महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार,नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक
पद्मभूषण पु.ल.देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..! 💐💐🙏🏻
सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. त्यांनी लिहिलेली पुस्तके आपले आजही मनोरंजन करतात. पु.ल.देशपांडे म्हटले की महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांचे मन अभिमानाने फुलून येते. या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गारुड आजही मराठी
माणसाच्या मनावर कायम आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटक यांची आठवण आल्यावाचून राहत नाही.
मराठी साहित्यामध्ये विनोदाला एक वेगळे स्थान देण्यात पु.लं. यांचा मोठा वाटा आहे. कोणत्याही विषयावर नेमका विनोद करण्यात पु.लं यांचा हात कोणीच धरु शकत नव्हते आणि आजही शकणार नाही. #puladeshpande#पुलदेशपांडे @LetsReadIndia
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?
१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते. 3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.
८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.
९) या गोष्टी पण इतर गोष्टी सार वाटायला लागतात.
१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.