ज्यांना मराठीची मजा चाखता येते,
त्यांच्यासाठी खास ...
प्रश्नमंजुषा..
बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात कां?
१. पगाराला दोनने 'गुणले' तरी
'भागत' का नाही ?
२. लग्नाची 'बेडी' नक्की
कोणत्या गुन्ह्यासाठी 'पडते'?
३. अक्कल 'खाते'
कोणत्या बँकेत 'उघडता' येते?
४. 'भाऊगर्दीत'
'बहिणी' नसतात का?
५. 'बाबा' गाडीत
'लहान बाळांना' का बसवतात?
६. 'तळहातावरचा फोड'
किती मोठा होईपर्यंत 'जपावा'?
७. मनाचे मांडे भाजायला
'तवा' का लागत नाही?
८. 'दुग्धशर्करा योग'
'मधुमेहींना' वर्ज असतो का?
९. 'आटपाट' नगर
कोणत्या 'जिल्ह्यात' येते?
१०. 'तिखट प्रतिक्रिया'
'गोड' मानून घेता येते का?
११. सतत 'मान खाली' घालायला लावणारा मित्र 'मोबाईल' असावा कां?
१२. 'काहीही' या पदार्थाची
'रेसिपी' मिळेल का?
१३. 'चोरकप्पा' नक्की
'कोणासाठी' असतो?
१४. 'पालक' 'चुका' दाखवून
मुलांना 'माठ' ठरवत असतात का?
१५. 'पैशांचा पाऊस' असेल
तर 'छत्री' उलटी धरावी का?
१६. 'भिंतीला' कान असतात
तर बाकीचे अवयव कुठे असतात?
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पूर्वी देवांची पूजा झाल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणारी लोकं होती. त्याची आठवण झाली.
मग विचार करता करता वाटलं किती सुंदर पद्धत आहे ना आपल्यात रोजच्या पूजेची.
माझ्या डोळ्यांसमोर पूर्वीचं एक छान चित्र ऊभं राहिलं.
भल्या पहाटेच ऊठून सर्व स्त्रिया घरातलं दळण, स्वैपाकघरातली कामं, पाणी भरणं, लहान मुलांकडे लक्ष देणं वगैरे कामात मग्न असताना पुरूष मंडळी बाहेरच्या अंगणाची सफाई, चूल पेटवणं, बागेला पाणी देणं, गोठा सफाई, धारा काढणं वगैरे कामात गर्क आहेत.
सकाळची सर्व आन्हिकं ऊरकून शूचिर्भूत होऊन घरातले यजमान पूजेसाठी फुलं काढायला बागेत जातात. ऊगवतीची कोवळी किरणं अंगावर घेत, अनवाणी पायांनी, रंगीबेरंगी फुलांची शोभा निरखत पानाफुलांशी हितगूज करत निसर्गाचं अप्रूप मनात साठवत मनाला आल्हाददायक देणारा एक आनंददायी (आणि आरोग्यदायीही)
एका लग्ना ला गेलो. जेवणाचा
तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते .युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....
तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........
आज काल डिग्री घेतलेली व्यक्ती हुशारच असते असा समज आहे. पण असे काही नाही कधी कधी कोणतेही शिक्षण न घेतलेले लोक सुद्धा आपल्या अनुभवाने आणि जीवनाकडे बघणाच्या व्यवहारी दृष्टिकोनाने असा काही चमत्कार घडवू शकतात की ज्याने अनेक न सुटणाऱ्या समस्या ह्या एका चुटकी सरशी मध्ये सोडवु शकतात...
मुंबईतील एका कंपनीने अवाढव्य आणि अतिशय महागड यंत्र जर्मनी मधुन मागवले होते.ते यंत्र कंपनीच्या तळघरात उतरवायचे होते. त्या काळात ते यंत्र पेलणारी मोबाईल क्रेन नव्हती. मुंबई पोर्ट कडे तशा क्रेन होत्या पण फिक्स्ड होत्या.
माथाडी कामगारांनी ओंडक्यांच्या मदतीने ते ट्रेलर वरुन उतरवल.....
... पण ते तळघरात ३६ फुट खोल ढकलायचे कसे यावर जर्मन आणि भारतिय तंत्रज्ञ खल करीत बसले होते. अखेरीस जम्शेदपुर वरुन क्रेम मागवायचे असे ठरले.पण त्यासाठी किमान २ आठवडे इतका तरी वेळ लागणार होता.......
आज एक रस्त्यावरील खड्डा किती जणांना पोसतो माहिती का?
1. काँट्रॅक्टर 2. सिमेंट, खडी, डांबर विक्रेते 3. सिमेंट, खडी, डांबर कंपन्या, अन उपसा करणारे 4. याची वाहतूक करणारे 5. खड्डे बुजवणारे कामगार 6. खड्यात पडून लागले तर डॉक्टर 7. जास्त लागले तर टाके घालणारा डॉक्टर
8. जोरात गचका बसला तर मणक्याचे डॉक्टर 9. हात पाय तुटले तर अम्ब्युलन्स आणि ड्रायवर 10. अम्ब्युलन्स मध्ये स्ट्रेचर बनवणारे 11. स्ट्रेचर बनवण्यासाठी लागणारे लोखंड विक्रेते, कापड / रबर विक्रेते 12. ते बनवणारे फेब्रिकेटर 13. मग ICU असणारे दवाखाने 14. तिथे काम करणारा वर्ग
15. औषधे, सलाईन, त्याची सुई बनवणारे, मार्केटिंग करणारे 16. औषध विक्रेते 17. हेल्मेट नसेल आणि जर डोके फुटले तर 18. (वरील 10-16 नंबर्स आहेतच शिवाय) 19. मेंदू सर्जन 20. ऑपरेशन साठी सुर्या, कात्र्या बनवणारे 21. जर धडाधड गाडी गेली खड्ड्यातून तर टायर विक्रेते 22. शॉकअबसरवर बनवणारे