प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात,तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो...
एका इंग्रजी मेसेजचा हा अनुवाद.
एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे.
नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे.
हा दिनक्रम रोजचाच झाला होता.
देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्याला वाटू लागली.
त्याला वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला
समजणे केवळ अशक्य.
तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ !
असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्याची बेचैनी वाढू लागली.
एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर तो तेथे पोहोचला. तिचा
नित्यक्रम संपण्याची त्याने वाट पाहिली.
त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला म्हणाला, मागील १५ दिवसांपासून तूं नियमितपणे येथे येते हे मी पहात असतो. तूं काय करतेस ?
ती एकदम म्हणाली, "प्रार्थना".
पुजाऱ्याने जरा साशंकतेनेच विचारले, तुला एखादी प्रार्थना येते?
"नाही" असे ती म्हणाली.
मग तूं डोळे मिटून रोज काय करते?असे त्याने हसून विचारले.
अगदी निरागसपणे ती म्हणाली, मला कोणतीच प्रार्थना येत नाही पण मला," a,b,c,d पासून z पर्यंत माहित आहे. ते ५ वेळा मी म्हणते आणि परमेश्वराला सांगते की मला तुझी प्रार्थना येत नाही पण ती नक्कीच या
alphabets च्या बाहेर असूच शकत नाही. ही alphabets तुझ्या इच्छेनुसार क्रमश: लावून घे आणि तीच माझी प्रार्थना.
ती उड्या मारत बेभानपणे धावत निघून गेली. ती दिसेनाशी होईपर्यंत निरखून तिच्याकडे पहात पुजारी नि:स्तब्ध होवून उभा राहिला.
ज्याची आपण मनोभावे पूजा करतो अशा परमेश्वरावर अतूट असलेली हीच ती श्रद्धा.
अगा बावन्न वर्णा परता। कोण मंत्रु आहे पांडुसूता।।
ज्ञानेश्वरी 🙏🙏🙏🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं, "ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?"
"होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं.
"गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल."
"अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?"
"ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल."
"ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?"
"मिरजलाच घेऊन जावी लागेल."
त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.
आपल्या सगळ्यानकडे अशी एक तरी मित्र / मैत्रीण असतेच.....बघा वाचल्यावर त्यांची आठवण येते का ते...
|| मैत्र ||
तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
सुरुवात कधी झाली, पुढाकार कोणी घेतला
दिवस कोणता – तारीख काय? किती वर्ष झाली?
हे तपशील म्हटलं तर सार्थ आहेत
पण म्हटलं तर व्यर्थ आहेत, कारण....
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
रोज भेटतो - असही नाही,
रोज फोन करतो - तर तसही नाही
एकमेकांकडे सारखे जातो येतो - असं तर नाहीच नाही
तरी पण स्नेहाचा बंध घट्ट आहे कारण...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
चौऱ्यांशी लक्ष योनी हिंडून झाल्यावर
माणूस जन्म मिळाला म्हणे !
मागचा जन्म आठवत नाही, अन पुढचा दिसत नाही
पण खरं सांगू या जन्मात तुझ्याशिवाय करमत नाही कारण ...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं.
लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.
वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?
सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.
सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.
निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा?
त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच..त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच,
त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल
तरच संसारात पाऊल टाकावं.
पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.
मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची.
माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं.
भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत.
सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही)
ज्यांना मराठीची मजा चाखता येते,
त्यांच्यासाठी खास ...
प्रश्नमंजुषा..
बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात कां?
१. पगाराला दोनने 'गुणले' तरी
'भागत' का नाही ?
२. लग्नाची 'बेडी' नक्की
कोणत्या गुन्ह्यासाठी 'पडते'?
३. अक्कल 'खाते'
कोणत्या बँकेत 'उघडता' येते?
४. 'भाऊगर्दीत'
'बहिणी' नसतात का?
५. 'बाबा' गाडीत
'लहान बाळांना' का बसवतात?
६. 'तळहातावरचा फोड'
किती मोठा होईपर्यंत 'जपावा'?
७. मनाचे मांडे भाजायला
'तवा' का लागत नाही?
८. 'दुग्धशर्करा योग'
'मधुमेहींना' वर्ज असतो का?
९. 'आटपाट' नगर
कोणत्या 'जिल्ह्यात' येते?
१०. 'तिखट प्रतिक्रिया'
'गोड' मानून घेता येते का?
११. सतत 'मान खाली' घालायला लावणारा मित्र 'मोबाईल' असावा कां?
१२. 'काहीही' या पदार्थाची
'रेसिपी' मिळेल का?
१३. 'चोरकप्पा' नक्की
'कोणासाठी' असतो?
१४. 'पालक' 'चुका' दाखवून
मुलांना 'माठ' ठरवत असतात का?