ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार!!

आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं, "ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय?"
"होय. पाच सहा किलोमीटरच." मी म्हटलं.
"गाडीचं इंजिन जाम झालंय... इंजिनचं काम करावं लागेल."
"अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?"
"ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल."
"ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल?"
"मिरजलाच घेऊन जावी लागेल."

त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात.
"डॉक्टर, गाडी बँकेनं ओढून नेली होय?" त्यानं विचारलं.

"कोण म्हटलं?"

"नाही, गावात कोणतरी म्हणत होतं."

तासाभरात दुसरा मनुष्य. "डॉक्टर, किती हप्ते थकले होते हो? हप्ते भरता येत नव्हते तर गाडीच घ्यायची नव्हती"

असेच मग दिवसभर लोक येत राहिले आणि प्रश्न विचारत राहिले.
दिवसभरात एकानंही, " गाडीला काय झालं?" किंवा "गाडी कुठं गेली?" म्हणून विचारलं नाही. सगळे जण असे बोलत होते की जणू गाडी बँकेनंच ओढून नेलीय.

मला सकाळी सकाळी या प्रश्नांचा राग आला होता पण नंतर नंतर लोकांच्या हलक्या कानाचं आणि सुमार बुद्धीचं हसू यायला लागलं.
दुपारनंतर तर आमचा संवाद असा होऊ लागला.

"डॉक्टर, बँकेनं गाडी ओढून नेली?"
होय ?"
"होय"
"का?"
"इंजिनच्या कामासाठी आणि ऑइल बदलीसाठी"
"पण गाडी बँकेनं का नेली? मेस्त्रीनं न्यायला पाहिजे होती नव्हं?
"आजकाल असंच असतं" मी गंभीरपणे म्हणायचो, "बँकेच्या
कर्जवसुलीची कामं मेस्त्री करतात आणि गाड्या दुरुस्तीची कामं बँकवाले करतात.

"असं का म्हणे?"

"काय माहीत?....पण सध्या असंच चाललेलं असतं !" मी आणखी गंभीर होऊन बोलायचो. माझं नाटक बघून बायको हसायची आणि मग समोरचा माणूस खजिल होऊन निघून जायचा.
त्या एका प्रसंगानं मला शिकवलं की लोक काय म्हणतात तिकडं कधीच लक्ष द्यायचं नाही. लोक काहीही बोलत असतात.

मध्यंतरी तर कमालच झाली. माझ्याकडे एक डॉक्टर मुलगी कामाला आली. तिला गाडीत बसलं की मळमळायचं. म्हणून ती पुढं माझ्याशेजारी बसायची.
लोक म्हणायचे, 'डॉक्टरनं दुसरं लग्न केलं वाटतं !'

एक जण माझ्या खऱ्या बायकोला म्हणालीही, "स्नेहा,खरंच भाऊजींनी दुसरं लग्न केलं होय गं?" माझी बायको हजरजबाबी. बोलली, "अगो बाई, तुम्हांला लग्नाला सांगायचंच राहिलं की !"

काही दिवसांनी ती मुलगी काम सोडून गेली. लोक म्हणाले, 'डॉक्टरची
दुसरी बायको डॉक्टरला सोडून गेली वाटतं !'

तोपर्यंत दुसरी मुलगी कामावर आली. लोक म्हणाले, 'आयला,डॉक्टरचं काही खरं दिसत नाही. दुसरी बायको गेली नाही तोपर्यंत तिसरी आणली'

माझ्या कानावर अशा बातम्या आल्या की मी पूर्वी पूर्वी खूप अस्वस्थ व्हायचो पण आता हे सगळं एन्जॉय करत असतो.
लोक काय, काहीही बोलत असतात पण आपण आपलं काम करत जायचं. कुणावरही न रागावता न चिडता.

ज्याची जेवढी कुवत तेवढा त्याचा विचार....!!
🙏शुभ प्रभात 🙏

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with ADITI Gujar

ADITI Gujar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @AditiGujar

18 Nov
आपल्या सगळ्यानकडे अशी एक तरी मित्र / मैत्रीण असतेच.....बघा वाचल्यावर त्यांची आठवण येते का ते...

|| मैत्र ||

तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे

सुरुवात कधी झाली, पुढाकार कोणी घेतला
दिवस कोणता – तारीख काय? किती वर्ष झाली?
हे तपशील म्हटलं तर सार्थ आहेत
पण म्हटलं तर व्यर्थ आहेत, कारण....
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे

रोज भेटतो - असही नाही,
रोज फोन करतो - तर तसही नाही
एकमेकांकडे सारखे जातो येतो - असं तर नाहीच नाही
तरी पण स्नेहाचा बंध घट्ट आहे कारण...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे

चौऱ्यांशी लक्ष योनी हिंडून झाल्यावर
माणूस जन्म मिळाला म्हणे !
मागचा जन्म आठवत नाही, अन पुढचा दिसत नाही
पण खरं सांगू या जन्मात तुझ्याशिवाय करमत नाही कारण ...
कारण तुझं आणि माझं मैत्र आहे
आणि मैत्री हेच आपलं समान गोत्र आहे
Read 7 tweets
18 Nov
कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं.

लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने २ मनं अगदी एकमेकांसारखी समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.

वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?
सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं हीच तर नियतीची जुनी हौस आहे.

सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.
निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा असणार कसा?

त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच..त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच,
त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे, हे मान्य करणार असाल
तरच संसारात पाऊल टाकावं.
Read 10 tweets
18 Nov
बोधकथा

प्रार्थनेचे शब्द महत्वाचे नसतात,तर त्या मागचा भाव महत्वाचा असतो...

एका इंग्रजी मेसेजचा हा अनुवाद.

एक लहान मुलगी रोज सकाळी मंदिरात जावून मूर्तीसमोर उभी राही व डोळे बंद करून हात जोडत दोन मिनिटे काहीतरी पुटपुटत असे.
नंतर डोळे उघडून नतमस्तक होई व स्मितहास्य करून धावतपळत बाहेर जात असे.
हा दिनक्रम रोजचाच झाला होता.

देवळातील पुजारी तिच्याकडे निरखून पहात होता. ती रोज काय करीत असते हे समजण्याची उत्सुकता त्याला वाटू लागली.
त्याला वाटले, ती मुलगी इतकी लहान आहे की धर्माचा सखोल अर्थ तिला
समजणे केवळ अशक्य.
तिला कोणतीही प्रार्थना येत नसेल. मग रोज सकाळी देवळात येण्याचा काय अर्थ !

असेच १५ दिवस निघून गेले. तिच्या वर्तनाविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेमुळे त्याची बेचैनी वाढू लागली.
एकदा सकाळी ती मुलगी तेथे येण्याच्या अगोदर तो तेथे पोहोचला. तिचा
Read 7 tweets
17 Nov
देवपूजा - एक मेडिटेशन

पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.
मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची.

माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं.
भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत.
सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही)
Read 12 tweets
16 Nov
🤔🤭🤪🤔🤭🤪🤔🤭🤪
काल कटिंग सलूनच्या दुकानावर
एक पाटी वाचली..
"आम्ही तुमच्या मनावरचे ओझे
कमी करू शकत नाही,
मात्र डोक्यावरचे ओझे
नक्कीच कमी करू "..🤣

इलेक्ट्रिकच्या दुकानवाल्याने
फलकावर लिहिलं होतं..
"तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो,
आमच्या बल्बचा नक्की पडणार".. 🤣
इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं
वाचून माझं मन भरून आलं ..
"आपला कुणी फॅन नसेल तर
आमच्याकडून एक घेऊन जा "..

चहाच्या टपरीवर असाच फलक होता..
"मी साधा माणूस आहे पण
चहा मात्र खास बनवतो.."🤣
एका उपाहारगृहाच्या फलकावर
वेगळाच मजकूर होता ..
"इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही,
आपण बिनधास्त आत या.." 🤪

पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..
"पाणीपुरी खाण्यासाठी मन
मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं" ..🤣
Read 5 tweets
15 Nov
ज्यांना मराठीची मजा चाखता येते,
त्यांच्यासाठी खास ...

प्रश्नमंजुषा..
बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात कां?

१. पगाराला दोनने 'गुणले' तरी
'भागत' का नाही ?
२. लग्नाची 'बेडी' नक्की
कोणत्या गुन्ह्यासाठी 'पडते'?
३. अक्कल 'खाते'
कोणत्या बँकेत 'उघडता' येते?
४. 'भाऊगर्दीत'
'बहिणी' नसतात का?
५. 'बाबा' गाडीत
'लहान बाळांना' का बसवतात?
६. 'तळहातावरचा फोड'
किती मोठा होईपर्यंत 'जपावा'?
७. मनाचे मांडे भाजायला
'तवा' का लागत नाही?
८. 'दुग्धशर्करा योग'
'मधुमेहींना' वर्ज असतो का?
९. 'आटपाट' नगर
कोणत्या 'जिल्ह्यात' येते?
१०. 'तिखट प्रतिक्रिया'
'गोड' मानून घेता येते का?
११. सतत 'मान खाली' घालायला लावणारा मित्र 'मोबाईल' असावा कां?
१२. 'काहीही' या पदार्थाची
'रेसिपी' मिळेल का?
१३. 'चोरकप्पा' नक्की
'कोणासाठी' असतो?
१४. 'पालक' 'चुका' दाखवून
मुलांना 'माठ' ठरवत असतात का?
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(