औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या खुलाशात अनेक बाबी गायब. खुलाशात सरकारी व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात लावल्याची बाब का दडवण्यात आलीय?
खासगी रुग्णालयात सरकारी व्हेंटिलेटर कुणाच्या आदेशाने लावले? यावर खुलाशात मौन का? विभागाचे मंत्री पण का गप्प?
सरकारी रुग्णालयातून व्हेंटिलेटर काढून एमजीएम आणि सिग्मा या खासगी रुग्णालयात सरकारी व्हेंटिलेटर कुणाच्या आदेशाने लावले यावर खुलाशात मौन. खासगी रुग्णालय प्रशासनही का गप्प?
खासगी रुग्णालयात सरकारी व्हेंटिलेटर लावल्यावर रुग्णांना बिलात सवलत देणारा आदेश काढला का? याबाबत खुलाशात स्पष्टता होत नाही.
विभागीय आयुक्तांच्या आदेशाने मराठवाड्यात इतरत्र पाठवलेल्या व्हेंटिलेटरचे काय झाले ? याचा अहवाल आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला नाही असे खुलासा सांगतो. म्हणजे, आरोग्य विभागाने व्हेंटिलेटर चौकशी पूर्ण केलेलीच नाही.
जर आरोग्य विभागाची चौकशी पूर्णच झालेली नसेल तर #MVA कोणत्या आधारावर सगळे व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत असा बनाव रचत आहे?
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे खुलासे सत्ताधारी मविआ प्रसारित का करतेय? अर्धवट खुलाशावर रुग्णालयाच्या अधिष्ठात्री कुणाच्या दबावाखाली गप्प आहेत? या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधीच का बोलतायत? हे संशयास्पद नव्हे का?
आरोग्य विभागाने व्हेंटिलेटर चौकशी कधी सुरू केलीय? चौकशी समितीचे सदस्य कोण आहेत? चौकशी समितीला कालमर्यादा काय? की केवळ राजकारणासाठी व्हेंटिलेटर प्रकरणी बदनामी मोहीम सुरू आहे? #toolkitexposed
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
१९ एप्रिल २०२१ रोजी औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाला १०० व्हेंटिलेटर पुरवले गेले.
यापैकी, २३ व्हेंटिलेटर सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात वळवले गेले.
औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वापरात असलेले २० व्हेंटिलेटर गुपचूप एमजीएम रुग्णालयात लावले गेले.
एमजीएम रुग्णालयात व्हेंटिलेटर लावताना उत्पादक कंपनीला कसलीही कल्पना दिली गेली नाही.