#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचा नविन प्रस्ताव "जहाॅंआरा बेगम" च्या मध्यस्तीने औरंगजेबने मागे घेतला.
५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत छत्रपती शिवरायांच्या जीवास धोका असल्याचे समजताच मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा "रामसिंग
याने शिवरायांच्या निवासस्थानाबाहेर विश्वासातील अर्जुनसिंह कछवाह, सुखसिंह नाथावट आणि तेजसिंह यांच्यामार्फत पहारा चालू केला.
५ जून इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १५९६, वार शुक्रवार)
महाराजांनी ऐंद्रिशांतीचे कार्य आटोपले. व मुख्य राज्याभिषेकाला सुरुवात!
सकाळी प्रथम ऐंद्रिशांतीचे कार्य आटोपले आणि त्यानंतर मुख्य राज्याभिषेकाला सुरुवात झाली. हा विधी शुक्रवारी सायंकाळपासून तो शनिवारी पहाटेपर्यंत चालला. शुक्रवारी सायंकाळी प्रथम गणेशपूजन, स्वस्तिवाचन, मातृकापुजन व वसोद्वारपूजन होऊन नंदिश्राह, नारायणपुजन व आज्य होम झाला.
आज्याहुती दिल्यानंतर मुख्य राज्याभिषेकास आरंभ झाला.
५ जून इ.स.१७३०
छत्रपती शाहु महाराजांतर्फे प्रतिनिधी व फत्तेसींग भोसले रायगडावर स्वारी करून तो जिंकतात. जय शिवराय 🚩🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#१)_धार्मिक:- तत्कालीन धार्मिक समजुतीप्रमाणे क्षत्रियालाच राजा होता येत असल्याने आणि हिंदू समाजात क्षत्रियच उरला नसल्याने हिंदूपैकी कोणीही राजा होणे शक्य नव्हते.
१/
हे राहणे ही ओघाने आलीच. शिवाजीराजांनी ही खुळचट कल्पना दूर करून हिंदूही या देशाचा राजा होऊ शकतो हे सिध्द करायचे होते.
#२)_राजकीय:- शिवाजीराजांनी स्वकर्तृत्व सिध्द केले असले तरी आदिलशाहीचे दृष्टीने ते आदिलशाही च्या शहाजीराजे या जहागीर दाराचे पुत्र म्हणजे आदिलशाहीचे चाकर होते
२/
त्यामुळे विजापूरचा आदिलशाहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा राजांना बरोबरीच्या नात्याते वागविण्यास तयार नव्हते मोगल बादशहा, इंग्रज, पोर्तुगीज हे सुध्दा बंडखोर, जहागीरदार म्हणून शिवाजीरांजाची संभावना करीत, आपण एक स्वतंत्र राजे असून आपल्या राज्याला धर्म व कायदाच अधिष्ठान आहे हे
३/