स्वयंप्रकाशीत व्हा 🌹🙏
प्रीतम वय 38 ,पंकजा वय 42 तसे पाहिले तर राजकारणात आल्यात तेव्हा 30 आणि 35 च्या असतील.गोपीनाथ मुंडे हे फक्त मराठवाडा पुरते लाडके व्यक्तित्व नव्हते तर उभा महाराष्ट्रात त्यांचे चाहते होते .आज मुंडे साहेबांन वर लिहिण्याचे काही प्रयोजन नाही विषय मुंडे
साहेबांचा नाही तर त्यांच्या मुलींचा आहे म्हणून त्यांची आठवण काढणे जरुरी आहे.आज जे काही या दोघीना मिळाले आहे म्हणजे प्रीतम ला दोन वेळा लोकसभा आणि पंकजा ला एकदा आमदार पद ते फक्त आणि फक्त मुंडे साहेबांना मरणोत्तर दिलेला सन्मान आहे तो मराठवाडा च्या लोकांनी आणि भाजपा या दोघांनी दिला
आहे.प्रीतम च्या पारड्यात 6 लाख असे विक्रमी मतदान हे मुंडे साहेबांन वरचे प्रेम आणि माया आहे .यात प्रीतम आणि पंकजा यांचा खारीचा वाटा आहे हे कोणाला सांगण्याची गरज नाही.पंकजा आक्रमक स्वभावाची आहे ती म्हणते मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे त्याची जाणीव गोपीनाथ गडावरच्या भव्य गर्दी
किंवा OBC मेळाव्यात जमा झालेले इतर पक्षीय नेते यावरून सगळ्यांना आलीय.मुख्यमंत्री च्या यादीत समोर कुणी नकोच या अट्टाहासा पायी देवेंद्र ने सरेआम खडसे आणि पंकजा यांचे पंख छाटायला सुरवात केली.मागच्या आठवड्यात देवेंद्र आणि अमित शहा यांच्यात दोन तास चर्चा झाली आणि मोदी जी हे पण फोनवर
उपलब्ध होते.नवीन मंत्रिमंडळ बनवतांना महाराष्ट्रा तुन कोणाला घेता येईल यावर निश्चितच चर्चा झाली आणि नावे पण ठरली गेलीत.इकडे सूत्र या भरवशावर काम करणारे पत्रकार या बैठकीला ऑपरेशन लोटस ची चर्चा म्हणून मोकळे झाले.पाकीट पत्रकारांनी च मग हिना गावित आणि प्रीतम मुंडे यांचा शपथविधी उरकून
टाकला. कराड / पवार / राणे यांचे नाव फक्त मोदिशा आणि देवेंद्र यांनाच माहीत होते.OBC /आदिवासी / मराठा या वर्गाच्या नेत्यांना प्राधान्य देऊन समतोल साधला गेला.ही सगळी देवेंद्र ची पसंती आहे .मुंडे न च्या मुलींचा दर वेळी विचार करण्याची गरज नाही हा कडवट संदेश दिल्ली वरून दिला गेला आहे.
मी निक्षून सांगतो ही सुरवात आहे .अंदाज असा ही आहे की पुढच्या वेळी पूनम महाजन चे तिकीट पण धोक्यात आहे .इतकेच काय तर भाजपा च्या डोक्यात बसलेल्या खडसे यांची सून रक्षा खडसे हिचे पण तिकीट धोक्यात आहे.मुंडे महाजन खडसे यांच्या मुलींनी आता वडिलांच्या पुण्याई वर काही मिळेल याची अपेक्षा
ठेऊ नये.पत्रकार परिषद किंवा मतांचा जोगवा मागताना या पुढे वडिलांच्या आठवणी काढून भावूक होता येणार नाही याची जाणीव त्यांनी स्वतःला करून दयायला हवी.पोरींनो हे लक्षात घ्या आज ची भाजपा ही अटल बिहारी यांच्या मवाळ स्वभावाची नाही तर मोदी, अमित भाई या प्रचंड म्हत्वाकांक्षी आणि सांम दाम
दंड ,भेद ही सगळी आयुधे सर्रास वापरणाऱ्या निष्णात योध्या न ची आहे .म्हणून विनंती आहे स्वतःची ओळख बनवा दुसरा पर्याय तुमच्या समोर नाही.वडिलांच्या आठवणी ,पुण्याई या पुढे उंबरठ्याच्या आतच राहू द्या. तुमच्या अस्तित्वाची जाणीव इतरांना करून द्या .मुलींनो स्वयंप्रकाशित व्हा 🌹🙏 .
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
हॅट्स ऑफ टू यू
दाद्दया त्यागी 🔥🔥🔥🔥
नारायण तातू राणे
काल राणे नि शपथ घेतली आणी रथी महारथी मुत्सद्दी ,हुद्र्य सम्राट , जाणते राजे , साधे राजे , टगे,सगे ,सोयरे सगळ्यानी तोंडात बोट नाही तर पाची बोटे घातलीत.राणे कोणत्याही पक्ष्यात गेले तरी राणे नि स्वतः च्या विचारसरणी त फार
बदल घडून आणला नाही.खरे तर सेने बरोबर पंगा घेणे तर ते पण बाळासाहेब असतांना हाच राणे न चा धमाका होता.मग काँग्रेस प्रवेश पण काँग्रेस म्हणजे प्रत्येक घोंगडे भिजत घालून सावलीत वाळत टाकणारे लोक.त्यात पृथ्वी राज बाबा, अधोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे एकाहून एक अडथळे पार पाडण्या पेक्षा
राणे नि स्वाभिमानी हा पक्ष काढला वास्तविक स्वाभिमान या शब्दाचा दूरदूर संबंध आपल्या राजकीय जीवनात त्यांनी ठेवला नाही.दस्तुरखुद्द राणे ना कधी कुठल्या पक्षात आपण जाऊ आणि सोडू याची खात्री तमा आणि पर्वा नसायची.कोकणी माणूस वरतून काटेरी आणि आतून फणसा सारखा गोड याला राणे नि तिलांजली
राहू दे खर्च पाण्याला
दिलदार बाप 🌹🙏
फक्त EBC च्या फॉर्म वर पालका चा व्यवसाय म्हणून लिहिणाऱ्या जागेत पालक -शेती म्हणून लिहायचो तेवढीच शेती नावावर होती.वडिल मूर्तिकार ,पेंटर , चित्रकलेचे क्लासेस घायचे .इतर ही काम करायचे खास असे नियमित उत्पन्न नसायचे पण एकत्र कुटूंबात निभावून
जायचे. वडील थोडीशी घेत असत पण कधी घरी तमाशा किंवा गोंधळ कधीच करत नव्हते . इतर वेळी तुझे सर भेटले होते काल गणित कच्चे आहे म्हणत होते / शर्टवर शाई कोण फेकते रे तुझ्या ?/ पुस्तके फाटतात कशी तुझी 😡 इतक्या लवकर वही संपली ? पाऊस चालू तर जा ना विरघळणार आहे का पाण्यात ? हजारो प्रश्न
आणि मी कातवलेला .,शक्यतो बापा पासून लांबच राहायचो.पण पिऊन आलेले वडील पाहिले की मी एकदम मोकळा रिलॅक्स व्हायचो न पिलेला बाप म्हणजे गरम पाण्याचा बंब आणि पोटात गेलेली असली की बापा सारखा "गोड्या पाण्याचा झरा " दुसरा कुठेच नाही .इतर वेळी कमी खा शाळेत झोप येईल म्हणणारा बाप अचानक
दिलीप कुमार 🌹
1945 ते 1970 पर्यंत या तिघांनी हिंदी चित्रपट सृष्टी झाकोळून टाकली होती गोबऱ्या गुलाबी गालांचा नायिकेला लुभवणारा राज / थोडी मान वाकडी करून नायिकेच्या मागे धावणारा देव आणि तिसरा नायिकेच्या आकंठ प्रेमात पडून ग्लासात डुंबणारा दिलीप कुमार म्हणजे आपला ट्रेजीडी किंग
एक पिढी आज संपली.मधुमती ,मुगले आझम, गोपी, नया दौर ,हे तर ब्लॅक अँड व्हाइट च्या काळचे होते पण आज च्या पिढी ने मशाल ,शक्ती ,सौदागर , विधाता हे चित्रपट पाहिले असतीलच .मला भावलेला दिलीप म्हणजे गोपी मधला गळ्यात उपरणे आणि कपाळावर गंध लावून सुख के सब साथी दुःख मे ना कोई म्हणणारा गोपी.
त्याच्या अभिनया ची भुरळ इतकी पडलेली की दिलीप कुमार चे नाव युसूफ खान आहे हे विसरून च एक पिढी वयस्कर झाली.दिलीप चे वय 44 तर सायरा 22 ची त्यांचे सहजीवन एकूण 56 वर्षांचे 🌹 हे प्रेम घेऊन आज सकाळी साडेसात वाजेपर्यंत सायरा सावली सारखी दिलीप कुमार च्या सोबत सेवा करत राहिली
फियास्को 😩
मूळ इटालियन शब्द याचा अर्थ म्हणजे फजिती/ फज्जा / किंवा मराठीत पोपट होणे.मला लहानपणी च नाही तर आज ही केळीच्या सालीवरून कोणी घसरले / सायकल स्लिप झाली/ खुर्चीवरुन पडले कोणी गटारीत पडले तर हसू येते.समजते की आपण नीट वागत नाहीये पण हसू आवरले जात नाही .आणी मी जितका लोकांवर
हसलोय ना त्यापेक्षा 10 पट लोक माझ्यावर हसली आहेत 😭.माझा फियास्को तुम्हाला सांगतोय अजिबात हसायचे नाही गरीबाच्या लेकराला😂 शाळेत कधी शिक्षकांनी विचारले निबंध स्पर्धा आहे / कथाकथन स्पर्धा आहे /वक्तृत्व स्पर्धा आहे कोणाला भाग घायचा आहे ? माझा हात सगळ्यात आधी नेहमी वर 👆असायचा मी
प्रत्येक स्पर्धेत भाग घायचो .एकदा शिक्षकांनी वक्तृत्व स्पर्धेत परस्पर नाव दिले इयत्ता 6 वि .चार विषय होते त्यात मी माझी आजी हा निवडला आणि शिक्षकांना भेटलो त्यांच्या कडून निबंधाचे पुस्तक घेतले त्यातली माझी आजी निबंध लिहून पुस्तक परत केले आणि स्पर्धे करता पाठांतर केले.आदल्या
गुरुदक्षिणा 🌹🙏
इयत्ता पाचवी चित्रकलेचा तास गुरुजी नि पांढऱ्या ड्रॉईंगपेपर वर रेखाटन करून दिलेले हत्ती चे चित्र दिले सोबत रंग पण दिलेत आणि रंगवायला सांगितले.चित्रकलेचे गुरुजी माझ्या आजोबांचे शिष्य घरी पिढया न पिढया चित्रकला आणि मूर्तिकार यांचा वारसा.कदाचित त्यामुळे म्हणा मी जरा
जास्तच घमेंडी .हत्ती ला रंग दिला निळसर शेपटी पांढरी ,कांन वेगवेगळ्या रंगाचे , गवत हिरवे नाही पिवळे ,झटपट काढून गुरुजींना दाखवले ,त्यांनी ठेवून घेतले खूप छान 10 /10 मार्क दिलेत.रविवारी बाहेरून खेळून आलो तर गुरूजी आणि आजोबा माझी वाट पहात होते.आले आले बेरिस्टर साहेब आलेत 😱
आजोबांनी जवळ बोलवले हत्ती चे ड्रॉईंग दाखवले क्षणात कानाखाली आवाज आला मी गाल झाकतो तोपर्यंत गुरुजी नि दुसऱ्या कानाखाली जाळ काढला.निळा हत्ती /पिवळ गवत , पांढरी शेपटी हे शिकवले का तुझ्या बापाने ? गुरुजी बोलत होते रंगसंगती समजत नाही तुला ? साधे चित्र रंगवता येत नाही मुर्त्या काय
काल न वापरलेली औषधें परत करायला मेडिकल गेलो हिशेब चालूच होता .तेवढ्यात एक मुलगा म्हताऱ्या आई ला कपड्यावरून मध्यमवर्गीय च वाटत होते .मेडिसिन घायला आले मुलाने फाईल दिली किती बिल होईल सांगा म्हणला .उत्तर आले चार हजार मुलगा म्हणाला देऊन टाका तर आई नि सांगितले हजार चे करा वाटले तर
परत येऊ .सगळे आयुष्य पोरा बाळा न करता संसारकरता खर्ची घालवलेल्य आई ने तिथेच मुलाला चार शब्द सुनावले महिनाभराच्या किराणा इतक्या गोळ्या घेतात का कधी ?😡मी मेडिकल मालकाला दोस्तच माझा नजरेने खुणावले त्याने आजी ला औषधें चार हजाराची घेऊन जा बाकी परत करा मी घेईन असे सांगितले
कमीत कमी दोन अडीच ची तरी घेऊन जा सगळे डोस मी ऍडजस्ट करून देतो नाहीतर चार चे घेऊन जा आणि परत द्या काळजी करू नका आजी आणि मेडिसिन दिले. मी डुलत डुलत काठी टेकवून नाराजीनेच औषधे घेऊन जाणाऱ्या आजी च्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत होतो .मला आई आठवली कॅरी बॅग भरून औषधे आणले की आई आधी