#१)_धार्मिक:- तत्कालीन धार्मिक समजुतीप्रमाणे क्षत्रियालाच राजा होता येत असल्याने आणि हिंदू समाजात क्षत्रियच उरला नसल्याने हिंदूपैकी कोणीही राजा होणे शक्य नव्हते.
१/
हे राहणे ही ओघाने आलीच. शिवाजीराजांनी ही खुळचट कल्पना दूर करून हिंदूही या देशाचा राजा होऊ शकतो हे सिध्द करायचे होते.
#२)_राजकीय:- शिवाजीराजांनी स्वकर्तृत्व सिध्द केले असले तरी आदिलशाहीचे दृष्टीने ते आदिलशाही च्या शहाजीराजे या जहागीर दाराचे पुत्र म्हणजे आदिलशाहीचे चाकर होते
२/
त्यामुळे विजापूरचा आदिलशाहा आणि गोवळकोंड्याचा कुतुबशहा राजांना बरोबरीच्या नात्याते वागविण्यास तयार नव्हते मोगल बादशहा, इंग्रज, पोर्तुगीज हे सुध्दा बंडखोर, जहागीरदार म्हणून शिवाजीरांजाची संभावना करीत, आपण एक स्वतंत्र राजे असून आपल्या राज्याला धर्म व कायदाच अधिष्ठान आहे हे
३/
राजांना जगाला दाखवून धायचे होते.
#३)_आर्थिक:- स्वराज्यात अस्तित्वात असलेल्या कराशिवाय काही नवे कर लागू करणे अपरिहार्य होते. राजाच्या राजपदाला धर्म व कायद्याच अधिष्ठान नसल्याचे प्रजा कर देण्यास टाळाटाळ करी व बहुतेक प्रसंगी कर वसुलीसाठी बळाचा वापर करावा लागे.
४/
यासाठी राज्यभिषेक करुन राजपदाला धार्मिक महत्व आणणे आवश्यक होते.
#४)_न्यायविषयक-
चातुर्वर्ण्य पध्दतीमुळे ब्राम्हण गुन्हेगारांना शासन करण्याचा अधिकार फक्तं राजलाच असतो व शिवाजीराजे अनभिषिक्त राजे नसल्याने त्यांना ही अधिकार नव्हता. तसेच धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करता येत नसे.
५/
ही मर्यादा दूर करण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.
#५)_अंतर्गत बाबी:-
राज्यातील काही वतनदार, देशमुख, जहागीरदार हे राजांना जुमानत नाहीत कारण इस्लामी आक्रमण आल्यावर ताबडतोब पातशाही चाकरी करण्यात पराक्रम आहे असे वाटे
६/
कारण अनभिषिक्त राजे हे आपणास वतन, जहागिरी, देशमुख देणार शिवरायाकडे हे अधिकार नाही व अनेक घराणे हे पातशाहीकडून विविध पदवी लाऊन आपण पारतंत्र्यामध्ये आहोत हेच विसरून गेले होते. या भूमीचे खरी मालक आपण मराठे आहोत याची जाणिव करून देण्यासाठी राजांना राज्याभिषेक आवश्यक वाटत होता.
७/
#६)_लष्करी सामर्थ्य:-
स्वराज्याच्या कार्यासाठी राजांनी स्वतःचे लष्कर उभारलेले होते. या लष्कराच्या निष्ठा शिवाजीराजे या व्यक्तीप्रती होत्या. परंतु ही परिस्थिती घातक होती. कारण व्यक्ती बदलताच निष्ठा बदलायला वेळ लागत नाही.
८/
व्यक्ती प्रति असलेल्या निष्ठा राजपदाप्रती परिवर्तीत करण्यासाठी राजपदाला धार्मिक व कायदेशीर मान्यता आवश्यक होती. या मान्यतेमुळे शिवाजीराजावर ही प्रजेच्या रक्षणाचे कायदेशीर बंधन पडणार होते.
९/
#७)_इतर कारणे:- शिवाजी राजांनी स्वराज्य सिध्दी करीत असताना अनेकांना वतने, इनामे, दानपत्र दिले होती. अनेक सत्तांशी नवीन करारमदार केले होते. या सर्वांना राज्याभिषेकाशिवाय कायदेशीर महत्व प्राप्त होणार नव्हते.
सभासदाने राज्याभिषेकाचे महत्त्व मोजक्या शब्दांत परंतु प्रभावीपणे मांडले आहे,
"या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा, मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही" थोडक्यात शिवराज्याभिषेक प्रसंग हे मोलाचा व महत्त्वाचे
याचे महत्त्व पुढीलप्रमाणे --
११/
१) गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या.
२) या पृथ्वीवर क्षत्रिय कोणीही नाही म्हणून कोणी राजा बनू शकत नाही या विचाराने व सिध्दांताला मूठमाती मिळाली.
३) हिंदूना राजा मिळाला. हिंदुपदपातशाही निर्माण झाली. इस्लामच्या वर्चस्वाला कोणी आव्हान देऊ शकत नाही.
१२/
ज्यांनी दिले ते संपले हा सिध्दांत संपुष्टात आला. मराठ्यांचे स्वत:चे सार्वभौम राज्य स्थापन करता आले.
४) राज्याभिषेक करताना धर्मासिध्द अशी राज्यसंस्थेची निर्मिती शिवाजीराजांनी केली. आपल राज्याचा एक सांस्कृतिक व धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिली,
१३/
आपल्या राज्यासाठी एक नवी शासन यंत्रणा निर्माण केली.....
५) राज्याभिषेकने महाराजांच्या राजपदाला कायदाची मान्यता प्राप्त होऊन त्यांच्या कार्याचा योग्य मोल केले जाऊ लागले...
१४/
६) शिवराज्याभिषेकाने भारताच्या इतिहासात "नवे युग अवतरले "असे म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे कारण नवीन चलन, स्वतंत्र ध्वज, नवीन शिवशक शुभारंभ मागील चारशे वर्षात कधीच या हिंदुस्थानच्या भूमीत एकाचे वेळ कोणी सुरू केले नाहीत तो शिवाजीराजांनी सुरु केली.
१५/
#शिवविचार_प्रतिष्ठान#शिवदिनविशेष
५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना ठार मारण्याचा नविन प्रस्ताव "जहाॅंआरा बेगम" च्या मध्यस्तीने औरंगजेबने मागे घेतला.
५ जून इ.स.१६६६
आग्रा कैदेत छत्रपती शिवरायांच्या जीवास धोका असल्याचे समजताच मिर्झाराजे जयसिंगाचा मुलगा "रामसिंग
याने शिवरायांच्या निवासस्थानाबाहेर विश्वासातील अर्जुनसिंह कछवाह, सुखसिंह नाथावट आणि तेजसिंह यांच्यामार्फत पहारा चालू केला.
५ जून इ.स.१६७४
(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १५९६, वार शुक्रवार)
महाराजांनी ऐंद्रिशांतीचे कार्य आटोपले. व मुख्य राज्याभिषेकाला सुरुवात!
सकाळी प्रथम ऐंद्रिशांतीचे कार्य आटोपले आणि त्यानंतर मुख्य राज्याभिषेकाला सुरुवात झाली. हा विधी शुक्रवारी सायंकाळपासून तो शनिवारी पहाटेपर्यंत चालला. शुक्रवारी सायंकाळी प्रथम गणेशपूजन, स्वस्तिवाचन, मातृकापुजन व वसोद्वारपूजन होऊन नंदिश्राह, नारायणपुजन व आज्य होम झाला.