सरकार अगदी विनासायास करतंय. काँग्रेस, राष्ट्रवादी (आणि आता शिवसेनासुद्धा) - भाजपसमोर या बाबतीत नेहेमीच सरस ठरले आहेत. "सत्ता राबवणं" म्हणजे काय हे त्यांना कळतं.
सोशलमिडीयावर शिवीगाळ केली म्हणून सडकून काढतात ते उघडपणे. -
२+
(आपले नेते मात्र त्याच गुंडाच्या तब्येतीची चौकशी करतात!) एकेरी संबोधन केलं म्हणून एकीचं घर तोडतात, दुसऱ्याला ८ दिवस तुरुंगात डांबतात.
"आम्ही सर्व भारतीय एक आहोत!" असं म्हणणाऱ्याला संघी गणवेशात दाखवावं लागणं हा तुमचा स्कॉअरिंग पॉईंट नव्हे पराभव आहे!
१+
ज्या दैवी गळ्याच्या गायिकेने कित्येक दशकं भारतीयांना अवीट गोडीचा निर्भेळ आनंद मिळवून दिला, तिची साधना तुम्हाला हास्यास्पद वाटत असेल, फक्त तिने देशाच्या बाजूने एक स्वर उमटवला म्हणून...तर तुमची झोळी रिकामीच राहिली रे भिकाऱ्यांनो!
२+
तेंडुलकर, मंगेशकर, कुंबळे, पी टी उषा...
ही सर्व माणसं नाहीत...भारताला घडवणारी, भारताला ओळख देणारी, आपल्या अस्तित्वाची साक्ष आहेत ही थोर मंडळी!
एका फटक्यात तुम्ही यांना काय काय म्हणून गेलात!
त्याने या कुणाच्याही तपश्चर्येस काहीही काळिमा लागत नाही...तुमचंच तोंड काळं होतं रे!
आपण "भारतीय" आहोत असं दाखवून देणारे अनुभव अधूनमधून येतात आणि बरं वाटतं. पुनश्च एक सुखद अनुभव येतोय...भारतीय संस्कृतीतील अनेक तेजस्वी धडयांपैकी एक...वयं पंचाधिकं शतम्...आपण हा धडा विसरलो नाही आहोत हे जाणवतंय आणि बरं वाटतंय!
वनवासात असलेल्या पांडवांची फजिती करण्यासाठी दुर्योधन निघाला असताना, रस्त्यात गंधर्वांचा राजा चित्रसेन दुर्योधनाला धरतो. बंदी करतो.
हे समजल्यावर पांडव दुर्योधनाच्या मदतीस धावून येतात, त्याला सोडवतात.
२+
वास्तवात दुर्योधन अडचणीत सापडलाय हे बघून भीमार्जुन खुश होतात...तेव्हा युधिष्ठिर त्यांना समजावून सांगतो. म्हणतो आपण आपापसात कितीही भांडत असलो तरी "बाहेरच्या" लोकांसमोर आपण १०५च आहोत. १०० कौरव, ५ पांडव हा भेद आपला अंतर्गत. पण इतरांसाठी आपण १०५ एकत्रच आहोत.
राम मंदिराबद्दल आस्था असणारे बिनडोक ठरवावेसे वाटताहेत
यातून तुम्ही सामान्य भारतीयांपासून किती दुरावले आहात हे कळतंच. पण तुम्ही किती अमानवी आहात, हे ही दिसतं.
१+
शतकानुशतके या भूमीवर एक वारसा जपला गेलाय. इथल्या मातीने आमच्यात काही मूल्यं रुजवली आहेत. आमच्या आजी आजोबांनी आम्हाला लहानपणापासून काही गोष्टी सांगितल्या आहेत. मोठे होत असताना आम्ही इतिहास शिकलो आहोत.
भूतकाळातील घटना वर्तमानवर आघात करत भविष्य घडवत असतात, हे माहितीये आम्हाला.
२+
राम मंदिर या सगळ्याचाच परिपाक आहे.
जिजाऊ आईंनी छत्रपती शिवरायांना घडवताना रामच शिकवला. लहानपणी चांदोबा दाखवताना आईने रामाची गोष्टच सांगितली. म्हणूनच जय राम जी की ते राम राम ते राम नाम सत्य है पर्यंत कणाकणात रुजलाय राम इकडे.