Many people die with their music still in them. ऑलिव्हर वेन्डल होम्स यांचं जगद्विख्यात वाक्य. ९९% लोक असेच असतात, असं म्हणतात!
पण ऐसा क्यू?
आपण सगळे एक समाज म्हणून मेडिओक्रसीकडे का जातो, तीच आपली नैसर्गिक टेण्डन्सी का आहे यावर गेले बरेच दिवस -
१+
- खल करतोय. वाचन, चर्चा, रिसर्च.
कुणी स्पष्टपणे यावर बोललं नाहीये. म्हणजे टिपिकल उत्तरं - ध्येय नसणं, शिस्त नसणं, रोज स्वतःबरोबर वेळ नं घालवणं वगैरे आहेतच.
पण त्याहून खोल काही कारण असेल का यावर विचार करत असताना एक गोष्ट जाणवली.
२+
सेल्फ डेव्हलपमेंट हा बाळबोध, बुळबुळीत, हास्यास्पद प्रकार समजला जातो. आपल्याकडेच नाही, सगळीकडेच. जग गाजवणारे अनेक लोक पर्सनल मास्टरीवर भरभरून बोलतात, लिहितात. वेगवेगळे ब्रेन रिसर्च, सायकॉलॉजिकल अनालिसिस समोर ठेवतात.
त्यातून प्रत्येकाने आपल्यात लपलेला ग्रेटनेस शोधावा -
३+
धमाल जीवन जगावं यासाठी धडपडणारे कितीतरी अत्युत्कृष्ट आत्मे चहूकडे काम करताहेत. आपल्यातले अनेक अश्या मास्टर्सना फॉलो करत असतील, त्यांची पुस्तकं, व्हिडीओज, क्वोट्स एन्जॉय करत असतील.
पण या अश्या लोकांना आपण "विद्वान" समजतो का?
त्यांना वैचारिक प्रांतात मानाचं स्थान देऊ शकतो का?
४+
अजिबात नाही!
म्हणूनच यांची मतं, रिसर्च "आदरणीय' म्हणून आपल्या मेंदूवर रुजवून घेत नाही आपण.
हेच राजकीय विश्लेषक, सामाजिक विचारवंत यांच्याबद्दल मात्र अगदी उलट आहे.
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची राजकीय मतं पटो न पटो - त्याच्या लेखन/भाषणाचं कसलं जोखड अंगावर घेऊन फिरतो आपण!
५+
ज्यांची पटतात, आवडतात ते तर भगवानच! ते आमच्यासाठी प्रखर बुद्धिवान असतात, विद्वान असतात, तज्ज्ञ, आदरणीय असतात. यांनी त्या क्षेत्रात किती मेहनत घेतलीये, किती मनन चिंतन केलं आहे, काय कमावलं आहे - याची चाचपणी नं करता आपण त्यांना पदवी बहाल करतो.
६+
त्यांच्या त्या मतांचा तुमच्या आमच्या जीवनात कुठलाही कन्स्ट्रक्टिव्ह परिणाम होणार नसतो तरी आपण त्यांचा शब्द प्रमाण मानतो. त्यांना महत्वाचं स्थान देतो आपल्या विचारविश्वात.
इतकंच काय - तद्दन भिकार अॅक्टिंग टॅलेन्ट असणाऱ्या कलाकारांनी फक्त एक राजकीय ट्विट केलं तर आपण त्यांना -
७+
एकदम गांभीर्याने घ्यायला लागतो! त्यांचं मत आवडलेल्यांसाठी ते अचानक अभ्यासू झालेले असतात!
पण ज्यांनी हॅबिट्स, थॉट्स, सक्सेस, डेली रूटिन्स या कितीतरी मूलभूत गोष्टींवर महिनो न महिने रिसर्च करून, स्रोत जमवून निष्कर्ष काढून आपल्यासमोर एक ठोस आराखडा ठेवला आहे,
दिशा दाखवायचा -
८+
प्रयत्न केलाय त्यांना आपण "वा, छान!" इतकं म्हणून किंवा "ह्या! याने काही होत असतं का?" असं उडवून देऊन विसमरणात फेकतो.
त्यापुढे - जे लोक सेल्फ-फेल्प प्रकारच्या पुस्तकांचे नियमित वाचक आहेत, अश्या लेखकांचे "चाहते" आहेत - ते तरी त्या लेखकांना "विद्वान" मानतात का?
९+
सेल्फ-फेल्प पुस्तकं "इंटलेक्चुअल" सेक्शनमध्ये ठेवावीशी वाटतील का त्यांना?
नोप! नेव्हर!
का असेल हा फरक?
कारण राजकीय चर्चांमध्ये तुमच्या आमच्यावर कुठलीच जबाबदारी येत नाही.
कार्ल मार्क्स फार भारी काहीतरी लिहून गेले - मी ते वाचलंय - मला ते समजलंय - मला ते पटलंय --- बस्स -
१०+
इतकं म्हटलं की मी विद्वान, अभ्यासू म्हणवून घेण्यास तयार.
पण "मी टोनी रॉबिन्सला फॉलो करतो" म्हटलं, की स्वाभाविकपणे - त्याच्या कोणकोणत्या टिप्स मी जीवनात रुजवल्या आहेत - हा पुढचा लॉजिकल प्रश्न आहे.
तिथे मी क्लीन बोल्ड होतो.
मला ती जबाबदारीच नकोय!
११+
म्हणून मार्क्सवाद वा "कुरूंदकर संप्रदाय" तयार होणं सोपं आहे.
टोनी रॉबिन्सचा "भक्त" संप्रदाय तयार होणं कठीण असतं. झाला तरी त्याकडेसुद्धा "उगाच काहीतरी बोलतात!" म्हणून दुर्लक्ष केलं जातं.
(हा राजकीय लिखाण/वाचन करणाऱ्यांना टोमणा अजिबात नाही...कृपया गैरसमज करून घेऊ नका...!)
१२+
रॉबिन शर्मा किंवा रॉबर्ट कियोसाकीच्या फेसबुक पोस्ट्स खाली "थँक्स! आय फाऊंड यू ड्युरिंग अ डिफिकल्ट फेज ऑफ माय लाईफ अँड यू / युअर बुक्स हेल्प्ड मी गो थ्रू इट" असं म्हणणारे शेकडो सापडतील.
अँड येट - आमच्यासाठी रॉबिन शर्मा, रॉबर्ट कियोसाकी हे "इंटेलेक्चुअल्स" नाहीयेत.
१३+
कारण हे लोक अॅक्शनेबल गोष्टी सांगतात. तुमच्याकडून रिझल्ट्सच्या अपेक्षा ठेवतात.
आमच्याकडून हायर स्टॅंडर्ड अपेक्षित असणारे लोक आम्हाला विद्वान म्हणून मान्य नसतात.
तेंडुलकर-मंगेशकरांची चौकशी होणार म्हणून भाजप समर्थक चिडलेत.
का रे बाबांनो?
यात अनपेक्षित काय आहे नेमकं?
त्यांना सत्ता राबवणं जमतं! तुमच्या लाडक्यांना जमत नाही! इतकं साधं सरळ आहे सगळं!
केंद्र सरकारला जे ७ वर्षांत झेपलं नाही, जमलं नाही ते -
१+
महाराष्ट्रातील आघाडी सरकार अगदी विनासायास करतंय. काँग्रेस, राष्ट्रवादी (आणि आता शिवसेनासुद्धा) - भाजपसमोर या बाबतीत नेहेमीच सरस ठरले आहेत. "सत्ता राबवणं" म्हणजे काय हे त्यांना कळतं.
सोशलमिडीयावर शिवीगाळ केली म्हणून सडकून काढतात ते उघडपणे. -
२+
(आपले नेते मात्र त्याच गुंडाच्या तब्येतीची चौकशी करतात!) एकेरी संबोधन केलं म्हणून एकीचं घर तोडतात, दुसऱ्याला ८ दिवस तुरुंगात डांबतात.
"आम्ही सर्व भारतीय एक आहोत!" असं म्हणणाऱ्याला संघी गणवेशात दाखवावं लागणं हा तुमचा स्कॉअरिंग पॉईंट नव्हे पराभव आहे!
१+
ज्या दैवी गळ्याच्या गायिकेने कित्येक दशकं भारतीयांना अवीट गोडीचा निर्भेळ आनंद मिळवून दिला, तिची साधना तुम्हाला हास्यास्पद वाटत असेल, फक्त तिने देशाच्या बाजूने एक स्वर उमटवला म्हणून...तर तुमची झोळी रिकामीच राहिली रे भिकाऱ्यांनो!
२+
तेंडुलकर, मंगेशकर, कुंबळे, पी टी उषा...
ही सर्व माणसं नाहीत...भारताला घडवणारी, भारताला ओळख देणारी, आपल्या अस्तित्वाची साक्ष आहेत ही थोर मंडळी!
एका फटक्यात तुम्ही यांना काय काय म्हणून गेलात!
त्याने या कुणाच्याही तपश्चर्येस काहीही काळिमा लागत नाही...तुमचंच तोंड काळं होतं रे!
आपण "भारतीय" आहोत असं दाखवून देणारे अनुभव अधूनमधून येतात आणि बरं वाटतं. पुनश्च एक सुखद अनुभव येतोय...भारतीय संस्कृतीतील अनेक तेजस्वी धडयांपैकी एक...वयं पंचाधिकं शतम्...आपण हा धडा विसरलो नाही आहोत हे जाणवतंय आणि बरं वाटतंय!
वनवासात असलेल्या पांडवांची फजिती करण्यासाठी दुर्योधन निघाला असताना, रस्त्यात गंधर्वांचा राजा चित्रसेन दुर्योधनाला धरतो. बंदी करतो.
हे समजल्यावर पांडव दुर्योधनाच्या मदतीस धावून येतात, त्याला सोडवतात.
२+
वास्तवात दुर्योधन अडचणीत सापडलाय हे बघून भीमार्जुन खुश होतात...तेव्हा युधिष्ठिर त्यांना समजावून सांगतो. म्हणतो आपण आपापसात कितीही भांडत असलो तरी "बाहेरच्या" लोकांसमोर आपण १०५च आहोत. १०० कौरव, ५ पांडव हा भेद आपला अंतर्गत. पण इतरांसाठी आपण १०५ एकत्रच आहोत.
राम मंदिराबद्दल आस्था असणारे बिनडोक ठरवावेसे वाटताहेत
यातून तुम्ही सामान्य भारतीयांपासून किती दुरावले आहात हे कळतंच. पण तुम्ही किती अमानवी आहात, हे ही दिसतं.
१+
शतकानुशतके या भूमीवर एक वारसा जपला गेलाय. इथल्या मातीने आमच्यात काही मूल्यं रुजवली आहेत. आमच्या आजी आजोबांनी आम्हाला लहानपणापासून काही गोष्टी सांगितल्या आहेत. मोठे होत असताना आम्ही इतिहास शिकलो आहोत.
भूतकाळातील घटना वर्तमानवर आघात करत भविष्य घडवत असतात, हे माहितीये आम्हाला.
२+
राम मंदिर या सगळ्याचाच परिपाक आहे.
जिजाऊ आईंनी छत्रपती शिवरायांना घडवताना रामच शिकवला. लहानपणी चांदोबा दाखवताना आईने रामाची गोष्टच सांगितली. म्हणूनच जय राम जी की ते राम राम ते राम नाम सत्य है पर्यंत कणाकणात रुजलाय राम इकडे.
हे जोकर्स जगातले सर्वात मोठे लूजर्स आहेत.
"मदहोश" हा शब्द अख्खा देश जगतोय कालपासून. शेवटचा विजयी फटका घडला तेव्हा ऑफिसमध्ये लॅपटॉपस्क्रिनला चिकटून बसलेली अख्खी टीम किंचाळत नाचायला लागली.
१+
सचिन सौरव राहुल नंतर मी क्रिकेटच्या बाबतीत अगदीच अरसिक झालोय.
इतका की मला आपल्या टीममध्ये कोण प्लेयर्स आहेत हेही माहित नसतं. तरी मला कालच्या विजयाने विलक्षण ऑस्सम फिलिंग दिली.
पण काही आंबट चेहऱ्याचे लोक मात्र जरा आनंदी होऊ शकत नाहीत, हसू शकत नाहीत.
यातून काय कळतं माहितीये?
२+
तुमची मानसिकताच पराभूताची असेल तर तुम्हाला जिंकण्याचा आनंद कधीच मिळू शकणार नाही...!
तुम्हाला हिंदुत्व आवडत नाही. हा विचार भारतात इतक्या झपाट्याने का पसरलाय हा विचार करण्याची तुमची वैचारिक क्षमताच नाही. त्याची टर उडवावीशी वाटते.