#गुरूवर्य_कृष्णाजी_केळुस्कर_जयंती.
गुरूवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांचा जन्म कोकणातील वेंगुर्ले तालुक्यातील केळूस येथे दि.२० आॅगस्ट १८६० रोजी झाला.त्यांचे पूर्वज लष्करात होते.त्यांचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडीत झाले.
१८८१ ते १९२५ पर्यंत त्यानी विल्सन हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नौकरी केली.त्यानी संत तुकाराम, गौतमबुध्द, शिवाजी महाराज,गुणाजी घुले,एल्लपा बाळाराम आदी चरित्रग्रंथ लिहिले.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत त्यानी काम केले.ते नेहमीच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले.
१९०७ साली भीमराव आंबेडकर जेंव्हा मॅट्रिकची परीक्षा पास झाले तेंव्हा त्यानी रावबहाद्दर सी.के.बोले यांच्या समवेत भीमरावांच्या बी.आय.टी.च्या चाळीतील घरी जाऊन भीमरावाचे अभिनंदन केले.इतकेच नव्हे तर अस्पृश्यातील पहिला मॅट्रिक पास विद्यार्थी म्हणून बोले यांच्या अध्यक्षतेखाली भीमरावांचा
सत्कार घडवून आणला.रामजीबाबाना आपल्या मुलास पुढील शिक्षण देण्याचा सल्ला दिला.सत्कारप्रसंगी स्वतः लिहिलेले ' बुध्द चरित्र ' भेट दिले.त्याच ' बुध्द चरित्रा ' चा भीमरावांच्या भावी जीवनावर क्रांतिकारक परिणाम होऊन बुध्द तत्वज्ञानाचा त्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटला.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या The Buddha and His Dhamma ग्रंथाच्या प्रस्तावनेत कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून तेंव्हापासून बुध्दाचे आकर्षण असल्याचे म्हटले अाहे. गुरूवर्य केळूस्करानी भीमरावांची बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी भेट घालून दिली व पुढील
शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिली.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुढील आयुष्यात धुळीतून धुरंधराच्या मालिकेत जाऊन बसले त्या दैदीप्यमान जीवनाला गती देण्याचे काम गुरूवर्य कृष्णाजी अर्जुन केळूसकर यानी केले.त्यानी डाॅ.भीमराव आंबेडकरांवर पोटच्या मुलासारखे प्रेम केले.
शिवाशिवीच्या त्या कर्मठ काळात भीमरावाना गुरूजींच्या घरात मुक्तपणे प्रवेश होता.भीमरावाना ते प्रेमाने भिवा अशीच हाक मारत.रोज सकाळी गुरूवर्य भीमरावाना घेऊन समुद्रकिनारी दादर चौपाटीवर फिरायला जात.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरानी आपल्या लिखाणात व भाषणात गुरूवर्य केळूसकर यांचा
नेहमी आदराने उल्लेख करत असत.
गुरूवर्य केळूसकर हे वयाच्या ६५ व्या वर्षी विल्सन हायस्कूलमधून निवृत्त झाले.निवृत्त झाल्यावर त्याना बडोदा सरकार कडून पेन्शन मिळवून देण्यासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरानी पत्रव्यवहार करून प्रयत्न केले.पण त्यात यश आले नाही.
आयुष्याच्या शेवटच्या आठवड्यात गुरूजीना मुंबई मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान लाभला.पुढे ९ आक्टोबर १९३४ रोजी त्याना अर्धांगवायूचा झटका आला व त्यांचे अर्धे शरीर लुळे पडले.
१४ आक्टोबर १९३४ रोजी त्यांचे मुंबईतील राहात्या घरी निधन झाले.
बाबासाहेबांचे ते मार्गदर्शक गुरूच होते.त्यानीच बाबासाहेबाना बुध्द धम्माचा मार्ग दाखविला.
बाबासाहेबांच्या मार्गदर्शक गुरूवर्याना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.भावपूर्ण स्मरण.
.......🖋️बी. एन. साळवे
बरं झालं अफगाणिस्तान सारखी परिस्थिती नाही म्हणून धन्यता मानणाऱ्यांनो ही परिस्थिती त्याच दिशेने चालली. अफगाणिस्तान किंवा सिरीया बनायला जे लागतं तेच ब्राम्हणवादी मोदींच्या नेतृत्वात तुमच्या झोळीत देत आहे. शिक्षण व्यवस्था उध्वस्त करणे, नंतर बेरोजगारी वाढवणे,
महागाई आणि जीवनावश्यक वस्तू आवाक्याबाहेर बाहेर, सामाजिक सुरक्षा नाकारणे, न्याय व्यवस्था जटिल शक्यतो तो न्याय नाकारणारी बनवने म्हणजे नागरिक भुक, बेरोजगारी, दारिद्र्य, असुरक्षित जीवन, नाकारलेले न्यायाची सुड भावना किंवा आत्मरक्षण वाट्टेल त्या कारणाने हिंस्रक बनतील. टोळ्या बनवतील.
पोटाला मारायची व्यवस्था बनली की सामान्य लोकांचा विवेक आपोआप मरतो. संयम, शांतता, सृजनशीलता मेंदुत नाही तर पोटाच्या आताड्यातुन येते. जेवढी भुक, भाकरीची असुरक्षितता तेवढा व्यक्ती चिडखोर बनतो. न्यायाची, जगण्याची व्याख्या परिस्थिती सापेक्ष बदलली जाते.
1)खोले नावाच्या ब्राम्हण बाईने मराठा समाजातील महिलेवर जात लपवून खोले बाईच्या घरी स्वयंपाक केला म्हणून पोलिस केस तरीही ब्राम्हण द्वेष करु नका. 2) कुणबट संसदेत जाऊन नांगर हाकणार आहेत का? असे बाळ टिळक अथणीच्या सभेत बोलले. ब्राम्हण द्वेष करु नका.
3) सावित्रीमाईवर दगड आणि चिखलाचा मारा करणारे, क्रांतीबा फुले यांना वरातीतुन हाकलणारे जरी ब्राम्हण होते तरीही ब्राम्हण द्वेष करु नका. 4) स्त्री, अस्पृश्य यांच्यावर अन्याय करणारा मनुस्मृती या ग्रंथाचे नाव पुण्यातील ब्राम्हणाच्या घराला दिले जाते. ब्राम्हण द्वेष करु नका.
5) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात डाव्या पायाच्या अंगठ्याने राजतिलक गागो भट्टाने पैसे घेऊन केला होता. ब्राम्हण द्वेष करु नका . 6) शाहू छत्रपतींना आयुष्यभर त्रास ब्राम्हणांची दिला तरीही ब्राम्हण द्वेषाचा अतिरेक करु नका.
पाणिपत मराठ्यांचे झाले आणि अटकेपार झेंडे पेशव्याने लावले.फासावर भगतसिंग,सुखदेव,राजगुरु गेले आणि माफीवीर, स्वांतंत्र्यवीर बनले. शिवरायांवर तलवार चालवली ती कृष्णाजी भास्कर ने पण तो कृष्णाजी कुलकर्णी होता हे लपवले जाते.
शिवराय व रामदास गोसाव्याची कधी भेटच झाली नसताना शिवरायांचे गुरु बनवण्याचा हरामीपणा केला जातो. शिवरायांच्या सर्व लढाया केवळ राज्यविस्तार करण्यासाठीच होत्या पण त्याला हिंदु मुस्लिम जातधर्मिय तेढ बनवले गेले.
शिवरायांच्या हातात देवी तलवार देते आणि यवनांचा नाश करायला सांगते असाही खोटे लिहीले जाते. यशवंत घोरपडे यांच्या नावाची वाट लावली जाते आणि घोरपडीला नाव यशवंती देऊन दोरखंड घोरपड घेऊन कडा चढुन जाते असे पण लिहीले जाते.
काल नविन वर्षाचा पहिलाच दिवस होता आणि मी काल एक गोष्ट नोटीस केली. ती अशी की सोशल मीडियावर बहुसंख्य हिंदूंनी न्यू इयरच्या शुभेच्छा देणं टाळलं, मला मोबाईलवरही माझ्या हिंदू मित्रांनी न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.
ज्या हिंदू मित्रांना मी स्वतःहून मेसेज करून शुभेच्छा दिल्या त्यांनी मला रिप्लाय दिला नाही. मला ज्या शुभेच्छा आल्या त्या अहिंदू ख्रिश्चन मित्रांच्याच आल्या, मुस्लिम मित्रांनीही न्यू इयरच्या शुभेच्छा देणं टाळलं, त्यांच्याही शुभेच्छा आल्या नाहीत आणि त्यांनी रिप्लायही दिला नाही.
न्यू इयर तर साजरा करू पण शुभेच्छा मात्र गुढीपाडव्यालाच देऊ असा काहीसा हिंदूंचा निर्धार असावा. मागील काही दिवसांतील सोशल मीडियावरील हॅशटॅग बघितले तर तीच शक्यता जास्त आहे. मुस्लिम सुद्धा हिंदूं एवढेच कट्टर झाले आहेत.
शूरवीरांचा, क्रांतिकारी लोकांचा, क्रांतिकारक सत्य घटनांचा आपण इतिहास लपवून ठेवूच शकत नाही, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने समोर आल्याशिवाय राहत नाही. दोन वर्षांपूर्वी भीमा कोरेगाव येथे क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर जी अमानुष दगडफेक केली गेली -
त्यामुळे संपूर्ण जगभरात भीमा-कोरेगावचा क्रांतिकारी इतिहास पोहोचायला मोठी मदतच झाली आहे. आणि त्यामुळेच फुले, शाहू, आंबेडकरी क्रांतीचा, भारताचा बौद्ध संस्कृतीचा सत्य इतिहास आजपर्यंत लपवून ठेवणाऱ्या,
चुकीचा इतिहास सांगणाऱ्या नकली इतिहासकारांची आता गोची होतांना आपणास दिसून येत आहे. भारताला स्वतंत्र होऊन सत्तर वर्षं झालेली आहेत आणि आज पहिल्यांदा दूरदर्शनवर सह्याद्री वाहिनीने भीमा-कोरेगाव येथील क्रांतिस्तंभाचा अभिवादन सोहळा थेट प्रक्षेपित केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडपासून पाच मैलांवर आंबडवे नावाचे एक खेडे आहे. हाच आंबेडकर घराण्याचा मूळ गाव. या घराण्याचे कुलनाव सकपाळ. त्याची कुलदेवता भवानी.तिची पालखी ठेवण्याचा मान ह्याच महार घराण्याचा असे. गावातील वार्षिक उत्सवसमयी तर त्यांना गावकऱ्यांत विशेष मानाचे स्थान असे.
आणि या कुटुंबाला वर्षाकाठी तो दिवस
मोठा महत्त्वाचा, सोहळ्याचा नि अत्यंत उत्साहाचा वाटे.
आंबेडकरांच्या आजोबांचे नाव मालोजी सकपाळ. ते एक सेवानिवृत्त लष्करी शिपाई होते. त्यांच्या मुलांपैकी मीराबाई नावाची मुलगी आणि रामजी नावाचा मुलगा ह्या दोघांचीच
काय ती माहीती मिळते.
मालोजींना आणखी तीन मुलगे होते.
परंतु त्यांच्या लष्करी विभागाच्या वारंवार होणाऱ्या स्थलांतरामुळे, पुढे या त्यांच्या कुटुंबाशी मालोजींचा संबंध राहिला नसावा, असे दिसते. रामजी सकपाळ हेही सैन्यात नोकरीस राहीले.