#MahaPlasma
सध्या कोरोनाच्या तीव्र महामारीत आपण पाहतो आहे की अनेक रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णाला प्लाझ्मा मिळावा यासाठी आवाहन करताना दिसतात. सोशल माध्यमांवर आवाहन करण्यात बराच वेळ जातो.
हा वेळ टाळता यावा व प्लाझ्मादान करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांची यादी आपल्याला एका क्लिकवर मिळावी यासाठी मराठी ट्विटर #MahaPlasma हा उपक्रम राबवत आहे. कोरोनातून बरे झाल्यापैकी जे कुणी प्लाझ्मादान करण्यास इच्छुक असतील त्यांनी सोबत दिलेला फॉर्म भरून द्यावा आणि
ज्यांना कुणाला प्लाझ्मा लागत असेल त्यांनी दात्यासाठी ट्विटरवरील @MahaPlasma या हँडलला मेंशन करून ट्विट करावे किंवा मेसेज करावा. आपल्या परिसरातील उपलब्ध असलेल्या दात्यांची माहिती आपल्याला दिली जाईल. तसेच हा फॉर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून प्लाझ्मादान
करण्यासाठी दाते मिळावेत यासाठी आपण प्रयत्न करावेत ही विनंती.
रोहित सर्दाना गेल्यानंतर शेठने ट्विट केले.त्यांना श्रद्धांजली वगैरे वाहून झाली.
आता फक्त माहितीसाठी सांगतो,
- देशात शेकडो डॉक्टर्स Covid मुळे दगावले आहेत.
- शेकडोच्या संख्येने मेडिकल स्टाफने आपला जीव गमावला आहे.
- देशभरात किती सफाई कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला याचा अधिकृत आकडा देखील नाही.
- 300 च्या वर शेतकरी बांधवांनी शेतकरी आंदोलनात आपल्या प्राणाची आहुती दिली.
- 150 च्या वर ग्राउंड वरील पत्रकार covid चे बळी ठरले आहेत.
- देशभरात लाखो मृत्यू याच Covid मुळे झालेले आहेत.
यांच्याबद्दल शेठ कुठे काय बोलले का..?
थोडक्यात जे तुमच्या आमच्यासाठी झटत होते,ते आपल्यासाठी फ्रंटलाईन वर्कर होते.तर रोहित हा शेठ आणि त्यांच्या "सिस्टम" साठी राबणारा "फ्रंटलाईन वर्कर" होता..!