कोव्हिड संकट विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान करत आहे. विशेषतः ९वी ते १२वीच्या. परिचयातील काही पालकांशी यावर बोलणं झालं, हातात काहीच नसताना फक्त काळजी करण्यापेक्षा हे दिवस अगदीच वाया जाणार नाहीत यासाठी मला जे सुचतं ते बहुतेकांना सांगितलं. तेच इथे मांडायचा प्रयत्न करतोय.
१+
हे सगळं मांडताना गृहीतक हे आहे की सध्या या ४ ही वर्गातील मुलं अभ्यासात बिझी असतीलच पण शाळा कॉलेज नसल्याने त्यांच्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे. शिवाय त्यांना करिअरबद्दल अनिश्चितता सतावते आहे. आणि ही अवस्था पुढील ६ महिने तरी कायम असेल.
२+
१ - आपल्याकडे प्रचंड वानवा असलेली फायनान्शियल लिटरसी कमवून घ्या. पैसा काय चीज आहे समजून घ्या. मार्केट कसं फिरतं जाणून घ्या.
येत्या ६ महिन्यांत रिच डॅड पुअर डॅड किमान ३ वेळा वाचून काढा. मित्रांचा ग्रुप करून त्यातील प्रिन्सिपल्स समजून घ्या.
३+
२ - वरील मुद्द्याचंच एक्सटेन्शन. पावर ऑफ कंपाऊंंडिंग व्यवस्थित समजून, शिकून घ्या. इंटरनेट वर बरेच मोफत टूल्स आहेत. आजपासून पुढील २०-३०-५० वर्ष महिन्याला अमुक (अगदी ५००, १०००सुद्धा) रुपये गुंतवले आणि कमीत कमी - अगदी ७/८/९ % रिटर्न्स मिळत गेले तर वयाच्या अमुक टप्प्यात -
४+
किती मोठी रक्कम उभी राहू शकते हे गणित मांडून बघा. ही ऍक्टिव्हिटी तशी एकदाच करायची असली तरी हे आकडे सतत तपासत रहा. मेंदूवर रुजवून घ्या.
३ - करिअर बद्दल अनिश्चितता असली तरी ती फक्त शाळेतील/कॉलेजमधील शिक्षणाचा प्रवास कसा होणार, वर्ष वाया जाणार का यापुरतीच आहे. ---
५+
तुमचं व्यावहारिक शिक्षण थांबण्याची गरज नाही.
ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यात लागणारे इतर स्किल्स शिकूच शकता आता. मला डॉक्टर व्हायचं असेल तर बायोलॉजी सोडून इतर काही लागतं का, जे आजच किमान ओळख होण्यापूरतं शिकू शकेन? माझ्या फील्डमधले मॅगझीन्स, पॉडकास्ट, पुस्तकं कोणते?
६+
शिरता येईल का या जगात आताच?
प्रयत्न करून बघा.
४ - काही टेक्निकल स्किल्स सार्वत्रिक झाल्यात आता. सोशल मीडिया मॅनेजमेंट, व्हिडीओ क्रिएशन/एडिटिंग, ब्लॉगिंग-पॉडकास्टिंग, ग्राफिक डिझाईन, वेब डेव्हलपमेंट... सांगू तेवढ्या आहेत. शिकून घ्या आता. मस्त चान्स आहे हा.
७+
५ - खरं तर कम्युनिकेशन, नेटवर्किंग, रीडिंग कॉम्प्रेहेन्शन या कौशल्यांची गरज सार्वत्रिक आहे. पुढे तुमच्या लक्षात येईल की टेक्निकल किंवा क्षेत्रातील कोअर नॉलेज असूनही या सॉफ्ट स्किल्स नसल्यामुळे करिअर ग्रोथ होत नाही अनेकांची.
सध्या वेळ आहे तुमच्याकडे, खोलात शिरा जमेल तितकं.
८+
६ - प्लॅन बी तयार करा. मला अमुक क्षेत्रात जाता आलं नाही तर काय? त्याच क्षेत्राशी साधर्म्य असलेले इतर पर्याय कोणते? तिथे मला हवे तसे पैसे मिळू शकतात का? ही उत्तरं फार मोठा मानसिक आधार देऊन जातात. सगळं हवेत टांंगतं नाहीये, पर्याय आहे समोर - ही जाणीव रिलीफ मिळवून देते.
९+
शेवटी : मी करिअर काऊन्सलर नाही. पण जीवनात भरपूर चुका करून, पोळून निघालोय. १५-२० वर्षांपूर्वी मला काय माहीत असायला हवं होतं - हा प्रश्न स्वतःला विचारला तर जे काही डोक्यात येतं ते उतरवलं आहे.
हेतू फक्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हा कठीण काळ हताशपणे बसून घालवू नये -
१०+
काहीतरी मार्ग सापडावा इतकाच. योग्य वाटतात, पटतात ते पर्याय निवडा, हवं तर नातेवाईकांशी चर्चा करा...आणि कामाला लागा!
मोदींना कमी लेखण्यासाठी व्यूहान व्हायरसच्या नव्या म्युटेशनला “भारतीय” ओळख चिकटवण्याचा प्लॅन आखणारा पक्ष या देशाचं भलं करू शकतो – किंबहुना भाजप वा संघ वा मोदींना पर्याय ठरू शकतो – हे अजूनही ज्यांना वाटतं – त्यांची बेसिक समज एकतर उथळ आहे किंवा त्यांना देशाशी घेणं देणं नाहीये.
२+
“आपल्याला अनुकूल असणारे हॉस्पिटल्स मॅनेज करा - बेड बळकावून ठेवा – आपल्या शिफारसी शिवाय कुणालाच मिळू देऊ नका - म्हणजे सरकार रोष वाढेल” असलं नीच राजकारण करण्याचा कट रचणारा पक्ष देशहित नावाची गोष्ट इवलीशीसुद्धा मानू शकतो – असं ज्याना वाटतं ते एकतर बिनडोक आहेत किंवा लबाड.
इज्राईल-पॅलेस्टिन वादात तुम्ही कोणत्या बाजूचे आहात हे बाजूला ठेऊन हा व्हिडीओ काळजीपूर्वक बघा.
देश म्हणून आपल्या प्राथमिकता कोणत्या असायला हव्यात आणि त्यामुळे, आम्ही आमचं बजेट कुठे खर्च करायचं? असे वेळोवेळी उभे रहाणारे वाद कसे बघायचे हे या निमित्ताने छान समजून घेता येतं.
१+
आज पॅलेस्टिनी मिसाईल्सपासून इज्राईलचं "ऑटोमेटेड प्रोटेक्शन" करणारी यंत्रणा म्हणजे आयर्न डोम.
२७ मार्च २०११ पासून कार्यान्वित झालेला आयर्न डोम, इज्राईलच्या नागरी भागावर सोडले गेलेले मिसाईल्स डिटेक्ट करतो.
२+
त्यांची दिशा - वेग - त्यानुसार त्यांचं संभाव्य डेस्टिनेशन ही गणितं काही सेकंदांत करून - हवेतच हे मिसाईल्स "इंटरसेप्ट" करून वरच्या वरच उडवली जातात.
याची अॅक्यूरसी किती आहे?
९०% हुन अधिक...!
म्हणजे दर १०० मिसाईल्समागे ९० हुन अधिक मिसाईल्स हवेतच नष्ट केली हातात.
कारण त्याला साम-दाम-दंड-भेद निर्लज्जपणे आणि निर्दयीपणे कृतीत उतरवता येत होते.
हवं ते करणं राजेशाहीतही सहज शक्य नसतंच. ऑप्टिकक्स जपावेच लागतात. ते जपत, आपल्याला नको त्या गोष्टी घडूच नये अन घडल्या तर त्यांचा मिनिमम इम्पॅक्ट व्हावा - अशी तजवीज करण्यासाठी -
१+
कुणाच्याही नकळत अनंतखेळी खेळणं चाणक्यला जमलं.
म्हणून चाणक्य जिंकला.
पडद्यामागे विविध गुंतागुंतीच्या चाली रचून तो हवं तेव्हा शत्रूला आडवं पाडू शकत होता - म्हणून चाणक्य यशस्वी झाला.
शत्रूच्या नाजूक जागांवर आघात करणं, नजीकच्या भविष्यात हातघाईचा प्रसंग येऊ शकतो असं जाणवलं की -
२+
आधीच काटा काढणं, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्लॅकमेल करणं - हे सगळं चाणक्य नैतिकता वगैरे शिस्तीत बाजूला ठेऊन अमलात आणत होता.
हे जमलं तर चाणक्य जमला.
नाहीतर सत्तेत असूनही व्हिक्टिम कार्ड खेळत रहावं लागतं.
भारतीयांनी क्षुद्र राजकारणाची किती मोठी किंमत मोजणं अपेक्षित आहे?
शेतकरी आंदोलनाचा सोक्षमोक्ष अजूनही कसा लागत नाहीये?
दिल्लीत सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. विविध राज्यांमधून ऑक्सिजनचे ट्रक्स दिल्लीत पाठवले जाताहेत. पण रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलकांमुळे -
१+
ट्रक्स वेळेवर पोहोचायला उशीर होतोय.
२ दिवसांपूर्वी आयनॉक्स एअर प्रोडक्टस या कंपनीने केंद्राला पत्र लिहून कळवलं होतं की राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून आणले जाणारे ट्रक सतत ब्लॉकेजेसना सामोरे जाताहेत.
किमान १०० किमी चा वळसा घालून यावं लागतंय त्यांना.
२+
जिथे रुग्णांच्या मिनिटा मिनिटाच्या श्वासाचं गणित जुळवण्यात आपल्या आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागतीये, तिथे ही अशी परिस्थिती भयावह वाटते.
हे तेव्हा - जेव्हा आमच्या तज्ज्ञ सोशल मीडिया चाणक्यांच्या म्हणण्यानुसार -
अगदी खरंय. म्हणजेच तुमच्या उत्तरातून असं दिसतं की एकतर एकनिष्ठ रहातील असे लोक भाजपला ओढता येत नाहीत. किंवा ओढलेले लोक एकनिष्ठ ठेवता येत नाहीत. किंवा पवारांना "काहीही नं करता एकनिष्ठ रहातील" असे लोक बांधून घेण्याचं सिक्रेट कळालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांना स्वतःचं तोंड दाखवून उघड शिंगावर घेण्याची छाती नसलेले लोक फेकाड प्रोफाइईल तयार करून स्वतःला हवी ती हवी तशी भूमिका न घेणाऱ्या न डाव्या लोकांनाच झोडपण्यात मोठा पुरुषार्थ समजतात. काय ते क्षत्रितयत्व! वा!
+
यांच्यासाठी तुम्ही एकतर भाजप चे चाटे असायला हवे किंवा थेट मविआ समर्थक! पवार आणि कंपनी स्वतःची इकोसिस्टिम का उभी करू शकले आणि या पंटर पंडितांना ते का जमत नाही - याचं सिक्रेट यातच आहे! संघ "माणूस जोडतो" म्हणजे काय कमाल करतो हे या सो मि संघीष्ट लोकांना कळत नाही. किमान ते तरी शिका! +
कल्पना करा - महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुडवडा आहे. एक राजकीय पक्ष वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांना संपर्क साधतो. आपल्या स्तरावर. सरकारने सांगितलं म्हणून नव्हे, आपण होऊन. दमणला एक कंपनी म्हणते आम्ही करू प्रोडक्शन पण आमच्याकडे लायसन्स नाहीये.
१+
मग हा पक्ष यंत्रणा हलवतो. पुन्हा - प्रोअॅक्टीव्हली. केंद्राबरोबर को-ओर्डीनेट करतो, आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या जातात. कंपनी रेमडेसिवीर प्रोडक्शन करते.
पुढे - या सगळ्याची राज्य सरकारला कल्पना नसते का? असते! अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंना हे माहिती असतं.
२+
इतकंच नाही - हे रेमडेसिवीर राज्य सरकार तर्फेच डिस्ट्रिब्युट होणार असतात.
असं झालं तर या पक्षाबद्दल, या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल काय वाटेल तुम्हाला? गूड! व्हेरी गूड! उत्तम काम! बरोबर?
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात - ही औषधी पुरवणाऱ्या कम्पनीच्या लोकांना -