#गरुडाचा_पुनर्जन्म !

गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.

त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही ,
चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात.
अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे !
जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत
तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर, गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो.
एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल?
आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !
150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !
याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून
कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !
150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील !
दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे
एकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची...
@sujitppatil
@Mrutyyunjay
@sujitppatil
@MarathiDeadpool
@Nilesh_P_Z
@DrVidyaDeshmukh

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vikas Patil

Vikas Patil Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @vikaspatil198

15 Jun
रेल्वेच्या खिडकीत बसून. प्रवास करणाऱा २२ वर्षाच्या मुलगा मोठ्याने ओरडून आपल्या वडिलांना म्हणाला,...... पप्पा बघा झाड मागे पळत आहेत. वडील त्याच्याकडे पाहून हसले. त्यांच्या समोर एक जोडप बसले होते. त्यांना तो मुलगा अबनार्मल वाटला. इतक्यात तो मुलगा परत ओरडला,
पप्पा ढग आपल्या बरोबर पळत आहेत. समोर बसलेले जोडपे त्या मुलांच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही मुलाला चांगल्या डॉक्टरकडे का नाही दाखवत. वडील हसले आम्ही आता हास्पीटल मधूनच येत आहोत. माझा मुलगा जन्मतःच अंध आहे. त्याला आजच डोळे मिळाले......
या जगातील प्रत्येक माणसाची एक वेगळी कथा असते.
समोरच्या माणसाबद्दल खात्री असल्याशिवाय आपले मत बनवू नये. कारण सत्य हे कदाचित आश्चर्यकारक असू शकते .
Read 4 tweets
13 Jun
कोणत्याही स्त्रीचे आत्मबळ वाढविण्यामधे तिच्या कुटुंबियांचा खुप मोठा हातभार असतो. घरच्यांनी जर तिला आधार आणि ठाम पाठींबा दिला तर ती या सगळ्यातून स्वतःला सावरु शकेल. तिला पूर्वीप्रमाणेच दैनंदिन आयुष्य जागायला देणे. लावणे, जसे की वेशभूषा, टिकली, कुंकु, मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या
तिच्या आवडीप्रमाणे तिला वापरु देणे. केवळ नवऱ्याचा मृत्यु झाला म्हणून या गोष्टी तिला वर्ज्य करु नयेत. याबाबतित तिची आवड महत्वाची आहे. तिचे बाह्यरूप कसे असावे किंवा तिने कसे दिसावे हे ठरविण्याचा हक्क सर्वस्वी तिचा आहे आणि तो तिला मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
विधवा असणे हा गुन्हा नाही. त्यांनाही तितक्याच् समानतेने आणि स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आणि अधिकार आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या युगात हे जे घडतंय ते बदलण्याची जबाबदारी त्या स्त्रियांची नसून, पुरुषांची, इतर स्त्रियांची, समाजाची आणि या व्यवस्थेची आहे.
Read 4 tweets
24 Feb
लघुकथा..!!

नुकतेच तिच्या पतीचे निधन झालेले. कालच तेरावा पार पडला. तिच्या दीड वर्षाच्या जुळ्या मुली. शिक्षण जास्त नाही. पण दिसायला देखणी म्हणून एकविसाव्या वर्षी मागणी घालून लग्न झाले. आता पुढे काय असा विचार करुन डोके फुटायची वेळ आली होती.
@DrSanjayRakibe
@Rohini_indo_aus Image
चौदाव्या दिवशी तिने गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवले. अंघोळ करुन बारीक काळी टिकली आणि एक साधासा ड्रेस घालून ती स्वयंपाकघरात आली. सासूबाई भाजी निवडत होत्या. "इकडे ये बाळ" अशी हाक ऐकून बिचारी चुपचाप त्यांच्या समोर उभी राहिली. हलकेच तिला जवळ घेऊन ती माऊली बोलली "जे झालं ते झालं.
आता सगळे विसरायचा प्रयत्न कर. सगळ्यात आधी गळ्यात मंगळसूत्र घाल. पूर्वीसारखी टिकली लाव. जे झाले त्यात तुझा काहीच दोष नाही. तुला हवं असेल तर पुढे शीक. बाबा आणि मी आम्ही दोघे मिळून मुलींना सांभाळू. तुला नोकरी करावीशी वाटली तर जरुर कर. देवदयेने आपल्याला काहीही कमी नाही.
Read 5 tweets
22 Feb
पांगुळगाडा...!!

खुप वर्षां पुर्वी पोरं सिझेरियन न होता घरीच जन्मायची.

कुणी तरी अनुभवी आज्या त्यांना न्हाऊ माखू घालायच्या.
आईच दूध पिऊन , आजोळहून पाठवलेल्या लाकडी पाळण्यात पोरं गाढ झोपायची.

दूध पिणे आणि झोपणे एवढे दोनच मुख्य कार्यक्रम असायचे.
@faijalkhantroll
स्तन्यावर पोसली की पायात बळ यायचं, मग कशाच्या तरी आधारानं पोरं उभं रहायला शिकायची.

आई नाही तर आजीच्या दोन्ही हाताला धरून पोरं पा पा करायला लागली की घरात लाकडी पांगुळगाडा यायचा.

तो बहुतेक आजोळच्या सुताराने बनवून मामा बरोबर पाठवलेला असायचा.
लाकडी सुबक पांगुळगाड्याच्या आधाराने मस्त चालायला, भक्कम पावलं टाकायला शिकायची पोरं.

एक दीड वर्षात पोरं चांगली चालायला लागली की पांगुळगाडा अडगळीच्या खोलीत जायचा, पुढच्या पोराची वाट बघत पडून रहायचा.

चालायला शिकलेली पोरं पळायची, धडपडायची,ढोपरं फोडुन घ्यायची परत चालायची.
Read 6 tweets
21 Feb
अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या जपानसारख्या छोट्या राष्ट्राने देखील आपली प्रगती साधली ती आपल्या मातृभाषेतूनच. कोणत्याही परकीय भाषेचा पांगुळगाडा त्यांनी पत्करला नाही.
आपल्या देशाचा आणि आपला व्यक्तिगत विकास आपणांस साधावयाचा असेल तर मातृभाषेचे ऋण मानले पाहिजेत व या मातृभाषेतील थोर ठेवा जपला पाहिजे, वाढविला पाहिजे.
ज्ञानदेवांनी मातृभाषेचे हे सामर्थ्य जाणले होते म्हणूनच त्यांनी मराठीतून ज्ञानाचा प्रसार करण्याचा संकल्प सोडला.
नाथांना मातृभाषेचे हे ऋण मान्य होते. म्हणून तर त्यांनी समाजाचा विरोध सहन करूनही मातृभाषेतच रचना करण्याचा आग्रह धरला.मातृभाषेतून आपले रोखठोक विचार व्यक्त करताना तुकाराममहाराजांना शब्दांची कधीच उणीव भासली नाही आणि लोकानुनय साधण्यासाठी समर्थांना मातृभाषाच उपयोगी पडली.
Read 4 tweets
19 Feb
🌼 किंमत एका पेल्याची..!!

वडील आपल्या मुलाला सद्गुणांची किंमत समजावुन सांगत असतात. एक काचेचा पेला हातात घेऊन ते विचारतात,
वडील : "बाळ, या पेल्याची किंमत किती आहे.?"
मुलगा उत्तरतो : "असेल पंधरा रुपये."
वडील : "समज या पेल्यात पाणी भरले तर.?" @TSYIngle @Mrutyyunjay
@rt_marathi
मुलगा : "वीस रुपये".
वडील : "आता या पेल्यात केशर विलायचीयुक्त उत्तम दूध भरले."
मुलगा : "आता याची किंमत शंभर रुपये होईल,
वडील : "ठीक आहे. आता मी यात सोन्याचे काही दागिने भरतो."
मुलगा : "आता तर याची किंमत लाखोंच्या घरात होईल."
वडील : आता मी अनमोल अशा जवाहिरांनी
हा पेला भरतोय."
मुलगा : "आता तर याची किंमत अब्जावधीच्या घरात जाईल किंवा त्याहीपलीकडे होईल."
वडील : "बघ हं. नक्की ना.?" असे विचारतात,
आणि हातातला पेला फरशीवर सोडून देतात.
काचेचा पेला तो. फुटून त्याचे तुकडे होतात.
वडील : "आता याचे किती रुपये येतील.?"
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(