नमस्कार आपण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील *धोडप* या किल्ल्याविषयी माहिती घेऊया.
#धोडप

नाव:- धोडप
उंची:- १४५१ मी / ४७५९ फूट
प्रकार:-गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी:- मध्यम
ठिकाण:- नाशिक, महाराष्ट्र
जवळचे गाव:-धोडांबे
डोंगररांग:-अजंठा-सातमाळा
सध्याची अवस्था:-जीर्ण
स्थापना:-१०४६
*भौगोलिक स्थान*
नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा होय.अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे.सर्वात उंच बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय.शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरुन स्पष्टपणे ओळखू येतो.
राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती. पुढे इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला. धोडप किल्ल्याची इतर नावे धुडप, धरब, धारब आहेत.
शिलालेख क्र.३संपादन करा
हा शिलालेख धोडप किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या डावीकडील भिंतीवर आहे. शिलालेख फारशी लिपी व भाषेत असून हिजरी १०४६ मोहरम महिन्याच्या २५ व्या दिवसाचा उल्लेख त्यात आहे, आणि “दुसरा शूर शहाजहान बादशहा, त्याचा नम्र सेवक अलावर्दी खान तुर्कमान, तसेच त्यांचे इतर
चौदा किल्ले चार महिन्यात जिंकल्याचा उल्लेख त्यात आहे. चौदा किल्ल्यात धोडप ,चांदोर (चांदवड), इंद्राई, राजदेहर, कोळदेहर, कांचना, मांचना , कण्हेरा, जोला (जवळ्या), रोला( रवळ्या), मार्कांड्या, अहिवंत, अचलगड, रामसेज यांचा समावेश आहे.[१]
धोडप किल्ला हा महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये दुसरा सर्वात उंच किल्ला आहे. (प्रथम - साल्हेर - १५६६ मी. (५१४१ फूट))
धोडप किल्ला हा १४५१ मी. (४७६० फूट) उंची असलेला हा पेशवाई किल्ला ९४५ हेक्टर परिसरात कळवण, चांदवड आणि दिंडोरी अशा तीन तालुक्यांच्या परिक्षेत्रात पसरलेला आहे.
हा 'धोडपावनकी' नावाचा किल्ला बर्बन निजामशाह च्या ताब्यातील किल्यांपैकी असावा.ब्रिटीशयाचा उल्लेख 'धरप' असा करीत. हा किल्ला १६३५ मध्ये मुगल सरदार अल्लाह दी बनला स्वाधीन झालेला होता.
मुस्लिम राजां नंतर मराठयांच्या हाती हा किल्ला आल्यावर त्यांनी या किल्ल्याला नाशिकच्या महत्वाच्या
किल्ल्यांपैकी एक बनवले.
धोडपच्या जीवनातील एक महत्त्वाची घटना म्हणजे, या गडाच्या पायथ्याशी माधवराव पेशव्यांनी राघोबाबदादाचा पराभव केला. भोसले, गायकवाड व इंग्रज यांची मदत घेऊन राघोबादादा बंड करणार असे दिसू लागताच माधवरावाने राघोबाला भोसले व मोगल यांची मदत मिळण्याआधी
त्याचा बिमोड करायचे ठरविले. एकंदर ४० हजार फौज घेऊन माधवराव निघाला. राघोबादादा आनंदवल्लीहून तळ हलवून धोडपच्या आश्रयाला आला.राघोबा दादाकडे २५ हजार सैन्य होते.राघोबाची फौज किल्ल्याखाली उभी राहिली.राघोबा धोडप किल्ल्यात गेला. उभयपक्षी मोठी लढाई जुंपून राघोबाच्या सैन्याचा पाडाव झाला.
माधवरावांच्या सैन्याने माचीपर्यंत लूट केली. खजिन्याचा उंट लुटला, किल्ल्याला वेढा दिला, शेवटी राघोबादादा माधवरावांच्या स्वाधीन झाला. त्याला शनिवारवाडयात (पुणे) बंदोबस्तात ठेवण्यात आले.
पेशव्यांच्या अखत्यारीतील दोन सुभेदार आप्पाजी हरी आणि बाजीराव आप्पाजी यांना सोळाशे सैन्यासह
या किल्यावर थांबण्यास सांगितले त्यावेळी होळकरांकडील दोन सरदार अजबसिंग व सुजकुम यानी हल्ला करुन किल्ला ताब्यात घेतला, गावात लुट केली. त्यानंतर तेथे कधी भरभराटी पुन्हा आली नाही. पुन्हा पेशव्यांच्या ताब्यात हा किल्ला आल्यानंतर पेशव्यांच्या अधिकाऱ्यांनी १८१८ मध्ये कोणत्याही
तंट्याशिवाय हा किल्ला सोडून दिला.
१८१८ मध्ये पेशव्यांनी ताबा सोडल्यानंतर धोडपला कॅप्टन ब्रिगसने भेट दिली. त्याने या किल्ल्याचे वर्णन "खडकाळ स्वरुपातला मोठा डोंगर , जो चांदोर (चांदवड) रांगेतील मजबूत बांधणीचा किल्ला आहे".
असे केले आहे."

धोडपच्या डोंगरात उगम पावणाऱ्या नद्या म्हणजे
नेत्रावती व कोलथी या होय.
*किल्ल्याची चढण व जाण्याचा मार्ग:-*
या किल्ल्यावर जाण्यासाठी मुख्यत: दोन मार्ग आहेत. एक वडाळीभाई व दुसरा कळवणमार्गे, बडाळीभोईमार्गे गेल्यास किल्ल्याच्या पायथ्याशी राजपूत लोकांची वस्ती असलेले हट्टी हे छोटेसे गाव आहे. कळवण किंवा देवळामागे गेल्यास
हनुमंतपाडा हे आदिवासी लोकवस्ती असलेले गाव लागते. धोडपच्या पायथ्याशी हट्टी गावापासून माची धोडप गावापर्यंत चढण्यास जवळजवळ एक ते दीड तास लागतो. माचीपासून किल्ल्यावरील सप्तशृंगी देवीच्या कुपा पर्यंत जाण्यास जिथे डोंगराची चढण सुरू होते तिथे मारुतीची स्थापना केलेली आहे.
मारुतीपासून मारचीपरयंत पाऊलवाटेने वळणावळणाने चढत जावे लागते.
थोडे पुढे गेल्यानंतर तीन वाटा फुटलेल्या दिसतात, उजवीकडील वाट माचीवरील सोनाराच्या वस्तीकडे जाते डावीकडील वाट पेशवेकालीन गणपती व शंकराध्या मंदिराकडे तर समोरचीवाट किल्ल्याकडे जाते. या ठिकाणी एक जुनी पायन्यांची
बारव (पायविहीर) आहे. या बारवेची बांधणी संपूर्ण दगडात चौकोन आकाराची असून पाण्यात उतरताना खालील कमानीची रचना मंत्रमुग्ध करून टाकते. उजवीकडच्या वाटेवरमाची धोडपलगत आठ ते दहा घरांची वस्ती आहे. पूर्वी पेशवेकाळात या माचीवर बरीच मोठी वस्ती असावी, असे येथे असलेल्या भग्नावस्थेतील
जीर्णावस्थेतील विखुरलेल्या पडक्या घरांवरून दिसते.
माचीतून पश्चिमकडे जाणाऱ्या वाटेवर प्रथम गणपती मंदिर व एक शंकराचे मंदिर लागते. या शंकराच्या मंदिराजवळ एक पायविहीर आहे. जवळच दोन पाण्याचे कुंड आहेत. तेथून गेल्यानंतर आपण गडाच्या पश्चिम वेशीजवळ पोहोचतो, या वेशीच्या कमानी, दरवाजा आजही
सुस्थितीत आहे. या वेशीबाहेरच काही लोक वस्ती करून राहतात, त्याला गवळीपाडा असे म्हणतात.

गडाचा मुख्य दरवाजा गुप्त ठिकाणी दडवलेला असल्याने कुठूनही दिसत नाही. तिथे पोहोचल्यावर एक पाण्याचे मोठे टाके नजरेस पडते. या पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूस खोदलेला जिना लागतो. जिन्याच्या
शेवटी एक वळण घेताच एक दरवाजा लागतो. वरच्या सपाटीवर आल्याने तर उजव्या बाजूला हवालदाराचा पडका वाडा दिसतो. त्याला सदर असे म्हणतात. डाव्या बाजूला थोडे चालुन गेल्यास पाण्याचे दोन मोठे टाके दिसतात. शेवटी एक मोठी गुफा लागते. या गुफेत सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे या मंदिराजवळ असलेल्या
सप्तशृंगी देवीच्या गुफेपासून थोडे पुढे चालून गेल्यानंतर आपण धोडप किल्ल्याच्या प्रसिद्ध अशा भिंतीवर जाऊन पोहोचतो. या भिंतीचा आकार अतिशय अरुंद पण लांबलचक असा आहे, तर माथा धारदार सुर्याने कापल्यासारखा सपाट आहे. भिंतीचे उभे कडे सुमारे ३०० मीटर उंच आहेत. भिंतीच्या मध्यावर यू आकाराचे
खंडार पडलेले दिसते.
ही जागा समुद्रसपाटीपासून ५०५७.५ फूट उंच असून धोडपचा पिंडीसारखा दिसणा सुळका ५२५ फूट उंच आहे. येथे जाण्यासाठी प्रस्तारोपण करावे लागते

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with vivek badhan

vivek badhan Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @badhanvivek

7 Dec 20
1991 नंतर भारताची अर्थव्यवस्था हि मुक्त झाली म्हणजेच लायसन्स राज संपुन भारताने मुक्त अर्थव्यवस्था अंगीकृत केली
लायसन्स राज मध्ये ठराविक परिवार ह्यांना व्यवसाय चालवायची मक्तेदारी होती कोणी नविन माणुस ह्या लायसन्स राज मध्ये मोठा होऊ शकत नव्हता #8दिसंबर_भारत_चालु_रहेगा
"टाटा,गोदरेज,अंबानी,वाडीआ,बजाज" हि ठराविक कुटुंब फक्त व्यवसाय चालवायची व आज जी कांग्रेस अंबानी अडाणी करत फिरते त्यांचा ह्या लायसन्स राज मध्येच हि मंडळी मोठी झाली श्रीमंत झाली
पन 1991 नंतर मुक्त अर्थव्यवस्था आली आणि अनेक नविन उद्योग व उद्योगपती भारतात तयार झाले
0 बजेट चा अर्थव्यवस्थेवरून आज आपण जगातील 6 वी मोठी अर्थव्यवस्था आज आहोत
आपण रिफाॅर्मस बदल अंगीकृत केले त्यामुळे आपला विकास होत आहे
आज नविन कृषिबील मोदी सरकारने आणला आहे.
एकप्रकारे दलाल व एजेंट चा कचाट्यात सापडलेला शेतकरी हा दलालराज मधुन मुक्त करण्यासाठी बील आणला आहे.
Read 9 tweets
4 Dec 20
Gate way To Telangana
आज भाग्यनगर (हैद्राबाद) महानगरपालिकेचा निकाल आला आणि तो ह्या वेळी आश्चर्यकारक होता पन आशादायक हि आला.पहिल्यांदा औवेसी कुटुंबियांचा गड ओल्ड हैद्राबाद सिटी मध्ये प्रत्यक्ष लढा भाजप ने दिला. मजलिस ला 2 सिटचा नुकसान झाल. दिसायला ते कमी वाटेल पन
#GHMCResults
देशभरात राजकिय शक्ती होत आहे असे स्वप्न पाहणारा मजलिस ला मोठी धोक्याची घंटा ह्या निर्णयाने दिली कारण एकतर्फी निवडणुक जिंकुन येणारा मजलिस चे ह्यावेळी अनेक मतदार प्रामुख्याने मुस्लिम असलेले भाजप कडे वळालेले दिसत आहे दिसायला प्रमाण कमी असेल पन जर हा ट्रेंड असाच राहिला
तर पुढचा वेळी औवेसी ला लोकसभेत जिंकुन येण सहज शक्य नाही.ह्या मुस्लिम बोटबॅन्क मध्ये अजुन काही प्रमाणात घट झाली तर ओल्ड हैद्राबाद मधुन भाजप चा लोकसभा उमेदवार सहजरीत्या जिंकुन येऊ शकतो.अनेक पक्ष आज देशभरात जे औवेसी विरूद्ध बोलता पन कधीच भाग्यनगर ( हैद्राबाद ) मध्ये येऊन लढले नाही
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!