सावधान, श्रीकृष्ण जिवंत आहे !!🦚

कृष्ण अंधारात जन्माला. ह्याचा प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
एक बाप मुलाला म्हणाला, " आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ. "
मुलगा भिंतीवर चढला.
बाप म्हणाला, " आता खाली उडी मार. मी आज तुला मोठा धडा शिकवत आहे."
मुलगा घाबरला. दहा फूट खाली उडी मारायची हिंमत होत नव्हती.
बाप म्हणाला, " मार उडी. काळजी करू नकोस,
मी तुला झेलून घेईन."

मुलाने डोळे बंद केले आणि उडी मारली. बाप बाजूला निघून गेला. मुलगा धाडकन खाली आदळला. जोरात आपटला. बापाने मुलाला सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेवून उडी मारायची चूक केलीस. म्हणून पडलास. डोळे उघडे ठेवून, तुझ्या बळावर उडी मारली असती तर काही झालं नसतं.
आज मी तुला मोठा धडा शिकवला. जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर कर.

कृष्णही असाच खोडकर आहे. केव्हा आधार काढून पळून जाईल भरवसा नाही !!

अभिमन्यू चक्रव्यूहात फसला. कशामुळे, तर श्रीकृष्णामुळे. चक्रव्यूह कसा भेदायचा हे कृष्णाने सांगितलं होतं. पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे
कृष्णाने सांगितलं नाही. कृष्ण आहेच असा अजब. आपल्याला फसवतो. गंमत बघतो. फुकटात काही देत नाही. अर्धा मार्ग दाखवतो. रस्ता थोडासा उघडतो. पण पोहोचायचे कष्ट आपल्यालाच घ्यायला लावतो. मोफत काही नाही. no spoon feeding.

चक्रव्यूहात उतरणार असाल तर उतरा, पण जिंकून बाहेर पडायची माहिती
तुम्हालाच घ्यावी लागेल. ते कष्ट तुम्हीच घ्यायचे. चक्रव्यूहातून श्रीकृष्ण अलगद उचलून बाहेर काढत नाही. काढू शकतो, पण काढत नाही. फार चलाख आहे. ''चालू'' आहे असंच म्हणा. चक्रव्यूहात सोडतो आणि गंमत बघतो. सुटायचं तर तुमच्या बळावर सुटा, नाहीतर फसलात. फसल्यावर
त्याच्याकडे अपेक्षेने पहात बसाल तर फक्त सौम्य हसतो. फार अर्थ आहे ह्या हसण्यामागे
तो फक्त एक नाजूक स्मितहास्य करून सांगतो, जे करायचे स्वतःच्या बळावर करा. शिकून घ्या, समजून घ्या. आत्मसात करा. अर्जुनाला असंच अडकवलं. आपलं सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः एकटाच अर्जुनाच्या पक्षात आला
. ज्यामुळे दुर्योधनाला पक्के कळले की अर्जुन जिंकणार नाही, पांडव जिंकणार नाहीत. युद्धाचा निकाल तिथेच लागला होता.

श्रीकृष्ण "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" अशी शप्पथ घेऊन रथावर चढला. काम केलं फक्त रथ हाकण्याचं. अर्जुनही घाबरला.
साक्षात महायोद्धा कृष्ण रथावर सोबतीला होता, पण निशस्त्र ! वरून अर्जुनाला ताकीद दिली की तुझं धनुष्य तू उचल आणि लढ. लढत असशील तर मी रथ चालवीन, दिशा दाखवीन.
विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणुस जाणुन पुरुषार्था
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था
कृष्ण भर रणांगणात वेदार्थ सांगतो. कर्मयोग पटवून देतो. आपण तो नाही पटवून घेतला, नाही आचरणात आणला तर कृष्णाचा काही भरवसा नाही. मैदान सोडून पळून जाईल. अर्जुनाला बजावले की धनुष्य खाली टाकशील तर मी रथ सोडलाच म्हणून समज.
अर्जुन भर रणांगणात फसला. अखेरीस त्याचा तोच लढला आणि शेवटी जिंकला.
अर्जुनामध्ये जिंकण्याची क्षमता आहे. कृष्णाला हे पक्के ठाऊक होते. आपल्यातही ही क्षमता असते, पण आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कोणीतरी मदत करेल ही अपेक्षा ठेवतो. आपली लढाई दुसर्याने लढून द्यावी असे वाटते. अशावेळी कृष्ण मदत करत नाही. आपली लढाई आपल्यालाच लढायला लावतो.
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर: ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥

जिथे योगेश्वर आहे, श्रीकृष्ण आहे तिथे विजय निश्चित आहे. का नसणार ? तो सोबतीला उभा राहतो. थोडी फार दिशा दाखवतो. लढायचं आपल्यालाच आहे. जो लढेल, तो निश्चितच जिंकेल.
असं म्हणतात की कृष्ण जिथे नसावा तिथेही आहे. दारूचा गुत्ता, जुगारचा अड्डा इथे लपून बसला आहे. माझ्याकडे कोण कोण आकर्षित होतो, कोण येतो हे तो बघत बसतो.

रंगहीन मी, या विश्वाच्या रंगाने रंगलो.
कौरवांत मी, पांडवांत मी. अणुरेणुत भरलो.
तो पांडवांमध्ये आहे आणि कौरवातही आहे. नीतीच्या पक्षात बसला आहे आणि अनीतीच्याही. त्याला नीती - अनीतीच्या तराजूत तोलता येत नाही. कारण तो कुठेही गेला तरी रंगहीन आहे. पण तो रंगपंचमी खेळतो. आपल्याला रंगवून सोडतो. त्याचा काही भरवसा नाही. आपल्यासमोर अनेक रंग पसरवून ठेवतो आणि पाहतो,
की आपण कोणत्या रंगात रंगतो.
हा कृष्ण काल होता, आज आहे आणि उद्याही असणार.
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
तो म्हणतो की धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात येत राहीन. म्हणजे तो काल होता, आज आहे आणि उद्याही असणार आहे. तो आपल्या सोबतही राहणार आहे.
फक्त त्याचे म्हणणे ऐकावे लागेल.
कृष्ण सरळ नाही, पण चांगला आहे. समजून घेतलं तर फारच उपयोगाचा आहे.

श्रीकृष्णाने आयुष्यात जितक्या गोष्टी सोडल्या, तितक्या त्या इतर कोणालाही सोडता आल्या नाहीत.

श्रीकृष्णाने आपली आई, वडील सोडले, त्यानंतर नंद-यशोदाला. मित्र निघून गेले. राधा निघून गेली.
गोकुळ सोडले आणि मथुराही सोडली.

आयुष्यभर कृष्ण काही ना काही सोडतच गेला. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला. आपली आजची पिढी, जी एखाद्या गोष्टीच्या विरहाने कोसळून पडते, तिने कृष्णाला गुरु बनवावे. ज्याला कृष्ण समजला तो कधीच औदासिन्यात (depression) जात नाही.
कृष्ण आनंदाचा देव आहे. एखादी गोष्ट हातातून निसटून गेल्यावरही सुखी कसे रहावे हे कृष्णापेक्षा कोणीही उत्तम शिकवू शकत नाही.🙏🙏

@threadreaderapp Plz unroll🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ADITI Gujar

ADITI Gujar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AditiGujar

30 Sep
पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही...

टप्पा १:- १९५० ते १९७५

या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती.
सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक...
मोठे वाडे...
दांडगा रुबाब...
निसर्गावर चालणारी शेती...
अगदी १० वी-१२ वी शिकलेले सुद्धा शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले. तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळावायचे.
अनेक पदवीधर PSI, Dy. SP, तहसीलदार त्या काळात झाले.
नाही जरी नोकरी लागली तर आहे की 20-30 एकर शेती...
उत्तम शेती, दुय्य्म नोकरी, तृतीय व्यापार अशी म्हण होती.
हा काळ म्हणजे मराठी माणूस राजा होता.

टप्पा २:- १९७५ ते १९९५

देश उद्योग व आधुनिकतेकडे जाऊ लागला, १९७४ च्या दुष्काळापासून निसर्गाने झटका द्यायला सुरुवात केली.
शेतीची विभागणी सुरु झाली, २० एकराचे मालक ५ एकरावर आले.
बाहेरील राज्यातील कामगारांचे मुंबई शहरात शिरकाव सुरु झाले.
Read 14 tweets
25 Sep
#कन्यादानच

गेले चार पाच दिवस समाज माध्यमातून एक विषय जोरदार चर्चेत आहे.आलिया भट नामक सिनेअभिनेत्री ने एका जाहिरातीत कन्यादान करण्याऐवजी कन्यामान करा असा अनाहुत सल्ला हिंदुंना दिला.वरवर पाहता एखाद्याला वाटेल की कन्येचा मान करायला सांगतेय यात काही चुकीचं नाही.परंतु त्या आधी ती
कन्यादाना ऐवजी हे करायला सांगतेय ते १००%चुकीचे आहे.कसे ते आपण नीट पाहिले पाहिजे.
सनातन वैदिक हिंदु धर्मात काही संकल्पना मांडल्या आहेत.दान हि देखील एक उदात्त संकल्पना आहे.सत्पात्री व्यक्तीलाच दान दिले पाहिजे असा शास्त्राचा दंडक आहे.योग्य काळी,योग्य वेळी एखादि जबाबदारी योग्य
व्यक्ती कडे सुपूर्द करणे हे दानात अभिप्रेत आहे.दान हे निर्जीव वस्तुचे होते हा एक गोड गैरसमज आहे.शास्त्रानुसार गोप्रदान,महिषीदान,मेषदान, भूदान अशी अनेक सजीवांची दाने देखील सांगीतली आहेत.त्यामुळे हा मुद्दा आपसुकच बाजूला होतो.
दुसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.शास्त्रानुसार कौमार्य
Read 14 tweets
24 Sep
लेखन प्रपंच करावासा वाटतोय.

काल प्रसिध्द हिंदुत्वनिष्ठ लेखक भागवत व रामायणाचे अभ्यासक डॉ.सच्चिदानंद शेवडे व गणकप्रवर सिध्दांतिज्योतिषरत्न डॉ.गौरव देशपांडे या दोन मान्यवरांशी चर्चा करुनच आज हा विषय मांडत आहे.

परवा पासुन चार पाच महिलांनी दुरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व
एक विचारणा केली. गुरुजी नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात व देवीची नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत, हे सत्य आहे का?

काही महिलांनी तर नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले, गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते
दागिने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचेही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असे काही दिले आहे का? हे विचारले.

गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात कि "लक्ष्मी प्राप्त "होईल अशाही चर्चा होताहेत.

यात सत्यता आहे का? गुरुजी धर्मशास्त्रात हे
Read 20 tweets
23 Sep
देवपुजा, स्तोत्रपठण छे छे....वेळ कुणालाय इथे एवढा, मी तर सकाळी घर सोडताना देवघरात ठेवलेल्या फोटो समोर हात जोडतो व निघतो आणि सौं च विचारायला गेलात तर तिला काही देवादिकांची अथवा स्तोत्रांची अजिबात आवड नाहीये त्यामुळे ती सकाळी लावला देवापुढे दिवा तर लावते नाहीतर काय...
चालतय रे आणि तसही तिला वेळ कुठे असतो आणि मुलांचा तर विषयच सोडून दे...काय करायचं त्यांना हे देव देव करून ही असली Hard Wording ची lengthy स्तोत्र पाठ करून उगाच ह्या नादात ते त्यांचाच अभ्यास विसरून जायचे....ए चल सोड हा विषय निघतो मी...
हा कोणताही काल्पनिक संवाद नव्हे तर ही आजची वास्तविकता आहे.आज दुर्दैवाने इतकी घरं व कुटुंब अशी आहेत की जिथे अनेक दिवस देवपुजाच काय तर दिवसातून एकदा देवाला दिवा देखील लावला जात नाही.घरात शुभं करोती, अथर्वशीर्ष, भीमरूपी ह्या गोष्टी तर दुरचं.असो पूजाअर्चा,
Read 10 tweets
23 Sep
• 🌹 स्त्रिचा पदर 🌹••
खुप छान मेसेज नक्की वाचा

👉🏻 पदर काय जादुई शब्द आहे
हो मराठीतला !

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार नाही. एक सरळ तीन
अक्षरी शब्द.

पण केवढं विश्‍व
सामावलेलं आहे त्यात....!!
किती अर्थ,
किती महत्त्व...
काय आहे हा पदर.......?

साडी नेसणाऱ्या स्त्रीच्या खाद्यावर
रुळणारा मीटर दीड मीटर लांबीचा
भाग.......!!

तो स्त्रीच्या लज्जेचं रक्षण तर
करतोच,
सगळ्यात महत्त्वाचं हे
कामच त्याचं.
पण,
आणखी ही
बरीच कर्तव्यं पार पाडत असतो.
या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,
कसा अन्‌ कशासाठी करेल,
ते सांगताच येत नाही.

सौंदर्य खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात तर छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते.
सगळ्या जणींमध्ये चर्चाही
तीच. .....!!
Read 11 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(