अमेरिकेतील सर्वात महागड्या हॉस्पिटलमधून उपचार घेता येणे म्हणजे लक्झरी नाही.
लक्झरी म्हणजे निरोगी असणे.
😀
लक्झरी म्हणजे क्रूझवर जाणे असे नाही किंवा प्रसिद्ध शेफने तयार केलेले अन्न खाणे नव्हे.
लक्झरी म्हणजे आपल्या स्वतःच्या अंगणात किंवा परसात
उगवलेल्या ताज्या सेंद्रिय भाज्या खाता येणे.
😀
लक्झरी म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट असणे असे नव्हे.
लक्झरी म्हणजे विनासायास 3-4 मजले चढण्याची क्षमता असणे
😀
लक्झरी म्हणजे मोठे रेफ्रिजरेटर घेण्याची क्षमता असणे असे नाही.तर....
लक्झरी म्हणजे ताजे शिजवलेले अन्न दिवसातून 3 वेळा खाण्याची उपलब्धता आणि क्षमता असणे.
😀
लक्झरी म्हणजे होम थिएटर सिस्टीम असणे अन त्यावर हिमालयीन मोहीम पाहणे नव्हे.
लक्झरी म्हणजे हिमालयीन मोहिमेचा शारीरिक अनुभव घेता येणे.
😀
60 च्या दशकात एक कार असणे लक्झरी होती.
70 च्या दशकात टेलिव्हिजन असणे लक्झरी होती.
80 च्या दशकात टेलिफोन ही लक्झरी होती.
90 च्या दशकात संगणक एक लक्झरी होती ...
मग आता लक्झरी म्हणजे काय ??
🤔🤔🤔
तर आता लक्झरी म्हणजे.....
निरोगी असणे,प्रामाणिक असणे, आनंदी असणे, आनंदी वैवाहिक जीवन असणे, प्रेमळ कुटुंब असणे, प्रेमळ मित्रांची सोबत असणे,गुरुंची सोबत असणे, प्रदूषित नसलेल्या ठिकाणी राहण्याचे ठिकाण असणे
या सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत
आणि ह्या दुर्मिळ गोष्टी आपणांपाशी असणे हीच खरी आजची
लक्झरी!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
एका लग्ना ला गेलो. जेवणाचा
तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते .युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....
तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........
आज काल डिग्री घेतलेली व्यक्ती हुशारच असते असा समज आहे. पण असे काही नाही कधी कधी कोणतेही शिक्षण न घेतलेले लोक सुद्धा आपल्या अनुभवाने आणि जीवनाकडे बघणाच्या व्यवहारी दृष्टिकोनाने असा काही चमत्कार घडवू शकतात की ज्याने अनेक न सुटणाऱ्या समस्या ह्या एका चुटकी सरशी मध्ये सोडवु शकतात...
मुंबईतील एका कंपनीने अवाढव्य आणि अतिशय महागड यंत्र जर्मनी मधुन मागवले होते.ते यंत्र कंपनीच्या तळघरात उतरवायचे होते. त्या काळात ते यंत्र पेलणारी मोबाईल क्रेन नव्हती. मुंबई पोर्ट कडे तशा क्रेन होत्या पण फिक्स्ड होत्या.
माथाडी कामगारांनी ओंडक्यांच्या मदतीने ते ट्रेलर वरुन उतरवल.....
... पण ते तळघरात ३६ फुट खोल ढकलायचे कसे यावर जर्मन आणि भारतिय तंत्रज्ञ खल करीत बसले होते. अखेरीस जम्शेदपुर वरुन क्रेम मागवायचे असे ठरले.पण त्यासाठी किमान २ आठवडे इतका तरी वेळ लागणार होता.......
आज एक रस्त्यावरील खड्डा किती जणांना पोसतो माहिती का?
1. काँट्रॅक्टर 2. सिमेंट, खडी, डांबर विक्रेते 3. सिमेंट, खडी, डांबर कंपन्या, अन उपसा करणारे 4. याची वाहतूक करणारे 5. खड्डे बुजवणारे कामगार 6. खड्यात पडून लागले तर डॉक्टर 7. जास्त लागले तर टाके घालणारा डॉक्टर
8. जोरात गचका बसला तर मणक्याचे डॉक्टर 9. हात पाय तुटले तर अम्ब्युलन्स आणि ड्रायवर 10. अम्ब्युलन्स मध्ये स्ट्रेचर बनवणारे 11. स्ट्रेचर बनवण्यासाठी लागणारे लोखंड विक्रेते, कापड / रबर विक्रेते 12. ते बनवणारे फेब्रिकेटर 13. मग ICU असणारे दवाखाने 14. तिथे काम करणारा वर्ग
15. औषधे, सलाईन, त्याची सुई बनवणारे, मार्केटिंग करणारे 16. औषध विक्रेते 17. हेल्मेट नसेल आणि जर डोके फुटले तर 18. (वरील 10-16 नंबर्स आहेतच शिवाय) 19. मेंदू सर्जन 20. ऑपरेशन साठी सुर्या, कात्र्या बनवणारे 21. जर धडाधड गाडी गेली खड्ड्यातून तर टायर विक्रेते 22. शॉकअबसरवर बनवणारे
*दिवाळी समाप्तीच्या शुभेच्छा...*
माणसाने विझलेले दिवे सुध्दा पहायचे असतात,
मग तेजाळणार्या दिव्याची महती समजते. तेजाच्या वलयाची जाणीव होते.
दिवे जळून विझले की त्यांची असहाय्यता समजते. ते का विझले असावेत याचा अंदाज घेता येतो. विझलेल्या दिव्यांची वेदना समजून घेता येते. आपण जेंव्हा वेदनेच्या परिछायेत असू त्यावेळची जाणीव होते. आणि तसं पाहिलं तर प्रत्येक दिव्याला विझावंच लागतं...
कधी वेळ आल्यावर तर कधी अवेळी. दिवे जेव्हा प्रकाशमान असतात तेंव्हा प्रत्येकाला ते आवडतात. पण याचा अर्थ असा नाही की अंधार उपयोगी नसतो. अंधार पण वेदनेला पोटात जागा देतो. आसवं मुक्तपणे ओघळू देण्यासाठी
सहवास कोणाचा ?
🙏🏻
🏵️ दहा मिनिटे बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे कळेल.
🏵️ दहा मिनिटे बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल.
🏵️ दहा मिनिटे साधु संन्याशा समोर बसा, आपल्या जवळील सर्वकाही दान करून टाकावे असे वाटेल
🏵️ दहा मिनिटे राजकारणी पुढाऱ्या समोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल
🏵️ दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल
🏵️ दहा मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल.
🏵️ दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल.
🏵️ दहा मिनिटे चांगल्या शिक्षका समोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल.
बाळांनो...!
आली आली म्हणता म्हणता पाच दिवस संपले.तुम्ही म्हणत आसाल संपली दिवाळी..फराळाचे डबे आता संपत आले असतील...तेल उटण्याच्या वाट्या घासून पुसून चकचकीत झाल्या असतील.पाच दिवस उजळून काळवंडलेल्या पणत्या तुम्हाला आज भकास वाटत असतील...पण....
खरं तर मी कुठे जात नसते.थोडा काळ पुढं सरकलाय इतकचं.
मी येतेच ती तुम्हाला वर्षभर पुरेल इतकी एनर्जी द्यायला.
देव दानवांनी मंथन करून लक्ष्मी व तेरा रत्न बाहेर काढली.
रोज प्रामाणिकपणे कष्ट करून तुम्ही जे काही मिळवता तीच खरी लक्ष्मी आसते.
तेच खरे लक्ष्मी पुजन ...मी देखील तुमच्यापाशी
तेंव्हा रेंगाळत रहाते.
जेंव्हा तुम्ही पती पत्नी एकमेकांकडे आदर प्रेम व कौतुकाने बघता तोच खरा पाडवा असतो.
मी देखिल तुमच्या नजरेत विरघळून तो पाडवा जगत असते.
जेंव्हा तुम्ही भाऊ बहिण एकमेकांच्या सुखदुःखाला धावून जाता..तीच खरी भाऊबीज...
तुमच्या धावणा-या पायात मीच तर बळ देत असते.