बाबा अत्यावश्यक सेवेत नोकरीला असल्याने एक ना एक दिवस कोरोना घरी धडकेल अशी पूर्वतयारी आम्ही सर्वांनीच केलेली होती. त्यात बाबांना डायबिटीस. म्हणून तेवढी एक चिंता असायची. २ दिवस ताप आला आणि तिसऱ्या दिवशी टेस्ट केली. टेस्ट positive आली. लगेच CT स्कॅन १/n
केला. सुदैवाने स्कोर ५ होता. त्यामुळे सगळे निवांत होतो. स्कोअर कमी असल्यामुळे घरीच इलाज करायचे ठरवले. त्याप्रमाणे एक डॉ. घरी येत होते. डायबिटीस आहे तर रिस्क नको घ्यायला म्हणून रेमडीसेवर घेऊयात असे डॉ. ने सुचवले. त्याप्रमाणे ६ इंजेक्शन चा कोर्स पूर्ण केला. ५-६ दिवस रोज अंडी, २/n
चिकन असा पौष्टीक आहार आणि भरपूर पाणी पिणे व आराम करणे ही दिनचर्या सुरू ठेवली. आईला पण लक्षणे होती म्हणून टेस्ट केली ती पण positive होती. स्कोर कमी होता. मग तिचा पण घरीच इलाज केला. एवढं नक्की माहित होत की लवकर इलाज सुरू केले आहेत त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. रेमडीसेवर ३/n
कोर्स संपला त्याच्या दुसऱ्यादिवशी बाबांच्या डोळ्याच्या खाली सूज आली आणि दुखायला लागले. डॉ नी एक पेन किलर दिली. ह्यावर जर त्रास कमी झाला तर ठीक नाही तर तज्ञ डॉ कडे जायला सांगितले. त्यादिवशी त्रास कमी झाला पण पुन्हा दुसऱ्यादिवशी सूज वाढली. मग तिसऱ्या दिवशी डॉ कडे गेलो. त्यांनी ४/n
पहिला प्रश्न विचारला डायबिटीस आहे का? उत्तर हो. दुसरा प्रश्न कोरोना झाला होता का? उत्तर हो. पुढच्या क्षणाला म्हणाले हे फंगल इन्फेक्शन आहे. लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या. अतिशय वेगात पसरून हे काहीच दिवसात दृष्टी घालवत आणि मग मेंदूला लागण होते, ती झाली तर ८०% डेथ चान्स आहे! ५/n
तसाच घरी आलो. आईला सांगितलं थोडंसं इन्फेक्शन झालंय अन इथे हॉस्पिटल मध्ये कुठे जागा नाहीय म्हणून हैद्राबाद चाललो आहोत. धादांत खोटं बोलत होतो मी. पण आमच्याकडे हैद्राबादला कोणी उपचार घ्यायला जातंय म्हणलं की सर्वांचे हातपाय गळतात. आईचे पण गळाले... आईला जवळ घेतलं आणि सांगितलं, ६/n
" फक्त एका दिवसाचं काम आहे. ते इन्फेक्शन काढून लगेच येतो. घाबरून जाण्यासारखे काहीही नाही." आई सोबत येण्यासाठी हट्ट करत होती. तिला म्हणलं, " जसा घेऊन जातोय त्यापेक्षा चांगली तब्येत करून तुझ्यासमोर उभा करतो बाबांना. तू नको काळजी करू." मित्राला कॉल केला, लगेच हैद्राबाद जायचं आहे ७/n
अर्ध्या तासात तयार हो. किती दिवस लागतील सांगता येत नाही." तो, मी आणि बाबा आहे त्या कपड्यांवर निघालो. बाबांना त्रास वाढत होता. हैद्राबाद चा दवाखाना म्हणजे १.५-२ लाख सोबत ठेऊनच दवाखान्यात पाय ठेवावा लागतो. खिशात ३०-४० हजार होते. मग तिथे पोहचेपर्यंत बाकी पैसे जमावले.८/n
बाबाला होणारा त्रास बघून आपोआप डोळ्यात पाणी येत होत पण परवानगी नव्हती. जेव्हा एखादी जबाबदारी आपल्यावर पडते तेंव्हा कमकुवत होता येत नसत. मीच रडायला लागलो असतो तर बाबांचा धीर खचला असता. तिथे पोहचल्यावर डॉ. नी सविस्तर सगळं सांगितलं. लवकरात लवकर हे फंगस काढून टाकून २१ दिवसांचा ९/n
अँटी फंगल चा डोस घ्यावा लागेल. पण एक अट ठेवली, कोविड negative असल्याशिवाय तुमच्यावर कुठलाच इलाज करता येणार नाही! आणि लवकर इलाज केला नाही तर इन्फेक्शन पसरेल... त्याक्षणी सर्व विवेक हरवून बसलो होतो... जेवढ्या प्रार्थना पूर्ण आयुष्यात केल्या नव्हत्या तेवढ्या त्या एका दिवसात १०/n
केल्या असतील. सुदैवाने रिपोर्ट negative आली! बाबांना लगेच आलिंगन दिले आणि म्हणलं," जिंकलो बाबा! आता कशाचीच भीती बाळगू नका!" लगेच उपचार सुरू केले. आयुष्यात सह्याद्री सारखा पाठीशी असणारा बाप पहिल्यांदा मी व्हीलचेअर वर बसून OT मध्ये जाताना पाहत होतो. ज्यांच्या शरीराला कधी एक ११/n
टाका पडला नाही त्यांच्यावर सर्जरी होणार होती. अक्षरशः डोळ्यात अश्रू धडका मारत होते बाहेर यायला. पण मनाचा दगड करावा लागला... Undertaking फॉर्म वर सही करताना हात थरथरत होते. मनात नको ते वाईट विचार येत होते. शेवटी मनाला सांगितलं, एवढे वर्ष बाबांनी सांभाळ केलाय आपला अगदी १२/n
तळहाताच्या फोडाप्रमाणे. आता आपली जबाबदारी आहे. OT मध्ये जाताना बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणलं,"लवकर बाहेर या, मोबाईल मध्ये चार्जिंग नाही माझ्या, बोर होतंय मला एकट्याला." बाबा खळखळून हसले... वेटींग रुममध्ये घालवलेले ते दोन तास आयुष्यातले सर्वात लांब दोन तास होते. शेजारी १३/n
इतर रुग्णाच्या नातेवाईकांचे चिंताग्रस्त, रडकुंडीला आलेले चेहरे पाहून मन खोल विचारात बुडून जात होतं. पैसा किती शूद्र आहे याची जाणीव होत होती. पण जीवन वाचवण्यासाठी तोच शूद्र पैसा लागतो हे अधिक प्रकर्षाने जाणवत होत. इथे बसलेले लोक पैसा आहे म्हणून इलाज तरी घेत होते. त्या हजारो १४/n
जीवांचे काय जे फक्त पैसा नाही म्हणून सरकारी दवाखान्याच्या बाहेर तडफडून उपाचारविना गेले?
स्ट्रेचर वर झोपलेले बाबा OT च्या बाहेर आले आणि आयुष्यात पहिल्यांदा त्यांना त्या अवस्थेत पाहून पुरतं अवसान गळाले. त्यांचा हात गच्च पकडला आणि आणि फक्त बघत राहिलो. एक शब्द पण फुटत नव्हता. १५/n
तिथून त्यांना recovery रूम मध्ये घेऊन गेले तेंव्हा washroom गाठलं आणि आवरून ठेवलेला अश्रूंचा बांध मोकळा केला! घरातल्या मोठ्या मुलांना संकट काळात घाबरून जाण्याची, भावनिक व्हायची आणि रडण्याची परवानगी नसते! अगदी दगड बनून परिस्थितीचा सामना करावा लागतो. इनफेक्ट झालेला भाग १६/n
काढल्यामुळे इन्फेक्शन पसरण्याचा धोका कमी झाला होता. त्यामुळे ७०% युद्ध जिंकलो अशी भावना आमच्या मनात झाली. पुढे २१ दिवस अँटी फंगल इंजेक्शन घ्यावे लागणार होते. म्हणजे २१ दिवस मुक्काम पक्का. एका दिवसाचा खर्च ४० हजारांच्या घरात जाईल असे सांगितले होते. आता कर्ता पुरुष आजारी १७/n
म्हणल्यावर एवढ्या पैशाची सोय कशी करायची हा प्रश्न पडला. डॉ. ला उपचार सुरू करायला सांगितले. बाबांना खर्च किती लागतोय ह्याची कल्पना येणार नाही ह्याची काळजी घेतली. त्यांच्या मनाला कुठलीच चिंता नको. आयुष्यात पैसा कमवा किंवा माणसे ह्या वाक्याची प्रचिती आली. २ दिवसात ८ लाख जमा झाले१८/n
डॉ. मराठी होते. त्यांनी स्वतः जवळचे ४० हजारांचे इंजेक्शन आम्हाला फ्री दिले. एवढेच नाही तर जे इंजेक्शन दवाखान्याच्या फार्मसी मध्ये ८ हजाराला एक होते ते त्यांनी बाहेरून २.५ हजारात उपलब्ध करून दिले! डॉ. हे देवाचे रूप असतात ह्याची पण प्रचिती आली. एक मध्यमवर्गीय कुटुंब म्हणून १९/n
त्यांनी मदत केली का मराठी म्हणून सहानुभूती होती देव जाणो. पण मानसिक आधारासोबत आर्थिक सहकार्य खूप लाभले त्यांचे. १४ दिवसात पूर्ण बरे होऊन घरी आलो. घरी आल्यावर मात्र मोठे युद्ध जिंकल्याची भावना मनात होती. आईला दिलेला शब्द पाळला ह्याचे समाधान होते. माझ्या सह्याद्रीला धक्का लागला२०/n
नाही ह्यासाठी ईश्वराचे आभार मानले. अर्ध्या तासात अनिश्चित काळासाठी सोबत येणारा, ४ दिवस फक्त २ तासांची कारच्या ड्रायव्हिंग सीट वर झोप घेणारा मित्र. कर्ज काढून आर्थिक मदत करणारे मित्र, नातेवाईक आणि हिंमत न हारता केलेला सामना ह्या भांडवलावर ह्या संकटावर मात करू शकलो.
आता प्रत्येकाला हीच विनंती करतो, आजार अंगावर काढू नका त्वरित उपचार करा. घाबरून जाऊ नका. सगळ जग तुमच्या मदतीला येईल तुम्ही हिमतीने लढलात तर. स्वतः खचलात तर कोणीही वाचवू शकणार नाही. #StayStrongIndia
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
कालपासून बऱ्याच जणांचे ट्विट पाहतोय, सरकार जरी लस मोफत देणार असेल तरी आम्ही विकत घेऊ शकतो म्हणून तेवढी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार. ह्या कठीण परिस्थितीत सरकारला मदत करणे आपले कर्तव्य आहे.
हे वाचून वाटलं किती जागरूक नागरिक आहोत आपण. किती चिंता आहे आपल्याला आपल्या
देशाची, राज्याची. पण राज्याची स्थिती एवढी बिकट असताना फक्त नागरिकांनी मदतीसाठी प्रयत्न करायचे असतात का? ज्यांच्या हातात राज्याचा कारभार आहे त्यांचे वर्तन कसे आहे? ते काटकसरीने खर्च करत आहेत का? असे किती आमदार, मंत्री आहेत जे स्वताची कार, घर नाही घेऊ शकत? किमान आर्थिक तंगीच्या
काळात तरी सरकारी संसाधनांचा वापर टाळून ह्या गोष्टींसाठी खिशातून पैसे खर्च करावेत. ह्या उलट शेकडो कोटी मंत्र्यांच्या घरावर डागडुजी साठी खर्च केले गेले. वरून म्हणतात कसे, " मला लेविश लाईफस्टाईल जगायला आवडते!" इकडे सामान्य जनता लसीच्या ८०० रुपयांचा देखील विचार करत आहे अन् नेते मात्र
ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांच्या घरात कोणाला डायबिटीस आहे अशा सर्वांना एक कळकळीची विनंती, कोरोनाला हलक्यात घेऊ नका. डायबिटीस असलेल्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्वरित आणि योग्य उपचाराने तो कमी होतो. त्यानंतर पोस्ट कोविड काही आजार मात्र होण्याची दाट शक्यता आहे.
त्यापैकी म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन अतिशय घातक आहे. कोरोना झालेल्या डायबेटिक व्यक्तीला जर चेहऱ्यावर सूज आली असेल तर एका दिवसाचा ही वेळ न घालवता त्वरित उपचार सुरू करा. हे इन्फेक्शन सुरुवातीला डोळ्यांच्या खाली, नाकात होतं आणि तिथून मग जलद गतीने प्रसार होतो. ह्यात दृष्टी जाणे
मेंदूकडे इन्फेक्शन झाले तर स्ट्रोक्स येणे असे गंभीर परिणाम होऊ शकतात. मेंदूला संसर्ग झाला तर प्रसंगी जीवही गमवावा लागू शकतो. सध्या माझ्या घरात एक रुग्ण ह्याने ग्रासलेला आहे. म्हणून पोट तिडकिने सांगतोय काळजी घ्या. फंगल इन्फेक्शनचे निदान झाले तर एकही दिवस न घालवता त्वरित उपचार सुरू
" माझे सोन्यासारखे बाबा गेले रे..."
मित्राच्या तोंडून हे शब्द ऐकून आलेला राग कोणावर काढू? स्वतःला दोष देऊ की मी त्याची काहीच मदत करू शकलो नाही? का विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ज्यांच्यामुळे कोरोना पसरतो आहे? का आजवरच्या सर्व सत्ताधाऱ्यांना ज्यांनी पुरेशा वैद्यकीय सुविधा उभारल्या
नाहीत? का नागरिकांना ज्यांनी कधी दवाखाना, वैद्यकीय संशोधन केंद्रे ह्यासाठी कधी आंदोलने केलीच नाही? आपल्या जातीच्या महापुरुषांचा पुतळा उभारावा म्हणून प्रत्येक जातीने आंदोलने केली. पण एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे म्हणून कधी कोणी आंदोलन केले नाही. त्या फ्रान्स च्या
राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात आमच्याकडे आंदोलन झाले. धार्मिक भावना दुखावल्या म्हणून. पाकिस्तानी हिंदूंना देशाचे नागरिकत्व द्यायचे का नाही ह्यावरून आपले लोक एकमेकांविरोधात उभे राहिले! पण मजाल कोणाची कोणी प्रत्येक जिल्हा- तालुक्यातील लोकांची सोय होईल असे इस्पितळ व्हावे म्हणून
सारखेच कंटेंट असलेले एकच औषध वेगवेगळ्या कंपन्या बनवतात. मग कंपनी बदलली की त्या औषधाची किंमत बदलते. काही कंपन्यांचे औषध 100रू ला असेल तर तेच औषध एखादी कंपनी 1000 रू ला विकते. मग डॉक्टरांनी आपल्या कंपनीचे औषध प्रिस्क्रीप्शन वर लिहून द्यावे यासाठी ह्या कंपन्या डॉक्टरांना विविध
भेटवस्तू, फॉरेन ट्रीप, ई. प्रलोभने देत असतात. एवढेच काय मागे ह्या गिफ्टच्या बदल्यात शरीरसुखासाठी मुलींची मागणी करणाऱ्या एका डॉक्टरला बेड्या ठोकल्या पोलिसांनी! अशी एकदम व्यवस्थित सामन्यांची पिळवणूक सुरू असते.
काही देशांमध्ये डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन वर औषधाच्या कंपनीचे नाव
लिहायला मनाई आहे. डॉक्टरांनी फक्त औषधांचे कंटेंट लिहायचे. मग रुग्णाला ते कंटेंट असणारे औषध ज्या कंपनीचे परवडेल तो ते घेईल. डॉक्टर फार्मा कंपन्यांचे प्रतिनिधी नसतात की ते त्या विशिष्ठ कंपनीचा फायदा व्हावा म्हणून त्यांचीच औषधे लिहून देतील. हा विचार असावा बहुधा त्यामागे.