📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?
१) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो.
२) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते. 3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते.
६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
७) आई वडीलांची किंमत कळायला लागते.
८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो.
९) या गोष्टी पण इतर गोष्टी सार वाटायला लागतात.
१०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
१२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.
१३) या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण
करून वाईट होतात,हे पण समजते.
१४) प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ति जिंकु शकतो, हे समजायला लागते.
१५) हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.
१६) जिवन जगण्याची नवी उमेद,एक ऊर्जा निर्माण होते.
१७) आयुष्याच्या प्रति संवेदनशील भावना निर्माण होते.
१८) एकमेकांच्या सुख:दुःख ची तीव्रता कळते.
१९) करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरिब तसेच दिवसाचे दोनशशे कमवणाऱ्यामध्ये श्रीमंत दिसायला लागतो...!
२०) आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं.
📖 चला मग आयुष्य सुंदर आणि सक्षम करण्यासाठी जसं होईल तसं वेळ काढून पुस्तकं वाचूया ,,जेणें करून आपलं जीवन अर्थपूर्ण आणि समृद्ध बनेल! #पुस्तकवाचन#पुस्तकप्रेमी @LetsReadIndia
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार,नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक
पद्मभूषण पु.ल.देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..! 💐💐🙏🏻
सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले. त्यांनी लिहिलेली पुस्तके आपले आजही मनोरंजन करतात. पु.ल.देशपांडे म्हटले की महाराष्ट्रातील तमाम साहित्य रसिकांचे मन अभिमानाने फुलून येते. या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गारुड आजही मराठी
माणसाच्या मनावर कायम आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु.लं यांचा आज स्मृतीदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटक यांची आठवण आल्यावाचून राहत नाही.