मित्रानो आज श्री राम नवमी सर्व सनातनी हिंदूंना श्री राम जन्माच्या शुभ कामना
श्री राम म्हणजे आदर्शाचा मेरूमणीच एक आदर्श पुत्र एक आदर्श शिष्य,आदर्श मित्र,आदर्श बंधू आदर्श पती आदर्श राजा एक आदर्श महामानव,
श्री रामाला समर्पित असे महाशक्तिशाली स्तोत्र श्री राम रक्षा
@PadmakarTillu Image
राम रक्षा न येणारा हिंदू विरळाच.
आजच्या या पावन दिवशी जाणून घेऊ या राम रक्षेची कहाणी,बऱ्याच जणांना माहित हि असेल
पण ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी हा राम रक्षा धागा
रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की, "एकदा माता पार्वतीने शंकारांस विचारले जसे विष्णुसहस्त्र नामावली आहे
तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का?तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या 'रामरक्षा' स्तोत्र विषयी सांगितले.पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे ती अशी की,
आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली.१००कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळवावेसे वाटू लागले
देव, मानव आणि दानव भगवान शंकरां कडे ते प्राप्त करण्या साठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्या मध्ये खूप वाद झाले. शेवटी श्ंकरांनी रामायणाची सर्वां मध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. १०० ही सम संख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच
@Vishakh50862352 @RajeGhatge_M Image
हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात ३२ अक्षरे होते. त्याचीही वाटणी केली. शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वत:कडे ठेवली. ते म्हणाले," ही दोन अक्षरे मी माझ्याकडे च ठेवतो " असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास संगितले व ध्याना साठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना
शंकरांनी ती अक्षरे स्वत:जवळ ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्व जण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जावू लागले. एक ऋषि मात्र शेवटपर्यंत थांबले.त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती.
@gajanan137
त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्या नंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जावून 'रामरक्षा' सांगितली
@Prof_Jay1
काही काळाने ऋषींना जाग आली. आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा 'रामरक्षेची ' निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते 'बुधकौशिक' ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे.
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः || तथा लिखितवान्प्रात: प्रबुध्हो बुधकौशिकः ||

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी -शतकोटीचे बीज म्हणजे राम हि ती दोन अक्षरे

मित्रानो आपण आता श्री राम रक्षेचे महत्व जाणून घेऊ या
श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की,प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे Image
बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष भगवान शंकरानेच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रा तील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.

कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी
त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ति उत्पन्न होते. व ती आपले सदा सर्वकाळ रक्षण करते. आबालवृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्या पासून निश्चित फायदा आहेच.

रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे
कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमी पर्यंत हे अनुष्ठान करतात.
प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा या प्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा
रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे. रामनाम घेत असतांना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= लक्ष्मण होते. नामस्मरण करताकरता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्ती मध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणा मुळे तृप्त होते
त्यातील विकार नाहीसे होतात ,शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते. अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते.सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते राम स्वरूप होते
रामरक्षेच्या एका श्लोका बद्दल-कदाचित माहिती असेलही सगळ्यांना
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।

रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।

या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत Image
रामो=रामः(प्रथमा) रामं (द्वितीया), रामेण (तृतीया), रामाय (चतुर्थी), रामान्नास्ति= रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे (सप्तमी),भो राम (संबोधन). ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.
मित्रानो राम रक्षेला आरोग्य रक्षक कवच असे हि म्हंटले जाते कसे ते पाहू या

एक वेगळा पैलू तुमच्या समोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते.

आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते
रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे? त्यासाठी राम रक्षेतले काही श्लोक मांडत आहे

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः । स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः । उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः । पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥
हे सहा श्लोकांचे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्या साठी मंत्र धारण करणे
थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे
मित्रानो आमच्या घरी आम्ही जेव्हा वाढदिवस साजरे करतो तेव्हा केक कापतो औक्षण करतो पण मेणबत्त्या विझवत नाही तर आम्ही अक्षता घेऊन राम रक्षेतले हे श्लोक म्हणून ज्याचा वाढदिवस आहे त्याच्यावर या अक्षतांचे सिंचन करतो आपण हि करून पहावे खूप समाधान आणि शांत वाटते
ह्या कवचाच्या फलश्रुती मध्ये किती अर्थ आहे पहा

पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥

म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे
असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकां कडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत!!*
छद्मचारिणः' ह्या शब्दाचा शास्त्रीयअर्थ पाहूया विज्ञान शिकत असताना 'pseudopodium' हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबा सारखे जीव हे pseudopodium म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात!!
थोडक्यात; इथे 'राक्षस' हे राक्षस जाती नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवां साठी वापरण्यात आलेले आहेत. आजवर आयुर्वेदिक डाॅक्टरांना वैद्यकीय उपचार करत असताना;अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला आहे Image
मित्रानो आजच्या कोरोना महामारीच्या काळात आपण हि श्री राम रक्षेचा आधार घेऊ या आणि वैद्यकीय उपचारांबरोबरच ह्या दिव्य स्तोत्राने आपले मनोबल उंचावू या
🙏जय श्री राम 🙏 Image

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा

Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rajrajsi

23 Apr
शरद पोंक्षेनी एका अत्यंत जवळच्या मित्राला ही पोस्ट त्याच्या वैयक्तिक नंबर पाठवली
विचार करण्यासारखी आहे ,
दोन ते तीन दिवसात वेडं होण्याची पाळी आली आहे.आज कोरोना मुळे सगळे घरात बसलेत.काय करायचं कसा टाईमपास करायचा?असे अनेक प्रश्न पडलेत.अजून काही दिवस असंच घरात बसावं लागणार आहे
1/5
मीही वाचत बसलोय,पुस्तक आहे .. “आक्षेप आणि वास्तव”
सावरकरांवर केलेले आरोप व खंडन,सहज विचार आला की, आपण आपल्या घरात बसलोय
आपली जवळची माणसं सोबत आहेत.सर्व प्रकारच्या खाण्याच्या वस्तू आहेत,पुस्तकं आहेत,टीव्ही आहे. ATTACHEसंडास-बाथरूम आहे, नळाला पाणी आहे
2/5
टॅब,काॅंम्पूटरवर नविन एप्सवरून वेबसिरीज सिनेमे बघतां येतायत तरीही कंटाळा आलाय.काय कराव सुचत नाही.अजून१०दिवस काढायचे?बापरे किती भयंकर आहे?कधी संपणार हे?
मग सावरकर केवळ देशासाठी ७/११ च्या अंदमानच्या कोठडीत वरील कोणत्याही सुखसोयी नसताना, वर गळ्यात - पायात साखळदंड अडकवलेले,
3/5
Read 5 tweets
21 Apr
राम नवमीच्या दिनी भागवतातील सुंदर कथा

चैत्र महिन्यातील नवमी,प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, या गोजिरवाण्या दिव्य बालकाचे दर्शन व्हावे म्हणून सर्व देव देवता वेगवेगळी रूपे घेवून दर्शनाला येवू लागले, ज्याला जसे दर्शन घेता येईल ते ते देव श्री रामाचे दर्शन घ्यायला येवू लागले
1/4
सुर्यनारायण भगवान पण दर्शन घेवू लागले,इतके लोभस मोहक रूप पाहून भगवान सुर्यानारायणाचे समाधान होईना,त्या वेळी सुर्यभगवान आपल्या जागेवरून हालेचनात
इतर सर्व देवता दर्शन घेवून जात होत्या,पण "चंद्र " मात्र दु:खी होता,सूर्य पुढे सरकेना त्यामुळे संध्याकाळ होईना
2/4
त्यामुळे चंद्राला दर्शन घेता येईना त्यांनी सूर्यनारायणाला खूप विनवण्या केल्या,सूर्य काही पुढे जाईना
शेवटी चंद्राने रामप्रभूंना सांगितले कि सूर्याला पुढे सरकायला सांगा सूर्य भगवान त्यांचे ऐकेनात, माझे समाधान झाले कि मी पुढे जाईन,असे म्हणू लागले
रामप्रभूंनी चंद्राची समजूत घातली3/4
Read 4 tweets
27 Mar
मित्रानो खूप दिवस झाले थ्रेड लिहून बऱ्याच जणांनी विचारणा हि केली
पण सध्या वेळ आणि शांत मन यांचा ताळमेळ जुळून येत नाहीये सध्या काही दिवस झाले जुन्या पार्टनर(अर्थातच वपु) बरोबर नव्याने मन हलके करतोय
आजूबाजूची परिस्थती हि उबग आणणारी आहे म्हणून मन वपुंच्या विचारांची सावलीत आहे
एक अर्थवाही वपु लेख आपल्यापुढे ठेवत आहे जो सौन्दर्याची वेगळी परिभाषा मांडत आहे
"माणसे जिंकायची आहेत ? मग दोन तीन मिनिटे काढून हे वाचाच !!"
एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते
कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात
@PadmakarTillu
ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात.
बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो.
डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो.
मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो.
"नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय."
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो.
Read 15 tweets
26 Mar
म्हातारी मला सांगत होती, 'मुली बघणं हा पुरुषांचा स्थायीभावच आहे.बायकांकडे पाहावं ही भावना जोवर जागती आहे, तोवर पुरुष हा पुरुष आहे.आता विनाचे वडील, तसं वय झालेलं,पण असे ह्या खिडकीजवळ उभे राह्यले की गुंग व्हायचे,मोठ्या प्रसन्नतेने रस्त्यावरच्या बायका पाहत राहायचे.ते तर पुरुषच,
1/4
पण तुला गंमत सांगते,एकदोनदा मी पण त्यांच्याजवळ जाऊन उभी राह्यले.रस्त्यावरून जाणाऱ्या पोरींकडे त्यांच्या-म्हणजे तुम्हा पुरुषांच्या-नजरेतून पाहण्याचा प्रयत्न केला.तेव्हाबायांकडे पागल होऊन पाहणारे पुरुष मला पागल वाटेनासे झाले बघ!आता तर रस्त्यावरच्या मुली पाहण्याचा मलाच छंद जडलाय
2/4
बेभान करण्याचं तंत्र बरोब्बर शिकल्यात बघ पोट्ट्या. चित्रासारख्या राहतात बघ. मी तर गेल्या अनेक दिवसांत, कुरूप मुलगीच पाह्यली नाही. मी हसून विचारलं, 'आजी, तुमचे हे विचार एकदा माझ्या बायकोला ऐकवाल का?' 'मुळीच ऐकवणार नाही. 'का?' 'तरुणपणात बेटा अहंकार असतो.
3/4
Read 4 tweets
24 Jan
मित्रानो गेल्या १० महिन्यात आपल्या आसपासच्या समाज जीवनात सर्वच थरांवर खूप मोठ्या प्रमाणावर उलथापालथ झाली ,याच घटनेचे जे निरीक्षण प्रसिद्ध मानसतज्ज्ञ मयुरेश डंके यांनी केले आहे त्यातील शब्दन्शब्द खरा आहे, मी तरी माझ्या आजूबाजूला या सर्व घटना घडलेल्या पहिल्या आहेत
@PadmakarTillu
आपल्यापैकी बरीच जणांनी हि पहिल्या असतील त्यावरच आधारित त्यांचा हा लेख आपल्याला नक्कीच अंतर्मुख करेल

"जिंदगी इतनी आसान नहीं होती!"

मी गेले काही दिवस अगदी नियमानं दररोज निरीक्षण करतोय, तेव्हा असं लक्षात आलं, की मोठमोठ्या शहरांमधून माणसांचं स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढतंय.
लोक ओझी कमी करतायत. कारण त्यांना हे सगळं झेपण्याच्या पलीकडं गेलंय. आणि ते नुसते जात नाहीयत,कायमचे जातायत. घर आणि घरातल्या वस्तू मिळेल त्या किमतीला विकून जातायत. मोठ्या शहरांमध्ये राहणं त्यांना परवडत नाहीय आणि पुढेही परवडणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलंय
@Arya00716 @KohaleMangla
Read 24 tweets
20 Dec 20
मित्रानो आजच्या धाग्याचे नाव आहे डिसले तसे नसते अर्थात सध्या गाजत असलेल्या डिसले गुरुजींचा विषय त्यांना मिळालेल्या७ कोटीच्या पुस्काराची एक बाजू विमुक्त नी एका थ्रेड मधून मांडली आहेच त्याच संदर्भातडॉ विनय काटे यांचा एक लेख वाचनात आला त्याचेच सार ह्या धाग्यात आहे
@PadmakarTillu
चला तर वाचू या "डिसले तसे नसते" धागा
गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, देशातील मीडियात रणजितसिंह डिसले गुरुजींचं नाव गाजत आहे,कारण त्यांना मिळालेला "ग्लोबल टीचर अवार्ड 2020"अगदी अलीकडेच म्हणजे2015साली वरक्के (Varkey)फाउंडेशन या ब्रिटनमध्ये ऑफिस असणाऱ्या संस्थेने हे अवार्ड सुरूकेले
आणि त्याची रक्कम 1 मिलियन डॉलर इतकी ठेवली. भारतीय चलनात ही रक्कम 7 कोटींपेक्षाही जास्त असल्याने या रक्कमेकडे पाहूनच भारतीय लोकांचे डोळे विस्फारले. मग डिसले गुरुजींना महाराष्ट्रभूषण द्या, राज्यपालनियुक्त आमदार बनवा वगैरे मागण्या राजकीय क्षेत्रातून आल्या,
@ROHITKUMBHOJKAR
Read 30 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!