आज विश्र्वगुरू , समतेचे प्रणेते, आम्ही लिंगायत ज्यांच्या विचारांचे पाईक आहोत अशा महात्मा बसवेश्वरांची जयंती!
त्याबद्दल काल एक ट्विट बनवुन ठेवली होती. आज माझे नेते राहुलजी, अमित साहेब, नाना भाऊ, सत्यजीत दादा यांपैकी कुणाच्या तरी ट्विटला ते ट्विट RT with Comment करणार होतो.पण
(१/n)
अजूनतरी त्यांनी काही ट्विट केलं नाही.
त्यांनी म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया सांभाळणाऱ्या ज्या टीम आहेत त्यांनी ते ट्विट केलं नाही. मग प्रश्न पडतो की, आपण लिंगायत/बसवविचार मानणारे लोक बसवेश्र्वरांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्यास कमी पडत आहोत का ??
(२/n)
जेणेकरुन ह्या नेत्यांच्या टीमला त्यांचे विचार महत्वाचे वाटले नाहीत?
पण तस बघायचं झालं तर नरेंद्र मोदी , उद्धव ठाकरे, माझे नेते धीरज देशमुख व अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी ट्विट केलं आहे. म्हणजे नेत्यांपर्यंत बसवेश्वरांचे विचार किती महत्वाचे आहेत हे सांगण्यात आम्हाला यश आलंय.
(३/n)
हे ट्विट केल्यामुळे काही माझ्या जवळच्या नेत्यांना राग येऊ शकतो. दरवेळेस कॉल करुन स्वतःहून सगळं सांगावं असं आज मला वाटलं नाही.
मला काँग्रेसचे विचार बसवेश्र्वरांच्या विचाराच्या जवळचे वाटले म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे. हे मी समतेचे विचार लोकांपर्यंत पोहचवत राहीनच .
(०४/n)
आमचे प्रेरणास्थान स्व. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी काढलेल्या शासननिर्णयानुसार आज महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयात बसवेश्वर जयंती साजरी झाली , त्याचे समाधान आम्हा लिंगायत/ बसवविचारांच्या पाईकांना नक्कीच आहे.
खूप दिवस झालं याविषयी स्पष्टपणे बोलावं असं वाटायचं , पण ह्या आठवड्यात माझ्या काही ट्विटवर आलेले रिप्लाय पाहून लिहिणं बंधनकारकच झालं आहे, असं मला वाटलं म्हणून हा थ्रेड लिहिण्याचा केलेला प्रयत्न.
2/ झालं असं की, मी अगोदर साधूंच्या लंगोटचा मास्क म्हणून होणाऱ्या चेष्टेचा विरोध केला व त्यानंतर रामनवमीला प्रभु श्रीरामांचे काही व्यक्तीगुण सांगितले होते. यामुळे काही काँग्रेसी मित्रांनी आपण काँग्रेसी असल्याने आपण धर्मावर सार्वजनिकरित्या बोललंच नाही पाहिजे अशा सूचना मला केल्या.
3/ मला वाटलं की, हे अर्धवट अभ्यासू आहेत त्यामूळे कदाचित असं बोलत असतील .पण, दरवेळेस असं काही वेगळं लिहिलं की, मी ट्विटरवरील प्रसिध्द अशा काही "अभ्यासू" मित्रांना ते ट्विट पाठवत असतो व एरव्ही ते लगेच रिट्विट करतात , परंतु ह्यावेळेस बहुतांश जणांनी ते लाईक सुद्धा केलं नाही.
हे बघा केंद्राच्या वित्त मंत्रालयाच्या 2010-11 च्या वार्षिक अहवालात Mumbai IFSC ही केंद्र सरकारच्या Capital Markets Division चा एक भाग म्हणून अधिकृतरित्या नोंद दिसते.