थर्ड क्लास सिनेमांनी मला अनेक दर्जेदार लेखकांशी ओळख करून दिली. झटपट वाचा आणि लोटपोट व्हा !!!
***
तर मंडळी....
.
.
व्हिएफएक्स नं तरूण केलेलं एक अजय देवगण असतंय.
आणि व्हिएफएक्स च्या बी पाक पलीकडं गेलेलं संजय दत्त असतंय.
संजय दत्त पीके पिक्चरमधल्या गेटअप मधे असतंय.
तेच्या कडं एक कापाकापी करणारी कुऱ्हाड असत्या.
त्या कुऱ्हाडीनं ते लाकडं सोडून माणसं कापत असतंय ती बी समदी शत्रूची.
तेजं कामच असतंय ते.
अजय देवगण भुज एअरपोर्ट चं प्रमुख सरदार असतंय.
आणि तरी बी पाकिस्तान ची विमानं आली की ओम्नीच्या पत्र्यापासनं तयार केलेल्या विमानभेदी तोफेवर चढून विमानं उडवायचं काम तेला असतंय.
सात आठ विमानं आली तरी ते एक किंवा दोनच उडवत असतंय.
आणि तेच्या बॉस ला लगेच "मी एवढी ईमानं उडवली हौ" म्हणून फोन करत असतंय.
शास्त्रच असतंय ते..
आता अजय देवगण,संजय दत्त हाय म्हणल्याव सोनाक्षी सिन्हा आलीच.
ती धाडशी स्त्री असती.
तशी ती नेहमीच असती.
पण ह्यात ती विळ्या कोयत्यानं डायरेक बिबट्या कापती.
तर मंग पाकिस्तानी ईमानांनी भुज एअरपोर्ट च्या रनवेवर ह्ये मोठ्ठी मोठ्ठी भगदाडं पाडलेली आसत्यात.
त्ये मुजवायचं काम देवगण नं सोनाक्षी सिन्हा ला आन तीच्या गावकऱ्यांस्नी "राजीव गांधी समद्या हाताला
काम योजने" अंतर्गत दिलेलं असतंय.
त्ये काम बी एका रात्रीत सपवायचं असतंय.
गावातली घरं फोडून ती दगडं वापरून गावकरी समदं खड्डं मुजिवत्यात.
अजय देवगण आन तेची बायडी दोघं बी सोत्ता रोडरोलर फिरीवत्यात.
कुटं शिकलीत ईचारू नगा..मी बी ईचारलं न्हाई..
तवर तिकडनं पाकिस्तानी ईमानं येऊन रनवेवर अजून मोठ्ठी मोठ्ठी भगदाडं पाडत्यात.
त्यी भगदाडं बी गावकरी परत मुजिवत्यात.
डांबर कुठनं आणत्यात ते तुमी ईचारू नगासा..मी बी ईचारलं न्हाई.
आता अजय देवगण हाय म्हणल्यावर शरद केळकर बी आला.
फॅमिली मॅन आणि तान्हाजी मधे फिट दिसणारा केळकर हितं सुज आलेला सोल्जर झालाय.
त्यो 120 माणसास्नी घेऊन पाकिस्तान ची हजारो मान्सं कापून काढतोय.
त्यातले दोनशे तीनशे चारशे तर एकटा संजय दत्तच कापून काढतोय.
ते बी तेच्या कुऱ्हाडीनं.
आता त्यो कुऱ्हाड फिरीवतोय म्हणल्यावर समदी पाकडी बी दंबूका फेकून तेच्यासमोर चाकू घेऊनच येत्यात.
का ते तुमी ईचारू नगासा..मी बी ईचारलं न्हाई.
ते तिकडनं केळकर च्या मदतीसाठी पाचशे सैनिक एकाच विमानात कोंबून एक सरदारजी निघालेला असतोय.
अजय देवगण चा जो बॉस असतोय कनी तोच ह्या सरदाराचा बी बॉस असतोय.
बॉस ईचारतोय,"का रे मान्सा,
मायूस का हाईस?"
तर सरदारजी म्हंतोय,"पाचशे जण घेऊन ईमान उडंल का माह्यं ?"
तर बॉस म्हंतोय,"जा की शान्या तेला काय हुतंय?"
तर मग सरदारजी कुतून विमानाचं स्टेअरिंग वर वडतंय.
आता तुमी म्हणशीला विमानाचं स्टेअरिंग कुतून वडायला ते काय ट्रक हाये का?
पण तुमी तेवढ्यासाठी पिक्चर बगाच.
नाय तुमी हसून लोळलासा तर ही पोष्टच मागं घेतो.
तर मग सरदारजी एवढं कुतूनबी विमान उडंना म्हणल्यावर बॉस ला फोन लावतंय,
"अवो उडंना की ईमान !!!"
तर बॉस म्हंतय,
"शान्या,
पन्नास सैनिकास्नी काढ की भाईर !!!"
मग ते सरदारजी पाचशेतल्या पन्नास सैनिकास्नी ईमानातनं भाईर काढून ईमान आकाशात उडीवतंय.
तिकडनं अजय देवगण फोन करून ईचारतंय,
"निगलंस का?"
तर ते म्हणतंय,"निगलोय खरं,
पर ईमानाचं चाक तुटलंय."
देवगण म्हंतय,
"शान्या मी मराठा हाये,
ट्रक चालिवतो रनवेवर,तू ट्रकवर ईमान घाल."
सरदारजी ईमान आणतंय,ट्रकावर घालतंय,ईमान थांबतंय.
ईमानातनं 450 सैनिकं भाईर पडत्यात आन धडाधड गोळ्या घालून उरलेल्या धा-पंधरा पाकड्यास्नी यमसदनी पाटिवत्यात.
आन मंग साठा उत्तराची अजय देवगणनं पैशे घालून काशी केलेली कहानी संपतीया आन आपण गडाबडा लोळून हसतोया.
त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे 'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता.
दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा...
'कितना को..दिया..गणेशजी?'
दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा
'अंकल...साडे छहसो रुपये...
सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?' तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा.
कालपासून एक बातमी तुमच्या माथी मारली जात आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला. प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणुकीवरीलव्याज करपात्र.
ही बातमी खोडसाळ आहे.अर्धसत्य आहे जे तुमची दिशाभूल होईल अशा प्रकारे सांगितले जात आहे.
सत्य परिस्थिती अशी आहे
१ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
कोणत्याही व्यक्तीच्या (२०२१-२२ पासून )आर्थिक वर्षांतील प्रॉव्हिडंट फंडातील अडीच लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवरील व्याजावर कर द्यावा लागेल.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ लाख रुपये मर्यादा आहे.
2 spt च्या मध्यरात्री सर्व राक्षस लोकांची Emergency मिटींग झाली आणि आपल्यातला एक जण पृथ्वीवर जाणार असं ठराव संमत झाला.
मग काय ३ सप्टेबर ला पृथ्वीवर विजेचा⛈⛈कडकडाट झाला, सुनामीआली ,१० १२ जण मेले आणि निसर्गाची बरीच हानी झाली.
आफ्रिकेत जन्म घेता घेता ऐन टाईमला महाराष्ट्रातील
बारामती येथे भाऊंचा जन्म झाला.
जन्मा पासूनच ४ चाकी चालवण्यास ♀♀ शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळचा मोबाईल घेऊन DR.DRIVING गमे खेळणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चष्मा घालणारे पुण्यात
हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ#जाळ आणि #धुररर सोबतच काढणारे श्री श्री श्री @Sanket_J_007 यांना वाढदिवसाच्या ..१ ढेपीचे पोत , २ कंटेनर ,३ टमटम ,5 छोटा हत्ती , 10
टायर ट्रक ,11 ट्रैक्टर ,अनि 12 टेम्पो टाटा
७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलम्पिक मधे सुभेदार नीरज चोप्रा ने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला ऑलम्पिक च्या इतिहासात मैदानी खेळात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. १२१ वर्ष
एक स्वप्न जे भारतीयांनी आणि भारताचे दिग्गज मैदानी खेळाडू मिल्खा सिंग आणि पी.टी. उषा यांनी बघितलेलं होतं ते काल प्रत्यक्षात साकार झालं. नीरज ने त्या स्वप्नांचा मान ठेवताना आपलं पदक स्वर्गीय मिल्खा सिंग यांना समर्पित असल्याचं सांगून एक
आदरांजली भारताच्या एका सर्वश्रेष्ठ खेळाडूला वाहिली. कालच त्याच यश किती महत्वाचं आहे असेल याचा अंदाज कदाचित पी.टी.उषा यांना आला असेल ज्याचं पदक १९८४ च्या लॉस अँजेलिस ऑलम्पिक मधे अक्षरशः १ शतांश सेकंदांनी हुकलं होतं. त्या क्षणापासून गेल्या ३५ वर्षापेक्षा जास्त काळात त्या स्वतः आणि
मोदींनी रेल्वे, रस्ते, एयरपोर्ट, बंदर, सरकारी गोदाम, स्टेडियम सगळं विकायला काढलं आहे!- WA इकॉनॉमिट्स
मोदी सरकारची National Monetization Pipeline (एनएमपी) योजना काय आहे?
★ 6 लाख कोटी रुपयांच्या चार वर्षांच्या महत्वकांक्षी राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन (NMP) चे अनावरण मोदी सरकारने केले आहे.
★ खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून ऍडव्हान्समध्ये पैसे घेऊन, पण प्रकल्पांचे मालकी हक्क सरकारकडेच ठेवून.. (आय रिपीट : सर्व प्रकल्पांचे
मालकी हक्क सरकार कडेच ठेवून) ठरलेल्या कालावधीसाठी अशा खाजगी कंपन्यांना प्रकल्पांचे महसूल अधिकार हस्तांतरित करायची ही एक अतिशय सुटसुटीत, कोणतंही कन्फ्युजन नसलेली योजना आहे.
★ हा प्रकार देशात पहिल्यांदा होत नाहीये. Operate Maintain Transfer (OMT), Toll Operate
या देशाला स्वातंत्र्य मिळालं मिळताना ज्या काही गोष्टी घडल्या त्या सर्वश्रुत आहेत. धार्मिक द्वेषातून देशाची फाळणी, गांधी हत्या, जातीयवादाचे परिमार्जन म्हणून राखीव क्षेत्र, लांगुलचालन अथवा अतिसहिष्णुपणाचे फळ म्हणून ज्या त्या धर्मानुसार वेगवेगळे पर्सनल लॉ बोर्ड ई गोष्टी ठळक आपल्या
समोर येतात. तत्कालीन अनेक प्रश्न पुर्णतः न सोडवल्याने आजही आपल्या पिढीला काही समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर कित्येकदा माझ्या मित्रांनी अथवा इतरांनी त्या समस्यांवर लिहिले आहे. त्यातून एक मुद्दा समान आढळतो तो म्हणजे विशिष्ट वर्ग विशिष्ट समस्यांवर
कसा मूग गिळतो किंवा त्या समस्येत आणखी भर घालतो.
तर सर्वप्रथम हा जो विशिष्ट वर्ग आहे त्याचे स्वतःचे देखील काही हितसंबंध, विचार अथवा पूर्वानुग्रह आहेत ज्याला अनुसरून हेतुपुरस्सर किंवा नकळतपणे ते सदर गोष्टी करत असतात. यात सध्या