भारतीयांनी क्षुद्र राजकारणाची किती मोठी किंमत मोजणं अपेक्षित आहे?

शेतकरी आंदोलनाचा सोक्षमोक्ष अजूनही कसा लागत नाहीये?

दिल्लीत सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. विविध राज्यांमधून ऑक्सिजनचे ट्रक्स दिल्लीत पाठवले जाताहेत. पण रस्त्यावर उभ्या असलेल्या आंदोलकांमुळे -

१+
ट्रक्स वेळेवर पोहोचायला उशीर होतोय.

२ दिवसांपूर्वी आयनॉक्स एअर प्रोडक्टस या कंपनीने केंद्राला पत्र लिहून कळवलं होतं की राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधून आणले जाणारे ट्रक सतत ब्लॉकेजेसना सामोरे जाताहेत.

किमान १०० किमी चा वळसा घालून यावं लागतंय त्यांना.

२+
जिथे रुग्णांच्या मिनिटा मिनिटाच्या श्वासाचं गणित जुळवण्यात आपल्या आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागतीये, तिथे ही अशी परिस्थिती भयावह वाटते.

हे तेव्हा - जेव्हा आमच्या तज्ज्ञ सोशल मीडिया चाणक्यांच्या म्हणण्यानुसार -

२६ जानेवारीला जगभरात भारताची इभ्रत वेशीला टांगत -

३+
"ती दंगल घडू दिली गेली" - ज्याने शेतकरी आंदोलन "एका रात्रीत संपून गेलं" होतं.

त्या दिवशी टीव्ही समोर बसून रक्त उसळत होतं. इतक्या पवित्र दिवशी असं काही झालंच कसं हा प्रश्न पडला होता. हा धिंगाणा आधीच टाळता आला नसता का, आधीच साम-दाम-दंड-भेद करून या तथाकथित आंदोलनातील -

४+
अनिष्ट एलेमेंट्स दूर करता आले नसते का - नि असेच असंख्य विचार सतावत होते.

पण इथल्या स्वयंघोषित चाणक्यांना त्यात मोठा प्लॅन वाटला होता. देशाची इज्जत मातीमोल करून शेतकरी आंदोलन संपवण्याचा प्लॅन.

इतकाच प्लॅन होता तर फार्म बिल्स दीड वर्ष सस्पेंड करण्यापर्यंत भाषा का करावी लागली?

५+
अन तेवढं करूनही २६ जानेवारीचा धिंगाणा का घडला?!

काय झालंय त्या प्लॅनचं?

कळेल का आम्हाला?

आज दिल्लीत ऑक्सिजन कमी का पडतोय? इतके महिने होऊन गेले तरी अजूनही हे आंदोलन शमत का नाहीये?

देशभरात गर्दी जमू नं देण्याचे प्रयत्न सुरु असताना इतक्या मोठ्या संख्येने हे लोक कसे जमताहेत?

६+
दिल्लीतला कोरोना या लोकांनी आपापल्या राज्यात नेला तर काय घडेल याची कल्पना नाहीये का कुणालाच?

त्या राज्यांतून इतरत्र अधिक पसरला तर कोणतं संकट उभं रहाणारे माहिती नाहीये का?

केजरीवाल राजकारण करतात, आंदोलनात माओवादी घुसलेत, मीडिया यंव आहे, पुरोगामी त्यंव आहेत...सगळं माहितीये.

७+
केंद्र सरकार काय करतंय?!

कुंभ मेळा काय नि हे आंदोलन काय...केंद्र सरकार म्यूट स्पेक्टेटरची भूमिका घेऊनच बसणार आहे का?

हे प्रश्न कोणताही किमान मेंदू असलेला आणि घरावर कुटुंबाची जबाबदार असलेला नागरिक विचारणार नाही का?

८+
पण हे प्रश्न विचारणाऱ्याला काँग्रेसी एजंट ठरवण्याचा ट्रेंड आलाय इकडे.

लोकशाहीत सकारात्मक टीका महत्वाची आहे हे नरेंद्र मोदी स्वतः म्हणतात. पण त्यांच्या बारक्या चाणक्यांना ते पटत नाही.

आमच्या मराठवाड्यात एक गमतीशीर प्रकार असतो.

प्रत्येक गल्लीत एखादं तरी बारकं कुत्र असतं.

९+
हे कुत्र रात्री कुणी चोर आला, तर धूम ठोकून पळतं. पण त्याच गल्लीत रहाणारा कुणी पहाटे प्रवासाला जायचं म्हणून लवकर बाहेर पडला तर त्याच्या अंगावर केकाटत धावतं.

आपल्याकडे सोशल मीडियावर अश्या केकाटणाऱ्या बारक्या कुत्र्यांचा "भूंकमेळा" जमलाय अश्यात.

१०+
याना देशाशी, नागरिकांशी, आपल्या भविष्याशी काही देणंघेणं नाही. यांचं डोकं भाजपच्याच अवतीभोवती फिरतं.

नरेंद्र मोदी स्वतःला "प्रधान सेवक" म्हणवतात.

हे पंटर मात्र स्वतःला "प्रधान चाणक्य" समजतात आणि मोदींना "प्रधान दैवत".

यांना नं पटणारं लिहिलं की झालाच तो "मविआवाला...!"

११+
पण हे लोक राष्ट्रवादीच्या गुंडांना हेड-ऑन घेत नाहीत!

मोदी-शहा, सावरकर-गोळवलकरांवर अश्लाघ्य बोलणाऱ्यांवर सोडायला यांच्याकडे "अनुल्लेखाचं शस्त्र असतं".

त्यांच्यावर कधी fir केली, त्यांना त्यांच्याच शब्दांत सुनावलं वगैरे यांच्या कपॅसिटीत नाही.

१२+
यांचं आक्रमण देशाशी इमान असणाऱ्या, राष्ट्र प्रथम ही भावना असणाऱ्या लोकांवर!

असो.

केंद्र सरकारकडून या संपूर्ण काळात फार जास्त, फार व्यापक अपेक्षा होत्या. अजूनही आहेत.

डिसीजीव्ह लीडरशिपची गरज आहे सध्या देशाला. आणि तसा लीडर केंद्रात आहे हा विश्वासही आहे.

१३+
विश्वास आहे म्हणूनच अपेक्षा आहेत.

पण त्या अपेक्षा सतत मातीमोल होताहेत. आणि आपल्याला सतत किंमत चुकवावी लागतीये.

ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com

@threadreaderapp please unroll.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Omkar Dabhadkar

Omkar Dabhadkar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @OmkarDabhadkar

20 Apr
अगदी खरंय. म्हणजेच तुमच्या उत्तरातून असं दिसतं की एकतर एकनिष्ठ रहातील असे लोक भाजपला ओढता येत नाहीत. किंवा ओढलेले लोक एकनिष्ठ ठेवता येत नाहीत. किंवा पवारांना "काहीही नं करता एकनिष्ठ रहातील" असे लोक बांधून घेण्याचं सिक्रेट कळालं आहे.

बाकी अजून एक गम्मत आहे यात. +
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांना स्वतःचं तोंड दाखवून उघड शिंगावर घेण्याची छाती नसलेले लोक फेकाड प्रोफाइईल तयार करून स्वतःला हवी ती हवी तशी भूमिका न घेणाऱ्या न डाव्या लोकांनाच झोडपण्यात मोठा पुरुषार्थ समजतात. काय ते क्षत्रितयत्व! वा!

+
यांच्यासाठी तुम्ही एकतर भाजप चे चाटे असायला हवे किंवा थेट मविआ समर्थक! पवार आणि कंपनी स्वतःची इकोसिस्टिम का उभी करू शकले आणि या पंटर पंडितांना ते का जमत नाही - याचं सिक्रेट यातच आहे! संघ "माणूस जोडतो" म्हणजे काय कमाल करतो हे या सो मि संघीष्ट लोकांना कळत नाही. किमान ते तरी शिका! +
Read 4 tweets
18 Apr
कल्पना करा - महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुडवडा आहे. एक राजकीय पक्ष वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांना संपर्क साधतो. आपल्या स्तरावर. सरकारने सांगितलं म्हणून नव्हे, आपण होऊन. दमणला एक कंपनी म्हणते आम्ही करू प्रोडक्शन पण आमच्याकडे लायसन्स नाहीये.

१+
मग हा पक्ष यंत्रणा हलवतो. पुन्हा - प्रोअॅक्टीव्हली. केंद्राबरोबर को-ओर्डीनेट करतो, आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या जातात. कंपनी रेमडेसिवीर प्रोडक्शन करते.

पुढे - या सगळ्याची राज्य सरकारला कल्पना नसते का? असते! अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंना हे माहिती असतं.

२+
इतकंच नाही - हे रेमडेसिवीर राज्य सरकार तर्फेच डिस्ट्रिब्युट होणार असतात.

असं झालं तर या पक्षाबद्दल, या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल काय वाटेल तुम्हाला? गूड! व्हेरी गूड! उत्तम काम! बरोबर?

पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात - ही औषधी पुरवणाऱ्या कम्पनीच्या लोकांना -

३+
Read 7 tweets
17 Apr
मोदींचे हे ट्विट्स बघून मनात आलेले विचार :

१ - हे ६ महिने आधीच जमलं नसतं का? तेव्हा कळालं नाही का? जाणवलं नाही का? आधीच का थांबवलं नाही?

२ - हे मोदींनाच का करावं लागावं? कुंभसाठी केवढी मोठी यंत्रणा कामाला लावली गेली होती. ते सगळं आयोजन करताना आपण चुकीच्या प्राथमिकता जपतोय -

१+
हे कुणालाच वाटू नये? थांबवण्याचे प्रयत्न होऊ नयेत?

३ - आमचे पंतप्रधान - पक्षी आमच्या सिस्टिम्स - आदेश देऊन राबवत नाहीत. संत महंतांशी चर्चा करतात नि ते महानुभाव इकडची विनंती "मान्य" करून आपल्या अनुयानांना आदेश देतात - हे चित्र डिप्रेसिंग नाही का?

२+
४ - मोदींना जे कळालं ते मोदींच्या समर्थकांना कसं कळत, पटत नाही? कुंभ ने काहीच झालं नाही, गर्दी जमलीच नाही, पूर्ण खबरदारी घेतली होती...वगैरे बरीच समर्थनं सुरु आहेत...इतकं आहे तर मोदींना का करावं लागलं हे?

५ - कुंभ आणि मरकजची "तुलना" खटकतीये अनेकांना.

३+
Read 12 tweets
4 Apr
"कुणी कितीही म्हणू देत की तो जातीभेद मानत नाही, पण त्याच्या गळ्यात जानवं दिसलं, की माझ्यासारखा खरा डिकास्ट झालेला तरुण हे क्षणात ओळखेल की तो माणूस नाटकी आहे!"
१२-१३ वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. आजही स्पष्ट आठवतो. आम्ही तिघे मित्र (तिघेही जन्माने ब्राह्मण) गप्पा मारत असताना -

१+
दोघांमध्ये "जातीवाद" हा विषय सुरु झाला, मी म्यूट स्पेक्टेटर होतो. त्या चर्चेत वरील वाक्य माझा एक मित्र अतीव अभिमानाने आणि आत्मविश्वासाने म्हणून गेला. ते वयच कमाल असतं. नुकतंच पुस्तकं वाचन सुरु झाल्याने मला सगळं समजलंय हा अहंगंड असतो.

२+
त्यामुळे बरंच काय काय सुरु होतं आम्हा सर्वांच्याच मेंदूत. तेव्हा हे असं तावातावाने कॉन्फिडन्टली ठोस निष्कर्ष काढून मोकळं होणं स्वाभाविक होतं.

आज, एक तप पूर्ण झाल्यानंतर, मी फार कमी विषयांवर एवढा कॉन्फिडन्ट असतो. तो "जानवं दिसलं की..." डायलॉग मला अनेक प्रसंगी ग्राऊंडेड करतो.

३+
Read 20 tweets
29 Mar
आम्हाला आनंदात जगायलाच नकोय!

Many people die with their music still in them. ऑलिव्हर वेन्डल होम्स यांचं जगद्विख्यात वाक्य. ९९% लोक असेच असतात, असं म्हणतात!

पण ऐसा क्यू?

आपण सगळे एक समाज म्हणून मेडिओक्रसीकडे का जातो, तीच आपली नैसर्गिक टेण्डन्सी का आहे यावर गेले बरेच दिवस -

१+
- खल करतोय. वाचन, चर्चा, रिसर्च.

कुणी स्पष्टपणे यावर बोललं नाहीये. म्हणजे टिपिकल उत्तरं - ध्येय नसणं, शिस्त नसणं, रोज स्वतःबरोबर वेळ नं घालवणं वगैरे आहेतच.

पण त्याहून खोल काही कारण असेल का यावर विचार करत असताना एक गोष्ट जाणवली.

२+
सेल्फ डेव्हलपमेंट हा बाळबोध, बुळबुळीत, हास्यास्पद प्रकार समजला जातो. आपल्याकडेच नाही, सगळीकडेच. जग गाजवणारे अनेक लोक पर्सनल मास्टरीवर भरभरून बोलतात, लिहितात. वेगवेगळे ब्रेन रिसर्च, सायकॉलॉजिकल अनालिसिस समोर ठेवतात.

त्यातून प्रत्येकाने आपल्यात लपलेला ग्रेटनेस शोधावा -

३+
Read 15 tweets
8 Feb
तेंडुलकर-मंगेशकरांची चौकशी होणार म्हणून भाजप समर्थक चिडलेत.
का रे बाबांनो?
यात अनपेक्षित काय आहे नेमकं?

त्यांना सत्ता राबवणं जमतं! तुमच्या लाडक्यांना जमत नाही! इतकं साधं सरळ आहे सगळं!

केंद्र सरकारला जे ७ वर्षांत झेपलं नाही, जमलं नाही ते -

१+
महाराष्ट्रातील आघाडी सरकार अगदी विनासायास करतंय. काँग्रेस, राष्ट्रवादी (आणि आता शिवसेनासुद्धा) - भाजपसमोर या बाबतीत नेहेमीच सरस ठरले आहेत. "सत्ता राबवणं" म्हणजे काय हे त्यांना कळतं.

सोशलमिडीयावर शिवीगाळ केली म्हणून सडकून काढतात ते उघडपणे. -

२+
(आपले नेते मात्र त्याच गुंडाच्या तब्येतीची चौकशी करतात!) एकेरी संबोधन केलं म्हणून एकीचं घर तोडतात, दुसऱ्याला ८ दिवस तुरुंगात डांबतात.

छातीठोक. उघड उघड.

अर्थात, या अपेक्षा भाजपकडून नाहीतच.

पण गुन्हेगारांचं शासन तर व्हावं?!

३+
Read 16 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!