ज्यांना असे वाटते की त्यांना या सरकारकडून पिक व्हिमासंदर्भात काही मदत मिळेल, त्यांनी कृपया त्या अपेक्षा सोडाव्यात.
स्वताच्या कार्यकाळात २० हजार कोटींपेक्षा अधिक पीक वीमा देणारे @Dev_Fadnavis कुठे आणि शेतकऱ्यांचे तथाकथित कैवारी कुठे??!
(1/5)
फडणवीस यांच्या कार्यकाळात पीकविमा मदत :
2014 : 1596 कोटी
2015 : 4205 कोटी
2016-17 : 1924 कोटी
2017-18 : 2707 कोटी
2018-19 : 4655 कोटी
2019-20 : 5794 कोटी
(2/5)
2020 मध्ये १०७ लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा काढला होता. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार केवळ ११ लाख शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करण्यात आली...2020 मध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशी अनेक संकटे येऊन सुद्धा सरकार इतके उदासीन का होते???(3/5)
आता गुलाब चक्रीवादळाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलाय. अनेक भागात शेती पिकांसह जमीन खरवडून गेलीय. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, आदी पिकांचं 100 ठक्के नुकसान झालंय. तर फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. सरकार आता तरी शेतकर्यांच्या मदतीसाठी पुढे येईल का? (4/5)
गेल्या दोन वर्षांपासून बहुसंख्य शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. पीकविमा काढण्यात जो पुढाकार शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्या कार्यकाळात केली होती ती यंदा याच सर्व गोष्टींमुळे कमी झाली त्यात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये.
(5/5)
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#GandhiJayanti #Thread
तुर्कीच्या ओटोमनच्या खलिफाला बहाल करण्यासाठी अली बंधू आणि इतर काही लोकांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती.गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता.गांधी अशा धर्मांध चळवळीला का समर्थन देतील?(1/14)
इतिहासाची पुस्तके गांधींनी खिलाफत चळवळीला समर्थन का दिले हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. गांधींनी केलेली ही सर्वात वाईट चूक होती कारण यामुळे मुस्लिमांसाठी नवीन राष्ट्राची पायाभरणी झाली. (2/14)
खिलाफत चळवळीला भारतीय नेत्यांनी दिलेला पाठिंबा हा एक धक्का होता जो कदाचित भारत कधीच सावरणार नाही. गांधींना वाटले की भारतीय मुस्लिम राष्ट्रीय चळवळीत सामील होतील जर हिंदूंनी इस्लामिक खिलाफतच्या त्यांच्या मागणीचे समर्थन केले. (3/14)