पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.
मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची.
माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं.
भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत.
सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही)
सुंदर अनुभव.
फुलं घेऊन देवघरात आल्यावर सर्व देव (स्वत:) स्वच्छ घासलेल्या ताम्हनात काढून देवघराची स्वच्छता, देवांची ऊन पाण्याने अंघोळ, त्यांना लहान बाळांच्याच ममतेने आणि कोमलतेने (भक्तीने) स्वच्छ करून परत जागच्याजागी स्थानापन्न करतात.
तुम्हाला तुमच्या चिंता, क्लेश, दु:ख, दैन्य सारं सारं काही विसरायला लावणारा हा अनुभव.
खऱ्या भक्तीभावनेत तल्लीन होऊन पूजा करताना 'तो' आहे माझ्या पाठीशी, हेही दिवस जातील, 'तो' समर्थ आहे, मी कशाला ऊगीच काळजी करू किंवा कशाला
काही त्याच्याकडे मागू असा सार्थ विश्वास मनात जागतो.
चंदनाच्या गंधाचा मऊ स्पर्श, फुलांचे देखणे रंग आणि प्रकार, धूपाचा सुगंध, तेजाळलेले दिवे, वाहिली जाणारी अक्षत, दाखवला जाणारा नैवेद्य म्हणजे जणू टप्याटप्याने रंगत जाणारी महफिल.
ही पूजा पूर्ण केल्यानंतर ते सजलेलं, तेजाळलेलं,
सुगंधित देवघराचं रूप डोळे भरून मनात साठवून डोळे मिटावेत आणि असा सुंदर दिवस दाखवल्याबद्दल त्या ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
अशी ही साग्रसंगीत पूजा म्हणजे रस, रंग, गंध, स्पर्श या सर्व इंद्रियांद्वारे केली जाणारी साधनाच जणू. यात नादही येतोच की.
तुमचं मन जराही भरकटू नये आणि ईश्वरावर अढळ निष्ठा ठेवून समर्पित व्हायला मदत म्हणून धीरगंभीरपणे म्हटली जाणारी स्तोत्रं.
खरोखरच तुम्हाला सर्व नकारात्मक भावना विसरायला लावणारी. सकारात्मक भाव जागवून तुम्हाला सात्विक बनवणारी. तुम्हाला जास्त प्रेमळ, करूणामय आणि क्षमाशील बनवून तुम्हाला
आत्मविश्वास प्रदान करणारी.
मी तुझ्या पाठीशी आहे. सर्व काही ऊत्तमच होईल' असा भक्कम विश्वास देऊ करणारी.
हळूहळू तुमच्यातला 'अहं' विसरायला लावणारी....
अशी ही रोजची पूजा.
ही बहुधा प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपापली करणे अपेक्षित असेल का?
या वेळेस अंतर्मुख होऊन मौन राखून रोज परमेश्वराशी अद्वैत साधण्याचा प्रयत्न असेल का?
यात अमुक फुलं आहेत किंवा नाहीत म्हणून, चंदनाचं गंध हवं तसं किंवा हवं तितकं नाही म्हणून, मनासारखा नैवेद्य नाही म्हणून तुम्हाला राग येत असेल तर किंवा पूजा करताना तल्लीनतेने न करता मनात बाकीचे विचार
किंवा इतरत्र लक्ष असेल तर मंडळी या पूजेचा तुम्हाला काही ऊपयोग होईल का?
पूजा ही कुणा बाहेरच्या 'देवाला' प्रसन्न करून घेण्यासाठी नाहीये, तर स्वत:मधील ईश्वराची अनुभूती घेण्याचा तो एक प्रवास आहे. स्वतःला प्रसन्न ठेवण्यासाठी आहे.
दिवसाची सुरूवात सकारात्मक ऊर्जेने आणि ऊत्साहाने करायचा तो एक सहजसोपा आणि सुंदर मार्ग आहे.🙏🙏🙏🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात,तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो...
एका इंग्रजी मेसेजचा हा अनुवाद.
एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे.
नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे.
हा दिनक्रम रोजचाच झाला होता.
देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्याला वाटू लागली.
त्याला वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला
समजणे केवळ अशक्य.
तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ !
असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्याची बेचैनी वाढू लागली.
एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर तो तेथे पोहोचला. तिचा
ज्यांना मराठीची मजा चाखता येते,
त्यांच्यासाठी खास ...
प्रश्नमंजुषा..
बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात कां?
१. पगाराला दोनने 'गुणले' तरी
'भागत' का नाही ?
२. लग्नाची 'बेडी' नक्की
कोणत्या गुन्ह्यासाठी 'पडते'?
३. अक्कल 'खाते'
कोणत्या बँकेत 'उघडता' येते?
४. 'भाऊगर्दीत'
'बहिणी' नसतात का?
५. 'बाबा' गाडीत
'लहान बाळांना' का बसवतात?
६. 'तळहातावरचा फोड'
किती मोठा होईपर्यंत 'जपावा'?
७. मनाचे मांडे भाजायला
'तवा' का लागत नाही?
८. 'दुग्धशर्करा योग'
'मधुमेहींना' वर्ज असतो का?
९. 'आटपाट' नगर
कोणत्या 'जिल्ह्यात' येते?
१०. 'तिखट प्रतिक्रिया'
'गोड' मानून घेता येते का?
११. सतत 'मान खाली' घालायला लावणारा मित्र 'मोबाईल' असावा कां?
१२. 'काहीही' या पदार्थाची
'रेसिपी' मिळेल का?
१३. 'चोरकप्पा' नक्की
'कोणासाठी' असतो?
१४. 'पालक' 'चुका' दाखवून
मुलांना 'माठ' ठरवत असतात का?
एका लग्ना ला गेलो. जेवणाचा
तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते .युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....
तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........
आज काल डिग्री घेतलेली व्यक्ती हुशारच असते असा समज आहे. पण असे काही नाही कधी कधी कोणतेही शिक्षण न घेतलेले लोक सुद्धा आपल्या अनुभवाने आणि जीवनाकडे बघणाच्या व्यवहारी दृष्टिकोनाने असा काही चमत्कार घडवू शकतात की ज्याने अनेक न सुटणाऱ्या समस्या ह्या एका चुटकी सरशी मध्ये सोडवु शकतात...
मुंबईतील एका कंपनीने अवाढव्य आणि अतिशय महागड यंत्र जर्मनी मधुन मागवले होते.ते यंत्र कंपनीच्या तळघरात उतरवायचे होते. त्या काळात ते यंत्र पेलणारी मोबाईल क्रेन नव्हती. मुंबई पोर्ट कडे तशा क्रेन होत्या पण फिक्स्ड होत्या.
माथाडी कामगारांनी ओंडक्यांच्या मदतीने ते ट्रेलर वरुन उतरवल.....
... पण ते तळघरात ३६ फुट खोल ढकलायचे कसे यावर जर्मन आणि भारतिय तंत्रज्ञ खल करीत बसले होते. अखेरीस जम्शेदपुर वरुन क्रेम मागवायचे असे ठरले.पण त्यासाठी किमान २ आठवडे इतका तरी वेळ लागणार होता.......