तेंडुलकर-मंगेशकरांची चौकशी होणार म्हणून भाजप समर्थक चिडलेत.
का रे बाबांनो?
यात अनपेक्षित काय आहे नेमकं?
त्यांना सत्ता राबवणं जमतं! तुमच्या लाडक्यांना जमत नाही! इतकं साधं सरळ आहे सगळं!
केंद्र सरकारला जे ७ वर्षांत झेपलं नाही, जमलं नाही ते -
१+
महाराष्ट्रातील आघाडी सरकार अगदी विनासायास करतंय. काँग्रेस, राष्ट्रवादी (आणि आता शिवसेनासुद्धा) - भाजपसमोर या बाबतीत नेहेमीच सरस ठरले आहेत. "सत्ता राबवणं" म्हणजे काय हे त्यांना कळतं.
सोशलमिडीयावर शिवीगाळ केली म्हणून सडकून काढतात ते उघडपणे. -
२+
(आपले नेते मात्र त्याच गुंडाच्या तब्येतीची चौकशी करतात!) एकेरी संबोधन केलं म्हणून एकीचं घर तोडतात, दुसऱ्याला ८ दिवस तुरुंगात डांबतात.
छातीठोक. उघड उघड.
अर्थात, या अपेक्षा भाजपकडून नाहीतच.
पण गुन्हेगारांचं शासन तर व्हावं?!
३+
देवेंद्र फडणवीसांचं नाव वापरून खंडणीखोरी होते. भाजपला त्यावर व्हिक्टिमकार्ड खेळणं सोडून काहीही करावंसं वाटत नाही. फडणवीसांच्या बायकोपासून नरेंद्र मोदींच्या आईपर्यंत विकृत विनोद होतात, उफ्फ होत नाही यंत्रणेत.
का?
"कारण ते आम्हाला फॅसिस्ट म्हणतील!"
४+
पण सत्ता राबवणं काय असतं हे "त्या" पक्षांना माहितीये. आपल्याला फक्त आपल्याच मातृसंघटनेवर अश्लाघ्य शिवीगाळ करणाऱ्यांना मुलाखती देणं आवडतं! कसं एकदम जण्टलमन बिहेवियर! कारण यातून म्हणे मतपरिवर्तन होऊ शकतं! हीच आमची चाणक्यनीती!
५+
२६ जानेवारीला धिंगाणा "होऊ दिला", त्या आधीच ६ महिने या सर्वांची तयारी सुरु असताना काहीही केलं नाही ही आमची चाणक्यनीती. इकडे मात्र इनमीन वर्षभराचं सरकार. २-४ ट्विट्स काय केले, थेट राज्याचं गुप्तहेर खातं वापरताहेत!
६+
७ वर्ष जुनं "मजबूत" केंद्र सरकार डोळ्यांसमोर ६ महिने दंगलीची तयारी दिसत असताना आयबी, रॉ वापरून खलिस्तानी लोकांना पडद्यामागे विविध मार्गाने संपवू शकले नाही. त्या चाणक्याचं नाव आघाडी सरकारने घ्यावं. आपली चाणक्यनीती "दंगली होऊ दे" म्हणणारी.
७+
बाय द वे, २६ जानेवारीला "दंगल होऊ देऊन आंदोलन संपवलं" अशी वदंता होती. वास्तव आपल्या डोळ्यासमोर आहे.
कारण आम्ही दंगली थांबवू शकत नाही.
का बरं नाही थांबवू शकत?
कारण पत्रकार त्यांच्या खिश्यात आहेत!
अरे देशद्रोही असणाऱ्या पत्रकारांना अटक करण्यापासून कुणी थांबवलं आहे तुम्हाला?
८+
महाराष्ट्रातले पत्रकार कोरेगाव भीमा दंगल भडकवणारे रियल टाईम ट्विट करत होते. अक्षरशः लोकांना चिथवत होते. काय केलं फडणवीस सरकारने?
नथिंग. मग जबाबदार कोण?
आणि त्यांना अटक नं करून आता कोणतं गोड बोलताहेत हे तुमच्याबद्दल?
९+
जगभरातले सेलिब्रिटीज वापरताहेत तुम्हाला "फॅसिस्ट" ठरवत "चाय-योगा"ची प्रतिमा बदलायला. तुमच्या नेत्यांबद्दल काय काय घाणेरड्या अफवा पसरवतात...ऐकवत नाहीत अजिबात. विद्यार्थी, शेतकरी, मागासवर्गीय...सगळे अँगल्स वापरून तुम्हाला खिंडीत गाठताहेत.
१०+
भाजपची यावर रिऍक्शन काय? शून्य. त्याला फक्त चाणक्यनीती वा ठंडा कर के खाएंगे छाप काहीतरी गोंडस वेष्टन.
इकडे महाराष्ट्र सरकार बघा..!
लोकोपयोगी योजना रद्द करा, एजंटविना होणाऱ्या रिक्रूटमेंट्स बंद करा, साधूंची लिंचिंग होऊद्या..पोरीबाळींवर बलात्कार होऊ द्या..बिनधास्त आहेत एकदम!
११+
भाजप कार्यकर्ते आक्रमक ट्विट्स करून सोडून देतात. नवा दिवस नवं प्रकरण नवं ट्विट. बास!
हे सगळं पालुपद कशासाठी?
तर तेंडुलकर-मंगेशकरांची चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला म्हणून आपण चिडण्यात अर्थ नाही - हे समजण्यासाठी.
त्यांनी देशाची बाजू घेतली - हे सत्य क्षणभर बाजूला ठेऊ.
१२+
क्षणभर गृहीत धरू की या दोघांनी केंद्र सरकारची, भाजपची बाजू घेतली आहे.
बरं मग? सो व्हॉट?!
इतर सेलिब्रिटीजनी काँग्रेसी स्युडो सेक्युलरीझमची भलामण कधी केलेली नाही काय? गांधी नेहरूंचा ब्रँड पसरवला नाहीये काय? फ्रिडम ऑफ स्पीच काय फक्त डाव्या काँग्रेसींचंच असतं काय?
१३+
"एकसारखे" ट्विट्स रवीश कुमार पासून स्वरा भास्कर पर्यंत कधी कुणी केले नव्हते काय?!
हे सगळं असूनही - या सर्वांचे सगळे धंदे निर्धोकपणे सुरु आहेत. सुरु रहातील. पडद्यामागे कोऑर्डीनेट कॅम्पेन्स करून शिस्तबद्ध रीतीने दंगली घडवल्यात राव लोकांनी भाजपच्या राज्यात...!
कश्यामुळे?
१४+
कारण भाजपला सत्ता राबवणं, धारधार विरोधक असणं जमत नाही, झेपत नाही.
त्यामुळे तेंडुलकर मंगेशकरांसाठी आपण चिडून उपयोग नाही.
आपलापण तेंडुलकर मंगेशकर होऊ नये याची आपापली काळजी घ्या. तेवढंच आहे आपल्या हाती.
"आम्ही सर्व भारतीय एक आहोत!" असं म्हणणाऱ्याला संघी गणवेशात दाखवावं लागणं हा तुमचा स्कॉअरिंग पॉईंट नव्हे पराभव आहे!
१+
ज्या दैवी गळ्याच्या गायिकेने कित्येक दशकं भारतीयांना अवीट गोडीचा निर्भेळ आनंद मिळवून दिला, तिची साधना तुम्हाला हास्यास्पद वाटत असेल, फक्त तिने देशाच्या बाजूने एक स्वर उमटवला म्हणून...तर तुमची झोळी रिकामीच राहिली रे भिकाऱ्यांनो!
२+
तेंडुलकर, मंगेशकर, कुंबळे, पी टी उषा...
ही सर्व माणसं नाहीत...भारताला घडवणारी, भारताला ओळख देणारी, आपल्या अस्तित्वाची साक्ष आहेत ही थोर मंडळी!
एका फटक्यात तुम्ही यांना काय काय म्हणून गेलात!
त्याने या कुणाच्याही तपश्चर्येस काहीही काळिमा लागत नाही...तुमचंच तोंड काळं होतं रे!
आपण "भारतीय" आहोत असं दाखवून देणारे अनुभव अधूनमधून येतात आणि बरं वाटतं. पुनश्च एक सुखद अनुभव येतोय...भारतीय संस्कृतीतील अनेक तेजस्वी धडयांपैकी एक...वयं पंचाधिकं शतम्...आपण हा धडा विसरलो नाही आहोत हे जाणवतंय आणि बरं वाटतंय!
वनवासात असलेल्या पांडवांची फजिती करण्यासाठी दुर्योधन निघाला असताना, रस्त्यात गंधर्वांचा राजा चित्रसेन दुर्योधनाला धरतो. बंदी करतो.
हे समजल्यावर पांडव दुर्योधनाच्या मदतीस धावून येतात, त्याला सोडवतात.
२+
वास्तवात दुर्योधन अडचणीत सापडलाय हे बघून भीमार्जुन खुश होतात...तेव्हा युधिष्ठिर त्यांना समजावून सांगतो. म्हणतो आपण आपापसात कितीही भांडत असलो तरी "बाहेरच्या" लोकांसमोर आपण १०५च आहोत. १०० कौरव, ५ पांडव हा भेद आपला अंतर्गत. पण इतरांसाठी आपण १०५ एकत्रच आहोत.
राम मंदिराबद्दल आस्था असणारे बिनडोक ठरवावेसे वाटताहेत
यातून तुम्ही सामान्य भारतीयांपासून किती दुरावले आहात हे कळतंच. पण तुम्ही किती अमानवी आहात, हे ही दिसतं.
१+
शतकानुशतके या भूमीवर एक वारसा जपला गेलाय. इथल्या मातीने आमच्यात काही मूल्यं रुजवली आहेत. आमच्या आजी आजोबांनी आम्हाला लहानपणापासून काही गोष्टी सांगितल्या आहेत. मोठे होत असताना आम्ही इतिहास शिकलो आहोत.
भूतकाळातील घटना वर्तमानवर आघात करत भविष्य घडवत असतात, हे माहितीये आम्हाला.
२+
राम मंदिर या सगळ्याचाच परिपाक आहे.
जिजाऊ आईंनी छत्रपती शिवरायांना घडवताना रामच शिकवला. लहानपणी चांदोबा दाखवताना आईने रामाची गोष्टच सांगितली. म्हणूनच जय राम जी की ते राम राम ते राम नाम सत्य है पर्यंत कणाकणात रुजलाय राम इकडे.
हे जोकर्स जगातले सर्वात मोठे लूजर्स आहेत.
"मदहोश" हा शब्द अख्खा देश जगतोय कालपासून. शेवटचा विजयी फटका घडला तेव्हा ऑफिसमध्ये लॅपटॉपस्क्रिनला चिकटून बसलेली अख्खी टीम किंचाळत नाचायला लागली.
१+
सचिन सौरव राहुल नंतर मी क्रिकेटच्या बाबतीत अगदीच अरसिक झालोय.
इतका की मला आपल्या टीममध्ये कोण प्लेयर्स आहेत हेही माहित नसतं. तरी मला कालच्या विजयाने विलक्षण ऑस्सम फिलिंग दिली.
पण काही आंबट चेहऱ्याचे लोक मात्र जरा आनंदी होऊ शकत नाहीत, हसू शकत नाहीत.
यातून काय कळतं माहितीये?
२+
तुमची मानसिकताच पराभूताची असेल तर तुम्हाला जिंकण्याचा आनंद कधीच मिळू शकणार नाही...!
तुम्हाला हिंदुत्व आवडत नाही. हा विचार भारतात इतक्या झपाट्याने का पसरलाय हा विचार करण्याची तुमची वैचारिक क्षमताच नाही. त्याची टर उडवावीशी वाटते.
प्रॉब्लम हा आहे की व्हाट्सअप फक्त अर्णबकडेच नाहीये.
===
Broadcast Audience Research Council च्या माजी CEO, पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचा एडिटरइनचीफ अर्णब गोस्वामी यांच्या तथाकथित चॅट्सवरून हलकल्लोळ माजलाय. चॅट्स किती खऱ्या आहेत इथपासून सुरुवात आहे.
दासगुप्तांना त्रास दिला गेलाय या तक्रारीदेखील वाचायला मिळाल्या आहेत. पण तूर्तास या चॅट्स मुंबई पोलिसांनी उघड केल्या आहेत म्हणजे खऱ्या आहेत असं मानून चालू.
राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गोंगाटात या चॅट्समध्ये नेमकं गंभीर काय आहे हे नीट बघितलं तर मला ४ आरोप प्रामुख्याने दिसलेत.
२+
पहिला - पुलवामा अतिरेकी हल्ला झाल्याचा आनंद होणे
दुसरा - बालाकोट एअर स्ट्राईकबद्दल आधीच माहिती असणे
तिसरा - टीआरपी कमी-जास्त करण्याबाबत BARC च्या माजी CEO आणि COO मधील संभाषण