अलबेला 🌹
भगवान आबाजी पालव जन्म 1 ऑगस्ट 1913 अमरावती .वाचतांना किती साधे सरळ नाव वाटते ना ? दादर मध्ये वडील गिरणी कामगार म्हणून काम करत होते म्हणून यांचे बालपण पण मुंबईतच गेले .मध्यमवर्गीय कुटुंबातला हा आहे पहिला मराठी आणि हिंदी महानायक.हा होता 'शापित गंधर्व " प्रतिभेचे दान जरी
ईश्वराने पदरात टाकले तरी प्रारब्ध किंवा हाताच्या रेषांचे जाळे तुम्हाला त्यांनी आखून दिलेल्या रिंगणाबाहेर जाऊ देत नाही .भगवान दादा चे पण रिंगण वरतून आखून दिले होते दादर ची चाळ, चाळीतून जुहू चा समुद्र काठचा 20 खोल्यांचा बंगला ,आलिशान 8 दहा मोटारी उत्तुंग यश अमाप पैसा ,प्रसिद्धी
मग अपयश, घर दार गाड्या पैसा सर्व गायब आणि परत दादरची चाळ .लहानपणा पासून चित्रपटाची आवड वडील गिरणीत गेले की दादा परळ च्या स्टुडियोत चक्कर मारणार. एक मुकपट करून झाला ,दादा ला दिग्दर्शन करायची आवड एक दोन चित्रपट ही काढून झालेले.1951 मध्ये दादांनी बनवलेल्या "अलबेला " ने आयुष्याला
कलाटणी दिली .या चित्रपटाने भगवान दादा आणि संगीतकार सी .रामचंद्र हे दोन हिरे चित्रपट सृष्टी ला दिलेत. अलबेला च्या यशात होती दिलखेच कथा ,गीता बाली भगवान दादा यांची रोमॅटिक कॉमेडी ची केमिस्ट्री आणि सी रामचंद्र यांची सुमधुर सदाबहार गाणी .त्याकाळी गाण्यात कोंगो ,ओंगो ,क्लिरीनेट,
सेक्सफोन वापरण्याचा प्रयोग अण्णा यांनी केला सी रामचंद्र यांना अण्णा हे नाव दादांनी च दिले. आज ही कुठे पार्टी मध्ये "शोला जो भडके दिल मेरा धडके " हे निर्मिती ची सत्तरी गाठलेले गाणे लागले की जुनी आणि नवी पिढी स्टेज वर जाऊन भगवान दादांनी पडद्यावर दाखविलेले हळुवार पदलालित्य आठवून
बेधुंद होऊन नृत्य करु लागते .दादांच्या अंगातला हा निसर्ग दत्त ठेका लय आणि नाद यामुळे त्यांचे नृत्य आज ही भुरळ पाडते. अलबेला त ठेक्या ची गाणी च नाही तर "धीरे से आ जा रे अखियन मे निंदिया धीर से आजा "ही अजरामर लोरी म्हणजे अंगाई गीत पण होते .आणि होते अजून एक गाणे जे ऐकून नियती
गालातल्या गालात खुदकन हसली होती 😭😩 गाण्याचे बोल होते " किस्मत की हवा कभी गरम ,कभी नरम, कभी गरम गरम कभी नरम नरम कधी गरम तो कभी नरम " आजच्या पिढीने ल्युडो या वेब सिरीज मध्ये हे गाणे शिर्षक गीत म्हणून ऐकले असेल हेच ते गीत .चित्रपट रिलीज झाला आणि दादांची किस्मत गरम झाली .त्या
साल चा तीन नंबर चा गल्ला अलबेला ने जमवला .पैसाच पैसा नुसता पाऊस.जुहू चा आलिशान बंगला च नाही तर दादांनी चेंबुर ला जागृती स्टुडिओ विकत घेतला .सोमवार ते शनिवार वेगवेगळी कार , बुटपोलिश केली की दोन पैसे पोलिश तिथे दादा 10 रुपये देणार.त्याच धुंदीत मग लाबेला त्यानंतर झमेला असे चित्रपट
काढले दोन्ही दणकून आपटले.मध्यंतरी दादांनी एका सिन मध्ये नायिका ललिता पवार ला कानाखाली लगावली ललित पवार यांचा डोळा कायमचा अधू झाला .त्याच डोळ्याचा अधुपणा वापरून ललिता पवार यांनी खास्ट खलनायकीचे रोल करून चारित्र्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूड गाजवले .एका मागे एक चित्रपट डब्यात गेले
आणि दादांना घर गाड्या विकाव्या लागल्या कर्ज इतके झाले की दादा सगळे विकून परत दादर च्या चाळीत राहायला आलेत.वय झाल्यावर शब्दशः दादांनी "पर डे " म्हणजे रोजंदारी कलाकार म्हणून काम केले .त्यांच्या वर लिहिलेल्या पुस्तकात एक ठिकाणी नोंद आहे दादर मध्ये इस्त्री विकताना दादा ना कोणतरी
पाहिले होते आणि मग दादांच्या हलाखीची परिस्थिती लोकांना समजली.वार्धक्यात त्यांच्या मुला मुलींनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणी कुस्ती ची आवड असणाऱ्या दादांनी ऍक्शन आणि स्टंट पटात स्वतः च स्टंट केले होते .त्याच निरोगी शरीराची साथ घेऊन उणेपूरे 90 वर्ष जगून दादांनी दादरच्या चाळीत
प्राण सोडले. आज एक ऑगस्ट भगवान दादांन चा वाढदिवस म्हणून माझ्या कडून ही शब्दांजली .उतू नका मातु नका घेतला वसा टाकू नका ,रंका चा राव आणि रावाचा रंक झालेल्या पहिल्या मराठी महानायकाची ही डोळे भरून आणणारी कहाणी खरच कुणाला सांगू नका 🙏अलबेला म्हणजे सुंदर किंवा वेगळा किंवा त्या सारखा
दुसरा कोणी नसणे . खरच भगवान दादा सारखा कोणी झाला नाही आणि होणार ही नाही .म्हणूनच तर विधात्याने बनवून घेतला असेल का ? दादांच्या हातून
अलबेला 🌹🙏.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Shekhar P

Shekhar P Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Godfath52464383

30 Jul
संस्कार ठेवा रे 😡
अजित पवार आज म्हणाले ही महाराष्ट्र ची भाषा नाही पण हे तितके खरे नाही .खरे तर शिवराळ भाषा राजकारणात आणण्याचे श्रेय सेने कडे जाते .भुजबळांना मैद्याचे पोते ,पवारांना बारामती चा मल्ल , ही उपाधी बाळासाहेब यांनीच दिली .मागे फडणीस यांचा वारु मोकाट उधळत होता तेव्हा
छगन उठ कमळ बघ ,शरद कमळ घे असे हलके वक्तव्य करून हा वारसा सुरू केला .आज राणे न चे पोर म्हणतात हे भाडखाऊ सरकार आहे .ही भाषा नाही हे संस्कार आहेत.जनाब सेना ,सोनिया सेना ,जितृदिन आव्हाड, संघोट्या , टरबूज ,चम्पा , बोबड्या , फावड्या , पेंग्विन , धरण मुत्र्या, बेडूक .अरे काय लावलय काय
इतकीच खुमखुमी आहे ते सरळ आई बहिणीवरून शिव्या चालू करा ना .शिव्या पेक्षा ही खालची पातळी राजाकारण्यांनी धरली आहे,त्यात सर्व पक्षीय महिला पदाधिकारी पण चौखूर उधळल्या आहेत.मुख्य म्हणजे महिलांच्या अशा वक्तव्ये किंवा ट्विट ला हजारो लाईक करणारे त्यांचे चाहते आहेत. संजय राऊत यांनी शायरी
Read 6 tweets
30 Jul
घरोघरी चे आहारतज्ञ 😩
काल प्रफुल ने केलेल्या ट्विट वरून जे मनात आहे ते लिहितोय .शब्दशः उच्छाद घातलाय या घरोघरी च्या आहारतज्ञ जमाती ने .आणि ही जमात सगळ्यांच्या घरी असते .शिक्षित अडाणी हुशार मठ्ठ गरीब श्रीमंत सगळीकडे ही जमात पावसाळ्यातील भुछत्र सारखी उगवली आहे.मुख्य म्हणजे
आपले तोकडे ज्ञान इतरांना सांगताना ते किंचित ही लाजत नाही 😱.आता या जमातीचे बोल वाचा माझे एक जवळचे संबंधित आहे त्यांच्या कडे पाच लोक मिळून अर्धा किलो तेल महिनाभर पुरते आम्ही तेल खातच नाही म्हणे, जपान मध्ये उकडलेले अन्न खातात म्हणून 100 वर्ष आरामात जगतात आम्ही उकडलेलं खातो 😩 एकदा
घरी दोस्त आला मी सफरचंद सोलून काप करून त्याला खायला दिले .साल फेकू नये खरे सत्व त्यातच असते तू चुकीच्या पद्धतीने सफरचंद खातो आहे म्हणाला.😩कोणाकडे जेवायला गेले की विचारणार भात वाढू ना शुगर आहे म्हणून विचारतो आहे 😩 अरे वाढ 😡 वरण भाता शिवाय जेवण आहे का ? चहा चे पण तेच साखर टाकू ?
Read 10 tweets
9 Jul
स्वयंप्रकाशीत व्हा 🌹🙏
प्रीतम वय 38 ,पंकजा वय 42 तसे पाहिले तर राजकारणात आल्यात तेव्हा 30 आणि 35 च्या असतील.गोपीनाथ मुंडे हे फक्त मराठवाडा पुरते लाडके व्यक्तित्व नव्हते तर उभा महाराष्ट्रात त्यांचे चाहते होते .आज मुंडे साहेबांन वर लिहिण्याचे काही प्रयोजन नाही विषय मुंडे
साहेबांचा नाही तर त्यांच्या मुलींचा आहे म्हणून त्यांची आठवण काढणे जरुरी आहे.आज जे काही या दोघीना मिळाले आहे म्हणजे प्रीतम ला दोन वेळा लोकसभा आणि पंकजा ला एकदा आमदार पद ते फक्त आणि फक्त मुंडे साहेबांना मरणोत्तर दिलेला सन्मान आहे तो मराठवाडा च्या लोकांनी आणि भाजपा या दोघांनी दिला
आहे.प्रीतम च्या पारड्यात 6 लाख असे विक्रमी मतदान हे मुंडे साहेबांन वरचे प्रेम आणि माया आहे .यात प्रीतम आणि पंकजा यांचा खारीचा वाटा आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही.पंकजा आक्रमक स्वभावाची आहे ती म्हणते मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे त्याची जाणीव गोपीनाथ गडावरच्या भव्य गर्दी
Read 9 tweets
9 Jul
हॅट्स ऑफ टू यू
दाद्दया त्यागी 🔥🔥🔥🔥
नारायण तातू राणे
काल राणे नि शपथ घेतली आणी रथी महारथी मुत्सद्दी ,हुद्र्य सम्राट , जाणते राजे , साधे राजे , टगे,सगे ,सोयरे सगळ्यानी तोंडात बोट नाही तर पाची बोटे घातलीत.राणे कोणत्याही पक्ष्यात गेले तरी राणे नि स्वतः च्या विचारसरणी त फार
बदल घडून आणला नाही.खरे तर सेने बरोबर पंगा घेणे तर ते पण बाळासाहेब असतांना हाच राणे न चा धमाका होता.मग काँग्रेस प्रवेश पण काँग्रेस म्हणजे प्रत्येक घोंगडे भिजत घालून सावलीत वाळत टाकणारे लोक.त्यात पृथ्वी राज बाबा, अधोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे एकाहून एक अडथळे पार पाडण्या पेक्षा
राणे नि स्वाभिमानी हा पक्ष काढला वास्तविक स्वाभिमान या शब्दाचा दूरदूर संबंध आपल्या राजकीय जीवनात त्यांनी ठेवला नाही.दस्तुरखुद्द राणे ना कधी कुठल्या पक्षात आपण जाऊ आणि सोडू याची खात्री तमा आणि पर्वा नसायची.कोकणी माणूस वरतून काटेरी आणि आतून फणसा सारखा गोड याला राणे नि तिलांजली
Read 7 tweets
8 Jul
राहू दे खर्च पाण्याला
दिलदार बाप 🌹🙏
फक्त EBC च्या फॉर्म वर पालका चा व्यवसाय म्हणून लिहिणाऱ्या जागेत पालक -शेती म्हणून लिहायचो तेवढीच शेती नावावर होती.वडिल मूर्तिकार ,पेंटर , चित्रकलेचे क्लासेस घायचे .इतर ही काम करायचे खास असे नियमित उत्पन्न नसायचे पण एकत्र कुटूंबात निभावून
जायचे. वडील थोडीशी घेत असत पण कधी घरी तमाशा किंवा गोंधळ कधीच करत नव्हते . इतर वेळी तुझे सर भेटले होते काल गणित कच्चे आहे म्हणत होते / शर्टवर शाई कोण फेकते रे तुझ्या ?/ पुस्तके फाटतात कशी तुझी 😡 इतक्या लवकर वही संपली ? पाऊस चालू तर जा ना विरघळणार आहे का पाण्यात ? हजारो प्रश्न
आणि मी कातवलेला .,शक्यतो बापा पासून लांबच राहायचो.पण पिऊन आलेले वडील पाहिले की मी एकदम मोकळा रिलॅक्स व्हायचो न पिलेला बाप म्हणजे गरम पाण्याचा बंब आणि पोटात गेलेली असली की बापा सारखा "गोड्या पाण्याचा झरा " दुसरा कुठेच नाही .इतर वेळी कमी खा शाळेत झोप येईल म्हणणारा बाप अचानक
Read 7 tweets
7 Jul
दिलीप कुमार 🌹
1945 ते 1970 पर्यंत या तिघांनी हिंदी चित्रपट सृष्टी झाकोळून टाकली होती गोबऱ्या गुलाबी गालांचा नायिकेला लुभवणारा राज / थोडी मान वाकडी करून नायिकेच्या मागे धावणारा देव आणि तिसरा नायिकेच्या आकंठ प्रेमात पडून ग्लासात डुंबणारा दिलीप कुमार म्हणजे आपला ट्रेजीडी किंग Image
एक पिढी आज संपली.मधुमती ,मुगले आझम, गोपी, नया दौर ,हे तर ब्लॅक अँड व्हाइट च्या काळचे होते पण आज च्या पिढी ने मशाल ,शक्ती ,सौदागर , विधाता हे चित्रपट पाहिले असतीलच .मला भावलेला दिलीप म्हणजे गोपी मधला गळ्यात उपरणे आणि कपाळावर गंध लावून सुख के सब साथी दुःख मे ना कोई म्हणणारा गोपी.
त्याच्या अभिनया ची भुरळ इतकी पडलेली की दिलीप कुमार चे नाव युसूफ खान आहे हे विसरून च एक पिढी वयस्कर झाली.दिलीप चे वय 44 तर सायरा 22 ची त्यांचे सहजीवन एकूण 56 वर्षांचे 🌹 हे प्रेम घेऊन आज सकाळी साडेसात वाजेपर्यंत सायरा सावली सारखी दिलीप कुमार च्या सोबत सेवा करत राहिली Image
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(