कारण त्याला साम-दाम-दंड-भेद निर्लज्जपणे आणि निर्दयीपणे कृतीत उतरवता येत होते.
हवं ते करणं राजेशाहीतही सहज शक्य नसतंच. ऑप्टिकक्स जपावेच लागतात. ते जपत, आपल्याला नको त्या गोष्टी घडूच नये अन घडल्या तर त्यांचा मिनिमम इम्पॅक्ट व्हावा - अशी तजवीज करण्यासाठी -
१+
कुणाच्याही नकळत अनंतखेळी खेळणं चाणक्यला जमलं.
म्हणून चाणक्य जिंकला.
पडद्यामागे विविध गुंतागुंतीच्या चाली रचून तो हवं तेव्हा शत्रूला आडवं पाडू शकत होता - म्हणून चाणक्य यशस्वी झाला.
शत्रूच्या नाजूक जागांवर आघात करणं, नजीकच्या भविष्यात हातघाईचा प्रसंग येऊ शकतो असं जाणवलं की -
२+
आधीच काटा काढणं, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ब्लॅकमेल करणं - हे सगळं चाणक्य नैतिकता वगैरे शिस्तीत बाजूला ठेऊन अमलात आणत होता.
हे जमलं तर चाणक्य जमला.
नाहीतर सत्तेत असूनही व्हिक्टिम कार्ड खेळत रहावं लागतं.
किंवा त्याहून भारी म्हणजे -
३+
नाकाखाली, डोळ्यांसमोर ६ महिने प्लॅनिंग करून दंगली घडवणं
कार्यकर्त्यांना राजरोस मारणं - मुडदे पाडणं - जाळपोळ करणं
हे सगळंच मुळातच चाणक्यनीतीचं इम्प्रुव्हड व्हर्जन आहे - असं कॉलर टाईट करून सांगत फिरावं लागतं.
४+
कारण एकतर सपशेल लोटांगण (उगा कडी निंदा वगैरे तोंडी लावायला आहेच) किंवा थेट राष्ट्रपती राजवट वा आंदोलनकर्त्यांवर गोळीबार : असे टोकाचेच पर्याय घुसतात आमच्या डोक्यात.
असे आम्ही चाणक्यचे शिष्य.
५+
भारीच.
ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
(आयटीसेलच्या चाणक्यांनी घोषित केल्यानुसार, सदर लेखक मविआ स्पॉन्सर्ड आहे.)
भारतीयांनी क्षुद्र राजकारणाची किती मोठी किंमत मोजणं अपेक्षित आहे?
शेतकरी आंदोलनाचा सोक्षमोक्ष अजूनही कसा लागत नाहीये?
दिल्लीत सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. विविध राज्यांमधून ऑक्सिजनचे ट्रक्स दिल्लीत पाठवले जाताहेत. पण रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलकांमुळे -
१+
ट्रक्स वेळेवर पोहोचायला उशीर होतोय.
२ दिवसांपूर्वी आयनॉक्स एअर प्रोडक्टस या कंपनीने केंद्राला पत्र लिहून कळवलं होतं की राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून आणले जाणारे ट्रक सतत ब्लॉकेजेसना सामोरे जाताहेत.
किमान १०० किमी चा वळसा घालून यावं लागतंय त्यांना.
२+
जिथे रुग्णांच्या मिनिटा मिनिटाच्या श्वासाचं गणित जुळवण्यात आपल्या आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागतीये, तिथे ही अशी परिस्थिती भयावह वाटते.
हे तेव्हा - जेव्हा आमच्या तज्ज्ञ सोशल मीडिया चाणक्यांच्या म्हणण्यानुसार -
अगदी खरंय. म्हणजेच तुमच्या उत्तरातून असं दिसतं की एकतर एकनिष्ठ रहातील असे लोक भाजपला ओढता येत नाहीत. किंवा ओढलेले लोक एकनिष्ठ ठेवता येत नाहीत. किंवा पवारांना "काहीही नं करता एकनिष्ठ रहातील" असे लोक बांधून घेण्याचं सिक्रेट कळालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांना स्वतःचं तोंड दाखवून उघड शिंगावर घेण्याची छाती नसलेले लोक फेकाड प्रोफाइईल तयार करून स्वतःला हवी ती हवी तशी भूमिका न घेणाऱ्या न डाव्या लोकांनाच झोडपण्यात मोठा पुरुषार्थ समजतात. काय ते क्षत्रितयत्व! वा!
+
यांच्यासाठी तुम्ही एकतर भाजप चे चाटे असायला हवे किंवा थेट मविआ समर्थक! पवार आणि कंपनी स्वतःची इकोसिस्टिम का उभी करू शकले आणि या पंटर पंडितांना ते का जमत नाही - याचं सिक्रेट यातच आहे! संघ "माणूस जोडतो" म्हणजे काय कमाल करतो हे या सो मि संघीष्ट लोकांना कळत नाही. किमान ते तरी शिका! +
कल्पना करा - महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुडवडा आहे. एक राजकीय पक्ष वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांना संपर्क साधतो. आपल्या स्तरावर. सरकारने सांगितलं म्हणून नव्हे, आपण होऊन. दमणला एक कंपनी म्हणते आम्ही करू प्रोडक्शन पण आमच्याकडे लायसन्स नाहीये.
१+
मग हा पक्ष यंत्रणा हलवतो. पुन्हा - प्रोअॅक्टीव्हली. केंद्राबरोबर को-ओर्डीनेट करतो, आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या जातात. कंपनी रेमडेसिवीर प्रोडक्शन करते.
पुढे - या सगळ्याची राज्य सरकारला कल्पना नसते का? असते! अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंना हे माहिती असतं.
२+
इतकंच नाही - हे रेमडेसिवीर राज्य सरकार तर्फेच डिस्ट्रिब्युट होणार असतात.
असं झालं तर या पक्षाबद्दल, या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल काय वाटेल तुम्हाला? गूड! व्हेरी गूड! उत्तम काम! बरोबर?
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात - ही औषधी पुरवणाऱ्या कम्पनीच्या लोकांना -
हे कुणालाच वाटू नये? थांबवण्याचे प्रयत्न होऊ नयेत?
३ - आमचे पंतप्रधान - पक्षी आमच्या सिस्टिम्स - आदेश देऊन राबवत नाहीत. संत महंतांशी चर्चा करतात नि ते महानुभाव इकडची विनंती "मान्य" करून आपल्या अनुयानांना आदेश देतात - हे चित्र डिप्रेसिंग नाही का?
२+
४ - मोदींना जे कळालं ते मोदींच्या समर्थकांना कसं कळत, पटत नाही? कुंभ ने काहीच झालं नाही, गर्दी जमलीच नाही, पूर्ण खबरदारी घेतली होती...वगैरे बरीच समर्थनं सुरु आहेत...इतकं आहे तर मोदींना का करावं लागलं हे?
"कुणी कितीही म्हणू देत की तो जातीभेद मानत नाही, पण त्याच्या गळ्यात जानवं दिसलं, की माझ्यासारखा खरा डिकास्ट झालेला तरुण हे क्षणात ओळखेल की तो माणूस नाटकी आहे!"
१२-१३ वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. आजही स्पष्ट आठवतो. आम्ही तिघे मित्र (तिघेही जन्माने ब्राह्मण) गप्पा मारत असताना -
१+
दोघांमध्ये "जातीवाद" हा विषय सुरु झाला, मी म्यूट स्पेक्टेटर होतो. त्या चर्चेत वरील वाक्य माझा एक मित्र अतीव अभिमानाने आणि आत्मविश्वासाने म्हणून गेला. ते वयच कमाल असतं. नुकतंच पुस्तकं वाचन सुरु झाल्याने मला सगळं समजलंय हा अहंगंड असतो.
२+
त्यामुळे बरंच काय काय सुरु होतं आम्हा सर्वांच्याच मेंदूत. तेव्हा हे असं तावातावाने कॉन्फिडन्टली ठोस निष्कर्ष काढून मोकळं होणं स्वाभाविक होतं.
आज, एक तप पूर्ण झाल्यानंतर, मी फार कमी विषयांवर एवढा कॉन्फिडन्ट असतो. तो "जानवं दिसलं की..." डायलॉग मला अनेक प्रसंगी ग्राऊंडेड करतो.
Many people die with their music still in them. ऑलिव्हर वेन्डल होम्स यांचं जगद्विख्यात वाक्य. ९९% लोक असेच असतात, असं म्हणतात!
पण ऐसा क्यू?
आपण सगळे एक समाज म्हणून मेडिओक्रसीकडे का जातो, तीच आपली नैसर्गिक टेण्डन्सी का आहे यावर गेले बरेच दिवस -
१+
- खल करतोय. वाचन, चर्चा, रिसर्च.
कुणी स्पष्टपणे यावर बोललं नाहीये. म्हणजे टिपिकल उत्तरं - ध्येय नसणं, शिस्त नसणं, रोज स्वतःबरोबर वेळ नं घालवणं वगैरे आहेतच.
पण त्याहून खोल काही कारण असेल का यावर विचार करत असताना एक गोष्ट जाणवली.
२+
सेल्फ डेव्हलपमेंट हा बाळबोध, बुळबुळीत, हास्यास्पद प्रकार समजला जातो. आपल्याकडेच नाही, सगळीकडेच. जग गाजवणारे अनेक लोक पर्सनल मास्टरीवर भरभरून बोलतात, लिहितात. वेगवेगळे ब्रेन रिसर्च, सायकॉलॉजिकल अनालिसिस समोर ठेवतात.
त्यातून प्रत्येकाने आपल्यात लपलेला ग्रेटनेस शोधावा -