"छे ! आत्मत्याग, आत्मबल, सत्याग्रह, अहिंसा, सत्य इ. गोंडस नावाखाली हितशत्रूसच शोभण्यासारखा राष्ट्राचा जो तेजोभंग आजपर्यंत करण्यात आला तो पुरे झाला !
राजकारणाचा पोरखेळ करून टाकला तो पुरे झाला. हा #गांधीगोंधळ आता पुरे झाला !
(१/६)
म्हणे कलकत्त्यास पायी जा आणि ओरडा !
हो, जर तुम्हांस राष्ट्रासाठी खरोखरच काही करून दाखवायचे असेल, तर हे बालिश तत्वज्ञान नि हे षंढतेचे शास्त्र पहिल्याने पायाखाली तुडवून टाका !
पुन्हा 'हे कृत्य सत्याग्रह आहे की नाही' हा प्रश्न एखाद्या आजीसारखा विचारीत न बसता -
(२/६)
- एखाद्या शिवाजीसारखे इतकेच पाहा की, ते कृत्य एकंदरीत आपणांस अल्पात अल्प स्वार्थत्याग करावयास लावून दुष्ट विपक्षाची अधिकात अधिक हानी करीत आहे की नाही !
मग त्यास भाबडेगिरी किंवा भामटेगिरी, सत्याग्रह म्हणो किंवा शस्त्राग्रह म्हणो !
(३/६)
तुम्हांस खादी विणायची असेल, फळे खाऊन किंवा पाने खाऊन जगायचे असेल, लंगोटी नेसून राहावयाचे असेल, उपासतापास करावयाचे असतील, तर तुम्ही सुखेनैव यांच्यामागे लागा. त्या सद्गुणांत तेच उपदेशक योग्य आहेत.
पण...
(४/६)
पण तुम्हांस स्वराज्य हवे असेल, स्वातंत्र्याची प्रबळ इच्छा तुम्हांस स्वस्थ बसू देत नसेल, या तुमच्या हिंदुस्थानच्या छातीवर उडणाऱ्या परक्या ध्वजाकडे पाहताच तुमची तोंडे लज्जेने काळी ठिक्कर पडत असतील तर तरुणहो, उठा नि तडक त्या रशियास, त्या इटलीस, त्या आयर्लंडास -
(५/६)
त्या शिवाजीस, त्या चंद्रगुप्तास, त्या यशोधर्मास जाऊन विचारा की, 'स्वातंत्र्याचे मार्ग कोणते?' कारण ते स्वतः त्या त्या मार्गाने गेलेले आहेत; त्यांनी स्वातंत्र्य संपादन केलेले आहे. मग त्या मार्गातून परिस्थितीस अनुरूप नि न्याय्य असा मार्ग तुम्हांस सहज निवडता येईल". #गांधीगोंधळ
(६/६)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
इथे पुण्यात येरवडा तुरुंगात रँड आणि आयर्स्ट यांचा 'कट करून हत्या' प्रकरणी दामोदर हरी चाफेकर यांना फाशीची शिक्षा झाली आणि तिथे भगूरला अवघ्या साडे चौदा वर्षाचा विनायक त्या बातमीने मात्र प्रचंड अस्वस्थ झाला.
काय करावं, काही सुचेना त्याला !
(१/५)
रात्र उलटून चालली होती.
'काय करावं ?' या विचाराने विनायक नुसता तळमळत होता.
लहानपणापासूनच 'मातृभूमीसाठी कोणताही त्याग करण्याचा' विचार जोपासणाऱ्या विनायकाला चाफेकरांच्या हौतात्म्यातून आपलं जगण्याचं उद्दिष्ट गवसलं.
(२/५)
आणि त्या रात्री आपल्या देवघरातल्या #अष्टभुजा देवीच्या मूर्ती समोर उभा राहून बाल विनायकाने जी शपथ घेतली ती शेवटच्या श्वासापर्यंत पाळली.
"माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन, चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवरायांसारखा विजयी होऊन -
आजच्याच दिवशी १४० वर्षांपूर्वी, म्हणजे ०४ जानेवारी १८८१ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दैनिक #केसरी हे वर्तमानपत्र सुरु करून भारतीय असंतोषाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली.
२ जानेवारी १८८० साली लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कुल' ची स्थापना केली.
महादेव बल्लाळ नामजोशी हे संपादक सुद्धा ह्या शाळेच्या संचालक मंडळाचा भाग होते.
(२/८)
१८८० च्या अखेरीस वामनराव आपटे शाळेत रुजू झाले आणि त्यांच्याच घरी एके दिवशी जेवताना विष्णुशास्त्री आणि नामजोशींनी वृत्तपत्र काढण्याची कल्पना सर्वांसमक्ष मांडली.
टिळक आणि आगरकरांनी ती उचलून धरली आणि ठरले की आता केवळ शाळा काढून थांबायचे नाही तर तिच्या कक्षेच्या विस्तारासाठी -
(३/८)
अकाली दलाचे माजी अध्यक्ष, तसेच गुरुव्दाराप्रबंधक समितीचे माजी अध्यक्ष आणि शिखांचे पुढारी मास्टर तारासिंग हे काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. काँग्रेसचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे धोरण त्यांना पटत नव्हते.
(१/८)
त्यांचा नि अकाली दलाचा काँग्रेसला ठाम विरोध होता.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि त्यांच्या पंजाबच्या दौऱ्यात आणि दिल्लीत त्यांच्या तेथील मुक्कामात भेटी होत, चर्चा होत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली #हिंदू या शब्दाची व्याख्या मास्टर तारासिंगांना पटत असे.
(२/८)
त्या व्याख्येप्रमाणे शीख हे हिंदूच आहेत, असे ते मान्य करीत. हिंदुराष्ट्रात समाधानाने राहण्यास शिखांची सिद्धता आहे. उभयतातील या समान ध्येयांमुळे हिंदूसभेचे आणि अकाली दलाचे ध्येय व धोरण प्रामुख्याने हिंदू-मुस्लिम प्रश्नावर समान होते.
सुप्रसिद्ध कवी कै.ग.दि.माडगूळकर यांनी त्यांचे #गीतरामायण हे काव्य लिहावयास आरंभ केला होता आणि काही कडवी रविवारच्या #केसरी त प्रसिद्ध होऊ लागली होती.
तात्याराव सावरकर ती कडवी अगदी न चुकता वाचत असत.
(१/८)
ग. दि. माडगूळकरांच्या कल्पकतेची झेप आणि अर्थपूर्ण शब्दांची यथायोग्य योजना तात्यांना फार आवडे.
एकदा केसरी मधील #गीतरामायण काव्य वाचून झाल्यावर तात्या म्हणाले, “माडगूळकरांची प्रतिभा उत्तुंग आहे. ते खरे प्रतिभासंपन्न कवी आहेत."
(२/८)
#गीतरामायण ला पुढे प्रख्यात संगीत दिग्दर्शक #सुधीरफडके ह्यांनी अर्थपूर्ण चाली देऊन ते स्वतः त्याचे गायनाचे कार्यक्रम करीत.
त्या सुमारास एक घटना घडली.
तात्यांचा पुण्यात दौरा होता. सकाळी नगर वाचनालयात सभा होती. त्या सभेत सुरुवातीला सुधीर फडके यांनी #सागरास हे सावरकरांचे गीत गाईले.
"माझ्या आठवणीप्रमाणे आपल्या आत्मर्पणाची प्रकट चर्चा तात्यांनी श्री.धनंजय कीर यांच्यापाशी केली होती.
१९६३ नोव्हेंबरमध्ये केव्हातरी संध्याकाळी खाली अंगणातून फेरी मारून झाल्यावर त्यांच्यापाशी तात्यांनी ही चर्चा केली.
(१/४)
कुमारील भट्ट, जगद्गुरू आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास यांच्याप्रमाणे आपणास आत्मार्पण करावे असे का वाटते, याविषयी सांगताना तात्या म्हणाले :
'वरील संतांना आपले जीवितकार्य पूर्ण झाले, आता कर्तव्य काही उरले नाही, अशी कर्तव्यपूर्ततेची भावना प्रबळ झाली -
(२/४)
- तशीच माझीही भावना झाली असल्याने मलाही त्यांच्याप्रमाणेच आत्मर्पणाचा मार्ग अनुसरावा असे वाटत आहे. माझा हा विचार पक्का होत आहे.'
हे सांगताना तात्यांचा स्वर रुद्ध झाला, कंठ दाटून आला. तेव्हा मला आता बोलणे अशक्य झाले आहे, असे सांगून तात्यांनी श्री.धनंजय कीर यांचा निरोप घेतला."
३/४