#छंद_ओठातले
पर्व १ भाग ६

‘चार दिवस सासूचे’ मालिका नुकतीच प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली होती. एका समारंभात मला मराठीतला एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक भेटला. मला पाहिल्याबरोबर तो जरा छद्मी हसला आणि म्हणाला – “अरे काय गाणं केलंस तू हे? चार दिवस सासूचे?! अशी काय चाल केलीस?” 1/18
त्याच्या प्रश्नातला कुत्सित सूर माझ्यापासून लपून राहिला नव्हता. पण मीही त्याच्याबरोबर हसलो आणि म्हणालो – “मला मजा आली म्हणून!”
‘चार दिवस सासूचे’ या मालिकेच्या शीर्षकात चारच दिवस असले तरी ही मालिका तब्बल अकरा वर्षं चालली. अनेक वर्षं ते गाणं लोकांच्या ओठांवर राहिलं. 2/18
खरं सांगायचं तर पहिल्यांदा ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेचे निर्माते नरेश बोर्डे आणि दिग्दर्शक खलील हेरेकर माझ्याकडे या मालिकेचा प्रस्ताव घेऊन आले तेव्हा हे गीत कसं काय होईल याबद्दल मीही जरा साशंक होतो. 3/18
मालिका ही मेलोड्रामा असल्यामुळे गाणं भावनेला आवाहन करणारं असायला हवं असा एक दंडक होता. ‘प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारी’ दैनंदिन मालिका, अर्थात ‘सोप ऑपेरा’ असा या मालिकेचा पोत असणार होता. गाणं हळुवार, भावनिक असायला हवं, त्यात भावनांचे विविध विभ्रम हवेत आणि 4/18
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्माता-दिग्दर्शकांचा आग्रह होता की मालिकेचं शीर्षक गाण्यात आलं पाहिजे. पण ‘चार दिवस सासूचे’ या शब्दांना काय चाल देणार! त्याला काही एक ठराविक मूड नाही.
खरं सांगायचं तर मी हे करू शकेन का नाही याबद्दल मला शंका होती. 5/18
‘मेलोड्रामा’ – त्यात दैनंदिन मालिका हा प्रकार आवडण्याकरिता एक भाबडेपणा लागतो आणि त्या दिशेने विचार करायची एक सवयही लागते. खाष्ट सासू आणि गरीब बिच्चारी सून वगैरे गोष्ट मलाच फार रुचेल असं मला वाटत नव्हतं. आणि तेही एकवेळ मी जमवलं तरी 6/18
‘चार दिवस सासूचे’ या शब्दांना इमोशनल चाल देणं मला खचितच जमणार नाही याची खात्री होती. पण नरेश बोर्डे आणि खलील हेरेकर यांचा त्यांच्या संकल्पनेवर पूर्ण विश्वास होता आणि त्यांचं पॅशन, त्यांचा उत्साह संसर्गजन्य होता. शिवाय लोक अतिशय चांगले होते. 7/18
आजवरच्या माझ्या व्यावसायीक आयुष्यातले मला भेटलेल्या चांगल्या, प्रामाणिक निर्मात्यांपैकी हेरेकर आणि बोर्डे ही जोडी आहे. आणि का कोणास ठाऊक पण माझा स्वतःवर नव्हता इतका विश्वास त्यांचा माझ्यावर होता. 8/18
“काहीही झालं तरी हे गाणं तुम्हीच करायचं असं आम्ही ठरवलं आहे.” असं त्यांनी मला बजावलं होतं.
प्रा. अशोक बागवे हे शीर्षकगीत लिहिणार होते. मी त्यांना विचारलं की या सगळ्या अटींचा विचार करता ‘चार दिवस सासूचे’ हे शब्द गाण्यात कसे बसवता येतील. बागवे सर मला म्हणाले, “काळजी करू नकोस. 9/18
आपण बरोबर बसवूया.”
बागवे सर शीघ्रकवी असल्यामुळे त्यांनी लगेचंच गाणं लिहून दिलं.
कशी म्हणावी जीवनगाणी
डोळ्यांमधले खारट पाणी
गालांवरती ओघळणाऱ्या मंद मंद हासूचे
चार दिवस सासूे

चार पावलांवरती वावर
अडखळतांना मजला सावर
फडफडत्या जखमी पदरावर थेंब थेंब आसूचे
चार दिवस सासूचे 10/18
एक बहरते एक उसवते
लाटेवरती लाट घसरते
काळजातल्या काठापुरते मोहर आभासाचे
चार दिवस सासूचे

बागवे सरांनी यमक तर उत्तम जुळवलं होतंच पण निर्माता-दिग्दर्शकांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या होत्या; आणि माझं काम खूप सोपं केलं होतं. 11/18
तरी तुमच्याही लक्षात येईल की ‘चार दिवस सासूचे’ या शब्दांचा आणि त्याच्या आधी येणाऱ्या तीन ओळींचा अर्थाच्या दृष्टीने काहीही संबंध नव्हता! पण त्याला इलाजही नव्हता! ‘चार दिवस सासूचे’ या शब्दांच्या आधी काहीही आलं असतं तरी हाच प्रश्न निर्माण झाला असता. 11/18
माझ्यावरची जबाबदारी आता स्पष्ट होती. एक लक्षवेधी चाल तर करायचीच होती आणि त्यात मालिकेचं नावही ठसठशीतपणे यायला हवं होतं. पण पहिल्या तीन ओळीत आलेल्या हळुवार, भावनांनी ओतप्रोत भरलेल्या शब्दांनंतर ‘चार दिवस सासूचे’ हे शब्द येतात तेव्हा अचानक मिठाचा खडा लागल्यागत होऊ नये 12/18
याची काळजी घ्यायची होती.
मालिकेचं शीर्षक जिथे येतं ती एक प्रकारे मालिकेची ‘अनाउन्समेन्ट’ असते. त्यामुळे शक्यतो हे शीर्षक सप्तकाच्या वरच्या भागात यायला हवं. मी गमतीने म्हणतो की शेजारी जरी टीव्ही लागला तरी आपल्या घरी कळायला हवं की मालिका सुरू झाली आहे! 13/18
पण माझ्यासाठी तरीही ‘चार दिवस सासूचे’ हे शब्द गाण्यात येणं जरा नापसंतीचंच होतं. अशा वेळी मग मी त्या रचनेमध्ये काहीतरी गंमत करता येतीए का ते पाहतो. महाभारतात जसे व्यासांनी गणपतीच्या लिखाणाचा वेग कमी व्हावा म्हणून कूटश्लोक पेरले तशी ‘चार दिवस सासूचे’ हे गीत एक कूटरचना आहे. 14/18
म्हणजे असं बघा, तुम्ही समजा हे गीत सुरूवातीपासून म्हणून पाहिलं आणि ‘चार दिवस सासूचे’ हे शब्द म्हणून पुन्हा ‘कशी म्हणावी जीवनगाणी’ हे धृवपद गायलात तर तुम्ही एक पट्टी खाली आले असता! तुमच्याही नकळत ही पट्टी उतरते!
या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाविषयी आणखी एक गमतीशीर आठवण आहे. 15/18
याचं संगीत संयोजन माझा मित्र समीर म्हात्रे याने केलं आहे. १९९९ किंवा २००० साली जेव्हा संगणकावर ध्वनिमुद्रण ही तुलनेने नवी गोष्ट होती तेव्हा हे गीत मी माझ्या घरी ध्वनिमुद्रित केलं आहे. मनीष कुलकर्णी या माझ्या मित्राने गिटारही माझ्या घरी येऊन रेकॉर्ड केली आणि भूपाल पणशीकर 16/18
या माझ्या मित्राने सतारही अशीच रेकॉर्ड केली. फक्त महालक्ष्मी अय्यरचं डबिंग करण्यापुरतं आम्ही स्टुडिओत गेलो होतो. २० वर्षांपूर्वी घरातल्या संगणकावर गाणं ध्वनिमुद्रित होतं याचंही लोकांना आश्चर्य वाटायचं. 17/18
चार दिवस म्हणत म्हणत ही मालिका ११ वर्षं चालली आणि मालिकेच्या निमित्ताने हे शीर्षकगीतसुद्धा! आपल्याला विशेष रुचणारं काम आपण आवडीने करतोच; पण या गाण्याने मला शिकवलं की प्रत्येक कामात आपल्याला रुचणारी एक तरी जागा आपण शोधून काढू शकतो.
© कौशल इनामदार २०२०
18/18

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Kaushal S Inamdar| कौशल इनामदार

Kaushal S Inamdar| कौशल इनामदार Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @ksinamdar

31 May
#छंद_ओठातले या मालिकेतल्या पहिल्या पर्वाचा भाग पाचवा.
संगीतकार म्हणून माझ्या कारकि‍र्दीच्या अगदी सुरुवातीला मंगेश पाडगांवकरांनी मला एक सल्ला दिला होता – “कवितांना तू चाली देतो आहेस हे ठीकच आहे, पण तू गाणं explore कर.” १/
तेव्हा ते नेमकं काय सांगत आहेत ते मला नीटसं समजलं नव्हतं पण घरी आल्यावर शांताबाई शेळके यांचा गीतसंग्रह – ‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ उघडला आणि शांताबाईंची गीतं पाहायला लागलो. गीत आणि कविता यात नेमका फरक काय आहे यावर अनेक चर्चा, वाद झडले आहेत. २/
त्यात मला आत्ता पडायचं नाही. इतकंच सांगतो की शांता शेळकेंचा संग्रह वाचू लागलो आणि मंगेश पाडगांवकर काय सांगू पाहत होते ते माझ्या हळूहळू ध्यानात येऊ लागलं होतं.
‘कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती’ हा शांताबाईंच्या अशा गीतांचा संग्रह आहे की ज्यातली ३/१४
Read 14 tweets
1 Mar
Bhakts are going after this with hammer and tongs. But look at how this little incident brings about the best in Nehru’s leadership.
1. He had excellent taste in smoking and also was careful about not overdoing the vice. Just one cigarette. Not more than that. No overdoing stuff
2. He needed just one cigarette after lunch but the loyalty he inspired from his employees, I mean, his followers was akin to Hanuman’s loyalty of Shri Ram! Look at how they acquired the entire carton instead of just that one cigarette.
3. To add to how he inspired loyalty, his most humble servants didn’t think twice before using taxpayer resources to get his wish fulfilled. This not only shows bravery of not fearing legal consequences but also great prudence for they didn’t spend that money from their own
Read 11 tweets
22 Feb
I was educated in English. Marathi was spoken primarily at home. It was in the last year of my college that I picked up a novel by the great Marathi litterateur, GoNi Dandekar - Kuna Ekachi Bhramangatha. By the time I reached the last page of the novel, I had an epiphany. 1/n
English (and other European languages) may have the world’s best literature, but literature that talked about me and my environment could be found in Marathi and in Marathi only. It propelled me to learn my mother tongue seriously. I must thank my parents who were avid 2/n
readers and also enthusiastic book collectors. When I came into contact with the Marathi playwright, Chetan Datar, this urge to know the subtleties of the language grew manifold. I started exploring #Marathi through poetry and music. I think it was exactly this that led me to 3/n
Read 8 tweets
17 Jan
I seriously think we should stop this nonsense of boycott calls. Attention is what they want and attention is what they get. Spend your energy and money behind creating content that suits your thinking or ideology. If you don’t like something or feel outraged, just shut it off.
There is a great space for Indic content and people who are producing that are either amateurish or totally unsubtle. (Read ‘loud’). The more people come in the more diversity of expression we will have. Content doesn’t have to be always upfront. The fact that the left is rattled
by an Indic resurgence can be gauged by the fact that their content is becoming increasingly loud, provocative and gross. Don’t feed it by giving too much attention (keywords being ‘too much’). Leftist propaganda/ expression used to be subtler, more aesthetic in 70s-80s because
Read 6 tweets
22 Nov 20
One of my friends in college got married to a guy. Her own family disowned her. After marriage and one kid, the slow harassment of pressure to convert began. The kid was influenced by in laws to hate kaffirs and his own mother. That’s when she took a rather brave decision to
walk out of the house with her son. The whole experience was traumatic but she is a strong woman and she came out and could stand on her own feet as she was educated. A couple of years ago she remarried and is very happy. But a decade of her life was lost to this trauma.
People like you Mr. Basu obviously think that this is ok. In your dictionary, false representation, harassment of women and a latent violence laced with hatred for kaffirs may be women empowerment. In the real world it is not. I also have a cousin who married into a Muslim
Read 4 tweets
8 Nov 20
दर वर्षी या दिवशी मला पुलंची ही भेट आठवते. चांगलं दोन अडीच तास पुलंच्या सहवासात घालवलेला हा वेळ मला आयुष्यभर पुरेल!
‘कवितेला चाली देऊन त्यांचा कार्यक्रम का करावासा वाटला?’ या त्यांच्या प्रश्नाला माझ्यातल्या नवख्या, अतिउत्साही आणि त्यांच्या कौतुकाने हुरळून गेलेल्या संगीतकाराने
- “मला काहीतरी वेगळं करायचं होतं” असं त्या वेळी भारी वाटणारं पण अतिसामान्य असं उत्तर दिलं तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले - “तू चांगलं कर. वेगळं आपोआप होईल.” हा मंत्र मी आयुष्यात विसरलो नाही.
याच भेटीत त्यांनी ‘बाई या पावसानं’ या अनिलांच्या कवितेला
मी दिलेली चाल ऐकून भरभरून दाद दिली. मला माहीत होतं की याच कवितेला त्यांचीही चाल आहे. मी हिम्मत करून विचारलं - “तुम्हाला कुठली चाल जास्त आवडली?”
क्षणभर ते शांत होते, मग पुलंच्या डोळ्यांत एक मिस्किल चमक आली आणि ते म्हणाले - “माझी!”
आम्ही सगळेच यावर मनमुराद हसलो.
पुढच्याच वर्षी
Read 15 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(