रोहित सर्दाना गेल्यानंतर शेठने ट्विट केले.त्यांना श्रद्धांजली वगैरे वाहून झाली.
आता फक्त माहितीसाठी सांगतो,
- देशात शेकडो डॉक्टर्स Covid मुळे दगावले आहेत.
- शेकडोच्या संख्येने मेडिकल स्टाफने आपला जीव गमावला आहे.
- देशभरात किती सफाई कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला याचा अधिकृत आकडा देखील नाही.
- 300 च्या वर शेतकरी बांधवांनी शेतकरी आंदोलनात आपल्या प्राणाची आहुती दिली.
- 150 च्या वर ग्राउंड वरील पत्रकार covid चे बळी ठरले आहेत.
- देशभरात लाखो मृत्यू याच Covid मुळे झालेले आहेत.
यांच्याबद्दल शेठ कुठे काय बोलले का..?
थोडक्यात जे तुमच्या आमच्यासाठी झटत होते,ते आपल्यासाठी फ्रंटलाईन वर्कर होते.तर रोहित हा शेठ आणि त्यांच्या "सिस्टम" साठी राबणारा "फ्रंटलाईन वर्कर" होता..!
रोहितने मरकज प्रकरणात मुस्लिम समाजाबद्दल खूप वाईट पद्धतीने तेढ पसरवली होती.पण यात मुस्लिम समाजाच नुकसान झालं होत अस नाही.तर देशातील दोन महत्वाच्या समाजात तेढ निर्माण करण्याचं काम रोहितने केलं होत.आयडिया ऑफ इंडियाच्या मूळ तत्वांना त्याने सुरुंग लावला होता.
एक मुस्लिम म्हणून मला त्याच्या या कृत्याचा राग नक्कीच आहे,पण एक भारतीय म्हणून त्याने केलेल्या या कृत्यांची भयंकर चीड जास्ती आहे.
असो.
भगवद् गीता मध्ये म्हटल आहे,
"If u want to see brave,look at those who forgive..!"
इमाम हुसेन म्हणतात,
"“The most merciful person is the one who forgives when he is able to take revenge.”
आणि आपले गांधीबाबां म्हणतात,
"An eye for an eye will leave the whole world blind.”
रोहित चा मृत्यू हे त्याच्या कर्माच फळं आहे.तथापि त्याच्या या अकाली जाण्याने त्याच्या परिवारावर कोसळलेल्या
संकटात आमच्या सहवेदणाच इथ सोबत असतील.
गौरी लंकेश यांना मारल्यानंतर इथल्या कट्टर राष्ट्रप्रेमी लोकांनी त्यावर व्यक्त केलेल्या आनंदा सारखा आनंद आम्ही रोहितच्या मृत्यूवर व्यक्त करू शकत नाहीत.कारण एका माणसाची,एका बापाची व एका पतीची किंमत आम्ही समजतो.हो एक एक माणसाची किंमत आम्ही जाणतो
#MahaPlasma
सध्या कोरोनाच्या तीव्र महामारीत आपण पाहतो आहे की अनेक रुग्णांचे नातेवाईक आपल्या रुग्णाला प्लाझ्मा मिळावा यासाठी आवाहन करताना दिसतात. सोशल माध्यमांवर आवाहन करण्यात बराच वेळ जातो.
हा वेळ टाळता यावा व प्लाझ्मादान करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लोकांची यादी आपल्याला एका क्लिकवर मिळावी यासाठी मराठी ट्विटर #MahaPlasma हा उपक्रम राबवत आहे. कोरोनातून बरे झाल्यापैकी जे कुणी प्लाझ्मादान करण्यास इच्छुक असतील त्यांनी सोबत दिलेला फॉर्म भरून द्यावा आणि
ज्यांना कुणाला प्लाझ्मा लागत असेल त्यांनी दात्यासाठी ट्विटरवरील @MahaPlasma या हँडलला मेंशन करून ट्विट करावे किंवा मेसेज करावा. आपल्या परिसरातील उपलब्ध असलेल्या दात्यांची माहिती आपल्याला दिली जाईल. तसेच हा फॉर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून प्लाझ्मादान