का घ्यावा ?
कोणी घ्यावा ?
किती घ्यावा ?
कधी घ्यावा ?
कोणाकडून घ्यावा ?
कोणता घ्यावा ?
टर्म इन्शुरन्स चा धागा वाचायला सुरुवात करण्यापूर्वी 👇 ह्या poll मध्ये नक्की सहभागी व्हा..!
आपण ह्यापैकी कोणत्या इन्शुरन्स/विमा याचे पैसे एकदा तरी भरले आहेत?
का घ्यावा ?
Insurance/इन्शुरन्स हा शब्द मूळ ensure ह्या शब्दापासून आलाय ज्याचा अर्थ होतो खात्री देणे / शब्द देणे.
म्हणजेच जेव्हा आपण कशाचाही इन्शुरन्स/विमा घेतो तेव्हा ती कंपनी आपल्याला शब्द देत असते की कराराप्रमाणे विमा घेतलेल्या गोष्टीला जर काही झाले तर जबाबदारी आमची..! #म
थोडक्यात काय तर आपण आपली मोठी जबाबदारी (आणि त्या जबाबदारी सोबत येणारा धोका/ risk) थोडे पैसे देऊन त्या कंपनीवर टाकत असतो.
म्हणजेच आपण गाडीचा insurance घेतला आणि गाडीला काही झाले तर कराराप्रमाणे त्या गाडीचा खर्चाची जबाबदारी त्या कंपनीची..!
आपल्या तब्येतीला काही झाले तर कराराप्रमाणे त्याचा खर्च कंपनीचा..!
तसेच आपण टर्म इन्शुरन्स घेतलाय व काही कारणाने आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर नंतर कराराप्रमाणे ठरलेली रक्कम कुटुंबीयांना द्यायचे काम कंपनीचे..!
आता ह्यात गोष्टीत सर्वात महत्त्वाचा शब्द आहे -कराराप्रमाणे..!
जगात जर सर्व लोक खरेपणाने वागले असते आणि विमा कंपनीला पण नफा कमवायचा नसता तर हा करार फार तर २ ओळीत संपला असता..पण तसे नसल्याने खोटेपणापासून बचाव आणि नफा जास्तीत जास्त व्हावा ह्या हेतूने कोणत्याही कंपनीचा करार हा खूप मोठा आणि किचकट असतो.
आणि ह्या कराराची सर्वात मोठी अट हीच की वर्षभरात विमा घेतलेल्या गोष्टीला/व्यक्तीस कोणतेही नुकसान झाले नाही तर विमा करताना द्यायची रक्कम कंपनीकडे जमा होईल..!
आणि इथेच आपली फसायला सुरुवात होते..त्यासाठी हे ऐका..!
भारतातील गाड्यांचा विमा %
चारचाकी ६०-७०%
दुचाकी ४०% आणि
असे असूनही भारतात १०% लोकांचाही टर्म इन्शुरन्स नाही..!
म्हणजेच लोक गाडीला काही झाले तर खर्च नको म्हणून पैसे द्यायला तयार आहेत पण स्वतः ला काही झाले तर कुटुंबाचे काय हा विचार करताना पैसे वाया जायची भीती वाटते..!
बरं , आता जर तुम्ही म्हणाल की आमची LIC आहे..तर हे लक्षात घ्या की-
LIC ही एक कंपनी आहे..ही कंपनी लाईफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स दोन्ही विकते..असे असूनही बहुतांश लोकांकडे LIC ची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे पण टर्म इन्शुरन्स पॉलिसी नाही..!
दोन्ही मधला फरक पाहिजे असल्यास हे आधी लिहिलेले ट्विट बघा..👇
आणि असे असायचे कारण पुन्हा तेच..नफा..! पण ह्यावेळी एजंट चा..LIC एजंटला लाईफ इन्शुरन्स काढल्याने जास्त कमिशन(~४-४०%) भेटत असल्याने फक्त त्याच प्रकारची पॉलिसी लोकांना सांगितली जाते..आणि तीच पॉलिसी आपल्याला पटते पण..कारण आपल्याला पटवून देण्यात येते की फक्त लाईफ इन्शुरन्सच योग्य ! 😏
बरं..ह्या मध्ये मी कोठेही लाईफ इन्शुरन्स वाईट आहे असे म्हणत नाहीये पण टर्म इन्शुरन्स नसताना लाईफ इन्शुरन्ससाठी पैसे देणे घोडचूक आहे.
अजूनही तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे LIC एजंट योग्य आहेत तर त्यांना हा प्रश्न विचारा -आज जर मला काही झाले तर माझ्या घरच्यांना किती पैसे भेटणार ?
त्या रकमेच्या आकड्यातच तुमचा चालू इन्शुरन्स कसा आहे ह्याचे उत्तर लपले आहे.
२ ओळीत सांगायचे झाले तर टर्म इन्शुरन्स म्हणजे असा इन्शुरन्स ज्याने आपल्याला जीवाचे काही बरे वाईट झाल्यास एकरकमी पैसे मिळून आपल्या कुटुंबाची कमीत कमी २० वर्षाची सोय होते..! #म
किती घ्यावा ?
कमीत कमी आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १० पट किंवा २५ लाख ह्यापैकी जी रक्कम मोठी तेवढा तरी आपला इन्शुरन्स असावा.
आपल्या नावावर कर्ज / देणी असतील(बँकेकडून किंवा उसने घेतलेले) तर तेवढ्या रकमेचा जास्तीचा विमा घेतलेला चांगला..!
आणि बाकी काहीच नाही तर आपल्या कर्जाच्या
रकमे इतका तरी विमा असावा म्हणजे अचानक मृत्यू आल्यास देणेकरी चा त्रास तर नसेल..!
कोणी घ्यावा ?
ज्या ज्या व्यक्तीच्या उत्पन्नावर कुटुंब पूर्णपणे/अंशतः अवलंबून आहे..त्या त्या सर्वांचा टर्म इन्शुरन्स असावा..! आपण नसतानाही कुटुंब जसेच्या तसे आर्थिक निकडी शिवाय चालावे हा हेतू..! #म
म्हणूनच घरात सगळ्यांचा टर्म इन्शुरन्स करणे अपेक्षित नाही..ज्यांचा इन्शुरन्स करायची तशी गरज नाही (लहान मुले,वृध्द,गृहिणी इ) अशा कुटुंबियांच्या नावावर ठराविक रक्कम आपण SIP वाटे शेअर मार्केट मध्ये गुंतवलेले जास्त फायद्याचे ठरते.
म्हणून ज्या घरात एकापेक्षा जास्त कमावते लोक आहेत
किंवा ज्या घरात एकटाच कमवता आहे पण तुम्ही नसताना तुमचा व्यवसाय घरातील दुसरी व्यक्ती समर्थपणे सांभाळू शकते अशा वेळेस विमा हा ऑप्शनल आहे..कारण अशा घरात एक व्यक्ती ही दुसऱ्याची इन्शुरन्स पॉलिसीच असते. त्यांनी थेट गुंतवणुकीचा मार्ग धरलेला उत्तम..!
टर्म इन्शुरन्स हा आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनातील जबाबदारी / रिस्क कमी करण्यासाठी असतो म्हणून जशी जबाबदारी वाढते तसा तसा इन्शुरन्स घेतलेला चांगला..साधारणपणे ३ टप्प्यात घ्यावा
१.कमवायला लागाल तेव्हा
२.लग्न झाल्यावर
३.मुलं झाल्यावर
अशा प्रकारे टप्याटप्याने घेतल्यास गरज असेल तेव्हाच इन्शुरन्स घेतला जातो आणि उगाच गरज नसताना प्रीमियम भरले जात नाही.
कुठून घ्यावा ?
ऑनलाईन का ऑफलाईन
सरकारी कंपनी का खाजगी
महाग का स्वस्त
ह्याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असणार आहे तरी काही विचारात घ्यावा अशा गोष्टी म्हणजे -
१.पहिला विमा/ टर्म इन्शुरन्स हा LIC च्या एजंट कडून घेतलेला चांगला.. का ? तर आपल्याला काही झालं तर हे एजंट सहसा आपल्या ओळखीचे असल्याने आपल्या कुटुंबाला पॉलिसी चे पैसे मिळवून द्यायला आणि सर्व प्रक्रियेला मदत करू शकतील. ही पहिली प्रक्रिया फार महत्त्वाची असते..ती झाल्यास पुढच्या
Online विमा च्या प्रक्रियेला त्रास होत नाही..पण फक्त online विमा घेतला असेल तर नंतर ह्या गोष्टींना मदत करणारे लोक मिळणाऱ्या रकमेच्या १०-२०% हे कमीशन म्हणून घेतात..😡
2. LIC चे हे एजंट आपल्या वयाच्या जवळपासचे असलेले चांगले.. का ? तर त्यांचं वय जर आपल्यापेक्षा खूप जास्त असेल तर
👆 वर जी ही मदत सांगितली आहे ती मदत करण्यासाठी तेच तेव्हा उपलब्ध नसतील(त्यांनाच काही झाले तर?!) तर आपण केलेले नियोजन वाया जायची शक्यता उद्भवते.
3. दुसरा विमा ऑनलाईन आणि तशा मोठ्या खाजगी कंपनीच्या (बँकांचे पाठबळ असलेल्या)(SBI,HDFC,ICICI ) वेबसाईट वर जाऊन काढलेला चांगला..
त्याही पेक्षा सोपा पर्याय म्हणजे त्या कंपनीच्या वेबसाईट वर जाऊन त्यांना आपल्याला कॉल करायला सांगायचं..ते आपल्याला कॉल करतात,समजावून सांगतात..आपण त्यांचा कॉल रेकॉर्ड करू शकतो..आणि ते what's app वर आणि घरपोच दरवर्षी पॉलिसी पण पाठवतात..!
४.ह्यात महत्वाचे म्हणजे फोन पे किंवा
किंवा पॉलिसी बाजार इ वेबसाईट ह्या डिजिटल एजंट आहेत..ह्यांच्या कडून पॉलिसी काढायचा फायदा काहीच नाहीये..उलट तुम्ही थेट विमा कंपनी कडून विमा घेत असाल तर त्यांचे कमिशन द्यायचे वाचत असल्याने थोडीफार घासाघीस करून आपला प्रीमियम कमी पण करून घेता येऊ शकतो..!
५.तिसरा विमा हा ऑनलाइन आणि
बऱ्या खाजगी कंपनीचा घेतलेला चालू शकतो..कारण तोपर्यंत आपण २ विमा आधी घेतल्याने रिस्क बऱ्यापैकी कमी झालेली असते..आणि अशा कंपनीचे प्रीमियम पण LIC पेक्षा बरेच कमी असते.
६.आता 👇बघा ह्यातील सेटलमेंट ratio म्हणजे किती लोकांनी विमाचे पैसे मागितले(claim) आणि त्यातील किती लोकांना मिळाले
पण फक्त हेच बघून चालत नाही..कारण विमा कंपन्या(सरकारी आणि खाजगी दोन्हीही) हा ratio चांगला दिसावा म्हणून छोट्या किमतीचे विमा(जास्त संख्या) सहज मान्य करतात पण मोठ्या रकमेचे(कमी संख्या) विमा रक्कम मंजूर करण्यास त्रास देतात..कारण एक मोठ्या रकमेचा विमा नाकारला तर जास्त पैसे वाचतात आणि
त्याने त्यांचा रेकॉर्ड पण खराब दिसत नाही..! त्यामुळे एकच मोठ्या किमतीचा विमा काढण्यापेक्षा ३ वेगळे/टप्याने विमा काढल्याने तेवढ्याच सुरक्षेसाठी कमी पैसे भरावे लागतात..तसेच नंतर क्लेम भेटायला त्रास होत नाही.
कोणता घ्यावा ? 👇 पुढे चालू..
कोणता घ्यावा ?
सध्या भारतात २५ विमा कंपन्या आहेत..आणि त्या एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणीत असतात..अशाने गोंधळ होतो.. म्हणून IRDA संस्था जी सर्व विमा कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण ठेवते, तिने २ निर्णय घेतले आहेत..ज्याने आपले ग्राहकाचे काम सोपे झालेय..
१.ज्या व्यक्तीने नियमित प्रीमियम भरले आहे.. त्या व्यक्तीचा क्लेम(नंतर भेटणारी रक्कम) कोणतीही कंपनी नाकारू शकत नाही.
२. प्रत्येक कंपनीने 'सरल जीवन विमा' नावाची विमा पॉलिसी आणावी..ज्याच्या सर्व अटी ह्या सर्व कंपन्यांसाठी सारख्या आणि IRDA म्हणजेच सरकारने निर्देशित केलेल्या असाव्या.
म्हणजे आपण ही 'सरल जीवन विमा' ही साधी आणि सोपी पॉलिसी निवडणे चांगले..फक्त कोणत्या कंपनीकडून घ्यायची हे ठरवावे. ह्याचा तोटा किंवा त्रास हा आहे की पॉलिसी बहुतेक सगळ्या कंपन्यांची २५ लाखापर्यंतच आहे.. म्हणून ज्याला जास्त विमा लागतोय त्याने जास्त कंपनीकडून 👆 घ्यावे किंवा 👇वापरावे
अजून काही -
१.तुमचा जीवनातील योग्य टप्पा पार झाल्यानंतर लगेचच विमा घेतलेला चांगला..कारण जेव्हढा कमी वयात विमा घेणार तेवढं प्रीमियम कमी पडते.
२.विमा कंपनीकडून कोणतीही आरोग्य विषयक माहिती लपवू नये. मद्य घेत असल्यास किंवा मागच्या ३ वर्षात कधीही धूम्रपान/तंबाखू इ केलेले असल्यास
फॉर्म भरताना तसे लिहावे..कारण ह्या सगळ्या गोष्टी नंतर विमा रक्कम नाकारण्याचे कारणे बनतात.
३.तुम्हाला विमा घ्यायच्या आधी जर डॉ ला भेटायला किंवा चाचण्या करण्यास सांगितले तर ते सर्व online करू नये..प्रत्यक्ष डॉ जाऊन भेटून तपासण्या करणे कधीही चांगले.
४.विमा हा सामान्य माणूस
समोर ठेवून केलेला असतो..तुम्ही जर स्वतःहून जीव धोक्यात आणणाऱ्या खेळ/गोष्टी ( sky diving , rock climbing , rafting इ) करताना काही झाले तर विमा कंपन्यांना तुमचा विमा नाकारायचा पूर्ण हक्क असतो.
५.भारत सरकारच्या वर्षाला ३३० ₹ भरून विमा मिळणारी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा (PMJJBY)
आणि वर्षाला १२ ₹ भरून मिळणारी प्रधानमंत्री सुरक्षा बीमा(PMSBY) ह्या योजनांचा देशाचा एक करदाता म्हणून लाभ घेणे ही हुषारीचे ठरते. (ह्या सरकारी योजनांची माहिती आपण आपल्या आजूबाजूच्या अल्प उत्पन्न गटातील लोकांना करून दिल्यास/ त्यांना काढून दिल्यास त्यांनाही विमाचा लाभ भेटू शकतो..!)
हा धागा आपल्याला वरील विषयाची ढोबळ माहिती व्हावी म्हणून लिहिला आहे..मी कोणी विमा एजंट नाही व वरील सर्व माहितीचा उपयोग #मराठीत उपलब्ध करून दिल्याने आपले आर्थिक निर्णय अधिक अचूक होतील ही आशा..😇🙏
पुढचा धागा कोणता असावा ह्याबद्दलचे आपले मत/सूचना तसेच काही प्रश्न असल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा..मी माझ्या माहितीनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन..🙏
अशी कमान तेव्हाही अस्तित्वात नव्हती आणि आताही नाही..कमीत कमी आणीबाणीच्या काळात अशी एखादी कमान अस्तिवात यायला हवी..! अशी कमान अस्तित्वात असती तर कदाचित ताज हॉटेल पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या नौदलाच्या तळा वरून Marocs कमांडो NSG च्या आधी पोचले असते..किंवा NSG ला RAW च्या
विमानांची वाट पाहत न बसता त्या विमानतळावर जे विमान आहे त्या विमानाला/हेलिकप्टरला आदेश देऊन NSG काही बहुमोल तास ( ज्या तासांची किंमत आपल्याला आपल्या लोकांच्या प्रणांनी मोजावी लागली) वाचवू शकली असती..ह्या आणि अशा अनेक गोष्टी..पुण्याचे दक्षिण कमानचे कमांडो किंवा नगरच्या सेनेच्या
प्रश्न जरी साधा असला तरी त्याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असणार आहे..तरी मी साधारण idea देण्याचा व एखादी गोष्ट का करावी हे सांगण्याचा प्रयत्न करेन ज्याने निर्णय घेणे सोपे होईल.
"MF investments are subject to market risk, read the offer document carefully before investing" हे खूप महत्त्वाचे वाक्य आपण #mutualfund च्या जाहिरातीत खूपदा ऐकले असेल.
पण ह्याचा अर्थ असा असतो की मार्केट मधून मिळणारा परताव्याची गॅरंटी नाहीये.तो दिवसागणिक बदलू शकतो.
आज मार्केट मध्ये असणाऱ्या १ लाखाची किंमत उद्या मार्केट पडले तर ५०हजार किंवा वाढले तर २ लाखही होईल.सतत होणारा चढउतार हा मार्केटचा पहिला आणि शेवटचा नियम आहे.
म्हणूनच आपल्याला कधीही लागू शकतो असा पैसा मार्केट मध्ये टाकणे तोटा होण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरते. हा धोका कमी करण्यासाठी