फियास्को 😩
मूळ इटालियन शब्द याचा अर्थ म्हणजे फजिती/ फज्जा / किंवा मराठीत पोपट होणे.मला लहानपणी च नाही तर आज ही केळीच्या सालीवरून कोणी घसरले / सायकल स्लिप झाली/ खुर्चीवरुन पडले कोणी गटारीत पडले तर हसू येते.समजते की आपण नीट वागत नाहीये पण हसू आवरले जात नाही .आणी मी जितका लोकांवर
हसलोय ना त्यापेक्षा 10 पट लोक माझ्यावर हसली आहेत 😭.माझा फियास्को तुम्हाला सांगतोय अजिबात हसायचे नाही गरीबाच्या लेकराला😂 शाळेत कधी शिक्षकांनी विचारले निबंध स्पर्धा आहे / कथाकथन स्पर्धा आहे /वक्तृत्व स्पर्धा आहे कोणाला भाग घायचा आहे ? माझा हात सगळ्यात आधी नेहमी वर 👆असायचा मी
प्रत्येक स्पर्धेत भाग घायचो .एकदा शिक्षकांनी वक्तृत्व स्पर्धेत परस्पर नाव दिले इयत्ता 6 वि .चार विषय होते त्यात मी माझी आजी हा निवडला आणि शिक्षकांना भेटलो त्यांच्या कडून निबंधाचे पुस्तक घेतले त्यातली माझी आजी निबंध लिहून पुस्तक परत केले आणि स्पर्धे करता पाठांतर केले.आदल्या
दिवशी भरपूर निळ टाकून पांढरा शर्ट धुवून जवळजवळ निळा च केला होता खाकी चड्डी केसांना तेल लावून इन करून एकदम कड्डकमध्यें स्पर्धेत हजर झालो.स्पर्धा सुरू झाली समोर 700/800 पोर सर्व तुकड्या पाचवी ते दहावी च्या . माझ्या आधी एका मुलाचे नाव उच्चारले भरत शिंपी इयत्ता 6वि भरत गेला स्टेजवर
आणी बोलला मित्रानो मी आज तुम्हाला माझी आजी या विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी मी आशा करतो.माझी आजी मी पावसात भिजून आल्यावर माझे डोके तिच्या पदराने पुसून मला आले साखरपाका च्या वड्या खायला देते,माझी आजी संध्याकाळी मला शुभमंकरोती शिकवते .इकडे माझी
टरटर फाटली ना 😱 माझी आणि भरत ची आजी एकच .तोच निबंध त्याने पाठ केलेला मी रडकुंडीला आलेलो 😭 भरत डोक्यात गेलेला.पुढचे नाव माझे शेखर P इयत्ता 6 वि मी उठून स्टेज वर नाही मागे शिक्षक बसले तिकडे सगळे माझ्याकडे पहात होते .सरांना सांगितले सर माझी आणि भरत ची आजी एकच आहे काय करू ? सरांनी
स्टेज वर जा आणी बोल असा दमच दिला मी स्टेज वर गेलो सुरू झालो मित्रानो मी आज तुम्हाला माझी आजी या विषयावर दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शान्त पणे ऐकून घ्याल अशी मी आशा करतो .माझी आजी मी पावसात भिजून आल्यावर मला आले आणि साखरपाका च्या वड्या देते 😩 सगळे मुले मागे बसलेले 70/80
शिक्षक ,हेडमास्तर मनमुराद हसत होते.मी अजिबात थाम्बलो नाही माझी आजी पूर्णच केली आणि जागेवर जाऊन बसलो .स्पर्धा संपली मी शिक्षक रूम मध्ये सरां न समोर मान खाली घालून रडकुंडीला आलेलो .सरांनी कपाटातून पुस्तके काढलीत विज्ञानकथा /फास्टर फेणे /इसापनीती / शास्त्रज्ञ आणि शोध आणी मला दिलीत
जवळ घेऊन म्हणाले ते शब्द आज ही पाठ आहेत.चांगला वक्ता व्हायचे असेल तर चांगला श्रोता हो आणि चांगले लिहायचे असेल तर चांगले वाचायला शिक . 11 वि ला परत भाग घेतला दुसऱ्या शाळेत होतो विषय "पावले चालती पंढरीची वाट " तोपर्यंत चौफेर वाचन झालेले ,नोट्स ,संदर्भ ,गद्य ,पद्य ,आवाजातील चढउतार
शब्दफेक , सगळी शस्त्र अस्त्र वापरली .नोटीस बोर्ड वर नाव लागले द्वितीय पारितोषिक पावले चालती पंढरी ची वाट .तो पर्यंत नेहरू शर्ट पांढरा पायजमा चंदू टोपी घातलेले सर कधी ही परत न येणाऱ्या प्रवासाला निघून गेले होते 😭.छोटासा कप त्या खाली लाकडाचे काळे स्टॅन्ड हे बक्षिस तुम्हाला
दाखवायचे राहून च गेले सर 😭 ही खंत आयुष्यभर राहील .माझ्या आयुष्यात जे काही आचार विचारांचे भागभांडवल म्हणून आहे ना ते तुमच्यामुळे आहे सर .फजिती होतच राहील चुका करतच राहू पण स्पर्धेत भाग घेणे मी आज ही सोडत नाही .किती पण होऊ दे माझा
फियास्को 🙏🌹
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गुरुदक्षिणा 🌹🙏
इयत्ता पाचवी चित्रकलेचा तास गुरुजी नि पांढऱ्या ड्रॉईंगपेपर वर रेखाटन करून दिलेले हत्ती चे चित्र दिले सोबत रंग पण दिलेत आणि रंगवायला सांगितले.चित्रकलेचे गुरुजी माझ्या आजोबांचे शिष्य घरी पिढया न पिढया चित्रकला आणि मूर्तिकार यांचा वारसा.कदाचित त्यामुळे म्हणा मी जरा
जास्तच घमेंडी .हत्ती ला रंग दिला निळसर शेपटी पांढरी ,कांन वेगवेगळ्या रंगाचे , गवत हिरवे नाही पिवळे ,झटपट काढून गुरुजींना दाखवले ,त्यांनी ठेवून घेतले खूप छान 10 /10 मार्क दिलेत.रविवारी बाहेरून खेळून आलो तर गुरूजी आणि आजोबा माझी वाट पहात होते.आले आले बेरिस्टर साहेब आलेत 😱
आजोबांनी जवळ बोलवले हत्ती चे ड्रॉईंग दाखवले क्षणात कानाखाली आवाज आला मी गाल झाकतो तोपर्यंत गुरुजी नि दुसऱ्या कानाखाली जाळ काढला.निळा हत्ती /पिवळ गवत , पांढरी शेपटी हे शिकवले का तुझ्या बापाने ? गुरुजी बोलत होते रंगसंगती समजत नाही तुला ? साधे चित्र रंगवता येत नाही मुर्त्या काय
काल न वापरलेली औषधें परत करायला मेडिकल गेलो हिशेब चालूच होता .तेवढ्यात एक मुलगा म्हताऱ्या आई ला कपड्यावरून मध्यमवर्गीय च वाटत होते .मेडिसिन घायला आले मुलाने फाईल दिली किती बिल होईल सांगा म्हणला .उत्तर आले चार हजार मुलगा म्हणाला देऊन टाका तर आई नि सांगितले हजार चे करा वाटले तर
परत येऊ .सगळे आयुष्य पोरा बाळा न करता संसारकरता खर्ची घालवलेल्य आई ने तिथेच मुलाला चार शब्द सुनावले महिनाभराच्या किराणा इतक्या गोळ्या घेतात का कधी ?😡मी मेडिकल मालकाला दोस्तच माझा नजरेने खुणावले त्याने आजी ला औषधें चार हजाराची घेऊन जा बाकी परत करा मी घेईन असे सांगितले
कमीत कमी दोन अडीच ची तरी घेऊन जा सगळे डोस मी ऍडजस्ट करून देतो नाहीतर चार चे घेऊन जा आणि परत द्या काळजी करू नका आजी आणि मेडिसिन दिले. मी डुलत डुलत काठी टेकवून नाराजीनेच औषधे घेऊन जाणाऱ्या आजी च्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत होतो .मला आई आठवली कॅरी बॅग भरून औषधे आणले की आई आधी