अकाली दलाचे माजी अध्यक्ष, तसेच गुरुव्दाराप्रबंधक समितीचे माजी अध्यक्ष आणि शिखांचे पुढारी मास्टर तारासिंग हे काँग्रेसचे कट्टर विरोधक होते. काँग्रेसचे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे धोरण त्यांना पटत नव्हते.
(१/८)
त्यांचा नि अकाली दलाचा काँग्रेसला ठाम विरोध होता.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि त्यांच्या पंजाबच्या दौऱ्यात आणि दिल्लीत त्यांच्या तेथील मुक्कामात भेटी होत, चर्चा होत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली #हिंदू या शब्दाची व्याख्या मास्टर तारासिंगांना पटत असे.
(२/८)
त्या व्याख्येप्रमाणे शीख हे हिंदूच आहेत, असे ते मान्य करीत. हिंदुराष्ट्रात समाधानाने राहण्यास शिखांची सिद्धता आहे. उभयतातील या समान ध्येयांमुळे हिंदूसभेचे आणि अकाली दलाचे ध्येय व धोरण प्रामुख्याने हिंदू-मुस्लिम प्रश्नावर समान होते.
(३/८)
पंजाबच्या दौऱ्यावर असताना एकदा अकाली एकदा दलाच्या वतीने तात्यांचा प्रकट सत्कार करण्यात आला.
अमृतसर येथील सुवर्णमंदिरात वीर सावरकरांचा गुरुव्दारा प्रबंधक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला, आणि चांदीची मूठ असलेली तलवार वीर सावरकर यांना अर्पण करण्यात आली, मानपत्र देण्यात आले.
(४/८)
त्या वेळी अध्यक्षस्थानी म्हणून मास्टर तारासिंग हे होते. त्या वेळी असे सांगितले जात होते की, सुवर्णमंदिरात शिखांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पुढाऱ्याचा सत्कार झालेला नव्हता.
#स्वातंत्र्यवीरसावरकर हेच पहिले शिखेतर पुढारी होते, की ज्यांचा सुवर्णमंदिरात सन्मान करण्यात आला.
सन १९५३-५४ मध्ये मास्टर तारासिंग मुंबईस आले असता त्यांनी ‘सावरकर सदन' मध्ये तात्यांची भेट घेतली होती.
चर्चेच्या ओघात तात्यांनी गुरुमुखीत छापलेल्या ग्रंथाचा अभ्यास केल्याचा उल्लेख केला तेव्हा आश्चर्याने तारासिंगांनी -
(६/८)
“आपणास गुरुमुखी येत का ?" असे विचारले.
त्यावर तात्या म्हणाले...
“तुम्ही वाचले नसेल इतके वाचन मी शिखांच्या इतिहाससंबंधी गुरूमुखीतून केले आहे. आणि #शिखांचाइतिहास या नावाचा ग्रंथही मी लिहिला होता. पुढे इंग्लंडहून ह्या ग्रंथाचे हस्तलिखित गुप्तपणे हिंदुस्थानात पाठविले असता -
(७/८)
- बोटीतून आणणाऱ्या व्यक्तीने भीतीने ते हस्तलिखित समुद्रात सोडून दिले म्हणून तो ग्रंथ प्रसिद्ध होऊ शकला नाही, हे प्रसिध्दच आहे."
आजच्याच दिवशी १४० वर्षांपूर्वी, म्हणजे ०४ जानेवारी १८८१ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दैनिक #केसरी हे वर्तमानपत्र सुरु करून भारतीय असंतोषाला वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली.
२ जानेवारी १८८० साली लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कुल' ची स्थापना केली.
महादेव बल्लाळ नामजोशी हे संपादक सुद्धा ह्या शाळेच्या संचालक मंडळाचा भाग होते.
(२/८)
१८८० च्या अखेरीस वामनराव आपटे शाळेत रुजू झाले आणि त्यांच्याच घरी एके दिवशी जेवताना विष्णुशास्त्री आणि नामजोशींनी वृत्तपत्र काढण्याची कल्पना सर्वांसमक्ष मांडली.
टिळक आणि आगरकरांनी ती उचलून धरली आणि ठरले की आता केवळ शाळा काढून थांबायचे नाही तर तिच्या कक्षेच्या विस्तारासाठी -
(३/८)
सुप्रसिद्ध कवी कै.ग.दि.माडगूळकर यांनी त्यांचे #गीतरामायण हे काव्य लिहावयास आरंभ केला होता आणि काही कडवी रविवारच्या #केसरी त प्रसिद्ध होऊ लागली होती.
तात्याराव सावरकर ती कडवी अगदी न चुकता वाचत असत.
(१/८)
ग. दि. माडगूळकरांच्या कल्पकतेची झेप आणि अर्थपूर्ण शब्दांची यथायोग्य योजना तात्यांना फार आवडे.
एकदा केसरी मधील #गीतरामायण काव्य वाचून झाल्यावर तात्या म्हणाले, “माडगूळकरांची प्रतिभा उत्तुंग आहे. ते खरे प्रतिभासंपन्न कवी आहेत."
(२/८)
#गीतरामायण ला पुढे प्रख्यात संगीत दिग्दर्शक #सुधीरफडके ह्यांनी अर्थपूर्ण चाली देऊन ते स्वतः त्याचे गायनाचे कार्यक्रम करीत.
त्या सुमारास एक घटना घडली.
तात्यांचा पुण्यात दौरा होता. सकाळी नगर वाचनालयात सभा होती. त्या सभेत सुरुवातीला सुधीर फडके यांनी #सागरास हे सावरकरांचे गीत गाईले.
"माझ्या आठवणीप्रमाणे आपल्या आत्मर्पणाची प्रकट चर्चा तात्यांनी श्री.धनंजय कीर यांच्यापाशी केली होती.
१९६३ नोव्हेंबरमध्ये केव्हातरी संध्याकाळी खाली अंगणातून फेरी मारून झाल्यावर त्यांच्यापाशी तात्यांनी ही चर्चा केली.
(१/४)
कुमारील भट्ट, जगद्गुरू आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास यांच्याप्रमाणे आपणास आत्मार्पण करावे असे का वाटते, याविषयी सांगताना तात्या म्हणाले :
'वरील संतांना आपले जीवितकार्य पूर्ण झाले, आता कर्तव्य काही उरले नाही, अशी कर्तव्यपूर्ततेची भावना प्रबळ झाली -
(२/४)
- तशीच माझीही भावना झाली असल्याने मलाही त्यांच्याप्रमाणेच आत्मर्पणाचा मार्ग अनुसरावा असे वाटत आहे. माझा हा विचार पक्का होत आहे.'
हे सांगताना तात्यांचा स्वर रुद्ध झाला, कंठ दाटून आला. तेव्हा मला आता बोलणे अशक्य झाले आहे, असे सांगून तात्यांनी श्री.धनंजय कीर यांचा निरोप घेतला."
३/४
#गुलाम मानसिकतेत जन्मलेल्या नि स्वार्थासाठी कणाहीन नेतृत्वाचा उदो उदो करणाऱ्या कर्तृत्वशून्य, निर्बुद्ध #सावरकरद्वेषी किड्यांची, सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी #भाषाप्रभू पु.भा.भावे यांनी आपल्या अग्रलेखातून केलेली खरडपट्टी आजही तेवढीच लागू पडते.
(१/८)
पु.भा.भावे लिहितात :
"भ्रष्टबुद्धी असलेल्याने सावरकरांस हिणविणे म्हणजे कर्दमांतील गांडुळाने फणीधरासमोर वळवळ करणे होय, जनान्यातील कंचुकीने अनेक समरप्रसंग गाजवणारऱ्या शुरांस युद्ध शास्त्रावर धडे देणे होय, दरिद्री खर्डेघाशाने कालिदासाच्या प्रतिभेसमोर वाकुल्या दाखवणे होय.
(२/८)
स्वतःच्या बायका परक्या घरी लोटावयास जे धैर्य लागते त्याच जातीचे धैर्य सावरकरांसारख्या नरशार्दुलावर भीरूतेचा आरोप करावयास लागते.
" 'नाही, नाही, राष्ट्रे कधीही मरत नाहीत, परमेश्वर गांजलेल्यांचा कैवारी आहे. त्याने मनुष्याला स्वातंत्र्यात राहण्यासाठी उत्पन्न केले आहे. तुम्ही मनांत आणा की तुमचा देश स्वतंत्र झालाच!' याहून अधिक उत्साहक असा दुसरा कोणाचा #राष्ट्रमंत्र आहे ?
(१/८)
'एकदा मनुष्याने असा निश्चय केला की मी स्वातंत्र्य, स्वदेश व मानव्य यावर भक्ती करतो, की मग त्याने स्वातंत्र्यासाठी, स्वदेशासाठी व मानव्यासाठी लढलेच पाहिजे, अखंड लढले पाहिजे, सर्व आयुष्यभर लढले पाहिजे, शक्य त्या त्या शस्त्राने लढले पाहिजे, -
- तिरस्कारापासून तो मरणापर्यंत सर्व संकटे तुच्छ मानली पाहिजेत, द्वेषाला नि निंदेला तोंड दिले पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही फलाची आकांक्षा न करता फक्त कर्तव्य म्हणून त्याने तत्पर झाले पाहिजे !' याहून अधिक दिव्य असा दुसरा कोणता #राष्ट्रमंत्र आहे ?