विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करण्याची जबाबदारी तुमची होती, आमची नव्हे. करोना फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही हे उद्गार तुमचे होते, आमचे नव्हे. २१ दिवसात युद्ध जिंकू ही भाषा तुमची होती, आमची नव्हे. लॉकडाऊनच्या काळात infrastructure उभं करायची जबाबदारी तुमची होती,
आमची नव्हे. मोफत लस सर्वांना वेळेवर पुरवायची जबाबदारी तुमची होती, आमची नव्हे. त्यासाठी ऑर्डर नोंदवायची जबाबदारी तुमची होती, आमची नव्हे. कुंभ, बंगाल - आसाम - तामिळनाडू येथे निवडणुका घेताना करोनाचा प्रसार होऊ नये याची खबरदारी न घेता समोरची गर्दी बघून तुम्ही हुरळून गेलात, आम्ही नाही
आमच्या दोन चुका झाल्या - तुम्ही नीट राज्य कराल ह्या विश्वासाने तुम्हाला एकदा नव्हे तर दोनदा मत दिलं. लॉकडाऊनमध्ये पोरा - बाळांना कसंही करून जगवावं म्हणून घराबाहेर पडलो. हौस नव्हती. आणि आज जे होतं आहे त्याला आम्ही सर्व जबाबदार आहोत असं म्हणून तुम्ही तुमच्या शिष्यांची तरफदारी करताय
जे गेले ते मुक्त झाले असे सांगून अडीच लाखांच्या वर जे लोक अकाली मृत्युमुखी पडले त्यांचा दोष झटकून टाकताय. आम्ही रोजगार संपत असतानाही कर भरले, तुमच्याकडून काडीचीही मदत नसताना. अजूनही ताठ उभे राहू. तुम्ही राजधर्म पाळा. आम्हीच जर आमचं सर्व पहायचं असेल तर तुम्ही सरकारमधून मुक्त व्हा.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एक पेपर बंद होतो तेव्हा किती पत्रकार बेरोजगार होतात त्याच्याबद्दल बरंच बोललं- लिहिलं जातं. पण एक पेपर बंद होतो तेव्हा फक्त पत्रकारच नव्हेत, तर सोबतच्या शेकडो इतर बिगर पत्रकारांची कुटुंबं उद्ध्वस्त होतात. त्यांची आठवण येते आणि झोप येत नाही.
आमच्या ऑफिस असिस्टंट चा कधी मधी गुड मॉर्निंग, गुड नाईट चा मेसेज येतो. त्याला काय उत्तर द्यावं कळत नाही. एकदोनदा तुला काही मदत करू का विचारलं, पण त्याला मदत नकोय, नोकरी हवीय. वयाच्या ४५ व्या वर्षी त्याला काय नोकरी मिळवून द्यायची? त्याच्याकडे इतर काहीही स्किल्स नाहीत.
डिझायनर होते. कोण कुठे, कोण कुठे हरवलाय. जमतील तसे दिवस काढताहेत. गावची शेती, आंब्याची बाग, कुठले तरी टुकार प्रिंट प्रोजेक्ट करत दिवस ढकलत आहेत.
फॅन्ड्री मध्ये शेवटाला अत्यंत पॉवरफुल सीन आहे. जब्याचा बाप आणि अख्खं कुटुंब डुकराच्या मागावर आहे. जब्याच्या बहिणीच्या लग्नाचा खर्च त्यातून निघणार आहे. कुटुंबासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि गावातून पाठलाग चालू असताना कुठल्याश्या कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू आहे.
जब्याचा बाप धर्मसंकटात. राष्ट्रगीताचा अपमान होऊ नये म्हणून सावधान मध्ये उभं राहायचं तर डुक्कर पळून जातय आणि नाही राहिला उभा तर गाव हाणील ही भीती. आपल्या राष्ट्रवादाच्या पोकळ कल्पनांना हात घालणारा प्रसंग मी थिएटरमध्ये पाहिला तेव्हा अंगावर काटा आला होता. आज दिल्लीत हेच झालंय.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आणि काही शेतकरी लाल किल्ल्यावर चालून गेले. त्यांनी तिथे शिखांना पूज्य असा निशान साहिब ध्वज लावला. राष्ट्रध्वज काढून नव्हे, किंवा त्याहून उंचावर नव्हे. पण त्याचं निमित्त करून शेतकऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरवलं जातं आहे.
अर्णब चे व्हॉट्सॲप गेले दोन दिवस नीट वाचले. पद्धतशीरपणे देशाच्या प्रत्येक भागात वातावरण कसं आणि कुठल्या मुद्द्यावर पेटवत न्यायचं याची रणनीती हा माणूस अत्यंत थंड डोक्याने आखत होता. काश्मीरवर अख्खा देश, ममतांच्या विरोधात बंगाल, लालूच्या विरोधात बिहार, केजरीवालच्या..
विरोधात दिल्ली, केरळमध्ये शबरीमला, बंगलोर, चेन्नई...महाराष्ट्रात आपण त्याचा उच्छाद पाहिलाच सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येनंतर...२०११ ला अण्णा आंदोलन...आणि ही नशा या माणसाच्या डोक्यात चढलीये. इंग्रजीत ज्याला drunk on power म्हणतात तसा प्रकार आहे हा. पुलवामा हल्ल्यानंतर याला...
Ratings वाढतील याचा orgasm होतो. शशी थरूर यांना दोषी ठरवून मीडिया trial चालवायची, टीव्ही वर सुब्रमणियन स्वामी यांच्याबरोबर भांडायच आणि आतून एक राहायचं...भयानक माणूस आहे हा. आणि यांच्यासारखे अनेक. एका निष्पक्ष anchor ने, जो याचा कट्टर विरोधक मानला जातो, त्याने याला चॅनल लॉन्च ..
ऑगस्ट १९९७ मध्ये प्रणती डेका या उल्फा दहशतवादी महिलेला अटक झाली. ती मुंबईत प्रसूतीसाठी आली होती तिच्या दोन साथीदारांसह. तिची इथली सर्व व्यवस्था केली होती टाटा टी ने. मग नंतर आसामच्या चहा मळ्यांमध्ये आपला व्यवसाय सुरळीत सुरू रहावा म्हणून टाटा टी व्यवस्थापन उल्फाला कशी मदत करतं
ही माहिती पुढे आली. फारसा गाजावाजा न होता प्रकरण दडपले गेले. नंतर अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळी याच टाटा टी ने एक सामाजिक मोहीम चालवली - जागो रे. टीव्हीवर भ्रष्टाचाराच्या विरोधात त्वेषाने उभे राहणारे तरुण यात चित्रित केले होते. फायदा कुणाला झाला?
टाटा ला सिंगूर मध्ये नॅनो साठी मिळालेल्या जागेवर वाद सुरू झाला आणि ममता बॅनर्जी यांनी मोठं आंदोलन उभं केलं स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी. गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक फोन कॉल केला आणि टाटांनी आपला प्रकल्प सानंद येथे नेला. केवळ धंदा सांभाळायचं
गो रा खैरनार नाव आठवत नसेल बऱ्याच जणांना. मुंबईचे Demolition Man म्हणून ओळखले जात १९९० च्या काळात. टीव्ही चॅनल्स तेव्हा अमाप नव्हती, तरीही त्यांना मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात बरंच कव्हरेज मिळत असे. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते आणि आता नेमकं कसं ते आठवत नाही,
पण अचानक खैरनारांची गाडी शरद पवारांवर घसरली. मुंडे विरोधी पक्षाचा आवाज होते. दोघांनी पवारांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली. एका मुलाखतीत पवारांच्या विरोधात ट्रक भर पुरावे आहेत असं खैरनार यांनी जाहीर केलं. पवार खैरनार यांच्या आरोपांना अजिबात उत्तर देत नसत. ती त्यांची पद्धत आहे.
आताही त्यांनी उद्धव ठाकरे यांना तोच सल्ला दिलेला दिसतो आहे - वेड्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करा. पवार मान्य करणार नाहीत पण आधी खैरनार, मग मुंडे आणि नंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्या प्रतिमेची पुरती वाट लावली. यात छुप्या शक्ती होत्याच पण बेछूट आरोपांची दखल वेळीच घेतली नाही तर काय होतं
अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल, किरण बेदी यांच्या सोबत दिल्लीत उपोषण सुरू केलं तेव्हा तिघे मोठे नेते बनले होते. दिल्लीतल्या हिंदी चॅनल्स ना त्यांच्यात महात्मा गांधी दिसू लागले होते. आपली मराठी चॅनल्स सुद्धा प्रेमात होती. खरं तर या सगळ्या गोष्टींच्या मागे फक्त आणि फक्त..
काँग्रेस द्वेष होता. (नंतर विवेकानंद फाऊंडेशन ने हे सगळं पद्धतशीर कसं रचलं ते आलंच.) पण त्यावेळचे अण्णा आणि केजरीवाल यांचे सगळे मुद्दे आठवून पाहा आणि त्या मुद्द्यांचा त्यांनी किती पाठपुरावा केला ते पहा. 2जी घोटाळा कोर्टात उडाला. लोकपाल अण्णा स्वतःच विसरले. एकछत्री नेतृत्व हवं
म्हणून केजरीवाल यांनी अनेक लोकांना बाजूला सारलं. सुरुवातीच्या काळात काँग्रेसवर जोमाने आरोप करणाऱ्या केजरीवाल यांनी भाजप वर तेव्हाही नाम मात्र हल्ले केले आणि आजही तेच सुरू आहे. जर काँग्रेसला आपणच खरोखर पर्याय आहोत असं आपला वाटत असेल तर त्यांनी भाजपचा आणि