भाजपमध्ये बरेच नेते व लोकप्रतिनिधी असे आहेत जे आपल्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत पण लो-प्रोफाईल ठेऊन आपलं काम करत असतात. ते एवढे लो-प्रोफाईल आहेत की त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून ते जे जबरदस्त कार्य करत आहेत, त्याचं श्रेय सुद्धा त्यांना घ्यायची इच्छा नसते.
मी एक सिरीज बनवत आहे. निस्वार्थ भावनेने व श्रेयवादाच्या भानगडीत न पडणाऱ्या अशा काही केंद्रीय मंत्र्यांच्या कार्याबद्दल, दर २-३ दिवसातून एक पोस्ट टाकून शक्य तेवढी (ज्याबद्दल जास्त चर्चा होत नाही अशी) माहिती मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याची सुरवात आज करत आहे.
डॉ.भारतीताई पवार
आरोग्य मंत्रालय, भारत सरकार.
प्रधानमंत्री जनऔषधी परियोजना, आयुष्यमान भारत अभियान (मोदी-केअर), कोविड लसीकरण अभियान सारख्या अनेक यशस्वी व जगभरात नावलौकिक मिळवलेल्या योजनांवर जोमाने काम तर
सुरूच आहे, पण त्याव्यतिरिक्त अजून बऱ्याच योजना व उपक्रम आहेत ज्यावर नव्याने फोकस करण्यात येत आहे.
★ 'मिशन इंद्रधनुष्य' ला पुढे नेत लहान मुले आणि गर्भवती महिलांमध्ये लसीने -प्रतिबंध करता येऊ शकतात अशा 12 रोगांविरूद्ध मृत्यू (mortality) आणि या रोगांमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक व
मानसिक आजारपण (morbidity) यांना प्रतिबंधित करणाऱ्या या मोदी सरकारने 2015 मध्ये लाँच केलेल्या मिशनमध्ये जातीने लक्ष देत त्याला वॉर-फुटिंग वर राबवत आहेत.. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम (यूआयपी) हा जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपैकी एक आहे ज्याचा दरवर्षी
सुमारे २६.७ दशलक्ष नवजात आणि २९ दशलक्ष गर्भवती महिलांना लाभ मिळतो..
★ आता प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) ही केंद्र सरकारची फक्त एक यशस्वी योजनाच नाही, तर ती आता डॉ.भारतीताई पवार एक अतिशय टार्गेटेड रणनीती बनवून मिशन-मोड मध्ये राबवत आहेत! प्रसूतीपूर्व काळजीचा भाग
म्हणून गर्भवती महिलांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत. प्रत्येक गर्भवती महिलेची 2/3 तिमाहीत किमान एक तपासणी व्हावी यासाठी प्रत्येक महिन्याच्या 9व्या दिवशी लाभार्थ्यांना प्रसूतीपूर्व काळजी सेवांचे एक 'कॉम्परीहेनसिव्ह हेल्थ-चेकअप पॅकेज' देशभरातील सर्व प्रधानमंत्री
सुरक्षित मातृत्व क्लिनिकमध्ये मोफत प्रदान केले जात असून या योजनेचा करोडो महिलांना लाभ मिळत आहे. येत्या काळात 'मॅटर्नल मॉर्टलिटी', अर्थात गर्भवती असताना काही कॉम्प्लिकेशन्स होऊन महिलांचे दगावण्याचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी भारतीताई आणि त्यांच्या आरोग्य मंत्रालयाने स्वतःला या
कार्यात झोकून दिले आहे...
★ दरवर्षी डायलिसिस (ESRD) चे सुमारे 2.2 लाख नवीन रुग्णांची भारतात भर पडते. परिणामी दरवर्षी 3.4 कोटी डायलिसिसची मागणी असते. PMNDP अर्थात प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा रुग्णांना परवडणारी डायलिसिस सेवा देण्यासाठी जिल्हा
रुग्णालयातील व्यवस्था मजबूत करणे हे आहे. भारतीताई पवार यांनी यासाठी नव्याने स्ट्रॅटेजी बनवत या कामाला अधिक वेगाने पुढे नेलं आहे व वाढती रुग्णसंख्या पाहता वेळेतच असे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत..
★ पूर्वी सरकारी हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा उपकरणाच्या
देखभालीसाठी योग्य सुविधा नव्हत्या. लोकं म्हणून जास्त पैसे खर्चून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जात असत. नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेन्टर (NHSRC) च्या मार्गदर्शनाखाली 29 राज्यांमध्ये अशा मेडिकल इक्विपमेंट्सचे मॅपिंगचे काम पूर्ण करून डॉ.भारतीताई पवार आणि आरोग्य
मंत्रालय यांच्याकडून आता अशी उपकरणे व्यवस्थित कार्यरत आहेत याची सातत्याने खात्री केली जात आहे.
अजून अशा अनेक योजना व उपक्रम आहेत ज्यांची माहिती इकडे फक्त 'बुलेट-पॉईंट्स' बनवून थोडक्यात देता येण्यासारखी नाही. या योजनांवर साधारणतः लोकं लिहित नाहीत, त्यामुळे चांगलं काम होत
असूनही अशा कामांना प्रसिद्धी मिळत नाहीये. आरोग्य मंत्रालय राबवत असलेल्या अशा योजना, उपक्रम आणि विषयांवर कधी तरी वेगळी आणि सविस्तर पोस्ट करेन.
डॉ.भारतीताई पवार यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा..💐
- वेद कुमार @migratorscave@gajanan137
आई श्रीतुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही
कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून
येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात. विशेष म्हणजे सर्वांची जगन्माता आई तुळजाभवानी ज्या पालखीत बसून मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते ते तयार करणारे हात एवढे छोटे आहेत की सर्वसामान्यांना काय पण मंदिर प्रशासनालाही त्यांच्या नावाची साधी कल्पनाही नाही.
थर्ड क्लास सिनेमांनी मला अनेक दर्जेदार लेखकांशी ओळख करून दिली. झटपट वाचा आणि लोटपोट व्हा !!!
***
तर मंडळी....
.
.
व्हिएफएक्स नं तरूण केलेलं एक अजय देवगण असतंय.
आणि व्हिएफएक्स च्या बी पाक पलीकडं गेलेलं संजय दत्त असतंय.
संजय दत्त पीके पिक्चरमधल्या गेटअप मधे असतंय.
तेच्या कडं एक कापाकापी करणारी कुऱ्हाड असत्या.
त्या कुऱ्हाडीनं ते लाकडं सोडून माणसं कापत असतंय ती बी समदी शत्रूची.
तेजं कामच असतंय ते.
अजय देवगण भुज एअरपोर्ट चं प्रमुख सरदार असतंय.
आणि तरी बी पाकिस्तान ची विमानं आली की ओम्नीच्या पत्र्यापासनं तयार केलेल्या विमानभेदी तोफेवर चढून विमानं उडवायचं काम तेला असतंय.
सात आठ विमानं आली तरी ते एक किंवा दोनच उडवत असतंय.
त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे 'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता.
दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा...
'कितना को..दिया..गणेशजी?'
दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा
'अंकल...साडे छहसो रुपये...
सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?' तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा.
कालपासून एक बातमी तुमच्या माथी मारली जात आहे. मोदी सरकारने मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला. प्रॉव्हिडंट फंडातील गुंतवणुकीवरीलव्याज करपात्र.
ही बातमी खोडसाळ आहे.अर्धसत्य आहे जे तुमची दिशाभूल होईल अशा प्रकारे सांगितले जात आहे.
सत्य परिस्थिती अशी आहे
१ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी हा प्रस्ताव मांडला होता.
कोणत्याही व्यक्तीच्या (२०२१-२२ पासून )आर्थिक वर्षांतील प्रॉव्हिडंट फंडातील अडीच लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवरील व्याजावर कर द्यावा लागेल.सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ लाख रुपये मर्यादा आहे.
2 spt च्या मध्यरात्री सर्व राक्षस लोकांची Emergency मिटींग झाली आणि आपल्यातला एक जण पृथ्वीवर जाणार असं ठराव संमत झाला.
मग काय ३ सप्टेबर ला पृथ्वीवर विजेचा⛈⛈कडकडाट झाला, सुनामीआली ,१० १२ जण मेले आणि निसर्गाची बरीच हानी झाली.
आफ्रिकेत जन्म घेता घेता ऐन टाईमला महाराष्ट्रातील
बारामती येथे भाऊंचा जन्म झाला.
जन्मा पासूनच ४ चाकी चालवण्यास ♀♀ शोकीन असलेले, जन्मल्या जन्मल्या नर्स जवळचा मोबाईल घेऊन DR.DRIVING गमे खेळणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चष्मा घालणारे पुण्यात
हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ#जाळ आणि #धुररर सोबतच काढणारे श्री श्री श्री @Sanket_J_007 यांना वाढदिवसाच्या ..१ ढेपीचे पोत , २ कंटेनर ,३ टमटम ,5 छोटा हत्ती , 10
टायर ट्रक ,11 ट्रैक्टर ,अनि 12 टेम्पो टाटा
७ ऑगस्ट २०२१ रोजी टोकियो ऑलम्पिक मधे सुभेदार नीरज चोप्रा ने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला ऑलम्पिक च्या इतिहासात मैदानी खेळात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. १२१ वर्ष
एक स्वप्न जे भारतीयांनी आणि भारताचे दिग्गज मैदानी खेळाडू मिल्खा सिंग आणि पी.टी. उषा यांनी बघितलेलं होतं ते काल प्रत्यक्षात साकार झालं. नीरज ने त्या स्वप्नांचा मान ठेवताना आपलं पदक स्वर्गीय मिल्खा सिंग यांना समर्पित असल्याचं सांगून एक
आदरांजली भारताच्या एका सर्वश्रेष्ठ खेळाडूला वाहिली. कालच त्याच यश किती महत्वाचं आहे असेल याचा अंदाज कदाचित पी.टी.उषा यांना आला असेल ज्याचं पदक १९८४ च्या लॉस अँजेलिस ऑलम्पिक मधे अक्षरशः १ शतांश सेकंदांनी हुकलं होतं. त्या क्षणापासून गेल्या ३५ वर्षापेक्षा जास्त काळात त्या स्वतः आणि