आज एक रस्त्यावरील खड्डा किती जणांना पोसतो माहिती का?
1. काँट्रॅक्टर 2. सिमेंट, खडी, डांबर विक्रेते 3. सिमेंट, खडी, डांबर कंपन्या, अन उपसा करणारे 4. याची वाहतूक करणारे 5. खड्डे बुजवणारे कामगार 6. खड्यात पडून लागले तर डॉक्टर 7. जास्त लागले तर टाके घालणारा डॉक्टर
8. जोरात गचका बसला तर मणक्याचे डॉक्टर 9. हात पाय तुटले तर अम्ब्युलन्स आणि ड्रायवर 10. अम्ब्युलन्स मध्ये स्ट्रेचर बनवणारे 11. स्ट्रेचर बनवण्यासाठी लागणारे लोखंड विक्रेते, कापड / रबर विक्रेते 12. ते बनवणारे फेब्रिकेटर 13. मग ICU असणारे दवाखाने 14. तिथे काम करणारा वर्ग
15. औषधे, सलाईन, त्याची सुई बनवणारे, मार्केटिंग करणारे 16. औषध विक्रेते 17. हेल्मेट नसेल आणि जर डोके फुटले तर 18. (वरील 10-16 नंबर्स आहेतच शिवाय) 19. मेंदू सर्जन 20. ऑपरेशन साठी सुर्या, कात्र्या बनवणारे 21. जर धडाधड गाडी गेली खड्ड्यातून तर टायर विक्रेते 22. शॉकअबसरवर बनवणारे
23. फिटर 24. इथे सगळीकडे काम करणारे 25. या सगळ्याचा पार्टस बनवणारे 26. या सगळ्यांना जागा भाड्याने देणारे 27. त्या भाड्या साठी ते बांधून देणारे बिल्डर्स 28. त्या बिल्डरला लागणारे सगळे सामान पुरवणारे 29. बिल्डिंग काँट्रॅक्टर्स 30. काँट्रॅक्टर्स कडे काम करणारे कामगार
31. त्यासाठी लागणारी वाहतूक 32. त्या वाहतुकीसाठी लागणारे डिझेल विक्रेते 33. तिथे काम करणारे कामगार 34. तो पेट्रोल पंप बांधणारे 35. मग ते मटेरियल सप्लाय आणि विक्रेते 36. त्या खड्ड्यावरून राजकारण करणारे पक्षाधारी आणि विरोधी पक्ष नेते
37. त्या नेत्यांच्या बाजूला आरोळ्या ठोकायला लागणारे कार्यकर्ते 38. त्यांच्या हातात असलेले बॅनर प्रिंट करणारी दुकाने 39. प्रिंटर वाले, त्याची शाई बनवनरे आणि विकणारे 40. त्या बॅनर ला लागणाऱ्या काठ्या पुरवणारे
41. त्या सगळ्या कार्यकर्तेयांना लागणाऱ्या गाड्या (दोघात किंवा तिघात एक) मग त्याचे पेट्रोल 42. त्या गाड्या बनवणारे 43. त्या गाड्या खड्ड्यातून गेल्यावर त्याचे स्पेअर पार्टस परत ढिल्या होणार ते बनवणारे आणि फिटर्स 44. समजा माणूस गचकलाच तर वरील सर्व 45. तिरडी वाले 46. गुरुजी
47. हार पुष्पवाले 48. त्यांच्याकडे येणार्याना लागणारे पेट्रोल 49. परत खड्ड्यातून जाणारे त्यांचे टायर्स आणि ढिले होणारे पार्टस 50. आणि अजून डायरेक्ट अथवा इंदायरेक्ट अनेक असतात
🤣🤣🤣😡😡🤣😡
हे असे आर्थिक चक्र आहे,
उघडा डोळे बघा नीट
"तुम्हाला ना माझी किंमतच नाही"
- एक खड्डा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एका लग्ना ला गेलो. जेवणाचा
तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते .युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....
तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........
आज काल डिग्री घेतलेली व्यक्ती हुशारच असते असा समज आहे. पण असे काही नाही कधी कधी कोणतेही शिक्षण न घेतलेले लोक सुद्धा आपल्या अनुभवाने आणि जीवनाकडे बघणाच्या व्यवहारी दृष्टिकोनाने असा काही चमत्कार घडवू शकतात की ज्याने अनेक न सुटणाऱ्या समस्या ह्या एका चुटकी सरशी मध्ये सोडवु शकतात...
मुंबईतील एका कंपनीने अवाढव्य आणि अतिशय महागड यंत्र जर्मनी मधुन मागवले होते.ते यंत्र कंपनीच्या तळघरात उतरवायचे होते. त्या काळात ते यंत्र पेलणारी मोबाईल क्रेन नव्हती. मुंबई पोर्ट कडे तशा क्रेन होत्या पण फिक्स्ड होत्या.
माथाडी कामगारांनी ओंडक्यांच्या मदतीने ते ट्रेलर वरुन उतरवल.....
... पण ते तळघरात ३६ फुट खोल ढकलायचे कसे यावर जर्मन आणि भारतिय तंत्रज्ञ खल करीत बसले होते. अखेरीस जम्शेदपुर वरुन क्रेम मागवायचे असे ठरले.पण त्यासाठी किमान २ आठवडे इतका तरी वेळ लागणार होता.......
*दिवाळी समाप्तीच्या शुभेच्छा...*
माणसाने विझलेले दिवे सुध्दा पहायचे असतात,
मग तेजाळणार्या दिव्याची महती समजते. तेजाच्या वलयाची जाणीव होते.
दिवे जळून विझले की त्यांची असहाय्यता समजते. ते का विझले असावेत याचा अंदाज घेता येतो. विझलेल्या दिव्यांची वेदना समजून घेता येते. आपण जेंव्हा वेदनेच्या परिछायेत असू त्यावेळची जाणीव होते. आणि तसं पाहिलं तर प्रत्येक दिव्याला विझावंच लागतं...
कधी वेळ आल्यावर तर कधी अवेळी. दिवे जेव्हा प्रकाशमान असतात तेंव्हा प्रत्येकाला ते आवडतात. पण याचा अर्थ असा नाही की अंधार उपयोगी नसतो. अंधार पण वेदनेला पोटात जागा देतो. आसवं मुक्तपणे ओघळू देण्यासाठी
सहवास कोणाचा ?
🙏🏻
🏵️ दहा मिनिटे बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे कळेल.
🏵️ दहा मिनिटे बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल.
🏵️ दहा मिनिटे साधु संन्याशा समोर बसा, आपल्या जवळील सर्वकाही दान करून टाकावे असे वाटेल
🏵️ दहा मिनिटे राजकारणी पुढाऱ्या समोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल
🏵️ दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल
🏵️ दहा मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल.
🏵️ दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल.
🏵️ दहा मिनिटे चांगल्या शिक्षका समोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल.
बाळांनो...!
आली आली म्हणता म्हणता पाच दिवस संपले.तुम्ही म्हणत आसाल संपली दिवाळी..फराळाचे डबे आता संपत आले असतील...तेल उटण्याच्या वाट्या घासून पुसून चकचकीत झाल्या असतील.पाच दिवस उजळून काळवंडलेल्या पणत्या तुम्हाला आज भकास वाटत असतील...पण....
खरं तर मी कुठे जात नसते.थोडा काळ पुढं सरकलाय इतकचं.
मी येतेच ती तुम्हाला वर्षभर पुरेल इतकी एनर्जी द्यायला.
देव दानवांनी मंथन करून लक्ष्मी व तेरा रत्न बाहेर काढली.
रोज प्रामाणिकपणे कष्ट करून तुम्ही जे काही मिळवता तीच खरी लक्ष्मी आसते.
तेच खरे लक्ष्मी पुजन ...मी देखील तुमच्यापाशी
तेंव्हा रेंगाळत रहाते.
जेंव्हा तुम्ही पती पत्नी एकमेकांकडे आदर प्रेम व कौतुकाने बघता तोच खरा पाडवा असतो.
मी देखिल तुमच्या नजरेत विरघळून तो पाडवा जगत असते.
जेंव्हा तुम्ही भाऊ बहिण एकमेकांच्या सुखदुःखाला धावून जाता..तीच खरी भाऊबीज...
तुमच्या धावणा-या पायात मीच तर बळ देत असते.