या देशाला स्वातंत्र्य मिळालं मिळताना ज्या काही गोष्टी घडल्या त्या सर्वश्रुत आहेत. धार्मिक द्वेषातून देशाची फाळणी, गांधी हत्या, जातीयवादाचे परिमार्जन म्हणून राखीव क्षेत्र, लांगुलचालन अथवा अतिसहिष्णुपणाचे फळ म्हणून ज्या त्या धर्मानुसार वेगवेगळे पर्सनल लॉ बोर्ड ई गोष्टी ठळक आपल्या
समोर येतात. तत्कालीन अनेक प्रश्न पुर्णतः न सोडवल्याने आजही आपल्या पिढीला काही समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर कित्येकदा माझ्या मित्रांनी अथवा इतरांनी त्या समस्यांवर लिहिले आहे. त्यातून एक मुद्दा समान आढळतो तो म्हणजे विशिष्ट वर्ग विशिष्ट समस्यांवर
कसा मूग गिळतो किंवा त्या समस्येत आणखी भर घालतो.

तर सर्वप्रथम हा जो विशिष्ट वर्ग आहे त्याचे स्वतःचे देखील काही हितसंबंध, विचार अथवा पूर्वानुग्रह आहेत ज्याला अनुसरून हेतुपुरस्सर किंवा नकळतपणे ते सदर गोष्टी करत असतात. यात सध्या
ज्यांना लिब्रांडू अथवा फुरोगामी म्हटले जाते ते स्वार्थापोटी- हेतुपुरस्सर-द्वेषातून सदर कृत्य करत असतात.

मीडिया, शिक्षण, साहित्य या क्षेत्रांवर या लोकांचा पूर्वी कब्जा असल्याने त्यांनी मोठ्या खुबीने राष्ट्रवादी असणे, हिंदुहीतवादी असणे, इथल्या पारंपरिक
गोष्टींचा सन्मान करणारी व्यक्ती असणे म्हणजे मोठे पातक असल्यासारखे वातावरण निर्माण करून ठेवले आहे.

आज इसवी सन २०२१ मध्ये भारतीय राष्ट्रवाद, हिंदू समाजाचे हित, या देशावर वेळोवेळी झालेले इस्लामिक हल्ले, काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या फुटीरतावादी चळवळी, माओवादाचे आव्हान आदी
कुठल्याही गोष्टीवर तुम्ही मत मांडले की ती चर्चा थेट १९४७ साली झालेल्या महात्मा गांधींची हत्या अथवा स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू असलेला जातीयवाद, ब्रिटिश काळात सुरू असलेली सती प्रथा या विषयांवर घेऊन येण्याचे युद्धतंत्र ते यशस्वीपणे राबवतात. हे चक्र गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे
सुरु आहे, त्याच त्या व्यक्तींबरोबर त्याच त्या गांधी,सती,अस्पृश्यता वगैरे वगैरे विषयांवर वांझोट्या चर्चा सुरूच आहेत.

गेली सत्तर वर्ष गांधीहत्या,सती, अस्पृश्यता आदी चर्चा ऐकून ऐकून इथला बहुसंख्य हिंदू जणू काही महात्मा गांधी यांना आपणच गोळ्या घातल्या आहेत
या भीतीमध्येच वावरतो. ( याला आता आता काही अंशी अपवाद निर्माण होऊ लागले आहेत)

इस्लामी जिहाद, मिशनरी धर्मांतर,फुटीरतावादी चळवळी आदी समकालीन समस्या मांडणाऱ्या समूहाचे इतके खच्चीकरण झाले आहे की कळत
नकळतपणे त्यांचे मन तथाकथित पुरोगाम्यांच्या निर्दोषत्वाच्या प्रमाणपत्रासाठी आसुसलेले आहे. ते त्यांच्या कट्टर विरोधकांकडून अशा गोष्टींची अपेक्षा करत आहेत जी कधीच पूर्ण होणार नाही.

कोण कुठला गांधी आणि कोण ते सतीप्रथा पाळणारे मध्ययुगीन लोक ? ते गांधी गेले, त्यांना मारणारा
देखील गेला, ज्यांनी जातीयवाद केला ते देखील गेले आणि ज्यांनी तो सहन केला ते देखील गेले. कुठल्या तरी अनोळखी लोकांच्या कृत्यांवरून आजच्या कुणातरी फुरोगाम्याला किंवा तथाकथित वंचिताला मला जाब विचारण्याचा किंवा मला शिक्षा देण्याचा काय अधिकार ? मी यापैकी कुणाचे काही देणे लागत
नाही की मी कुणाचा अपराधी नाही त्यामुळे मी कुठल्या न्यूनगंडात राहण्याचे देखील कारण नाही.

मला माहित आहे की जे माझे विरोधक आहेत त्यांना माझ्याशी काही न काही कारणावरून भांडायचेच आहे. मग मी चांगला वागलो किंवा वाईट वागलो याने त्यांना काही फरक पडणार नसतो. मग ज्यांना
आपल्याशी भांडायचेच आहे त्यांना समजावण्यात किंवा ते मला कधीतरी चांगले म्हणतील यासाठी त्यांच्या प्रमाणपत्राची वाट बघण्यात मला रस नाही व गरज पण नाही.

माझी ही गरज, माझा न्यूनगंड ज्या दिवशी दिवशी संपला त्याच दिवशी मी खऱ्या अर्थाने मुक्त झालो आहे. तुम्ही मुक्त आहात का?
तुषार दामगुडे
महाराष्ट्रद्रोही-जातीयवादी- प्रतिगामी- कारस्थानी असामी
@barty_croutch @migratorscave @abhi_hinduwagh @gajanan137 @devharshada @stitch_yamalaa @Manishapangark1 @The_SpyDee_ @sameerlaxmanbh1 @jayant_rokade @Sanket_J_007 @GloriousHindu @Ram9699_ @rrrrajput @pallavict

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with चिंतामणी 🇮🇳

चिंतामणी 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @tolchintamani01

15 Sep
थर्ड क्लास सिनेमांनी मला अनेक दर्जेदार लेखकांशी ओळख करून दिली. झटपट वाचा आणि लोटपोट व्हा !!!

***

तर मंडळी....
.
.
व्हिएफएक्स नं तरूण केलेलं एक अजय देवगण असतंय.
आणि व्हिएफएक्स च्या बी पाक पलीकडं गेलेलं संजय दत्त असतंय.
संजय दत्त पीके पिक्चरमधल्या गेटअप मधे असतंय.
तेच्या कडं एक कापाकापी करणारी कुऱ्हाड असत्या.
त्या कुऱ्हाडीनं ते लाकडं सोडून माणसं कापत असतंय ती बी समदी शत्रूची.
तेजं कामच असतंय ते.
अजय देवगण भुज एअरपोर्ट चं प्रमुख सरदार असतंय.
आणि तरी बी पाकिस्तान ची विमानं आली की ओम्नीच्या पत्र्यापासनं तयार केलेल्या विमानभेदी तोफेवर चढून विमानं उडवायचं काम तेला असतंय.
सात आठ विमानं आली तरी ते एक किंवा दोनच उडवत असतंय.
Read 15 tweets
12 Sep
'शेवटची गणेश मुर्ती'

त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे 'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता.
दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा...
'कितना को..दिया..गणेशजी?'

दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा
'अंकल...साडे छहसो रुपये...
सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?' तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा.
Read 24 tweets
5 Sep
प्रॉव्हिडंटफंडावरील व्याज करपात्र..सत्य परिस्थिती

कालपासून एक बातमी तुमच्या माथी मारली जात आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला. प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणुकीवरीलव्याज करपात्र.
ही बातमी खोडसाळ आहे.अर्धसत्य आहे जे तुमची दिशाभूल होईल अशा प्रकारे सांगितले जात आहे.

सत्य परिस्थिती अशी आहे

१ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
कोणत्याही व्यक्तीच्या (२०२१-२२ पासून )आर्थिक वर्षांतील प्रॉव्हिडंट फंडातील अडीच लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवरील व्याजावर कर द्यावा लागेल.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ लाख रुपये मर्यादा आहे.
Read 10 tweets
3 Sep
2 spt च्या मध्यरात्री सर्व राक्षस लोकांची Emergency मिटींग झाली आणि आपल्यातला एक जण पृथ्वीवर जाणार असं ठराव संमत झाला.
मग काय ३ सप्टेबर ला पृथ्वीवर विजेचा⛈⛈कडकडाट झाला, सुनामीआली ,१० १२ जण मेले आणि निसर्गाची बरीच हानी झाली.
आफ्रिकेत ‍‍‍जन्म घेता घेता ऐन टाईमला महाराष्ट्रातील Image
बारामती येथे भाऊंचा जन्म झाला.
जन्मा पासूनच ४ चाकी चालवण्यास ♀‍♀ शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळचा मोबाईल घेऊन DR.DRIVING गमे खेळणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चष्मा घालणारे पुण्यात
हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर  माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुररर सोबतच काढणारे श्री श्री श्री @Sanket_J_007 यांना वाढदिवसाच्या ..१ ढेपीचे पोत , २ कंटेनर ,३ टमटम  ,5 छोटा हत्ती , 10
टायर ट्रक ,11 ट्रैक्टर ,अनि 12 टेम्पो टाटा
Read 4 tweets
3 Sep
एका भाल्याचा प्रवास... विनीत वर्तक ©

७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलम्पिक मधे सुभेदार नीरज चोप्रा ने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला ऑलम्पिक च्या इतिहासात मैदानी खेळात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. १२१ वर्ष ImageImage
एक स्वप्न जे भारतीयांनी आणि भारताचे दिग्गज मैदानी खेळाडू मिल्खा सिंग आणि पी.टी. उषा यांनी बघितलेलं होतं ते काल प्रत्यक्षात साकार झालं. नीरज ने त्या स्वप्नांचा मान ठेवताना आपलं पदक स्वर्गीय मिल्खा सिंग यांना समर्पित असल्याचं सांगून एक
आदरांजली भारताच्या एका सर्वश्रेष्ठ खेळाडूला वाहिली. कालच त्याच यश किती महत्वाचं आहे असेल याचा अंदाज कदाचित पी.टी.उषा यांना आला असेल ज्याचं पदक १९८४ च्या लॉस अँजेलिस ऑलम्पिक मधे अक्षरशः १ शतांश सेकंदांनी हुकलं होतं. त्या क्षणापासून गेल्या ३५ वर्षापेक्षा जास्त काळात त्या स्वतः आणि
Read 25 tweets
29 Aug
मोदींनी रेल्वे, रस्ते, एयरपोर्ट, बंदर, सरकारी गोदाम, स्टेडियम सगळं विकायला काढलं आहे!- WA इकॉनॉमिट्स

मोदी सरकारची National Monetization Pipeline (एनएमपी) योजना काय आहे?
★ 6 लाख कोटी रुपयांच्या चार वर्षांच्या महत्वकांक्षी राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन (NMP) चे अनावरण मोदी सरकारने केले आहे.

★ खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून ऍडव्हान्समध्ये पैसे घेऊन, पण प्रकल्पांचे मालकी हक्क सरकारकडेच ठेवून.. (आय रिपीट : सर्व प्रकल्पांचे
मालकी हक्क सरकार कडेच ठेवून) ठरलेल्या कालावधीसाठी अशा खाजगी कंपन्यांना प्रकल्पांचे महसूल अधिकार हस्तांतरित करायची ही एक अतिशय सुटसुटीत, कोणतंही कन्फ्युजन नसलेली योजना आहे.

★ हा प्रकार देशात पहिल्यांदा होत नाहीये. Operate Maintain Transfer (OMT), Toll Operate
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(