@LetsReadIndia
#महाराष्ट्रदिन
#खाद्यसंस्कृती
विषय जिव्हाळ्याचा आहे म्हणल्यावर व्यक्त व्हायला हवं. महाराष्ट्रात परिपूर्ण आहार जितका समृद्ध आहे तितकेच महत्त्वाचे इतर पदार्थ सुद्धा आहेत. चटण्या लोणची या जेवणाची अधिक लज्जत वाढवतात.१/५
लाल तिखटाची शेंगदाणा चटणी, काराळ्याची चटणी, जवसाची चटणी, तिळाची चटणी अत्यंत आवडीची. काही ठिकाणी कवठाची, चिंचेची गोड चटणी करतात. ओला नारळ किसून केलेली चटणी तर अप्रतिम. पेरू चिरून त्याला फोडणी देऊन केलेली चटणी तोंडाला पाणी आणते.२/५
कच्च्या कैरीचे खारे लोणचे, तिखट लोणचे, करंवंदाचे लोणचे, ओल्या हळदीचे लोणचे, लिंबू-मिरचीचे खारे लोणचे, आवळ्याचे लोणचे, लिंबाचे गोड लोणचे, मुरांबा गुळांबा उन्हाळा अधिक सुसह्य करतात.३/५
कोकणातला मेतकूट हा प्रकार साधा पण कधीही उपलब्ध होणारा साध्या भातात कालवून खाल्ला तरीही तृप्त करणारा. ओल्या डाळींची पाट्यावर वाटून हिरवी मिरची लसूण घालून थोडीशी परतलेली चटणी देखील अप्रतिमच. ४/५
तुमच्या भागातल्या वेगळ्या चटण्या आणि लोणच्याची माहिती आम्हालाही द्या..कारण खाणार त्यालाच देव देणार 😋😋😋५/५

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Dr. Nishigandha

Dr. Nishigandha Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Nishigandha269

29 Apr
पणजी, आजी आणि आई तिघींकडून जुन्या उत्तमोत्तम पाककला शिकायला मिळाल्या. साध्या जिन्नसांपासून तयार केलेले महाराष्ट्रीयन पदार्थ आजही तेवढेच प्रिय. हिवाळ्यात हुलग्यांपासून बनवलेलं तिखट माडगं, शिंगोळे तर पणजीची खासीयत. १/n
#महाराष्ट्रदिन
@LetsReadIndia
आजी लाल जोंधळ्यांची जाड भाकरी करायची त्यावर पाट्यावर वाटून केलेला हिरव्या मिरची लसणाचा झणझणीत खर्डा, तेल मिरची कच्चा कांदा टाकून केलेले तोंडलावणी म्हणजे केवळ अमृतचं. दोडका वाटून त्यात हिरवी मिरची ,लसूण टाकून दोडक्याचा ठेचा व्हायचा बाजरीच्या भाकरीसोबत खायला मजा यायची.२/n
उन्हाळ्यात केलेला सांगा वर्षभरासाठी आयत्या वेळेची भाजी म्हणून तयार असायचा. गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कुरडया सणासुदीला कुरकुरीत पणा आणायच्या. गव्हाच्या शेवया उन्हाळ्यात आमरसाबरोबर साजूक तूप टाकून तृप्ती द्यायच्या.३/n
Read 7 tweets
23 Sep 20
Covid-19 या आजाराने सध्या थैमान घातलं आहे. याच आजारातून बरे झालेल्यांना अजूनही बरीचशी लक्षण दिसत आहेत. आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात हाती आलेले‌ काही निकष या थ्रेडमध्ये मांडत आहे. कोविड होऊ न देणं आणि मास्क सॅनिटायझर चा वापर करणं हाच सध्या रामबाण उपाय आहे.१/n
खालील लक्षणे:-
लक्षणे सौम्य ते तीव्र आढळून येतात
१.मेंदूशी संबंधित लक्षणे- चक्कर येणे, विसराळूपणा, दुःखी वाटणे ,गोंधळ होणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी, निद्रानाश, चव आणि वासाची संवेदना बदलणे, अनामिक भीती वाटते, चिडचिडेपणा.
२.केस गळणे.
३.अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे,अंग थरथरणे, वजन कमी होणे.२/n
४.Herpes शी निगडीत आजार, EB व्हायरस शी संबंधित आजार, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, हार्मोन( संप्रेरक)मधील चढ-उतार, उष्णता सहन न होणे.
५.सांधेदुखी
६.लघवीतून प्रथिने उत्सर्जित होणे.
७.फुफ्फुसावरील परिणाम-
दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे,श्वास पुरेसा घेता न येणे. धापा टाकणे.
३/n
Read 15 tweets
22 Sep 20
आपण: आपले ताणतणाव- एक चिंतन - अंजली नरवणे
मनावर विजय- एकनाथ ईश्वरन ( वैशाली जोशी)
चार शब्द द्यावे घ्यावे- संजीव परळीकर
मुलांवरचे संस्कार- शं.व्यं.काश्यपे
द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग- डेव्हिड श्वार्त्झ ( प्रशांत तळणीकर)
शांततेने काम करा- पॉल विल्सन (सुनंदा अमरापूरकर)
१/४
धीरुभाईझम- ए.जी.कृष्णमूर्ती (सुप्रिया वकील
प्रतिकूलतेवर मात- ए.जी.कृष्णमूर्ती(सुप्रिया वकील)
डबेवाला- श्रीनिवास पंडीत (सुप्रिया वकील)
संतकवी तुकाराम: एक चिंतन- डॉ.निर्मलकुमार फडकुले.
थेंबातल आभाळ- प्रवीण दवणे
वय वादळविजांचं -प्रवीण दवणे
चैतन्याचे चांदणे- डॉ.यशवंत पाटणे
२/४
नापास झालेल्यांची गोष्ट- अरूण शेवते.
अजब गजब जगणं वागणं-. राजन खान
इकिगाई- हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस
15 secrets successful people know about time management- Kevin Kruse.
आपण एक विश्वस्त - डॉ बाबा नंदनपवार
तरूणांना आवाहन- स्वामी विवेकानंद
३/४
Read 5 tweets
25 Aug 20
मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,राजमाता जिजाऊ यांच्यावरील सर्व पुस्तके वाचनीय.
मी मलाला- मलाला युसुफजाई
मैत्रेयी - अरूणा ढेरे
नवी स्त्री- वि.स खांडेकर
आई समजून घेताना- उत्तम कांबळे
बियॉन्ड अग्ली- कॉन्स्टन्स ब्रिस्को
१/५
होय मी स्त्री आहे- मनोबी बंदोपाध्याय झिमली मुखर्जी पांडे
कटिंग फ्री- सुप्रिया वकील
डॉक्टर म्हणून जगताना- डॉ सुलभा ब्रम्हनाळकर
इंद्रा नूयी जीवन चरित्र- अन्नपूर्णा/ प्रसाद ढापरे
Becoming- Michelle Obama
हा यें मुमकीन हैं- डॉ तरू जिंदाल.
गार्गी अजून जिवंत आहे- मंगला आठलेकर
२/५
आकाशस्थ तारांगणा- प्रतिभा हंप्रस
रसिदी तिकट- अमृता प्रीतम
विस्मृतीचित्रे- अरूणा ढेरे
राजमाता जिजाबाई- मा.सा कन्नमवार
सालुमरद तिक्कमा- कविता महाजन
आनंदीबाई जोशी यांचे चरित्र- काशिबाई कानिटकर
बारबाला- वैशाली हळदणकर
३/५
Read 5 tweets
23 Aug 20
संस्कृत भाषा अत्यंत मधुर , प्राचीन ज्ञानामृत असणारी आहे‌. बऱ्याच भाषांचा उगम संस्कृतमध्ये सापडतो. आयुर्वेद, पशुपक्षी, आहारविहार, नीतीमुल्ये यांचं चपखल वर्णन सुभाषितांमध्ये आढळतं. चरक, सुश्रुत,वाग्भटांच्या आरोग्यचिकित्सा आयुर्वेद आजही उपयुक्त आहेत. १२वी नंतर
हा अभ्यास थांबला १/n ImageImage
या थ्रेडमध्ये काही दुर्मिळ आणि आवर्जून वाचावे अशा महत्त्वपूर्ण ग्रंथाची माहिती देतेय.
कालिदासाचे मेघदूत हे महाकाव्य आजही सर्वोच्च रचना मानली जाते.
बाण- हर्षचरित
गुढाण- बृहतकथा
सोमदेव- कथासरितसागर
जयदेव-गीतागोविंद
दंडी- दशकुमारचरित्र
२/n Image
शुद्रक- मृच्छकटिक
भट्टनारायण- वेणीसंहार
नागानंद- रत्नावली
विशाखादत्त- मुद्राराक्षस, भट्टीकाव्य, माघकाव्य, किरातार्जुनीय, नैषधचरित
सुबंधू- वासवदत्ता
भर्तृहरि- शृंगारशतक, नीतीशतक, वैराग्यशतक.
३/n ImageImage
Read 6 tweets
12 Aug 20
बदामी लेण्यांतून दिसणारा सुंदर नजारा..
समोर बदामी किल्ला
अप्पर आणि लोअर शिवालय, तटबंदी बांधलेला तलाव 😊😊❤
#भटकंती Image
बदामी लेणी - ५ ते ७ शतक..
एकूण चार लेणी आहेत. Image
अप्रतिम शिल्पकला...यात विष्णुपुराणातील कथा कोरलेल्या आहेत. ImageImageImage
Read 7 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!