एक अस्थमाने आजारी तलाठी महिलेचा अनुभव-
त्या मास्क घाला अशी जेंव्हा लोकांना विनंती करत, “काही नाही मॅडम, काही होत नाही” अशी सरसकट उत्तरे ऐकुन गप्प बसायच्या.
प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काय करणे अपेक्षीत आहे?
#कोरोना साथीच्या काळात काय काळजी घेतली पाहिजे हे आरोग्य यंत्रणांनी सांगितले नव्हते की आजारी पडणाऱ्या सामान्यांना माहित नव्हते?
या कालावधीत नागरिक म्हणून किती सामाजीक भान आपण दाखवले?
मला माहित आहे, या प्रश्नांमुळे ज्यांचे कुटुंबीय व नातेवाईक आजारी पडले व दगावले अथवा आजारी आहेत
३
त्या सर्वांना माझा राग येणार आहे.
अनेकजण परिचीतांना वाचविण्याचा जीवापाड धडपड करत आहेत, पण जर आधीच थोडी काळजी घेतली असती, तर #कोविड19 परिस्थिती वेगळी नसती का?
मी माझ्या परीने कोणत्याही शासनाला- राज्य वा केंद्र, किंवा #आरोग्य यंत्रणांना या गंभीर परिस्थितीला जबाबदार मानत नाही.
४
मी #जबाबदार धरते बेजबाबदार वागलेल्या आणि वागणाऱ्या प्रत्येक नागरिकाला.
बाजारहाट वा लग्न कार्य वा धार्मीक कार्य- यात शरिराने सहभागी होताना देवाने दिलेला मेंदु नावाचा अवयव न वापरलेला प्रत्येक जण या परिस्थितीला जबाबदार आहे. आपल्यापैकीच कोणी ना कोणी सर्व मृत आणि संसर्गीत व्यक्तींना
५
संसर्ग पोचवला आहे.
काय सांगावे तुमच्या लक्षणे न दाखवलेल्या संसर्गाने एखाद्या घरातील आधारवड हरपला असेल, कोणी पोरके झाले असेल कोणी पोर हरवले असेल. कल्पना करा स्वत:ची एखादा खूनी किंवा खूनाचा प्रयत्न करणारा गुन्हेगार म्हणून!
काळजी घ्या, भोवतालच्या लोकांवर काळजीपूर्वक वागण्याचा
६
दबाव निर्माण करा.
कोरोना ची ही साथ प्रशासनाच्या आटोक्याबाहेरची होती व आहे. या संसर्गाच्या प्रसाराची पद्धत बघता प्रत्येकाने निट वागले पाहिजे.
हे सारे माहित असलेल्या, समजलेल्या लोकांना परत काय सांगायचे?