तो दीड वर्षांचा असताना त्याच्या आईने आणखी एका मुलाला जन्म दिला, दुर्दैवाने तो तीनच महिन्यांत गेला. त्यानंतर दोन वर्षांनी त्याला एक बहीण मिळाली; पण तीसुद्धा चार महिन्यांत गेली. पुढे अडीच वर्षांनंतर त्याच्या आईने चौथ्या मुलाला जन्म दिला; पण वर्ष होण्याच्या आत तेसुद्धा देवाघरी गेले.
भावंडांशी खेळण्याच्या वयात त्याने एकापाठोपाठ एक तीन भावंडं गमावली. त्या वेळी तोही लहान असल्याने त्यांचं जाणं त्याला समजण्याच्या पलीकडे होतं. त्यात घरातलं दु:खी वातावरण, ताण, आईचं रडणं यांमुळे तो जास्तच एकटा पडला आणि चिडचिडा झाला. यातून हळूहळू तो खूप हट्टी झाला.
तो तीन वर्षांचा होईपर्यंत बोलत नव्हता. अगदी क्वचित एखादं अक्षर उच्चारायचा. त्यामुळे ‘आपला एकुलता एक मुलगा मुका तर नाही ना’ अशी भीती त्याच्या आईला वाटायला लागली होती. म्हणून त्याच्या आईच्या वडिलांनी त्याला अक्षरं शिकवायचं ठरवलं. त्यासाठी ‘अक्षर अभ्यासम’ हा विधी करावा लागणार होता.
लहान वयात अक्षरांची ओळख करून देण्यासाठी हा विधी केला जातो. एक दिवस त्याच्या आईने भल्या पहाटे त्याला तयार केलं. एका खोलीत जमिनीवर तांदळाचा जाड थर पसरला. त्याच्या आजोबांनी त्याचं बोट धरून तांदळातच प्रत्येक अक्षर लिहायला सुरुवात केली.
मोठ्याने म्हणत अक्षर लिहिण्याने त्याच्या कानावर भाषेचे संस्कार व्हायला लागले. दररोज पहाटे उठून त्यांचा हा अभ्यास चालायचा. काही दिवसांतच अभ्यासाचे परिणाम दिसायला लागले. तो बोलायला लागला आणि त्याच्या आईला हायसं वाटलं. तो शाळेत जायला लागला, तरी एकटं राहण्याची त्याची सवय गेली नव्हती.
इतरांमध्ये मिसळणं, इतर सांगतील ते करणं हे त्याच्या स्वभावातच बसत नव्हतं. तो नेहमी कसल्यातरी तंद्रीत असायचा. जणू तो फक्त स्वतःशीच बोलत असायचा. कुठलीही गोष्ट त्याला पाहिजे तेव्हाच करायचा. मनात नसेल, तर तो एक अक्षरसुद्धा बोलायचा नाही. पण त्याची बुद्धी मात्र खूप चौकस होती.
मुळातच तो एकलकोंडा होता. घरात कुणी भावंडंही नव्हती, मित्रही नव्हते. तो इतरांशी काही बोलत नसला, कसली उत्तरं देत नसला, तरी त्याला सारखे कुठलेतरी प्रश्न पडलेले असायचे. ‘पृथ्वीवरचा पहिला माणूस कोण होता ?’, ‘दोन ढगांमध्ये किती अंतर असतं ?’ असे काहीतरी वेगळेच प्रश्न त्याला पडायचे.
आईवडिलांनी त्याला कधी इतर मुलांमध्ये फारसं मिसळू दिलं नाही. मित्र बोलवायला आले, तरी ते कधी त्याला मित्रांसोबत पाठवत नव्हते. सारखं घरातच बसून हळूहळू मैदानी खेळांमधला त्याचा रसच निघून गेला. त्याच्या वयाची इतर मुलं बारीक आणि चपळ होती, खेळायची सवयच नसलेला तो मात्र खूप जाड झाला होता.
हळूहळू त्याला शाळेची, अभ्यासाची गोडी लागली. दहा वर्षांचा होईपर्यंत त्याचं सगळं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. इंग्रजी, तमिळ आणि गणितात त्याला चांगले मार्क्स मिळाले. तो सगळ्या जिल्ह्यात पहिला आला. आईला आकाश ठेंगणं झालं. तिने पुढच्या शिक्षणासाठी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं.
एक दिवस शाळेत नेहमीप्रमाणे गणिताचा तास सुरू होता. सर भागाकार शिकवत होते. कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भागलं की, उत्तर एक येतं, असं त्यांचं म्हणणं होतं. उदाहरण देत, ते त्यांचा मुद्दा समजावून देत होते. ‘‘तीन फळं तीन जणांमध्ये वाटली, तर प्रत्येकाला एक फळ मिळतं. म्हणजेच,
एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागलं, तर उत्तर एक येतं.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘हजार फळं हजार जणांना वाटली, तरी प्रत्येकाला एकच फळ मिळेल. म्हणजेच उत्तर एक.’’ तास सुरू झाल्यापासून तो चुळबुळत करत होता. सर जे सांगत होते, त्यात काहीतरी चुकत असल्याचं त्याला सारखं वाटत होतं.
शेवटी त्यांचं बोलणं संपल्यावर तो उठला आणि त्याने विचारलं, ‘‘शून्याला शून्याने भागलं, तरी उत्तर एक येतं का ?’’ त्याच्या या प्रश्नाने वर्गात सगळीकडे शांतता पसरली. सरही विचारात पडले. तो पुढे म्हणाला, ‘‘कुठलंच फळं कुणामध्येच वाटलं नाही, तरी उत्तर एक येणार का ?’’
मग मुलंही एकमेकांत कुजबुजायला लागली. एरवी एकलकोंडा असणारा आणि बावळट वाटणारा हा मुलगा हुशार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या एका प्रसंगाने वर्गातल्या सगळ्या मुलांचा भविष्यात महान भारतीय गणितज्ञ म्हणून नावलौकिक मिळवणार्या श्रीनिवास रामानुजन यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
महाराष्ट्र राज्य सदैव संबंध देशाला योग्य दिशा दाखवण्याच्या कामगिरी मध्ये अग्रगण्य व अग्रेसर राहला आहे. आज महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या भावना, आक्रोश व संताप यांचा सन्मान करत राज्यव्यापी बंद पुकारला आहे.
१
देशात गेली कित्येक दिवस पंजाब व हरियाणा येथील शेतकरीवर्ग मोदीच्या भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी, अन्यायकारक व महागाईला प्रोत्साहन देणाऱ्या काळ्या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय. केंद्रातील मोदीचे भाजप सरकार ते आंदोलन दमनशाही करून चिरडण्याचे काम करत आहे.
२
ज्या मध्ये आतापर्यंत ४०० शेतकरी आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.
यात कहर म्हणजे मोदीच्या भाजप सरकार मधील केंद्रीय गृहराज्य मंत्र्याने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करण्यासाठी...
३
देशातील शेतकरीवर्ग आपल्या देशचा कणा आहे आणि केंद्रातील भाजपचे मोदी सरकार हा कणा मोडायला निघाले आहे, आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना गुलामीच्या दुष्टचक्रात कायमचे कैद करून संपवायला निघाले आहे. आज देशातील जनता महागाईने होरपळत आहे.
तरूणवर्गला बेरोजगारीने जर्जर केले आहे, देशातील शेतकरी मरत आहे. तो केंद्र सरकारने शेतीसंबंधी आणलेल्या काळ्या कायद्यातील ज्या त्रुटी आहेत, त्याबाबत पुनर्विचार करत ते कायदे मागे घेण्याची मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय.
तगोरगरीब शेतकरी आंदोलकांवर दादागिरी करत आंदोलन दडपण्याची धडपड करणारे केंद्रातील मोदी सरकार आणि त्या सरकार मधली केंद्रीय गृहराज्य मंत्र्याने शेतकऱ्यांबाबत केलेल्या प्रक्षोभक भाषणाचा निषेध करण्यासाठी लखीमपुर येथे जमलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवत त्यांना चिरडण्याची घटना घडली.