#थ्रेड
प्रत्येक गावात जवळचं, आवडीचं, आदराचं, एक वयस्कर माणूस असतंच अगदी तसेच मास्तर होते.
वय झालं होतं, जातील असं कोणाला वाटलं नव्हतं.
दसरा झाला व काही दिवसातंच ते देवाघरी गेले.
ते गेले तेव्हा सारं गाव निराश झालं, लोकं रडत होती,
बायका हुंदक्या देत देत रडत होत्या.
त्यांना पाहून त्यांची बारकी लेकरं पण रडायला लागली.
१५ दिवस दुखवटा होता सगळं बंद फक्त शेतातली कामं चालू.
भीती वाटत होती तेव्हा गाव ह्या सगळ्यातून सावरेल का?
खरंच ह्यांना किती दुःख झालंय, किती काय बोलतायेत, आठवणी सांगतायेत,
१३ दिवस त्यांच्या घरी लोकं बसायला जायची तेव्हाही
अश्रू आवरत नव्हते.
मास्तरांच्या घरच्यांना धीर द्यायला गेलेली माणसं स्वतःच खचल्यासारखी झाली. १५ दिवस शांत वातावरण होतं,
गावानीच धसका घेतला होता.
"शेवटी माणूस हाय कधीतरी जाणारंच माणसानी practical रहावं किती दिवस दुःख करणार" असे विचार असलेली लोकं अशी का वागतात?
असा प्रश्न पडायचा. ते वारले तेव्हा गावातल्या बारक्या बारक्या पोरांनी स्टेटस ला फोटो टाकून भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे लिहीले, बॅनर लावले.
१५ दिवस उलटून गेले तसं काहीच झालं नाही असं वागायला लागले.
१५ दिवसांपुर्वी हीच ती लोकं होती का ?
आक्रोश करणारी, धक्का बसलेली,
नवलच वाटत होतं सगळ्यांचं.
तेव्हा आठवण काढून काढून गळा काढणाऱ्या बाया आता एकमेकांच्या घरी फराळ बनवायला जातायेत,
खरेदी ला तालूक्याला जायचं म्हणून ठरवतायेत.
कोणाला काय काय घ्यायचं ह्याची चर्चा करतायेत.
एका दिवसात एवढा बदल कसा काय होऊ शकतो?
कालच नाक्यार पोरगं फटाके घेण्यासाठी लोळून लोळून रडत होतं, ज्यानी भावपूर्ण श्रद्धांजली ची पहिली स्टोरी टाकलेली.
माणसं पण अगदी कधी दारू प्यायची मटण खायचं का चीकन याच्या तयारीत निवांत चर्चा करत होती,
पोरींनी एकाच दिवशी मेंदी काढायचं पण ठरवलं. अगदी सर्व मजेत होते लवकर सावरले.
पण दुःख आहे असं दाखवायची दिखावा करायची खरंच गरज होती का ?
ते सर्वांच्या जवळचे आहेत, किती प्रिय होते हे दाखवण्याचा अट्टाहास करण्याची गरज होती का ?
मान्य असतं सण साजरे करायचा आनंद लुटायचा प्रत्येकाला हक्क आहे
मग ते गेल्यावर एवढं भरभरून व्यक्त व्हायची, एवढा त्रास करून घ्यायची गरज होती का ? आईला रडताना पाहून तीचं बारकं लेकरू पण रडावं, खरंतर आईच्या डोळ्यांत अश्रू नव्हते पण पदर तोंडाला लावलेला.
त्या बारक्या लेकराला काय कळत होतं तेव्हा आई रडते हे वाटून ते रडत होतं त्याच्या जीवाला त्रास
द्यायची खरंच गरज होती का ?
बरं ते सर्व मनापासून होतं मान्य केलं तरी त्याची मर्यादा १५ दिवसाचीच कशी असू शकते ?
खरंच माणूस जीवंत पणे दिखावा करतो पण माणूस मेला की पण त्याला दिखावा करावा लागणं वाईट आहे ? भावना असतात पण त्या १५ दिवसांत कशा मरू शकतात ते पण सगळ्या गावाच्या?
आणि उगाच दुःखात आहे हे भासवणं पण चुकीचं आहे.
मास्तरांची बायको व त्यांचं घर आज पण त्या दुःखातून सावरू शकलं नाही आणि लोकं दिखावा करत होते फक्त!
आज त्यांच्याच बायको समोर "काल भाजणी दळली, लाडू वळायला येते" ह्या असल्या गप्पा त्यांच्या बायको समोर मारून त्या बाईला काय वाटत असावं?
१०
खरंच गरज नसते नसता दिखावा करायची, तो दिखावा लगेच समजून येतो.
त्यानी काही क्षणापुरतं समाधान मिळत असलं तरी वर गेलेला माणूस बघून पण तिथं रडावं एवढा दिखावा तरी करू नये.
माणूस जाण्याच्या दुःखातून कोणीच १५ दिवसात सावरत नसतं व काहीच न झाल्या सारखं वावरत ही नसतं ते पण महिन्याभरात.
११
आनंद व्यक्त करायचा सण साजरे करायचा प्रत्येकाला हक्क आहेच
पण राईचा पर्वत करण्यात अर्थ नाही. आपलं दुःख मोठं आहे हे भासवण्याची गरज नाही आणि दुःखात राहण्याची ही गरज नाही. तेवढ्यापुरतं वाईट वाटणं ठिके पण खरंच वाईट वाटत असताना कोण चकली लाडू आणि साडी झाडू वर बोलतं ?
१२
असे अनेक प्रश्न मनात चालू असताना जोरात मास्तरांच्या घरातून रडण्याचा आवाज येतो आणि एकीकडे पोरं फटाक्याची माळ लावतात,
फटाक्याच्या आवाजात ही तो रडण्याचा आवाज अधिक जाणवतो त्यात कसला दिखावा नसतो.
असतं ते फक्त मनमोकळं व्यक्त केलेलं साठवून ठेवलेलं दुःख.
१३/१३
-मध
#Honey__
#म #मराठी
@threadreaderapp will you plz unroll this thread.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ❤ हनी 👑

❤ हनी 👑 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(